बाप
सकाळची वेळ. सगळीकडे एकप्रकारचं चैतन्य संचारलेलं. सूर्याची कोवळी किरणं सगळीकडे पसरलेली. सार्वजनिक नळावर बायकांची पाणी भरण्यासाठी लगबग चाललेली. घरोघर दारात सडे टाकून त्यावर सुंदर रांगोळ्या काढण्यात गुंतलेल्या मुलीबाळी. कुणी शेतकरी आपली गुरे घेऊन शेताकडे निघालेला. पाणी भरता भरता बायकांचा आवाज वाढायला लागला. वाढत्या उन्हाबरोबर पाणी भरण्याची घाई वाढू लागली आणि त्यासोबतच भांडणांनाही सुरूवात झाली. रस्त्याच्या कडेलाच असणार्या झोपडीसमोर फाटक पोतं अंथरूण बसलेलं सुधाकरचं म्हातारं आपले मिचमिचे डोळे उघडायचा प्रयत्न करत होतं पण ऊन्हामुळं डोळ्यांसमोर अंधारी येत होती.