रामजोशी ( सवाल-जवाब आणि हटातटाने बटा)

यशवंतकुलकर्णी's picture
यशवंतकुलकर्णी in जनातलं, मनातलं
15 Oct 2010 - 5:53 pm

चित्रपटः रामजोशी
गीतकारः ग.दि.मा.

सवाल: पंचाग सांगता जलम गमविला उगाच सांगता काय भीती....अन चंद्र कोरीपुढं तुमचा काजवा चमकुन चमकल तरी किती...पोथ्या पुराणं वाचुन-वाचुन अक्कल वाढली असंल अती...तर चंदराचं चांदण शीतल का उष्ण का सांगा हो मजप्रती
जवाब: क्षयी कोर तु सूर्यापुढची तेज ओकीसी किती गं....विरहामध्य उष्ण चांदणे...शितल पती संगती ग..

************

सवाल: पाण्यामधली एक अप्सरा सहज भाळली नरावर, अन कधी कोण ते सांगून द्यावे, सवालास उत्तर..जी..जी.जी..

जवाब: पुराणातली वांगी राहू द्या पुराणात असली रं...नागकन्यका उलपी पूर्वी पार्थावर भुलली रं....

***************

सवाल: पती सोडूनी सती, कोण ती रतली अविरत परक्यासी...खारट त्याचे चुंबन घेई....एका मुखाने शिवा दोन्हीसी...

जवाब: पतीत पावन त्रिभूवन जीवन मुनीजन बोलती स्वर्गधुनी...निंदू नको जरी सिंधूस मिळली...गंगा गंगाधर त्यजुनी...

*****************

सवाल: तुझीच दौलत परंतू दैवे भाळी तुझ्या नाही.. गं...तुझीच असूनी तुझ्या दृष्टीला दुर्मिळ ते पाही गं.... तुझ्याच पाशी जन्मभरी ते रम्य दोन पेले गं...सुधा, हलाहल आणि मदिरा यानी भरलेले गं....

जवाब: कवडी पांढरी, लोलक काळा- लाल जरा कोने गं...जगती मरती जीव झिंगती आतील नजरेने..गं....शुभ्र पांढरे असते अमृत...हलाहलाचा रंगच काळा....सांग गुलाबी नेत्रकडांहून मद्याचा का रंग निराळा...जगवी अमृत, मारी हलाहल, मद्य झिंगवी कैफात...काढून बघ हे गुण तिनही असती तुझीया डोळ्यात...

***************

सवाल: सूर्य उगवता गगनामाजी जळी कमलिनी का फुलती, पूर्ण चंद्रमा नभात दिसता, सागरास का ये भरती...?

जबाब: सूर्य उगवता...कमल उमलते...सिंधू उसळतो चंद्रा बघुनी...शुध्द प्रिती हे एकच कारण ज्ञात्यांनो घ्या ह्रदयी भरूनी

******************

अईक्क्का...

हटातटाने बटा
हटातटाने बटा रंगवून जटा धरीशी का शिरी
मठाची उठाठेव का तरी?
वनात अथवा जनात हो का मनात व्हावे बरी
हरीचे नाव भवांबुधी तरी
काय गळ्यात घालुन तुळशीची लाकडे
ही काय भवाला दुर करतील माकडे
बाहेर मिरवीशी आत हरीशी वाकडे
अशा भक्तीच्या रसा रहीत तु कसा म्हणविशी बुधा
हरीरस सांडुन घेसी दुधा
भला जन्म गा तुला लाधला
खुलास ह्रदयी बुधा धरीसी तरी हरीचा सेवक सुधा
शिळा टोपीवर शिळा पडो या बिळात करीशी जप
तथापि न होय हरीची कृपा
दर्भ मुष्टी ज्या गर्भी धरूनी निर्भर पशुची वपा
जाळीशी तिळा तांदुळा तुपा
दंड कमंडलु बंड माजवीसी मुंड मुंडिशी तपा
न सार्थक लटक्या सार्‍या गपा
ही बार बार तलवार येईल काय पुन्हा?
या दुर्लभ नरदेहात ठेवीसी कुणा?
भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा
वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्त ना द्विधा
सदा हरी कविरायावर फिदा
हटातटाने बटा रंगवून जटा धरीशी का शिरी
मठाची उठाठेव का तरी?

कलानृत्यसंगीतकथाधोरणमांडणीसंस्कृतीनाट्यधर्मभाषावाङ्मयइतिहासशब्दक्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

यशवंतकुलकर्णी's picture

15 Oct 2010 - 6:28 pm | यशवंतकुलकर्णी

सुंदरा मनामधी भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भांग
अरे गड्या हौस नाही पुरली म्हणूनी विरली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग... नारी गं...ग..ग..ग.. जी..जी..

जशी कळी सोनचाफ्याची न पडू पाप्याची दृष्टी सोप्याची नसेल ती नार
अति नाजुक तनु देखणी गुणाची खणी उभी नवखणी चढून सुकूमार... नारी गं...ग..ग..ग.. जी..जी..

जशी मन्मथ रति धाकटी, सिंहसम कटी, उभी एकटी, गळ्यामधी हार... अंगी तारूण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारिते लहर मदन तल्वार...
पायी पैंजण झुमकेदार, कुणाची दार, कोण सरदार हिचा भरतार... नारी गं...ग..ग..ग.. जी..जी..

नाकामधे बुलाख सुरती, चांदणी वरती, चमकती परती हिच्यापुढ्या फार, किनखाप अंगीचा लाल, हिजपुढे नको धनमाल
कविराज चमकतो हीर, लोकजाहीर इतर शाहीर काजवा वांग ... नारी गं...ग..ग..ग.. जी..जी..

गणेशा's picture

15 Oct 2010 - 6:32 pm | गणेशा

आवडले ..

धन्यवाद ..

आयला सही ..हे कलेक्शनपण हवेच होते ...

जशी कळी सोनचाफ्याची न पडू पाप्याची दृष्टी सोप्याची नसेल ती नार
अति नाजुक तनु देखणी गुणाची खणी उभी नवखणी चढून सुकूमार,

जशी मन्मथ रति धाकटी, सिंहसम कटी, उभी एकटी, गळ्यामधी हार...
अंगी तारूण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारिते लहर मदन तल्वार...
पायी पैंजण झुमकेदार, कुणाची दार, कोण सरदार हिचा भरतार..

नाकामधे बुलाख सुरती, चांदणी वरती, चमकती परती हिच्यापुढ्या फार,
किनखाप अंगीचा लाल, हिजपुढे नको धनमालकविराज चमकतो हीर,
लोकजाहीर इतर शाहीर काजवा वांग

अस्सल स्त्री-सौदंर्याच वर्णन, च्यायला देवानी आजकाल अस रुपं बनविणच बंद केलं आहे की काय अशी शंका येते मनात

रामजोशी फॅन
सुहास

भाऊ पाटील's picture

15 Oct 2010 - 7:24 pm | भाऊ पाटील

रामजोशींच्या रचनांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद

अवांतर :
पुर्वी सिंहसम कटी हे पुरुषांच्यासाठी वापरले जायचे. रघुकुलातल्या राजा दिलीपच्या वर्णनात सिंहसम कटी म्हटलेले आहे.
आठवी-नववीत हा श्लोक होता असे आठवतय. येथील संस्क्रूत (कसं लिहायच हे?) जाणकार श्लोक देऊ शकतील.

गणपा's picture

15 Oct 2010 - 7:37 pm | गणपा

sMskRut = संस्कृत

भाऊ पाटील's picture

15 Oct 2010 - 7:50 pm | भाऊ पाटील

संस्कृत चा उगाच स्क्रू पिळला गेला.

यशवंतकुलकर्णी's picture

15 Oct 2010 - 8:00 pm | यशवंतकुलकर्णी

संस्कृत चा स्कृ पिळला ??
=) ) =) ) =) )

ते फार अवघड काम आहे..

देव: देवो देवः -- प्रथमा
देवं देवे देवान... द्वितीया
हे तर फारच अवघड.

हे शब्द लिहीताना अजूनही कानात छड्यांचेच आवाज घुमत आहेत (कारण अजूनही ते चुकीचंच आहे)

सुंदरा शिवायही पुर्वी कुठेतरी सिंहकटी हे सुंदरतेचे प्रतिक म्हणुन वाचल्याचे आठवते, पण नेमके कुठे ते आठवत नाही.मोल्सवर्थामध्येही सिंहकटीचा अर्थ तसाच आहे.

पण दिलीपबद्दल वाचल्यानंतर विचार आला, सिंहकटी म्हणण्यामागे नाजुक अपेक्षित नसुन कमनीय अशी असावी. पुरुषाचे वर्णन करताना (सिंह, सहसा मोठे डोके पण छोटी कंबर) सिंहासारखी म्हणजे कमावलेलीच अपेक्षित असावे. आजच्या सुंदरतेच्या व्याख्येमध्येही कंबर छोटी ठेवण्याकडे कल असतोच. (कुस्तीगीर सोडले तर बरेचसे सौष्ठवपटु कंबर लहानच ठेवतात.)

जाता जाता, कुणीतरी हटातटाने बटा आणी सुंदरा चे रसग्रहण करा राव, काही शब्द पेरुच्या बी सारखे छळताहेत!

चिंतामणी's picture

18 Oct 2010 - 9:02 am | चिंतामणी

अस्सल स्त्री-सौदंर्याच वर्णन, च्यायला देवानी आजकाल अस रुपं बनविणच बंद केलं आहे की काय अशी शंका येते मनात

रामजोशी फॅन
सुहास

सहमत

थांकु, सुंदरा मनामध्येचा व्हिडो हवा होता केव्हाचा.

प्रभो's picture

15 Oct 2010 - 6:47 pm | प्रभो

मस्त रे!!

अवलिया's picture

15 Oct 2010 - 6:48 pm | अवलिया

मस्त !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Oct 2010 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लावण्यामधील सवाल-जवाब हा भारीच प्रकार. रामजोशी म्हणाल्यावर 'सुंदरा मनामधी भरली'चीच आठवण होते. स्त्री सौंदर्याचे वर्णन करण्याच्या बाबतीत शाहिरांनी हातचे काहीच ठेवले नाही असे वाटते.

रामजोशींच्या रचनांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यू.....!

-दिलीप बिरुटे

खुप दिवसांनी आठवण झाली या सवाला-जवाबाची.
लहान असताना देमार लावणी पटांमध्ये हाच काय तो आवडता भाग असायचा :)

तर्री's picture

15 Oct 2010 - 7:09 pm | तर्री

ग.दि.मांच्या प्रतिभेला दंडवत |
अर्थात ह्यापूर्वीच अनेकदा घडला असला तरी , "राम जोशी" नंतर परत .....एक ते रामायण आणि एक हे "रामयण्".केवळ अद्भुत .

यशवंत राव , आभार ह्या धाग्याबद्दल.

मेघवेडा's picture

15 Oct 2010 - 7:12 pm | मेघवेडा

मस्त! सर्वच भारी आहेत!

प्राजु's picture

15 Oct 2010 - 7:57 pm | प्राजु

सु रे ख!!
धन्यवाद.

पैसा's picture

15 Oct 2010 - 8:01 pm | पैसा

खूप खूप दिवसांनी हंसा वाडकरला बघून छान वाटलं. गाणी तर एकापेक्षा एक आहेतच!

इन्द्र्राज पवार's picture

15 Oct 2010 - 8:29 pm | इन्द्र्राज पवार

सुंदरच....हे कलेक्शन असलेच पाहिजे असे वाटते... पण निदान आता ते लिखित स्वरूपात इथे आले आहे; हेही नसे थोडके. मला वाटते नगरकरांचीच 'अमर भूपाळी' मधील याच लकबीची (सुंदरा मनामधी भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भांग) एक लावणी आहे, जिचे सुरूवातीचे बोल आहेत :

"सुंदरा म्हणे दिलवरा राजअंबीरा...
जाई जुईच्या फुला राजसा,
तुला कुठं पाहू न् तुला कुठं पाहू
प्राणसख्या प्रियकरा राजसा...तुला कुठं पाहु..."

~ पहिल्या ओळीतील शेवटच्या 'राजअंबीरा...' बद्दल साशंक आहे, म्हणजे नेमका तोच शब्द आहे की अन्य. श्री.यशवंतरावांना माहित असेल.

इन्द्रा

कवटी's picture

15 Oct 2010 - 8:49 pm | कवटी

यशवंतराव...
धन्यवाद

पाषाणभेद's picture

15 Oct 2010 - 9:03 pm | पाषाणभेद

>> हटातटाने बटा
हे कवन शालेय अभ्यासक्रमात होते.
छानच ओळख करून दिली आहे तुम्ही. तुमचा व्यासंग मोठा आहे.

यशवंतकुलकर्णी's picture

15 Oct 2010 - 9:17 pm | यशवंतकुलकर्णी

सवाल-जवाब/ लावणी/ गाण्याचा आनंद घेऊन धन्यवाद दिलेल्या गणेशा, सुहास, भाऊ पाटील, गणपाशेठ, नाईल, प्रभो, अवलिया, प्रा.डॉ. बिरूटे सर, तर्री, मेघवेडा, प्राजू, इंद्रराज, कवटी, पाषाणभेद यांना आणि पुढे आनंद घेणार्‍या सर्वांना खूपखूप धन्यवाद.

एन्जॉय मेनी-मेनी टाईम्स !!!!!

भडकमकर मास्तर's picture

15 Oct 2010 - 11:43 pm | भडकमकर मास्तर

उत्तम लेख.. आणि विडीओ लिन्क्स मस्तच..
धन्यवाद

एक चूक असावी असे वाटते..
हटातटाने बटा नसून हटातटाने पटा असावे असे वाटते..
१९९१ ला दहावी पास झालो त्या पुस्तकात होती कवित...

पटा म्हणजे वस्त्रे असा अर्थ असावा..
जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा...

Nile's picture

16 Oct 2010 - 12:36 am | Nile

पटाच ऐकल्यासारखे आठवते, पण मला वाटले मीच चुकीचे ऐकले असेन म्हणुन मत नोंदवले नाही.

मस्त कलंदर's picture

16 Oct 2010 - 9:53 am | मस्त कलंदर

हो ते 'पटा'च आहे. हे बहुतेक भारूड प्रकारातले गीत आहे. (चुभूदेघे. शाळेत वाचलेल्या सगळ्याच गोष्टी बरोबर आठवतात असे नाही.) भोंदूगिरी करणार्‍यांवर ते 'हटातटाने पटा रंगवूनी जटा धरिशी का शिरी? मठाची उठाठेव का तरी?' असे म्हणतात.

इन्द्र्राज पवार's picture

16 Oct 2010 - 12:37 pm | इन्द्र्राज पवार

श्री.भडकमकरांचे मत आणि स्मरण योग्यच आहे. 'पटा' च हवे आहे. पटा = वस्त्र [यावरून 'दुपटा' निपजला ~ त्यानंतर दुपट्टा...इ.]

उत्तर भारतात सतरंजीला 'पटाई' असे म्हणतात....म्हणजे या पटाईचा उगम 'पटा' त असणार.

आता ती तुनळी पुन्हा पाहिली तर शाहीर त्या तावातावाने भांडणासाठी आलेल्या साधूच्या अवताराकडे पाहूनच 'हटातटाने...' सुरू करतो अन् नेमका 'पटा' च्या वेळी साधूच्या कपड्याकडे निर्देश करतो.

इन्द्रा

स्वाती२'s picture

16 Oct 2010 - 1:40 am | स्वाती२

धन्यवाद!

शिल्पा ब's picture

16 Oct 2010 - 4:37 am | शिल्पा ब

धमाल...लहानपणी हे सिनेमे पाहिल्याचे आठवते...पूर्वी खूपशा सिनेमामध्ये सवाल जवाब असत...छान वाटे ऐकायला...आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
हटातटाने बटा हे गाणं खूपच आवडीचं आहे.

सहज's picture

16 Oct 2010 - 6:34 am | सहज

मस्त!!

लोकगीत लिहिताना किती अभ्यास करावा लागत असे याच सवाल जवाब हे उत्तम उदाहरण!

धन्यवाद या धाग्याबद्दल , अन सर्व जाणकारांनी घतलेल्या ज्ञानाबद्दल.

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Oct 2010 - 9:16 am | बिपिन कार्यकर्ते

छानच!

साधा_सरळ's picture

22 Oct 2010 - 4:58 pm | साधा_सरळ

धन्यवाद!
वसन्त देसाई आणि जयराम शिलेदार ह्या॑च्या प्रतिभेलाही मुजरा!
शाळेत आमच्या मास्तरा॑नी 'हटातटाने पटा'चा अर्थ अगदी समरसून समजवला होता, त्याची पण आठवण झाली.