रामजोशींच्या रचनांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद
अवांतर :
पुर्वी सिंहसम कटी हे पुरुषांच्यासाठी वापरले जायचे. रघुकुलातल्या राजा दिलीपच्या वर्णनात सिंहसम कटी म्हटलेले आहे.
आठवी-नववीत हा श्लोक होता असे आठवतय. येथील संस्क्रूत (कसं लिहायच हे?) जाणकार श्लोक देऊ शकतील.
संस्कृत चा स्कृ पिळला ??
=) ) =) ) =) )
ते फार अवघड काम आहे..
देव: देवो देवः -- प्रथमा
देवं देवे देवान... द्वितीया
हे तर फारच अवघड.
हे शब्द लिहीताना अजूनही कानात छड्यांचेच आवाज घुमत आहेत (कारण अजूनही ते चुकीचंच आहे)
सुंदरा शिवायही पुर्वी कुठेतरी सिंहकटी हे सुंदरतेचे प्रतिक म्हणुन वाचल्याचे आठवते, पण नेमके कुठे ते आठवत नाही.मोल्सवर्थामध्येही सिंहकटीचा अर्थ तसाच आहे.
पण दिलीपबद्दल वाचल्यानंतर विचार आला, सिंहकटी म्हणण्यामागे नाजुक अपेक्षित नसुन कमनीय अशी असावी. पुरुषाचे वर्णन करताना (सिंह, सहसा मोठे डोके पण छोटी कंबर) सिंहासारखी म्हणजे कमावलेलीच अपेक्षित असावे. आजच्या सुंदरतेच्या व्याख्येमध्येही कंबर छोटी ठेवण्याकडे कल असतोच. (कुस्तीगीर सोडले तर बरेचसे सौष्ठवपटु कंबर लहानच ठेवतात.)
जाता जाता, कुणीतरी हटातटाने बटा आणी सुंदरा चे रसग्रहण करा राव, काही शब्द पेरुच्या बी सारखे छळताहेत!
लावण्यामधील सवाल-जवाब हा भारीच प्रकार. रामजोशी म्हणाल्यावर 'सुंदरा मनामधी भरली'चीच आठवण होते. स्त्री सौंदर्याचे वर्णन करण्याच्या बाबतीत शाहिरांनी हातचे काहीच ठेवले नाही असे वाटते.
रामजोशींच्या रचनांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यू.....!
-दिलीप बिरुटे
ग.दि.मांच्या प्रतिभेला दंडवत |
अर्थात ह्यापूर्वीच अनेकदा घडला असला तरी , "राम जोशी" नंतर परत .....एक ते रामायण आणि एक हे "रामयण्".केवळ अद्भुत .
यशवंत राव , आभार ह्या धाग्याबद्दल.
सुंदरच....हे कलेक्शन असलेच पाहिजे असे वाटते... पण निदान आता ते लिखित स्वरूपात इथे आले आहे; हेही नसे थोडके. मला वाटते नगरकरांचीच 'अमर भूपाळी' मधील याच लकबीची (सुंदरा मनामधी भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भांग) एक लावणी आहे, जिचे सुरूवातीचे बोल आहेत :
"सुंदरा म्हणे दिलवरा राजअंबीरा...
जाई जुईच्या फुला राजसा,
तुला कुठं पाहू न् तुला कुठं पाहू
प्राणसख्या प्रियकरा राजसा...तुला कुठं पाहु..."
~ पहिल्या ओळीतील शेवटच्या 'राजअंबीरा...' बद्दल साशंक आहे, म्हणजे नेमका तोच शब्द आहे की अन्य. श्री.यशवंतरावांना माहित असेल.
इन्द्रा
सवाल-जवाब/ लावणी/ गाण्याचा आनंद घेऊन धन्यवाद दिलेल्या गणेशा, सुहास, भाऊ पाटील, गणपाशेठ, नाईल, प्रभो, अवलिया, प्रा.डॉ. बिरूटे सर, तर्री, मेघवेडा, प्राजू, इंद्रराज, कवटी, पाषाणभेद यांना आणि पुढे आनंद घेणार्या सर्वांना खूपखूप धन्यवाद.
एन्जॉय मेनी-मेनी टाईम्स !!!!!
उत्तम लेख.. आणि विडीओ लिन्क्स मस्तच..
धन्यवाद
एक चूक असावी असे वाटते..
हटातटाने बटा नसून हटातटाने पटा असावे असे वाटते..
१९९१ ला दहावी पास झालो त्या पुस्तकात होती कवित...
पटा म्हणजे वस्त्रे असा अर्थ असावा..
जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा...
हो ते 'पटा'च आहे. हे बहुतेक भारूड प्रकारातले गीत आहे. (चुभूदेघे. शाळेत वाचलेल्या सगळ्याच गोष्टी बरोबर आठवतात असे नाही.) भोंदूगिरी करणार्यांवर ते 'हटातटाने पटा रंगवूनी जटा धरिशी का शिरी? मठाची उठाठेव का तरी?' असे म्हणतात.
श्री.भडकमकरांचे मत आणि स्मरण योग्यच आहे. 'पटा' च हवे आहे. पटा = वस्त्र [यावरून 'दुपटा' निपजला ~ त्यानंतर दुपट्टा...इ.]
उत्तर भारतात सतरंजीला 'पटाई' असे म्हणतात....म्हणजे या पटाईचा उगम 'पटा' त असणार.
आता ती तुनळी पुन्हा पाहिली तर शाहीर त्या तावातावाने भांडणासाठी आलेल्या साधूच्या अवताराकडे पाहूनच 'हटातटाने...' सुरू करतो अन् नेमका 'पटा' च्या वेळी साधूच्या कपड्याकडे निर्देश करतो.
इन्द्रा
धन्यवाद!
वसन्त देसाई आणि जयराम शिलेदार ह्या॑च्या प्रतिभेलाही मुजरा!
शाळेत आमच्या मास्तरा॑नी 'हटातटाने पटा'चा अर्थ अगदी समरसून समजवला होता, त्याची पण आठवण झाली.
प्रतिक्रिया
सुंदरा मनामधी भरली
आवडले .. धन्यवाद ..
आयला सही ..हे कलेक्शनपण हवेच
सिंहसम कटी
मदत
धन्यवाद गणपाशेठ!
संस्कृत चा स्कृ पिळला ?? =) )
सुंदरा शिवायही पुर्वी कुठेतरी
सहमत
थांकु, सुंदरा मनामध्येचा
मस्त रे!!
मस्त !!
लावण्यामधील सवाल-जवाब हा
खुप दिवसांनी आठवण झाली या
ग.दि.मा ना सा.द.
मस्त! सर्वच भारी आहेत!
सु रे ख!! धन्यवाद.
हंसा वाडकर
सुंदरा म्हणे दिलवरा....
यशवंतराव... धन्यवाद
>> हटातटाने बटा हे कवन शालेय
एन्जॉय मेनी-मेनी टाईम्स !!!!!
उत्तम लेख.. आणि विडीओ लिन्क्स
+१
हो ते 'पटा'च आहे. हे बहुतेक
पटा = वस्त्र
धन्यवाद!
धमाल...लहानपणी हे सिनेमे
सवाल जवाब
लोकगीत लिहिताना किती अभ्यास
छानच!
धन्यवाद! वसन्त देसाई आणि