सामूहिक मतप्राधान्याचे (एक्सेल) विश्लेषण
निवडणूका जवळ आल्या आहेत ( तशा नाहीत, पण प्रचार चालू आहे तेव्हा...).
तर सर्वात चांगला उमेदवार कोणता? ज्याला ५०% पेक्षा मते पडतात तो? पण असे झाले नाही तर? ज्याला सर्वात जास्त मते पडतात तो? पण हे कसे कळणार कि तो किती जणांना किती आवडतो.
सोम्या, गोम्या आणो सोग्या तीन उमेदवार आहेत. १०० मतदार आहेत. ३४, ३३, ३३ अशी अनुक्रमे त्यांना मते पडली. गोम्या आणि सोग्या ला मत देणारांना वाटते (६६% जणांना) कि 'बाकी काहीही होवो, सोम्या रपाटून पडावा'. पण बहुसंख्यांची इच्छा असूनही सोम्या चक्क जिंकतोय.

