.

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
30 Jan 2019 - 10:07 pm

नमस्कार मिपाकरांनो,

दिनांक २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा मराठी भाषा दिन आपण मिपावर शतशब्दकथा स्पर्धेच्या रुपात साजरा करणार आहोत. विषयाला कोणतेही बंधन नाहीये, पण स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत.
१. स्पर्धा १ फेब्रुवारी २०१९ रोजी ००.०० भाप्रवे सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१९ रोजी २३.५९ भाप्रवे संपेल.
२. स्पर्धकांनी आपली कथा साहित्य संपादक या आयडीला व्यनिने पाठवायची आहे.
साहित्य संपादकांना व्यनि पाठवण्यासाठी क्लिक करा.
कोणत्याही साहित्य संपादकाला वैयक्तिक व्यनि किंवा मिसळपाव अथवा सासं च्या इमेल आयडीवर किंवा अन्य कोणत्याही दुसऱ्या मार्गे कथा पाठवू नये.
३. प्रत्येक व्यक्ती एक शशक पाठवू शकते. एकापेक्षा जास्त शशक पाठवल्यास सर्वात प्रथम आलेल्या शशकनंतरच्या सगळ्या शशक रद्द समजल्या जातील.
४. ०१ फेब्रुवारी २०१९ ते २१ फेब्रुवारी २०१९ या काळात दर चोवीस तासांतून एकदा साहित्य संपादक आयडी आलेल्या कथा स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल. मूळ लेखकाचं नाव जाहीर होणार नाही. ("कथा बघून मत देण्याऐवजी आयडी बघून मत देतात" हा आक्षेप घेतला जाऊ नये म्हणून हे करण्यात आलेलं आहे.). स्पर्धा संपल्यावर लेखकांची ओळख जाहिर करायचीचं आहे.
५. मूळ लेखकाने आपली ओळख जाहीर करू नये अशी अपेक्षा आहे. कथेच्या धाग्यावर, मिपावरच्या सार्वजनिक जागेत (अन्य धाग्यांवर किंवा खरडफळ्यावर), मिपाच्या फेसबुक पानावर किंवा ट्विटर अकाऊंटवर आपली ओळख कथालेखक म्हणून जाहीर केल्यास ती कथा रद्दबातल ठरवून स्पर्धेतून बाद केली जाईल.
६. साहित्य संपादक कथा प्रकाशित करताना मुळाबरहुकूम (म्हणजे जशी आली तशी) करतील. मुद्रितशोधन किंवा अन्य कोणतेही संपादकीय संस्कार केले जाणार नाहीत. स्पर्धेमधल्या शतशब्दकथेमध्ये व्याकरणाचे नियम, शुद्धलेखन, मुद्रितशोधनाची वगैरेची जबाबदारी संपूर्णपणे स्पर्धकाची असेल.
७. शशक ही (शीर्षक वगळता) बरोब्बर शंभर शब्दांत लिहिली जाणं अपेक्षित आहे. आलेली शशक जशीच्या तशी "मायक्रोसॉफ्ट वर्ड" मध्ये चिकटवून वर्डकाऊंट पाहिला जाईल. शंभरपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास स्पर्धेतून बाद समजली जाईल आणि प्रकाशित होणार नाही.
८. तसंच, कथेत कोणतीही चित्रं, दृक्-श्राव्य दुवे, फॉरमॅटिंग वगैरे असल्यास ते वगळून कथा प्रकाशित केली जाईल.
९. जातिधर्माला दुखावणारं वा अश्लील लेखन आल्यास कथा स्पर्धेसाठी न घ्यायचा निर्णय संपादकीय अधिकारात घेतला जाईल. प्रवेशिका नाकारायचा अधिकार साहित्य संपादक राखून ठेवत आहेत. स्पर्धा संपल्यावर लेखक नियमबाह्य कथा स्वतःच्या जबाबदारीवर प्रकाशित करू शकतात.
१०. कथेला आपण देऊ इच्छित असणारं नावं व्यनिच्या विषयामधे लिहिलेलं असावं.
११. कुठेही पूर्वप्रकाशित कथा स्वीकारली जाणार नाही.
१२. कथा आधारित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख कथेच्या शेवटी करावा. हे शब्द १०० मध्ये मोजले जाणार नाहीत.

मतदान कथा प्रकाशित झाल्यावर लगेच सुरू होईल आणि दिनांक २५ फेब्रुवारी २३.५९ भाप्रवे पर्यंत करता येईल.

मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.

निकाल २७ फेब्रुवारी २०१९ रोजी म्हणजे मराठी भाषा दिनी जाहीर केला जाईल.

लेखन करण्याविषयी/व्यनिविषयी/स्पर्धेविषयी कोणतीही शंका असल्यास प्रतिसादांमध्ये विचारू शकता.

एक मार्गदर्शिका-
कथा मराठी मध्ये असावी. एखादं हिंदी-इंग्रजी वाक्य कथेची गरज म्हणून चालेल, पण कथा मराठीत हवी. प्रमाण मराठी, झाडीबोली, वऱ्हाडी, खान्देशी, सातारी, पुणेरी, आगरी, मालवणी... कोणतीही पण मराठीत हवी.

हे ठिकाणसंस्कृतीवाङ्मयकथासमाजkathaaप्रकटनविचारशुभेच्छाआस्वादसमीक्षालेखप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Jan 2019 - 9:43 am | ज्ञानोबाचे पैजार

अरे? सासंम कामाल लागलेले दिसतेय. लैच दिवसांनी नवी स्पर्धा आली.

आता नवे काही तरी वाचायला मिळणार याचा आनंद झाला

सर्व लेखक लेखिकांना शुभेच्छा, या निमित्ताने सर्व निद्रिस्त लेखकांनो खडबडुन जागे व्हा लेखण्या सरसावा आणि उडवा बार.

भरपुर , सकस लिखाण करा एक काय दहा दहा कथा लिहा, बोर्डावर फक्त शशकच दिसल्या पाहिजेत इतक्या कथा लिहा.

आणि हो स्पर्धेकरता न लिहीता स्वतःच्या आनंदा करता लिहा.

या निमित्ताने शशकचे ही शतक होउन जाउदे ही गणरायाच्या चरणी प्रार्थना.

वाचायला आम्ही उत्सुक आहोत.

पैजारबुवा,

जव्हेरगंज's picture

31 Jan 2019 - 10:32 am | जव्हेरगंज

+1

एमी's picture

31 Jan 2019 - 10:50 am | एमी

छान. शुभेच्छा!

प्रतिसादात +१ वगैरे लिहले म्हणजे कथेला Like केले असे समजणार आणि जास्तीजास्त Like मिळालेली कथा विजेती.

एक सदस्य अनेक Like मारू शकतो असेच ना?
कि एका सदस्याला एकच मत देता येणार आहे?
पहिला पर्यायच ठीक, सोयिस्कर आहे.

जव्हेरगंज's picture

31 Jan 2019 - 10:56 am | जव्हेरगंज

एका कथेला एकच +१ देऊ शकता. मतदान सगळ्या कथांना करता येईल.

ओके. धन्यवाद. Like सारखंच आहे म्हणजे.
एक सदस्य एका कथेला एकदाच +१ करणार.

फक्त डुआयडी असतील कोणाचे तर संपादक मंडळ बघून घेतलीच ;)

ज्योति अळवणी's picture

31 Jan 2019 - 1:37 pm | ज्योति अळवणी

मस्त. अलीकडेच मनात येऊन गेलं की बऱ्याच दिवसात मिपावर स्पर्धा नाही झाली. मजा येईल. धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2019 - 2:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरेवा ! बर्‍याच दिवसांनी मिपावर कथास्पर्धा !

सर्व हौशी-गौशी-आजी-माजी-मनमौजी लेखकानो खडबडून जागे व्हा आणि लेखण्या सरसावा... आणि आम्हाला वाचनाचा आनंदानुभव द्या !

तुषार काळभोर's picture

31 Jan 2019 - 10:40 pm | तुषार काळभोर

उद्यापासून स्पर्धा सुरू!!

विजुभाऊ's picture

1 Feb 2019 - 1:14 pm | विजुभाऊ

७. शशक ही (शीर्षक वगळता) बरोब्बर शंभर शब्दांत लिहिली जाणं अपेक्षित आहे. आलेली शशक जशीच्या तशी "मायक्रोसॉफ्ट वर्ड" मध्ये चिकटवून वर्डकाऊंट पाहिला जाईल. शंभरपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास स्पर्धेतून बाद समजली जाईल आणि प्रकाशित होणार नाही.

ही अट अवघड वाटतेय. थोडा टॉलरन्स असायला हवा. ( किमान १०% वर आणि खाली )

जव्हेरगंज's picture

1 Feb 2019 - 1:42 pm | जव्हेरगंज

शब्द कमी-जास्त झालेच तर सांगूच की. डायरेक्ट बाद नाही होणार. :)

चिगो's picture

1 Feb 2019 - 4:35 pm | चिगो

संपादक मंडळास धन्यवाद. बर्‍याच दिवसांनी मिपावर स्पर्धा होणार. सर्व लेखकांना व वाचकांना अभिनंदन आणि शुभेच्छा..

तुषार काळभोर's picture

1 Feb 2019 - 7:09 pm | तुषार काळभोर

तुमची प्रवेशिका?

पाषाणभेद's picture

1 Feb 2019 - 9:46 pm | पाषाणभेद

पण बक्षीस काय असणार आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2019 - 2:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

शतशब्दकथा हा विशेष लेखनप्रकार आहे.

केवळ सरळधोपट कथा सांगणे हा या लेखनप्रकाराचा मूलभूत उद्येश नसतो.

(अ) बरोब्बर १०० शब्दांमध्ये कथा सांगणे आणि
(आ) शेवटच्या शब्दात/वाक्यात वाचकाला अनपेक्षित धक्का बसेल असा कथेचा शेवट करणे,
ही या कथाप्रकाराची दोन कळीची लक्षणे आहेत.

मराठी कथालेखक's picture

5 Feb 2019 - 3:17 pm | मराठी कथालेखक

प्रत्येक व्यक्ती एक शशक पाठवू शकते. एकापेक्षा जास्त शशक पाठवल्यास सर्वात प्रथम आलेल्या शशकनंतरच्या सगळ्या शशक रद्द समजल्या जातील

मला सुचवावसं वाटतंय की एखाद्या आयडीला एकापेक्षा जास्त कथा स्पर्धेत उतराव्याशा वाटत असतील तर त्यास मुभा असावी कारण
१) स्पर्धा कथांची आहे, लेखकाची नाही
२) सर्व कथा "साहित्य संपादक" आयडीने प्रकाशित होणार आहेत
३) डुआयडी बनवून कुणी एकापेक्षा एक जास्त कथा पाठवल्यास ते शोधणे संपादकांसठी तसेही कठीणच असेल
४) वाचकांना जास्त कथा वाचण्यास मिळतील... [लेखक एरवीही कथा प्रकाशित करु शकतात हे खरेच पण तरी स्पर्धेमुळे अधिक प्रोत्साहन मिळते आणि स्वतःच्या आयडी शिवाय सासं आयडीने कथा प्रकाशित करुन लोकांच्या अस्सल प्रतिक्रिया अनुभवण्यातली मजा काही वेगळीच]
५) विजेत्यांना कुठलेही थेट बक्षीस नसल्याने मिपावर कोणताही अर्थिक ताण येणार नाही वा कुणी एक मिपाकर मोठा लाभार्थी ठरणार नाही.
बघा .. विचार करा.

तुषार काळभोर's picture

5 Feb 2019 - 3:53 pm | तुषार काळभोर

पुढील कोणत्याही स्पर्धेचे नियम ठरवताना हा मुद्दा नक्कीच विचारात घेतला जाईल, पण तूर्तास स्पर्धा सुरू झाल्याने (हा नियम बदलणे व्यावहारिक दृष्टीने शक्य असूनही) आता नियम बदलणे योग्य होणार नाही असं वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत.

नियम बदलल्याने कोणावरही अन्याय होत नाही
+ लेखक वाचक सगळ्यांसाठीच ही विनविन परिस्थिती असेल

त्यामुळे नियम बदलावा या मागणीला अनुमोदन.

पद्मावति's picture

7 Feb 2019 - 2:40 pm | पद्मावति

शतशब्दकथा स्पर्धा छान चालली आहे. उत्तम , दर्जेदार कथा या निमित्ताने वाचायला मिळत आहेत.

किल्ली's picture

7 Feb 2019 - 2:49 pm | किल्ली

बक्षिस काय असणार आहे?

एक निरिक्षण : काही श श क मधे वाचने ६०० च्या वर पण प्रतिसाद नगण्य ( म्हणजे वाचने ६०० पण गुण सात-आठ). ही फारच तफावत वाटते.
पुढच्या वेळी यात काही सुधारणा करता येतील काय? एक सजेशन - समजा वाचकाने शशक उघडली आणि वाचून झाल्यावर दुसर्‍या टॅब वर किंवा कथेवर जायच्या आधी एक डायलॉग पॉप अप करावा ज्यावर "कथा आवडली?" असा मेसेज आणि हो/नाही अशी दोन बटने द्यावीत. हो सिलेक्ट केले तर +१ गुण, नाही सिलेक्ट केले तर काही गुण नाहीत.

मआंजावर वेगवेगळे कंपू आहेत हे सगळ्यांना माहित आहेच.
समजा एखाद्या लेखकाने आपल्या कंपुतल्याना 'ही माझी कथा आहे. त्याला मत द्या.' सांगितलं आणि मित्रमंडळीनी येऊन मतदान केलं तर काय करणार?

ही शक्यता आहेच, ती नाकारता येणार नाही.

शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून आली नाहीय. मिपावर फारसे एक्टिव नसणारे चार आयडी, जे माबोवर एकाच कंपूत आहेत त्यानी एका कथेला मत दिलंय :D

यशोधरा's picture

7 Feb 2019 - 5:22 pm | यशोधरा

जाऊद्या हो, इथे भारतरत्न, किंवा पद्म पुरस्कार वगैरे मिळत नाहीत, हौशी लोकांची, हौशी लोकांसाठी, हौशी लोकांसाठी असलेली स्पर्धा आहे, त्यातून आनंद घ्या आणि पुढे चला. कुठे आंरजालावरच्या इतर ठिकाणच्या गोष्टी इथे घेऊन येताय? सोडून द्या :) चील माडी.

किसन शिंदे's picture

7 Feb 2019 - 7:45 pm | किसन शिंदे

शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून आली नाहीय. मिपावर फारसे एक्टिव नसणारे चार आयडी, जे माबोवर एकाच कंपूत आहेत त्यानी एका कथेला मत दिलंय :D

त्या कंपूतल्या आयडींनी नेमक्या त्यांच्याच माणसाला मतदान केलंय हे तुम्हाला कसं कळालं, कारण इथे कथा लेखकाच्या नावाने प्रकाशित न होता अॅनानिमसली प्रकाशित होत आहेत.

कारण त्या कथेला मतदान करणाऱ्या त्या कंपुतल्या आयडीनी इतर कथांवर मतदान केलं नाहीय....
एनिवे
यशोधरा म्हणतीय तसं... एकगठ्ठा मतदान चलता है.

मी सोडून दया अशा ह्या गोष्टी, असं ही म्हणतेय हो! :)

साला मै भोत दिन इधर आया नै या(log in नाही, नुसतं वाचिंग).
स्पर्धा बघुन पासवर्ड टाकला, आता नाही शक्य दररोज आम्हाला वाचायला, रविवार पकडून सगळे वाचतो. आम्हालाही मोजलय का डु आयडी किंवा कंपुष्टांच्या जत्रेत?

चौथा कोनाडा's picture

11 Feb 2019 - 10:24 am | चौथा कोनाडा

भोत दिन से इधर आया .... त्या बद्दल तुम्हाला त्या बद्दल वाहवा !

नक्की वाचा आणि मत (+१ पद्दद्तीने ) जरूर नोंदवा छान वाटेल स्पर्धकांना

प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देने शक्य नव्हते म्हणून जिथे आवडलं तिथे गुण दान करुन आलो.

जव्हेरगंज's picture

17 Feb 2019 - 12:37 pm | जव्हेरगंज

काही ठिकाणी तुम्ही फक्त "१" एवढेच लिहिलं आहे. तिथे "+१" करून यावे. नाहीतर मतमोजणीत अडचण येईल. :)

वेळ उलटून गेली आहे पण मी आज कथा पाठवू शकतो का?

जव्हेरगंज's picture

21 Feb 2019 - 12:40 pm | जव्हेरगंज

तुम्ही स्वतः प्रकाशित करू शकता. अर्थात स्पर्धेबाहेर.

चिनार's picture

26 Feb 2019 - 10:17 am | चिनार

मतदानाची वेळ संपलीये !!
आता निकालाची उत्सुकता आहे !!
किती विजेते असणार आहेत ??

कंजूस's picture

27 Feb 2019 - 4:08 am | कंजूस

दोन / चार ताव कथा कागदावर लिहिली तर अडिचशे / पाचशे शब्दांची होते. तेवढी तरी लघुकथा असावी. काही किस्सेही एवढ्यात व्यवस्थित बसतात.

निकाल आणि लेखक सांगा पटकन!
पहिल्या तीन कथा कोणत्या आहेत याचा अंदाज आला आहेच पण लेखकांबद्दल उत्सुकता आहे.

कुमार१'s picture

27 Feb 2019 - 12:00 pm | कुमार१

म भा दिनानिमित्त हा चांगला उपक्रम आखल्याबद्दल संयोजकांचे आभार !

या निमित्ताने मला अलीकडच्या एका वाक्प्रचाराबद्दल इथल्या लेखकांना आवाहन करायचे आहे.

सध्या आपण जालावर एखादा लेख लिहिणार असलो अथवा फोटो प्रसिद्ध करणार असलो, की ‘लेख टाका, टाकतो लवकर’, असे वाक्प्रचार सर्रास वापरला जातात.

लेखक जेव्हा एखादा लेख कष्टपूर्वक लिहितो त्याला ‘टाकणे’ म्हणणे मला अगदी टाकाऊ वाटते !
लेख प्रकाशित केला’ असे वाक्य त्या लेखालाही एक सन्मान देते.
wa वरील सटरफटर गोष्टी आणि संस्थळावर लिहिलेला लेख किंवा प्रसिद्ध केलेले कलात्मक फोटो यात गुणात्मक फरक आहे. म्हणून सर्व लेखकांना माझी ही विनंती की आजपासून ‘टाकणे’ ला टाकून द्या ! ☺️

यशोधरा's picture

27 Feb 2019 - 12:54 pm | यशोधरा

+१

@ कुमार१,

एखादा लेख कष्टपूर्वक लिहितो त्याला ‘टाकणे’ म्हणणे मला अगदी टाकाऊ वाटते !

+ १

दोन वर्षांपूर्वी पहिल्याच संदेशात तुम्ही मला ह्या बद्दल जागे केले होते, तेंव्हापासून मी लेख 'टाकणे' बंद केले आहे :-)

_/\_

प्रमोद देर्देकर's picture

27 Feb 2019 - 1:12 pm | प्रमोद देर्देकर

पहिली गळ दुसरी ग्लास तिसरी बहुतेक क्रॉस कनेक्शन--- एक अंदाज आपला

श्वेता२४'s picture

27 Feb 2019 - 1:17 pm | श्वेता२४

गॅस चेंबर?

टर्मीनेटर's picture

27 Feb 2019 - 6:42 pm | टर्मीनेटर

हो, खूप hilarious होती :)

नावातकायआहे's picture

27 Feb 2019 - 2:02 pm | नावातकायआहे

पहिली गळ दुसरी ग्लास तिसरी गॅस चेंबर (?)

Prajakta Yogiraj Nikure's picture

27 Feb 2019 - 2:09 pm | Prajakta Yogira...

निकाल दिसत नाहि

ज्योति अळवणी's picture

27 Feb 2019 - 3:01 pm | ज्योति अळवणी

निकाल लागला का? दिसत नाही

वकील साहेब's picture

27 Feb 2019 - 3:32 pm | वकील साहेब

निकाल लागेपर्यंत कोणत्या कथेचे कोणते लेखक ओळखा पाहू स्पर्धा खेळायची का?

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Feb 2019 - 4:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

मीच सुरुवात करतो :- मझे अंदाज खालिल प्रमाणे
गळ :- जव्हेरगंज,
ग्लास :- ???
गॅस चेंबर :- अतृप्त आत्मा
तिकिट :- विशुमित

बाकिचे अंदाज नंतर लिहितो

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Feb 2019 - 4:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

मीच सुरुवात करतो :- माझे अंदाज खालिल प्रमाणे
गळ :- जव्हेरगंज,
ग्लास :- ???
गॅस चेंबर :- अतृप्त आत्मा
तिकिट :- विशुमित

बाकिचे अंदाज नंतर लिहितो

पैजारबुवा,

यशोधरा's picture

27 Feb 2019 - 6:16 pm | यशोधरा

गॅस चेंबर :- अतृप्त आत्मा

काय ही कीर्ती गुर्जींची!! =)))

वकील साहेब's picture

27 Feb 2019 - 6:13 pm | वकील साहेब

ग्लास :जव्हेरगंज

साहित्य संपादक's picture

27 Feb 2019 - 6:35 pm | साहित्य संपादक

लवकरच जाहीर करतो...
:)

मराठी कथालेखक's picture

6 Apr 2020 - 9:01 pm | मराठी कथालेखक

एखादी शशक स्पर्धा होवून जावू द्या.