✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा

स
साहित्य संपादक यांनी
Wed, 01/30/2019 - 22:07  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा मराठी भाषा दिन आपण मिपावर शतशब्दकथा स्पर्धेच्या रुपात साजरा करणार आहोत. विषयाला कोणतेही बंधन नाहीये, पण स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत. १. स्पर्धा १ फेब्रुवारी २०१९ रोजी ००.०० भाप्रवे सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१९ रोजी २३.५९ भाप्रवे संपेल. २. स्पर्धकांनी आपली कथा साहित्य संपादक या आयडीला व्यनिने पाठवायची आहे. साहित्य संपादकांना व्यनि पाठवण्यासाठी क्लिक करा. कोणत्याही साहित्य संपादकाला वैयक्तिक व्यनि किंवा मिसळपाव अथवा सासं च्या इमेल आयडीवर किंवा अन्य कोणत्याही दुसऱ्या मार्गे कथा पाठवू नये. ३. प्रत्येक व्यक्ती एक शशक पाठवू शकते. एकापेक्षा जास्त शशक पाठवल्यास सर्वात प्रथम आलेल्या शशकनंतरच्या सगळ्या शशक रद्द समजल्या जातील. ४. ०१ फेब्रुवारी २०१९ ते २१ फेब्रुवारी २०१९ या काळात दर चोवीस तासांतून एकदा साहित्य संपादक आयडी आलेल्या कथा स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल. मूळ लेखकाचं नाव जाहीर होणार नाही. ("कथा बघून मत देण्याऐवजी आयडी बघून मत देतात" हा आक्षेप घेतला जाऊ नये म्हणून हे करण्यात आलेलं आहे.). स्पर्धा संपल्यावर लेखकांची ओळख जाहिर करायचीचं आहे. ५. मूळ लेखकाने आपली ओळख जाहीर करू नये अशी अपेक्षा आहे. कथेच्या धाग्यावर, मिपावरच्या सार्वजनिक जागेत (अन्य धाग्यांवर किंवा खरडफळ्यावर), मिपाच्या फेसबुक पानावर किंवा ट्विटर अकाऊंटवर आपली ओळख कथालेखक म्हणून जाहीर केल्यास ती कथा रद्दबातल ठरवून स्पर्धेतून बाद केली जाईल. ६. साहित्य संपादक कथा प्रकाशित करताना मुळाबरहुकूम (म्हणजे जशी आली तशी) करतील. मुद्रितशोधन किंवा अन्य कोणतेही संपादकीय संस्कार केले जाणार नाहीत. स्पर्धेमधल्या शतशब्दकथेमध्ये व्याकरणाचे नियम, शुद्धलेखन, मुद्रितशोधनाची वगैरेची जबाबदारी संपूर्णपणे स्पर्धकाची असेल. ७. शशक ही (शीर्षक वगळता) बरोब्बर शंभर शब्दांत लिहिली जाणं अपेक्षित आहे. आलेली शशक जशीच्या तशी "मायक्रोसॉफ्ट वर्ड" मध्ये चिकटवून वर्डकाऊंट पाहिला जाईल. शंभरपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास स्पर्धेतून बाद समजली जाईल आणि प्रकाशित होणार नाही. ८. तसंच, कथेत कोणतीही चित्रं, दृक्-श्राव्य दुवे, फॉरमॅटिंग वगैरे असल्यास ते वगळून कथा प्रकाशित केली जाईल. ९. जातिधर्माला दुखावणारं वा अश्लील लेखन आल्यास कथा स्पर्धेसाठी न घ्यायचा निर्णय संपादकीय अधिकारात घेतला जाईल. प्रवेशिका नाकारायचा अधिकार साहित्य संपादक राखून ठेवत आहेत. स्पर्धा संपल्यावर लेखक नियमबाह्य कथा स्वतःच्या जबाबदारीवर प्रकाशित करू शकतात. १०. कथेला आपण देऊ इच्छित असणारं नावं व्यनिच्या विषयामधे लिहिलेलं असावं. ११. कुठेही पूर्वप्रकाशित कथा स्वीकारली जाणार नाही. १२. कथा आधारित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख कथेच्या शेवटी करावा. हे शब्द १०० मध्ये मोजले जाणार नाहीत. मतदान कथा प्रकाशित झाल्यावर लगेच सुरू होईल आणि दिनांक २५ फेब्रुवारी २३.५९ भाप्रवे पर्यंत करता येईल. मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल. निकाल २७ फेब्रुवारी २०१९ रोजी म्हणजे मराठी भाषा दिनी जाहीर केला जाईल. लेखन करण्याविषयी/व्यनिविषयी/स्पर्धेविषयी कोणतीही शंका असल्यास प्रतिसादांमध्ये विचारू शकता. एक मार्गदर्शिका- कथा मराठी मध्ये असावी. एखादं हिंदी-इंग्रजी वाक्य कथेची गरज म्हणून चालेल, पण कथा मराठीत हवी. प्रमाण मराठी, झाडीबोली, वऱ्हाडी, खान्देशी, सातारी, पुणेरी, आगरी, मालवणी... कोणतीही पण मराठीत हवी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
संस्कृती
वाङ्मय
कथा
समाज
kathaa
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
शुभेच्छा
आस्वाद
समीक्षा
लेख
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
29890 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

मस्त...

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 01/31/2019 - 09:43 नवीन
अरे? सासंम कामाल लागलेले दिसतेय. लैच दिवसांनी नवी स्पर्धा आली. आता नवे काही तरी वाचायला मिळणार याचा आनंद झाला सर्व लेखक लेखिकांना शुभेच्छा, या निमित्ताने सर्व निद्रिस्त लेखकांनो खडबडुन जागे व्हा लेखण्या सरसावा आणि उडवा बार. भरपुर , सकस लिखाण करा एक काय दहा दहा कथा लिहा, बोर्डावर फक्त शशकच दिसल्या पाहिजेत इतक्या कथा लिहा. आणि हो स्पर्धेकरता न लिहीता स्वतःच्या आनंदा करता लिहा. या निमित्ताने शशकचे ही शतक होउन जाउदे ही गणरायाच्या चरणी प्रार्थना. वाचायला आम्ही उत्सुक आहोत. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

+1

जव्हेरगंज
गुरुवार, 01/31/2019 - 10:32 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

छान. शुभेच्छा!

एमी
गुरुवार, 01/31/2019 - 10:50 नवीन
छान. शुभेच्छा! प्रतिसादात +१ वगैरे लिहले म्हणजे कथेला Like केले असे समजणार आणि जास्तीजास्त Like मिळालेली कथा विजेती. एक सदस्य अनेक Like मारू शकतो असेच ना? कि एका सदस्याला एकच मत देता येणार आहे? पहिला पर्यायच ठीक, सोयिस्कर आहे.
  • Log in or register to post comments

एका कथेला एकच +१ देऊ शकता.

जव्हेरगंज
गुरुवार, 01/31/2019 - 10:56 नवीन
एका कथेला एकच +१ देऊ शकता. मतदान सगळ्या कथांना करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

ओके. धन्यवाद. Like सारखंच आहे

एमी
गुरुवार, 01/31/2019 - 11:07 नवीन
ओके. धन्यवाद. Like सारखंच आहे म्हणजे. एक सदस्य एका कथेला एकदाच +१ करणार. फक्त डुआयडी असतील कोणाचे तर संपादक मंडळ बघून घेतलीच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

मस्त. अलीकडेच मनात येऊन गेलं

ज्योति अळवणी
गुरुवार, 01/31/2019 - 13:37 नवीन
मस्त. अलीकडेच मनात येऊन गेलं की बऱ्याच दिवसात मिपावर स्पर्धा नाही झाली. मजा येईल. धन्यवाद
  • Log in or register to post comments

अरेवा ! बर्‍याच दिवसांनी

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/31/2019 - 14:41 नवीन
अरेवा ! बर्‍याच दिवसांनी मिपावर कथास्पर्धा ! सर्व हौशी-गौशी-आजी-माजी-मनमौजी लेखकानो खडबडून जागे व्हा आणि लेखण्या सरसावा... आणि आम्हाला वाचनाचा आनंदानुभव द्या !
  • Log in or register to post comments

उद्यापासून स्पर्धा सुरू!!

तुषार काळभोर
गुरुवार, 01/31/2019 - 22:40 नवीन
उद्यापासून स्पर्धा सुरू!!
  • Log in or register to post comments

७. शशक ही (शीर्षक वगळता)

विजुभाऊ
Fri, 02/01/2019 - 13:14 नवीन
७. शशक ही (शीर्षक वगळता) बरोब्बर शंभर शब्दांत लिहिली जाणं अपेक्षित आहे. आलेली शशक जशीच्या तशी "मायक्रोसॉफ्ट वर्ड" मध्ये चिकटवून वर्डकाऊंट पाहिला जाईल. शंभरपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास स्पर्धेतून बाद समजली जाईल आणि प्रकाशित होणार नाही.
ही अट अवघड वाटतेय. थोडा टॉलरन्स असायला हवा. ( किमान १०% वर आणि खाली )
  • Log in or register to post comments

शब्द कमी-जास्त झालेच तर

जव्हेरगंज
Fri, 02/01/2019 - 13:42 नवीन
शब्द कमी-जास्त झालेच तर सांगूच की. डायरेक्ट बाद नाही होणार. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अभिनंदन..

चिगो
Fri, 02/01/2019 - 16:35 नवीन
संपादक मंडळास धन्यवाद. बर्‍याच दिवसांनी मिपावर स्पर्धा होणार. सर्व लेखकांना व वाचकांना अभिनंदन आणि शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

कोरडं अभिनंदन??

तुषार काळभोर
Fri, 02/01/2019 - 19:09 नवीन
तुमची प्रवेशिका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

पण बक्षीस काय असणार आहे?

पाषाणभेद
Fri, 02/01/2019 - 21:46 नवीन
पण बक्षीस काय असणार आहे?
  • Log in or register to post comments

शतशब्दकथा हा विशेष लेखनप्रकार

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 02/03/2019 - 14:26 नवीन
शतशब्दकथा हा विशेष लेखनप्रकार आहे. केवळ सरळधोपट कथा सांगणे हा या लेखनप्रकाराचा मूलभूत उद्येश नसतो. (अ) बरोब्बर १०० शब्दांमध्ये कथा सांगणे आणि (आ) शेवटच्या शब्दात/वाक्यात वाचकाला अनपेक्षित धक्का बसेल असा कथेचा शेवट करणे, ही या कथाप्रकाराची दोन कळीची लक्षणे आहेत.
  • Log in or register to post comments

काही सुचवू इच्छितो

मराठी कथालेखक
Tue, 02/05/2019 - 15:17 नवीन
प्रत्येक व्यक्ती एक शशक पाठवू शकते. एकापेक्षा जास्त शशक पाठवल्यास सर्वात प्रथम आलेल्या शशकनंतरच्या सगळ्या शशक रद्द समजल्या जातील
मला सुचवावसं वाटतंय की एखाद्या आयडीला एकापेक्षा जास्त कथा स्पर्धेत उतराव्याशा वाटत असतील तर त्यास मुभा असावी कारण १) स्पर्धा कथांची आहे, लेखकाची नाही २) सर्व कथा "साहित्य संपादक" आयडीने प्रकाशित होणार आहेत ३) डुआयडी बनवून कुणी एकापेक्षा एक जास्त कथा पाठवल्यास ते शोधणे संपादकांसठी तसेही कठीणच असेल ४) वाचकांना जास्त कथा वाचण्यास मिळतील... [लेखक एरवीही कथा प्रकाशित करु शकतात हे खरेच पण तरी स्पर्धेमुळे अधिक प्रोत्साहन मिळते आणि स्वतःच्या आयडी शिवाय सासं आयडीने कथा प्रकाशित करुन लोकांच्या अस्सल प्रतिक्रिया अनुभवण्यातली मजा काही वेगळीच] ५) विजेत्यांना कुठलेही थेट बक्षीस नसल्याने मिपावर कोणताही अर्थिक ताण येणार नाही वा कुणी एक मिपाकर मोठा लाभार्थी ठरणार नाही. बघा .. विचार करा.
  • Log in or register to post comments

कथालेखक जी

तुषार काळभोर
Tue, 02/05/2019 - 15:53 नवीन
पुढील कोणत्याही स्पर्धेचे नियम ठरवताना हा मुद्दा नक्कीच विचारात घेतला जाईल, पण तूर्तास स्पर्धा सुरू झाल्याने (हा नियम बदलणे व्यावहारिक दृष्टीने शक्य असूनही) आता नियम बदलणे योग्य होणार नाही असं वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

नियम बदलल्याने कोणावरही

एमी
Tue, 02/05/2019 - 16:39 नवीन
नियम बदलल्याने कोणावरही अन्याय होत नाही + लेखक वाचक सगळ्यांसाठीच ही विनविन परिस्थिती असेल त्यामुळे नियम बदलावा या मागणीला अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

शतशब्दकथा स्पर्धा छान चालली

पद्मावति
गुरुवार, 02/07/2019 - 14:40 नवीन
शतशब्दकथा स्पर्धा छान चालली आहे. उत्तम , दर्जेदार कथा या निमित्ताने वाचायला मिळत आहेत.
  • Log in or register to post comments

बक्षिस

किल्ली
गुरुवार, 02/07/2019 - 14:49 नवीन
बक्षिस काय असणार आहे?
  • Log in or register to post comments

शशक च्या गुणांक पद्ध्तीत सुधारणा करता येईल काय?

बबन ताम्बे
गुरुवार, 02/07/2019 - 15:20 नवीन
एक निरिक्षण : काही श श क मधे वाचने ६०० च्या वर पण प्रतिसाद नगण्य ( म्हणजे वाचने ६०० पण गुण सात-आठ). ही फारच तफावत वाटते. पुढच्या वेळी यात काही सुधारणा करता येतील काय? एक सजेशन - समजा वाचकाने शशक उघडली आणि वाचून झाल्यावर दुसर्‍या टॅब वर किंवा कथेवर जायच्या आधी एक डायलॉग पॉप अप करावा ज्यावर "कथा आवडली?" असा मेसेज आणि हो/नाही अशी दोन बटने द्यावीत. हो सिलेक्ट केले तर +१ गुण, नाही सिलेक्ट केले तर काही गुण नाहीत.
  • Log in or register to post comments

मआंजावर वेगवेगळे कंपू आहेत हे

एमी
गुरुवार, 02/07/2019 - 16:13 नवीन
मआंजावर वेगवेगळे कंपू आहेत हे सगळ्यांना माहित आहेच. समजा एखाद्या लेखकाने आपल्या कंपुतल्याना 'ही माझी कथा आहे. त्याला मत द्या.' सांगितलं आणि मित्रमंडळीनी येऊन मतदान केलं तर काय करणार?
  • Log in or register to post comments

ही शक्यता आहेच, ती नाकारता

यशोधरा
गुरुवार, 02/07/2019 - 17:02 नवीन
ही शक्यता आहेच, ती नाकारता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून

एमी
गुरुवार, 02/07/2019 - 17:18 नवीन
शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून आली नाहीय. मिपावर फारसे एक्टिव नसणारे चार आयडी, जे माबोवर एकाच कंपूत आहेत त्यानी एका कथेला मत दिलंय :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

जाऊद्या हो, इथे भारतरत्न,

यशोधरा
गुरुवार, 02/07/2019 - 17:22 नवीन
जाऊद्या हो, इथे भारतरत्न, किंवा पद्म पुरस्कार वगैरे मिळत नाहीत, हौशी लोकांची, हौशी लोकांसाठी, हौशी लोकांसाठी असलेली स्पर्धा आहे, त्यातून आनंद घ्या आणि पुढे चला. कुठे आंरजालावरच्या इतर ठिकाणच्या गोष्टी इथे घेऊन येताय? सोडून द्या :) चील माडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून

किसन शिंदे
गुरुवार, 02/07/2019 - 19:45 नवीन
शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून आली नाहीय. मिपावर फारसे एक्टिव नसणारे चार आयडी, जे माबोवर एकाच कंपूत आहेत त्यानी एका कथेला मत दिलंय :D त्या कंपूतल्या आयडींनी नेमक्या त्यांच्याच माणसाला मतदान केलंय हे तुम्हाला कसं कळालं, कारण इथे कथा लेखकाच्या नावाने प्रकाशित न होता अॅनानिमसली प्रकाशित होत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

कारण त्या कथेला मतदान

एमी
गुरुवार, 02/07/2019 - 21:44 नवीन
कारण त्या कथेला मतदान करणाऱ्या त्या कंपुतल्या आयडीनी इतर कथांवर मतदान केलं नाहीय.... एनिवे यशोधरा म्हणतीय तसं... एकगठ्ठा मतदान चलता है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मी सोडून दया अशा ह्या गोष्टी,

यशोधरा
गुरुवार, 02/07/2019 - 22:06 नवीन
मी सोडून दया अशा ह्या गोष्टी, असं ही म्हणतेय हो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

साला मै भोत दिन इधर आया नै या

भीमराव
Sun, 02/10/2019 - 00:04 नवीन
साला मै भोत दिन इधर आया नै या(log in नाही, नुसतं वाचिंग). स्पर्धा बघुन पासवर्ड टाकला, आता नाही शक्य दररोज आम्हाला वाचायला, रविवार पकडून सगळे वाचतो. आम्हालाही मोजलय का डु आयडी किंवा कंपुष्टांच्या जत्रेत?
  • Log in or register to post comments

भोत दिन से इधर आया .... त्या

चौथा कोनाडा
Mon, 02/11/2019 - 10:24 नवीन
भोत दिन से इधर आया .... त्या बद्दल तुम्हाला त्या बद्दल वाहवा ! नक्की वाचा आणि मत (+१ पद्दद्तीने ) जरूर नोंदवा छान वाटेल स्पर्धकांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देने

भीमराव
Sun, 02/17/2019 - 09:05 नवीन
प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देने शक्य नव्हते म्हणून जिथे आवडलं तिथे गुण दान करुन आलो.
  • Log in or register to post comments

काही ठिकाणी तुम्ही फक्त "१"

जव्हेरगंज
Sun, 02/17/2019 - 12:37 नवीन
काही ठिकाणी तुम्ही फक्त "१" एवढेच लिहिलं आहे. तिथे "+१" करून यावे. नाहीतर मतमोजणीत अडचण येईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

मी आज कथा पाठवू शकतो का?

bhagwatblog
गुरुवार, 02/21/2019 - 12:31 नवीन
वेळ उलटून गेली आहे पण मी आज कथा पाठवू शकतो का?
  • Log in or register to post comments

वेळ उलटून गेली आहे

जव्हेरगंज
गुरुवार, 02/21/2019 - 12:40 नवीन
तुम्ही स्वतः प्रकाशित करू शकता. अर्थात स्पर्धेबाहेर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: bhagwatblog

मतदानाची वेळ संपलीये !!

चिनार
Tue, 02/26/2019 - 10:17 नवीन
मतदानाची वेळ संपलीये !! आता निकालाची उत्सुकता आहे !! किती विजेते असणार आहेत ??
  • Log in or register to post comments

दोन / चार ताव कथा कागदावर

कंजूस
Wed, 02/27/2019 - 04:08 नवीन
दोन / चार ताव कथा कागदावर लिहिली तर अडिचशे / पाचशे शब्दांची होते. तेवढी तरी लघुकथा असावी. काही किस्सेही एवढ्यात व्यवस्थित बसतात.
  • Log in or register to post comments

निकाल आणि लेखक सांगा पटकन!

एमी
Wed, 02/27/2019 - 09:11 नवीन
निकाल आणि लेखक सांगा पटकन! पहिल्या तीन कथा कोणत्या आहेत याचा अंदाज आला आहेच पण लेखकांबद्दल उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

थोडेसे अवांतर

हेमंतकुमार
Wed, 02/27/2019 - 12:00 नवीन
म भा दिनानिमित्त हा चांगला उपक्रम आखल्याबद्दल संयोजकांचे आभार ! या निमित्ताने मला अलीकडच्या एका वाक्प्रचाराबद्दल इथल्या लेखकांना आवाहन करायचे आहे. सध्या आपण जालावर एखादा लेख लिहिणार असलो अथवा फोटो प्रसिद्ध करणार असलो, की ‘लेख टाका, टाकतो लवकर’, असे वाक्प्रचार सर्रास वापरला जातात. लेखक जेव्हा एखादा लेख कष्टपूर्वक लिहितो त्याला ‘टाकणे’ म्हणणे मला अगदी टाकाऊ वाटते ! ‘लेख प्रकाशित केला’ असे वाक्य त्या लेखालाही एक सन्मान देते. wa वरील सटरफटर गोष्टी आणि संस्थळावर लिहिलेला लेख किंवा प्रसिद्ध केलेले कलात्मक फोटो यात गुणात्मक फरक आहे. म्हणून सर्व लेखकांना माझी ही विनंती की आजपासून ‘टाकणे’ ला टाकून द्या ! ☺️
  • Log in or register to post comments

+१

यशोधरा
Wed, 02/27/2019 - 12:54 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

@ कुमार१,एखादा लेख कष्टपूर्वक

अनिंद्य
गुरुवार, 02/28/2019 - 11:44 नवीन
@ कुमार१, एखादा लेख कष्टपूर्वक लिहितो त्याला ‘टाकणे’ म्हणणे मला अगदी टाकाऊ वाटते ! + १ दोन वर्षांपूर्वी पहिल्याच संदेशात तुम्ही मला ह्या बद्दल जागे केले होते, तेंव्हापासून मी लेख 'टाकणे' बंद केले आहे :-) _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

पहिली गळ दुसरी ग्लास तिसरी

प्रमोद देर्देकर
Wed, 02/27/2019 - 13:12 नवीन
पहिली गळ दुसरी ग्लास तिसरी बहुतेक क्रॉस कनेक्शन--- एक अंदाज आपला
  • Log in or register to post comments

गॅस चेंबर?

श्वेता२४
Wed, 02/27/2019 - 13:17 नवीन
गॅस चेंबर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

हो, खूप hilarious होती :)

टर्मीनेटर
Wed, 02/27/2019 - 18:42 नवीन
हो, खूप hilarious होती :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

पहिली गळ दुसरी ग्लास तिसरी

नावातकायआहे
Wed, 02/27/2019 - 14:02 नवीन
पहिली गळ दुसरी ग्लास तिसरी गॅस चेंबर (?)
  • Log in or register to post comments

निकाल दिसत नाहि

Prajakta Yogir…
Wed, 02/27/2019 - 14:09 नवीन
निकाल दिसत नाहि
  • Log in or register to post comments

निकाल लागला का? दिसत नाही

ज्योति अळवणी
Wed, 02/27/2019 - 15:01 नवीन
निकाल लागला का? दिसत नाही
  • Log in or register to post comments

निकाल लागेपर्यंत कोणत्या

वकील साहेब
Wed, 02/27/2019 - 15:32 नवीन
निकाल लागेपर्यंत कोणत्या कथेचे कोणते लेखक ओळखा पाहू स्पर्धा खेळायची का?
  • Log in or register to post comments

मस्त आयडीया..

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 02/27/2019 - 16:40 नवीन
मीच सुरुवात करतो :- मझे अंदाज खालिल प्रमाणे गळ :- जव्हेरगंज, ग्लास :- ??? गॅस चेंबर :- अतृप्त आत्मा तिकिट :- विशुमित बाकिचे अंदाज नंतर लिहितो पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वकील साहेब

मस्त आयडीया..

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 02/27/2019 - 16:40 नवीन
मीच सुरुवात करतो :- माझे अंदाज खालिल प्रमाणे गळ :- जव्हेरगंज, ग्लास :- ??? गॅस चेंबर :- अतृप्त आत्मा तिकिट :- विशुमित बाकिचे अंदाज नंतर लिहितो पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वकील साहेब

गॅस चेंबर :- अतृप्त आत्मा

यशोधरा
Wed, 02/27/2019 - 18:16 नवीन
गॅस चेंबर :- अतृप्त आत्मा
काय ही कीर्ती गुर्जींची!! =)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

ग्लास :जव्हेरगंज

वकील साहेब
Wed, 02/27/2019 - 18:13 नवीन
ग्लास :जव्हेरगंज
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा