प्रिय सुपरहीरोस (कथा)
सुपरहीरो ब्रेकअप कथा
सुपरहीरो ब्रेकअप कथा
एक इनंती: आधी २० सुक्ष्मकथा-१ हा दुवा वाचावा. मग पुढे धकावं.
सुक्ष्मकथेत अजून काय मजा आणता येईल याचा विचार करतांना एक नवीन उपप्रकार सापडला (मुळात ही कल्पना शैलेंद्र शिर्के यांची. कल्पनाविस्तार अन कथा मात्र माझ्या)
संकल्पना अगदी सोप्पीये- कुठल्याही गाण्याच्या धृवपदाची पहिली ओळ (किंवा दोन्ही ओळी) घ्यायची, दुसऱ्या ओळीत असे शब्द घालायचे की गाण्याचा अर्थ पुर्ण बदलून जाईल. शिवाय एक वेगळीच नवीन सुक्ष्मकथा तयार होईल.
केवळ तिन ते दहा शब्द या मर्यादेतल्या, वेगवेगळ्या विषयांवरच्या विस कथा.
साधं सरळ आयुष्य असतं आमचं. दहावी-बारावीच्या मार्कांवर आमची लायकी ठरते अन कॉलेज सुरु होतं. ते आटपून कुठेतरी नोकरीला लागायचं. मग लग्न, पोरंबाळं,संसार वगैरे वगैरे. आमच्यासारख्या शंभरातल्या ऐंशीजणांची हीच कथा. उरलेले काहीजण कॉलेजमध्ये प्रेम वगैरे करतात, परदेशात वगैरे शिकायला जातात.शेवटी एका पातळीनंतर सगळ्यांची कथा आणि व्यथा सारखीच ! कोणी पुण्यात रडतो तर कोणी क्यालिफोर्नीयात एवढाच काय तो फरक!
आठ - दहा दिवसांपूर्वी व्हाट्सॲपवर आंतरसोसायटी हापपिच क्रिकेट स्पर्धेच आवतान आल. आणि गेलं नाही तर आपल्या सोसायटीची काय इज्जत राहिल? हा प्रश्न प्रत्येक सोसायटीच्या क्रीडाप्रेमी, हौशी क्रीडापटू इ. लोकांना पडला. आणि बघता बघता स्ट्रॅटेजीजना सुरुवात झाली. आमच्या सोसायटीचे हौशी क्रीडापटू कसे मागे राहतील?
सृष्टीच्या अंताच्या वेळची एक अनोखी प्रेमकथा.
प्रकार: अदभुतिका ( फॅंटसी)
सूर्याकडून तांबूस सोनेरी किरणं उसनी घेऊन उल्हासित झालेली पहाट श्री.दिक्षीत यांच्या दारावर हळुवार थाप मारू लागली होती परंतु उशिराच्या जागरणामुळे असेल किंवा रात्रीच्या पार दुसऱ्या प्रहरी लागलेल्या झोप यांमुळे असेल श्री.दिक्षीत तिच्या गोड हाकेला प्रत्युत्तर देत नव्हते. आपल्या सोनेरी रूपावर भाळून स्वागताला येणाऱ्या दिक्षीत यांची तिला अगदी सवयच होऊन गेलेली होती. परंतु आज ते बाहेर येत नाहीसं पाहून तिला अचंबा वाटला. थोडावेळ वाट पाहून थकलेली पहाट मोत्यासारख्या शुभ्ररुपात त्यांच्या दरवाजात अवतरली.
राम राम मंडळी,
बघता बघता २०१६ संपायला फक्त ०२ दिवस उरले आहेत. सरत्या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहे ज्या आठवणीत राहतील.
माझ्यसाठी म्हणाल अर्नेस्ट हेमिंग्वेची ट्रेंड मध्ये आलेली ' सिक्स वर्ड्स स्टोरी' हि चांगलीच लक्षात राहिली.त्याची हि स्टोरी होती "For sale: baby shoes, never worn," या सिक्स वर्ड्स स्टोरीच्या ट्रेंडने जगात भरपूर धुमाकूळ घातला. नेमक्या सहा शब्दांत व्यक्त होणं जरा कठीणच काम. पण अनेका जण हि कसरत साधत अगदी सहा शब्दांत व्यक्त झाले.
---------काल गावाकडून पुण्याकडे एशियाड्मधून येत होतो. तेव्हाचं डोक्यातलं विचारचक्र ------
पंधरा नम्बरची सीट मिळालेये मस्त.अगदि मध्यभागी बसच्या.शिवनेरी वॉल्वो ऐवजी ह्यावेळी एशियाड घेउन किती स्मार्टपणा केलाय बॉस मी. संध्याकाळची वेळ. मस्त आल्हाद गारवाय हवेत. वाहती हवा. अगदि गरमी म्हणावी अशीही हवा नाही, आणि अगदि गारठून वैतागावे अशीही थंडी नै. मी स्वतःवरच खुश. आपण किती स्मार्ट आहोत त्याबद्दल. एरव्ही खूपदा शिवनेरीने जातो असह्य उकाडा वाटला तर. साडे तीनशे ऐवजी ऑल्मोस्ट सातशे रुपये पडतं भाडं इन द्याट केस.
.
.
८ नोव्हेंबरला पंतप्रधानांनी नोटबंदीची घोषणा केली. त्यावर बऱ्यावाईट प्रतिक्रिया येणं सुरु झालं.काळ्या पैशेवाल्यांचे चेहरे पांढरे पडले अन प्रामाणिक लोकांचे चेहरे खुलले. पण काळे नं पांढरे ह्यातल्या कश्याशीही संबंध नसलेला आमचा मन्या मात्र नोटबंदीच्या निर्णयानंतर परेशान झाला होता. आता अर्थातच हे आमच्या ध्यानात आलं नव्हतं. साहजिकच आहे म्हणा, नोटबंदी नंतरच्या गदारोळात मन्याची आठवण येणे शक्यंच नव्हते. पण त्यादिवशी बँकेच्या लायनीत उभा असताना, दूर झाडाखाली मन्या दिसला. मी त्याच्याजवळ गेलो.