वाट - एक पाहणे !
वाट पाहणे हा योग माझ्या कुंडलीतच असावा बहुधा. मी कुठेही, कधीही, काहीही करायला गेलो की सर्वात आधी माझ्या वाटेवर येते ते म्हणजे वाट पाहणं. बऱ्याच ठिकाणी वाट पाहणं अपरिहार्य असते आणि ते सगळ्यांच्याच "वाट्याला" येते. उदा.बाहेर जाताना बायकोची तयारी होईपर्यंत वाट पाहणं या वैश्विक समस्येवर अजूनतरी तोडगा निघाला नाही. पण माझ्या वाट्याला वाट पाहण्याचे आणखी कितीतरी योग येत असतात. इतके की आताशा वाट पाहणं मी एन्जॉय करायला लागलो आहे. अतार्किक ,स्वैर,रँडम विचार करायचे असतील तर त्यासाठी मी वाट पाहण्याचा वेळ उपयोगात आणतो.
