विरंगुळा
अलिबाबा चाळीस चोर लेटेस्ट व्हर्जन !
जुनी उचकापाचक करताना ही एक उचापत सापडली..
*********
( फार पुढे कधीतरी भविष्यात मुलं आपल्या जुन्या इसापनीती, सिंदबादच्या सफरी, अरेबीयन नाइट्स चुकून कधी वाचतील तर त्यातून ते त्यांच्या मनासारखा अर्थ लावत जातील आणि मग काहीसं असं होईल )
कालच एक गोष्ट वाचली ओल्डेस्ट स्टोरी डॉट कॉम वर 'आलिबाबा आणि चाळीस चोर'
एका गावात एक अलीबाबा राहत असतो खूपच गरीब असतो तो साधा नोकिया सी फाईव्ह नसतो त्याच्याकडे. तो रोज गाढवं घेऊन बाहेर जायचा, गाढव हा शब्द मी आजोबांकडून खूप वेळा ऐकलाय पण त्याचा फोटो काल पाहिला सेम आयशर गाडीवर लोगो असतो ना! तसा दिसतो
मोदी आणि मोदी
रॉयटर्सचा वार्ताहर मोदींची मुलाखत घेत आहे. मुलाखतीचे थेट प्रक्षेपण सुरू आहे.
वार्ताहरः मोदीजी, तुमचे आवडते फळ कोणते?
मोदी: आंबा
क्षणार्धात सर्व वाहिन्यांवर ब्रेकींग न्यूज येते.
"मोदींना पेरू आवडत नाही" . . .
पुढच्या क्षणी प्रतिक्रिया येऊ लागतात.
मिपास्तोत्र
नम्स्कार , बरेच दिवस आम्चा मनात होते कि सर्वना उपयुक्त असेल असे 'मिपा स्तोत्र' येथे द्यावे .
याचा स्तोत्राच फायदा मला झाला. तुम्हि हे स्तोत्र रोज वाचुन स्वतः अनुभव घ्याव.
( श्री सपादक प्रसन्ना )
'जालि' प्रवेशला मन्गलनन्दन , तो देखिले 'मिपा' सन्स्थल ,
'पन्कजराजा' करि स्त्वन , सम्पादकाचे हे देवा //१//
जय जय 'मिपा' चालका, सन्स्थल पालका ,
प्रवेश द्या या बालका, 'तथास्तु' य नावे //२//
मुंबईच आगळ रुप पाहताना
दक्षिण मुंबईत एका बांधकाम पूर्णत्वाला आलेल्या इमारतीमध्ये अगदी थेट गच्चीवर जायची संधी मिळाली. मुळात वर जाणे हासुद्धा एक थरारक अनुभव होता - अजुन काम बरेच बाकी असल्याने उद्वाहन कार्यरत झाने नवह्ते. इमारतीच्या बाहेरुन लोखंडी मनोरा बांधुन त्यात तात्पुरते उद्वाहन म्हणजे चक्क एक पिंजरा बसविला होता. एखाद्या हॉटेलच्या बाहेरुन लावलेल्या कॅपसूल लिफ्ट मधुन बाहेर पाहणे वेगळे. इथे फट फट फट फट आवाज करत सरळ्सोट वर चढत जाणार्या पिंजर्यातुन लहान होत जाणार्या इमारती आणि आपण केवळ एका कप्पीवर आहोत ही धास्ती क्षणभर का होईना पण जाणवली.
आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)
उनक
जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही.
आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्यावर नाचत नाही हे दाखवणार कस?
< निशःब्द >
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/25136
सुरेश चे लग्न जमत नसते त्यामुळे तो टेन्शन मधे असायचा. आज बुधवार होता. बुधवारी एक कविता करणे हा सुरेशचा नियम होता त्यामुळे तो आजतरी बाहेर जाणार नव्हता. मात्र लग्न जमत नाही या तेन्शन मुळॅ त्याच्या बुधवारच्या कविता आटल्या होत्या. इतक्यात रमेश चा फोन आला
" काय अरे सुरेश बाबांची प्यान्ट टेलरकडुन आणायची विसरलास. मी ती दीड वीत लहान करायला दिली होती.
तू सुद्धा ...अरे मी देखील टेलर मास्तरला ती बाबांची प्यान्ट दीड वीत कमी करा म्ह्णून सांगुन आलोय." सुरेश.
म्हणजे तु सुद्धा." रमेश
कविता आमची रसग्रहण तुमचे
हा कवितेचा आकडी प्रकार
इथे कवि फक्त शब्द लिहीतो
रसिकांनी त्या शब्दांना त्यांना पाहिजे तो अर्थ देऊन त्यांना पाहिजे तो रस निर्माण करावा
त्याचा स्वाद घ्यावा . मित्र मैत्रिणी निमंत्रित करून रसपान केल्यास मुक्ती प्राप्त होते असे ऐकले .
एक दोन तीन
एकदो न तीन
एकदोन '' ती '' न
काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १
निमित्त कॉफीचं
वैभवला कशाचा तरी आनंद साजरा करायचा होता, कसला ते तो मला आधी सांगायला तयार नव्हता. पण त्यासाठी तो मला एका प्रसिद्ध ‘कॉफी शॉप’मध्ये घेऊन गेला.
वैभवने मला हुकूम सोडला. “साधं-सरळ वाच. तुझं उर्दू वाचन इथं आत्ता दाखवायची गरज नाही.”
