✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रामजोशी ( सवाल-जवाब आणि हटातटाने बटा)

य
यशवंतकुलकर्णी यांनी
Fri, 10/15/2010 - 17:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12884 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

सुंदरा मनामधी भरली

यशवंतकुलकर्णी
Fri, 10/15/2010 - 18:28 नवीन
सुंदरा मनामधी भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भांग अरे गड्या हौस नाही पुरली म्हणूनी विरली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग... नारी गं...ग..ग..ग.. जी..जी.. जशी कळी सोनचाफ्याची न पडू पाप्याची दृष्टी सोप्याची नसेल ती नार अति नाजुक तनु देखणी गुणाची खणी उभी नवखणी चढून सुकूमार... नारी गं...ग..ग..ग.. जी..जी.. जशी मन्मथ रति धाकटी, सिंहसम कटी, उभी एकटी, गळ्यामधी हार... अंगी तारूण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारिते लहर मदन तल्वार... पायी पैंजण झुमकेदार, कुणाची दार, कोण सरदार हिचा भरतार... नारी गं...ग..ग..ग.. जी..जी.. नाकामधे बुलाख सुरती, चांदणी वरती, चमकती परती हिच्यापुढ्या फार, किनखाप अंगीचा लाल, हिजपुढे नको धनमाल कविराज चमकतो हीर, लोकजाहीर इतर शाहीर काजवा वांग ... नारी गं...ग..ग..ग.. जी..जी..
  • Log in or register to post comments

आवडले .. धन्यवाद ..

गणेशा
Fri, 10/15/2010 - 18:32 नवीन
आवडले .. धन्यवाद ..
  • Log in or register to post comments

आयला सही ..हे कलेक्शनपण हवेच

सुहास..
Fri, 10/15/2010 - 18:36 नवीन
आयला सही ..हे कलेक्शनपण हवेच होते ... जशी कळी सोनचाफ्याची न पडू पाप्याची दृष्टी सोप्याची नसेल ती नार अति नाजुक तनु देखणी गुणाची खणी उभी नवखणी चढून सुकूमार, जशी मन्मथ रति धाकटी, सिंहसम कटी, उभी एकटी, गळ्यामधी हार... अंगी तारूण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारिते लहर मदन तल्वार... पायी पैंजण झुमकेदार, कुणाची दार, कोण सरदार हिचा भरतार.. नाकामधे बुलाख सुरती, चांदणी वरती, चमकती परती हिच्यापुढ्या फार, किनखाप अंगीचा लाल, हिजपुढे नको धनमालकविराज चमकतो हीर, लोकजाहीर इतर शाहीर काजवा वांग अस्सल स्त्री-सौदंर्याच वर्णन, च्यायला देवानी आजकाल अस रुपं बनविणच बंद केलं आहे की काय अशी शंका येते मनात रामजोशी फॅन सुहास
  • Log in or register to post comments

सिंहसम कटी

भाऊ पाटील
Fri, 10/15/2010 - 19:24 नवीन
रामजोशींच्या रचनांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद अवांतर : पुर्वी सिंहसम कटी हे पुरुषांच्यासाठी वापरले जायचे. रघुकुलातल्या राजा दिलीपच्या वर्णनात सिंहसम कटी म्हटलेले आहे. आठवी-नववीत हा श्लोक होता असे आठवतय. येथील संस्क्रूत (कसं लिहायच हे?) जाणकार श्लोक देऊ शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मदत

गणपा
Fri, 10/15/2010 - 19:37 नवीन
sMskRut = संस्कृत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊ पाटील

धन्यवाद गणपाशेठ!

भाऊ पाटील
Fri, 10/15/2010 - 19:50 नवीन
संस्कृत चा उगाच स्क्रू पिळला गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

संस्कृत चा स्कृ पिळला ?? =) )

यशवंतकुलकर्णी
Fri, 10/15/2010 - 20:00 नवीन
संस्कृत चा स्कृ पिळला ?? =) ) =) ) =) ) ते फार अवघड काम आहे.. देव: देवो देवः -- प्रथमा देवं देवे देवान... द्वितीया हे तर फारच अवघड. हे शब्द लिहीताना अजूनही कानात छड्यांचेच आवाज घुमत आहेत (कारण अजूनही ते चुकीचंच आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊ पाटील

सुंदरा शिवायही पुर्वी कुठेतरी

Nile
Fri, 10/15/2010 - 21:54 नवीन
सुंदरा शिवायही पुर्वी कुठेतरी सिंहकटी हे सुंदरतेचे प्रतिक म्हणुन वाचल्याचे आठवते, पण नेमके कुठे ते आठवत नाही.मोल्सवर्थामध्येही सिंहकटीचा अर्थ तसाच आहे. पण दिलीपबद्दल वाचल्यानंतर विचार आला, सिंहकटी म्हणण्यामागे नाजुक अपेक्षित नसुन कमनीय अशी असावी. पुरुषाचे वर्णन करताना (सिंह, सहसा मोठे डोके पण छोटी कंबर) सिंहासारखी म्हणजे कमावलेलीच अपेक्षित असावे. आजच्या सुंदरतेच्या व्याख्येमध्येही कंबर छोटी ठेवण्याकडे कल असतोच. (कुस्तीगीर सोडले तर बरेचसे सौष्ठवपटु कंबर लहानच ठेवतात.) जाता जाता, कुणीतरी हटातटाने बटा आणी सुंदरा चे रसग्रहण करा राव, काही शब्द पेरुच्या बी सारखे छळताहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊ पाटील

सहमत

चिंतामणी
Mon, 10/18/2010 - 09:02 नवीन
अस्सल स्त्री-सौदंर्याच वर्णन, च्यायला देवानी आजकाल अस रुपं बनविणच बंद केलं आहे की काय अशी शंका येते मनात रामजोशी फॅन सुहास सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

थांकु, सुंदरा मनामध्येचा

Nile
Fri, 10/15/2010 - 18:47 नवीन
थांकु, सुंदरा मनामध्येचा व्हिडो हवा होता केव्हाचा.
  • Log in or register to post comments

मस्त रे!!

प्रभो
Fri, 10/15/2010 - 18:47 नवीन
मस्त रे!!
  • Log in or register to post comments

मस्त !!

अवलिया
Fri, 10/15/2010 - 18:48 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments

लावण्यामधील सवाल-जवाब हा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/15/2010 - 18:48 नवीन
लावण्यामधील सवाल-जवाब हा भारीच प्रकार. रामजोशी म्हणाल्यावर 'सुंदरा मनामधी भरली'चीच आठवण होते. स्त्री सौंदर्याचे वर्णन करण्याच्या बाबतीत शाहिरांनी हातचे काहीच ठेवले नाही असे वाटते. रामजोशींच्या रचनांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यू.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खुप दिवसांनी आठवण झाली या

गणपा
Fri, 10/15/2010 - 18:57 नवीन
खुप दिवसांनी आठवण झाली या सवाला-जवाबाची. लहान असताना देमार लावणी पटांमध्ये हाच काय तो आवडता भाग असायचा :)
  • Log in or register to post comments

ग.दि.मा ना सा.द.

तर्री
Fri, 10/15/2010 - 19:09 नवीन
ग.दि.मांच्या प्रतिभेला दंडवत | अर्थात ह्यापूर्वीच अनेकदा घडला असला तरी , "राम जोशी" नंतर परत .....एक ते रामायण आणि एक हे "रामयण्".केवळ अद्भुत . यशवंत राव , आभार ह्या धाग्याबद्दल.
  • Log in or register to post comments

मस्त! सर्वच भारी आहेत!

मेघवेडा
Fri, 10/15/2010 - 19:12 नवीन
मस्त! सर्वच भारी आहेत!
  • Log in or register to post comments

सु रे ख!! धन्यवाद.

प्राजु
Fri, 10/15/2010 - 19:57 नवीन
सु रे ख!! धन्यवाद.
  • Log in or register to post comments

हंसा वाडकर

पैसा
Fri, 10/15/2010 - 20:01 नवीन
खूप खूप दिवसांनी हंसा वाडकरला बघून छान वाटलं. गाणी तर एकापेक्षा एक आहेतच!
  • Log in or register to post comments

सुंदरा म्हणे दिलवरा....

इन्द्र्राज पवार
Fri, 10/15/2010 - 20:29 नवीन
सुंदरच....हे कलेक्शन असलेच पाहिजे असे वाटते... पण निदान आता ते लिखित स्वरूपात इथे आले आहे; हेही नसे थोडके. मला वाटते नगरकरांचीच 'अमर भूपाळी' मधील याच लकबीची (सुंदरा मनामधी भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भांग) एक लावणी आहे, जिचे सुरूवातीचे बोल आहेत : "सुंदरा म्हणे दिलवरा राजअंबीरा... जाई जुईच्या फुला राजसा, तुला कुठं पाहू न् तुला कुठं पाहू प्राणसख्या प्रियकरा राजसा...तुला कुठं पाहु..." ~ पहिल्या ओळीतील शेवटच्या 'राजअंबीरा...' बद्दल साशंक आहे, म्हणजे नेमका तोच शब्द आहे की अन्य. श्री.यशवंतरावांना माहित असेल. इन्द्रा
  • Log in or register to post comments

यशवंतराव... धन्यवाद

कवटी
Fri, 10/15/2010 - 20:49 नवीन
यशवंतराव... धन्यवाद
  • Log in or register to post comments

>> हटातटाने बटा हे कवन शालेय

पाषाणभेद
Fri, 10/15/2010 - 21:03 नवीन
>> हटातटाने बटा हे कवन शालेय अभ्यासक्रमात होते. छानच ओळख करून दिली आहे तुम्ही. तुमचा व्यासंग मोठा आहे.
  • Log in or register to post comments

एन्जॉय मेनी-मेनी टाईम्स !!!!!

यशवंतकुलकर्णी
Fri, 10/15/2010 - 21:17 नवीन
सवाल-जवाब/ लावणी/ गाण्याचा आनंद घेऊन धन्यवाद दिलेल्या गणेशा, सुहास, भाऊ पाटील, गणपाशेठ, नाईल, प्रभो, अवलिया, प्रा.डॉ. बिरूटे सर, तर्री, मेघवेडा, प्राजू, इंद्रराज, कवटी, पाषाणभेद यांना आणि पुढे आनंद घेणार्‍या सर्वांना खूपखूप धन्यवाद. एन्जॉय मेनी-मेनी टाईम्स !!!!!
  • Log in or register to post comments

उत्तम लेख.. आणि विडीओ लिन्क्स

भडकमकर मास्तर
Fri, 10/15/2010 - 23:43 नवीन
उत्तम लेख.. आणि विडीओ लिन्क्स मस्तच.. धन्यवाद एक चूक असावी असे वाटते.. हटातटाने बटा नसून हटातटाने पटा असावे असे वाटते.. १९९१ ला दहावी पास झालो त्या पुस्तकात होती कवित... पटा म्हणजे वस्त्रे असा अर्थ असावा.. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा...
  • Log in or register to post comments

+१

Nile
Sat, 10/16/2010 - 00:36 नवीन
पटाच ऐकल्यासारखे आठवते, पण मला वाटले मीच चुकीचे ऐकले असेन म्हणुन मत नोंदवले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

हो ते 'पटा'च आहे. हे बहुतेक

मस्त कलंदर
Sat, 10/16/2010 - 09:53 नवीन
हो ते 'पटा'च आहे. हे बहुतेक भारूड प्रकारातले गीत आहे. (चुभूदेघे. शाळेत वाचलेल्या सगळ्याच गोष्टी बरोबर आठवतात असे नाही.) भोंदूगिरी करणार्‍यांवर ते 'हटातटाने पटा रंगवूनी जटा धरिशी का शिरी? मठाची उठाठेव का तरी?' असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

पटा = वस्त्र

इन्द्र्राज पवार
Sat, 10/16/2010 - 12:37 नवीन
श्री.भडकमकरांचे मत आणि स्मरण योग्यच आहे. 'पटा' च हवे आहे. पटा = वस्त्र [यावरून 'दुपटा' निपजला ~ त्यानंतर दुपट्टा...इ.] उत्तर भारतात सतरंजीला 'पटाई' असे म्हणतात....म्हणजे या पटाईचा उगम 'पटा' त असणार. आता ती तुनळी पुन्हा पाहिली तर शाहीर त्या तावातावाने भांडणासाठी आलेल्या साधूच्या अवताराकडे पाहूनच 'हटातटाने...' सुरू करतो अन् नेमका 'पटा' च्या वेळी साधूच्या कपड्याकडे निर्देश करतो. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

धन्यवाद!

स्वाती२
Sat, 10/16/2010 - 01:40 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

धमाल...लहानपणी हे सिनेमे

शिल्पा ब
Sat, 10/16/2010 - 04:37 नवीन
धमाल...लहानपणी हे सिनेमे पाहिल्याचे आठवते...पूर्वी खूपशा सिनेमामध्ये सवाल जवाब असत...छान वाटे ऐकायला...आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. हटातटाने बटा हे गाणं खूपच आवडीचं आहे.
  • Log in or register to post comments

सवाल जवाब

सहज
Sat, 10/16/2010 - 06:34 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

लोकगीत लिहिताना किती अभ्यास

स्पंदना
Mon, 10/18/2010 - 08:46 नवीन
लोकगीत लिहिताना किती अभ्यास करावा लागत असे याच सवाल जवाब हे उत्तम उदाहरण! धन्यवाद या धाग्याबद्दल , अन सर्व जाणकारांनी घतलेल्या ज्ञानाबद्दल.
  • Log in or register to post comments

छानच!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/18/2010 - 09:16 नवीन
छानच!
  • Log in or register to post comments

धन्यवाद! वसन्त देसाई आणि

साधा_सरळ
Fri, 10/22/2010 - 16:58 नवीन
धन्यवाद! वसन्त देसाई आणि जयराम शिलेदार ह्या॑च्या प्रतिभेलाही मुजरा! शाळेत आमच्या मास्तरा॑नी 'हटातटाने पटा'चा अर्थ अगदी समरसून समजवला होता, त्याची पण आठवण झाली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा