तुम्ही हिस्स बघितला आहे का? हा तोच तो. मल्लिका शेरावतचा. बघितला आहे असे उघड उघड मान्य करणारे लोक या पृथ्वीतलावर फार कमी सापडतील. तसा हिस्स मीही बघितलेला नाही आहे. खरेच सांगतो. पण मल कथा महिती आहे. तिच ती जुनी कथा. इच्छाधारी नागिण आणि तिचा प्रतिशोध. विषयही तसा जुना आहे. यापुर्वी नागिन (सुनील दत्त, संजय खान, फिरोज खान रेखा, रीना रॉय फेम), जानी दुष्मन (डझनावारी हीरो फेम) असे बरेच चित्रपट नाग / नागिणींच्या प्रतिशोधावर येउन गेले आहेत.
या सगळ्या चित्रपटातले एक समान सूत्र असे आहे की हे सगळे चित्रपट नेहेमी मल्टिस्टारर असतात. (मल्लिका शेरावतचा हिस्स सोडुन. मल्लिका अशीही म्हणा सगळ्या गोष्टी 'अपवादाने' सिद्ध करणारी नायिका (???) आहे) या सगळ्या चित्रपटात याव्यतिरिक्तही एक समान सुत्र असते. त्यातला नाग किंवा नागिण जी कोण असते ती सुडाने पेटुन उठुन सदसद्विवेकबुद्धी बाजुला ठेवुन प्रतिशोध घेत असते. दिसला माणूस की घे चावा. कोणाल डोक्याला चावेल कोणाला पायाला कोणाला हाताला. जिथे जमेल तिथे चावायचे. त्यांच्या या चावरेपणाची चित्रपटात काम करणार्यांना भिती कशी वाटत नाही कोणास ठावूक. मल्लिका ने तर बिनधास्त चित्रपटात एका नागाच्या तोंडाला तोंड लावून चुंबन घेतले. वर हे चुंबन आपल्या आयुष्यातले सर्वोत्तम चुंबन होते असेही जाहीर केले. आता आपण चुंबनदृष्ये देणार नाही हे इम्रान हाशमी ने त्यानंतरच जाहीर केले म्हणे. त्याच्या आयुष्यात त्याचा असा अपमान त्याआधी कोणी केला नव्हता आणि त्यानंतर कोणी करावे अशी त्याची इच्छा नसावी. शिवाय चुंबनदृष्ये जास्त हिट होउ लागली तर आपल्यापेक्षा सापांना जास्त चांगले दिवस येतील अशीही त्याला भिती वाटली असावी (असेही जनावरं त्याच्यापेक्षा चांगला अभिनय करु शकतात असे बर्याच जणांचे मत आहे).
हे असले चित्रपट बघून माझ्या मनात सापांबद्दलची भिती वाढली आहे (त्यांच्यामुळे हे असले चित्रपट बॉलीवूड वाले काढतात म्हणून). कुत्र्यांपेक्षा सापाची भिती आताशा जास्त वाटते. कुत्रे वास्तविक जास्त दिसतात. शिवाय चावणे त्यांचा स्थायीभाव आहे. देशद्रोही मध्ये कसा कमाल खान भाषणे देउन चाव चाव चावतो तसेच. देशद्रोही वर उपाय आहे हो. चॅनेले बदलता येते (थेटरात जाउन बघण्याचे पाप करण्याची तर आपली हिंमतच नाही). कुत्र्यांच्या चावण्यावर काय करावे? माणसेही खुप आणि कुत्रेही खुप. दोघांच्याही नसबंदीचे सगळे उपाय नेहेमीच फोल ठरतात आणि कुत्रे चावत राहतात. पुर्वी १४ इंजेक्शने घ्यावी लागायची. ती ९,५.३ असे करत करत १ पर्यंत कमी आली आहेत. शिवाय ३ दिवस कुत्रा पिसाळलेला नाही याची खात्री करत फिरायचे ते वेगळेच. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे कुत्रा चावला म्हणुन फारसे लोक मरत नाहीत. साप चावल्यावर मरण्याची शक्यता जास्त. विषारी असेल तर खुपच जास्त. शिवाय कुत्र्याचे चावणे खुप कॉमन. त्याची आताशा बातमी देखील होत नाही. कुत्रा माणसाला चावला तर कसली बातमी, माणूस कुत्र्याला चावत असेल तर सांगा असे पत्रकारितेत नेहेमी शिकवले जाते म्हणे.
यामुळेच अगदी यामुळेच एक साप एरिट फॉक्स या इसरायली मॉडेल ला चावला त्यात लोकांना काही विशेष वाटले नाही. अश्याही फॉक्स बाई सापाबरोबर नैसर्गिक अवस्थेत पोज देत होत्या (फोटोसाठी. उगाच भलतेसलले विचार करु नका). हे सापाबरोबर फोटो काढण्याचे वेड काही मला कळत नाही. आपली मधू सप्रे झाली, हॉलीवूडच्या ढीगभर ललना झाल्या. अजगराला कवटाळुन फोटो काढायला यांना का एवढे आवडते ते काही कळत नाही. अर्रे (आमच्यासारखी) जितीजागती माणसे काय मेली आहेत काय? पण नाही आधी अजगर गुंडाळुन घ्यायचा आणि मग चावला की आरडाओरडा करायचा. बर बिचार्या सापाची त्यात आता काय चूक त्याला धोका वाटला की तो चावणार. माणसाचा जो सगळ्यात जवळचा अवयव असेल त्याला चावणार. आता फॉक्स बाईंनी सापाला शरीराभोवती गुंडाळले. त्यामुळे बाईंचा कुठला भाग सापच्या सगळ्यात जवळ असणार हे सांगायला नको. त्यात परत आधिक सुंदर दिसण्यासाठी बाईंनी शस्त्रक्रिया करवुन घेतली होती. अश्या परिस्थितीत सगळ्याचजणी काही आपल्या मल्लिकाबैंसारख्या नशिबवान नव्हत्या. मल्लिकेने घेतलेले चुंबन बहुधा सापाला भावले असावे. पण फॉक्स बाईंनी जेव्हा तोच प्रकार केला तेव्हा सापाचे डोके सटकले आणि त्याने त्याचा स्थायीभाव निभावत फॉक्स बाईंच्या शस्त्रक्रियेने कमावलेल्या अवयवावर हल्ला चढवला.
साप चावल्यामुले गर्भगळीत झालेल्या फॉक्स बाईंना इस्पितळात नेउन त्यांना टिटॅनसचे इंजेक्शन दिले गेले. सापाचे विष बहुधा काढले होते किंवा तो विषारी नव्हता. त्यामुळे बाई वाचल्या. पण .... पण....... साप बिचारा एवढा नशिबवान नव्हता. इतर लोकांप्रमाणेच त्यालाही माहित नव्हते की बाईंनी शस्त्रक्रिया करवुन घेउन सिलिकॉनच्या सहाय्याने स्वत:ला आधिक सुंदर बनवले आहे. त्या सिलिकॉनच्या विषाने बिचार्याचा बळी घेतला. लोहा लोहे को काटता है किंवा विषावर विषाचाच उपाय हे मी आजवर ऐकुन होतो पण एखाच्या सापाचा असा विषाने बळी घ्यावा हे पहिल्यांदाच ऐकले. ही बातमी आहे. न्युज ऑफ द मिलेनियम. कोण म्हणते बायका विषारी नसतात?
संपुर्ण बातमी वाचुन मला एकच प्रश्न पडला. फॉक्स बाईंचे सग्ळे बॉयफ्रेंड्स अजुन जिवंत असावेत का?
प्रतिक्रिया
22 Mar 2011 - 1:18 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
(असेही जनावरं त्याच्यापेक्षा चांगला अभिनय करु शकतात असे बर्याच जणांचे मत आहे).
हे अगदी खरे आहे!!
बाकी लेख मस्त जमलाय.
22 Mar 2011 - 1:29 pm | प्रास
मॉडेलचे नाव - ऑरिट फॉक्स
देश - इज्रायल
सापाची जात - बोआ
काय घडलं ते इथे बघा.....
ईश्वर मृत बोआच्या आत्म्याला शांती देओ.....
बाय द वे, बोआ सिलिकॉन पॉयझनिंगने मेला नाही असं इथे म्हणतायत.
खरं खोटं तो बोआच जाणे.....
22 Mar 2011 - 1:31 pm | नगरीनिरंजन
>>ही बातमी आहे. न्युज ऑफ द मिलेनियम.
अत्यंत सहमत!
>>कोण म्हणते बायका विषारी नसतात?
नो कॉमेंट्स.
>>संपुर्ण बातमी वाचुन मला एकच प्रश्न पडला. फॉक्स बाईंचे सग्ळे बॉयफ्रेंड्स अजुन जिवंत असावेत का?
सापाने जिथे दात रोवले तिथे कदाचित बॉयफ्रेंड्सना साधा हात लावायचीही परवानगी नसावी. सिलिकॉन बरंच महाग असतं म्हणे.
लेख वाचून भरपूर करमणूक झाली. या बातमीचा पत्ता तुम्हाला कुठुन लागला?
22 Mar 2011 - 1:47 pm | गणपा
हा हा हा धमाल लिहिलयस रे मृत्युंजया..
गेल्याच आठवड्यात आपल्या एका सज्जन मिपाकराने (मुद्दाम नाव सांगत नाही. नाही तर जाल लगेच त्यांच्या कडे लिंक मागायला. ;)) ह्या बातमीची लिंक दिली होती.
बाकी काय सांगावे त्या बिचार्या मुक्या (मुका घेणारा नव्हे. बोलता न येनारा म्हणुन मुका) सापा बद्दल वाईट वाटले.
22 Mar 2011 - 1:54 pm | मृत्युन्जय
प्रासाने लिंक दिलीच आहे. आम्हाला ही बातमी indiatimes.com या ;">(पॉर्न) साइट वरुन मिळाली ;)
22 Mar 2011 - 2:18 pm | गणेशा
मस्त लिहिले आहे
22 Mar 2011 - 2:35 pm | प.पु.
व्हिडो बघून हेवा वाटला हो सापाचा.....काय एकेकाचं नशिब असतं बघा..
![](http://media.bigoo.ws/content/gif/smiles/smiles_407.gif)
ड्वाले पाणावले अगदी..
22 Mar 2011 - 6:46 pm | मृत्युन्जय
धाग्याची साफ सफाइ झालेली दिसते आहे.
22 Mar 2011 - 8:18 pm | आनंदयात्री
>>पण फॉक्स बाईंनी जेव्हा तोच प्रकार केला तेव्हा सापाचे डोके सटकले आणि त्याने त्याचा स्थायीभाव निभावत फॉक्स बाईंच्या शस्त्रक्रियेने कमावलेल्या अवयवावर हल्ला चढवला.
=)) =)) =)) =))
अगागागा .. हहपुवा !!