ती...
डोक्याचा खुर्दा पडला होता, कधी एकदा २-३ पॅक मारतो असं झालं होत. बिअर बार मध्ये गेलो, बिअर बार कसला सालं बेवडयांची सोय व्हावी म्हणून काहीतरी बांधून ठेवलं होते हेवशीर होत एवढच काय ते चांगलं. एक कोपरा पकडून बसलो तेंव्हा ती दिसली एका खिडकी जवळ बसली होती, लक्ष गेले कि डोळ्यात डोळे घालून बघायची, डोळ्यांमध्ये आतुरता होती. मनात विचार आला का आली असेल इथे, एक पेग झाला तरी ती काय जागेवरून हलली नाही. एकटक माझ्या कडेच बघत होती , माझे ३ पेग संपले काय माहित मला चढली होती कि काय पण तिच्या डोळ्यात आता जास्तच आरव दिसत होती.