सांप्रतकाळी भारतवर्षात काय, किंवा विलायतेस काय, बरेच उच्चविद्याविभूषित जंटलमन आणि सुविद्य लेड्या ज्योतिषांची टर उडविताना दिसतात; कां की त्यांचे मते ज्योतिष हे एक थोतांड असून लबाड ज्योतिषी मडळींनी केवळ आपली तुंबडी भरण्यासाठी ते रचिलेले आहे, आणि ज्याअर्थी विश्वचूडामणि असलेल्या ‘आम्रविका’ खंडातील प्राख्यात ‘सायनस’या महासिकाची ज्योतिषविद्येस मान्यता नाही, त्याअर्थी हे थोतांड असल्याचे निर्विवादपणे सिद्धच होते, सबब समस्त लुच्च्ये ज्योतिषी हे खेटरे मारण्याच्या लायक होत.
बरे, एकीकडे हे चित्र, तर दुसरीकडे पहावे तो ज्योतिषांकडील गर्दीस खळ नाही, वृत्तमानपत्रादिकात याविषयीची सदरे, धोत्रे, बंड्या, चोळ्या, इत्यादि वर्षानुवर्षे सुखनैव चाललेली असतात, त्यांसही खळ म्हणून नाही; राशिचाक्रादि कार्यक्रम लोक दमड्या खर्चून चवीने बघतात, दूरदर्शनादिवरील गुबगुबीत, साजर्या - गोजर्या ज्योतिषांचे तर उखळ कायमचे पांढरे झाल्याचे दिसूनच येत असते, ज्योतिषाचीच जुळी भावंडे म्हणावीत, अश्या वास्तुशास्त्र, फ़ेंगशुई, नाडी इ. ची भलावण करणारेही बहुत लोक सांप्रत दिसून येतात.
सारांश, या दोन्ही प्रकारची माणसे एकसमयावच्छेदेकरून दृष्तोत्त्पत्तीस येत असल्याने मति गुंग होऊन बहुत मनुष्यांचे ठायी आपण ज्योतिषाकडे जावे किंवा कसे, असा संभ्रम निर्माण झालेला दिसून येत असतो.
आम्ही स्वत: ज्योतिषाच्या वाटेस कधीच गेलेलो नव्हतो, परंतु एके दिवशी योगायोगाने ‘लंबक विद्या’ हे पुस्तक आमच्या हाती पडले, आणि बघता बघता आम्ही स्वत:च लंबकाद्वारे भविष्यकथन करू लागलो. (या विषयी आम्ही आमच्या "एक 'वजनदार' धागा" या लेखात सविस्तरपणे सांगितले होते. जिज्ञासुंना ‘इथे’ टिचकी मारून तो लेख बघता येईल).
कालांतराने आम्ही लंबकाचे प्रयोग करणे कमी करत गेलो, त्या सुमारास एक दिवस आमच्या परिचयातील एक वयस्क जोडपे आपल्या तरूण मुलीस घेऊन आमचेकडे आले. सदर तरुणीची मलूल मुद्रा, हताश दृष्टी इत्यादिंवरून तिला काही असाध्य व्याधी जडली असावी, असे वाटत होते. इला काय झाले, अशी पृच्छा करता इचा प्रेमभंग जाहलेला असून त्यायोगे ती फार कष्टी जाहलेली आहे, सबब दिवसभर उदासवाणी बसून असत्ये, खातपीत काहीएक नाही, आम्ही सर्वांनी तिची फार समजूत घातली, तरी त्याचा काहीएक उपयोग नाही, दिवसेंदिवस इची प्रकृती खालावत चाललेली आहे, डागतरांचे औषधाचाही काहीएक परिणाम नाही, सबब ज्योतिषाच्या तोडग्याशिवाय काही तरणोपाय आम्हास आता दिसत नसल्याने तुमचेकडे आलो आहोत, असे उत्तर मिळाले.
हे सर्व ऐकून आम्ही फार कष्टी होऊन स्वत:शीच ह्मणालो:
“अरेरे, काय या बापुडीचे प्रारब्ध, “वो हस के मिले हमसे, हम प्यार समझ बैठे” अशी सुरुवात होऊन आता इची अवस्था “ तंग आ चुके ही कश्म-कशे जिंदगीसे हम, ठुकरा न दे जहां को कहीं बेदिली से हम ” अशी झालेली आहे. “बहार आनेसे पहले, खिजां चली आयी” हेही तिच्या मुद्रेवरून दिसून येत आहे. इच्या “बेदर्दी बालमा” ने “बेमुरव्वत” पणे इजला “हाय अकेला छोड गये” असे करून तो स्वत: मात्र कुणाबरोबर तरी “ये राते, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा” म्हणत खुशाल हिडत आहे. इची “तडप ये दिन-रातकी” अशी अवस्था बघून कुणीतरी आता इजला “राही तू मत रुक जाना… कभी तो मिलेगी तेरी मंजिल, कहीं दूर गगन की छाओंमे” अशी सांत्वना तातडीने देणे गरजेचे आहे, आणि ज्याअर्थी हे तुजकडे मोठ्या आशेने आलेले आहेत, त्याअर्थी हे काम आता त्वां सत्वर करावेस, याबद्दल किमपि संशय नाही”
आमच्या अंतर्मनाने असा निर्वाळा देताच आम्ही ताबडतोब आमच्या लंबकविद्या करण्याच्या जागी स्थानापन्न होऊन त्या मुलीस आमचे समोर, तर तिच्या माता-पित्यास दोन्ही बाजूला बसवून दृष्टी लंबकावर स्थिर ठेवण्यास सांगितले, आणि आम्ही त्या बापड्या मुलीस मदत करण्याचे आवाहन आमच्या लंबकास करून चित्त एकाग्र केले.
लंबकाकडून अनुकूलतेचा इशारा मिळतच आम्ही मोठ्याने “हिचा ज्याच्यावर जीव जडलेला आहे, तो तरूण या घडीस काय करीत आहे?” असे विचारले, यावर लंबकाकडून “सांप्रत तो दुसर्या स्त्रीसोबत रममाण झालेला आहे” असे उत्तर मिळाले, त्यावरून ती तरुणी हमसाहमशी रडू लागली. तिचे जरा सांत्वन करून मग आम्ही “बरे, तर मग तो तरूण स्वभावाने कसा आहे?” असे विचारता “तो चंचल स्वभावाचा असून नित्य नवीन स्त्रियांच्या शोधात फिरणारा लंपट पुरुष आहे” असे आले. मग “इचा त्याचेशी विवाहसंबंध घडून आल्यास तो सुखाचा ठरेल काय?” असे विचारता “किमपि नाही” असे उत्तर त्रिवार आले. “विवाह केल्यास आणखी काय घडेल?” अशी पृच्छा करता “सासरी फार छळ होऊन पुढे वैधव्य येईल” असे उत्तर मिळाले.
एवढे सर्व होईतो साधारणत: अर्धा कलाक उलटलेला होता, आणि त्या मुलीच्या चर्येवर अंमळ तरतरी येऊ लागलेली होती. पुढे “हिने आता काय करावे?” अशी पृच्छा लंबकाद्वारे केल्यावर “अभ्यासात लक्ष घालून शिक्षण पूर्ण करावे” असे उत्तर मिळाले, आणि "हिच्या विवाहाचे काय?" असे विचारता “शिक्षण पूर्ण झाल्यावर आई-वडीलांनी शोधलेला उत्तम पती लाभून सुखाचा संसार होईल” असे कळले.
आता मुलगी चांगलीच सावरली होती आणि तिच्या मुद्रेवरील भाव पालटून ती समाधानी दिसत होती. बर्याच दिवसांनंतर ती प्रथमच पोटभर जेवली, आणि आणि आमचे वारंवार आभार मानून ती मंडळी स्वगृही परतली. आठवडाभरातच तिच्या वडिलांनी ती आता पुनश्च पहिल्यासारखी झाली असून नीट अभ्यासाला लागली असल्याचे कळवले. आम्हालाही ती पुन्हा “आज फिर जीने की तमन्ना है” या स्थितीत आल्याचे ऐकून बरे वाटले.
आणखी एक उदाहरण म्हणजे आमच्या परिचयातील (आता दिवंगत) पासष्ठ वर्षे वयाचे एक चित्रकार विधुर असून एकटेच मोठ्या घरात रहात असत. त्यांचा एकुलता एक मुलगा परदेशात स्थायिक झालेला होता. एक दिवस मला ते म्हणाले, की तुला अगदी खाजगी असे काही सांगायचे आहे, आणि तुझ्या लंबकविद्येद्वारे त्या बाबतीत भविष्य जाणून घ्यायचे आहे.
त्यांच्या संपर्कातील सुमारे पन्नाशीतील एका विवाहित स्त्रीवर त्यांचे मन जडले होते. त्या स्त्रीस तीन मुले असून ती पती व मुलांसोबत रहात असे. त्यांना असे वाटू लागले होते, की तीही त्यांच्यावर अनुरक्त असून यांनी पुढाकार घेतल्यास ती सहजच आपले घर सोडून यांच्याबरोबर येऊन राहील.… आम्हाला जरी हा सर्व त्यांच्या एकटेपणाचा, विधुरावस्थेचा आणि कल्पनाशीलतेचा परिणाम आहे, असे वाटले, तरी त्यांना मात्र पूर्ण खात्री वाटत होती, हिंम्मत मात्र होत नव्हती.
मी त्यांना विचारले, की सध्या तिचे तुमच्याबद्दलचे आकर्षण, (आणि त्यामुळे तिची तुम्हाला ‘हो’ म्हणण्याची शक्यता) किती टक्के असावे असे तुम्हाला वाटते? “ऐशी टक्के” ते म्हणाले. मग मी टक्केवारीचा चार्ट वापरून लंबकाद्वारे तिचे हे आकर्षण पुढील काही वर्षात कमी कमी होत होत पाच-सात वर्षात ते पूर्णपणे लयाला जाईल, असे त्यांना दाखवून दिले. परिणामी त्या गृहस्थांनी तो नाद सोडून दिला (आणि संभाव्य मानहानि आणि संकटापासून बचावले).
वाचकहो, निराशेच्या गर्तेत सापडलेली ती मुलगी आणि खोट्या आशेत दिवास्वप्ने बघणारे ते गृहस्थ यांना त्यांच्या त्या त्या स्थितीतून बाहेर काढण्यास या विद्येचा उपयोग आम्ही करू शकलो, हे काय कमी आहे? हे प्रयोग आम्ही कवडीही न घेता करायचो, शिवाय येणाराचे आदरातिथ्य करायचो, यात आमचा कोणता स्वार्थ होता? त्या दीड-दोन वर्षात आम्ही बरेच जणांना दिलासा देऊ शकलो, मदत करू शकलो. पुढे मात्र आम्ही असे प्रयोग करणे थांबवले, ते आजतागायत.
सारांश, ज्योतिषाच्या विविध पद्धतींचा निस्वार्थीपणे, समजून उमजून नीट उपयोग केला गेला, तर ती एक उपयोगी, हितकारक विद्या ठरू शकते, भले तीस ‘शास्त्र’ म्हणता येवो वा न येवो.
पत्रिका बघून सांगितलेले भविष्य तंतोतंत खरे ठरल्याचे अनुभवही आम्हाला आलेले आहेत, मात्र हे अनुभव धंदेवाईक ज्योतिषांकडून आलेले नसून निस्वार्थीपणाने लोकांच्या मदतीसाठी आपल्या विद्येचा उपयोग करणार्या, विनम्र व्यक्तींनी केलेल्या भविष्यकथनाविषयी आहेत. त्याविषयी पुढे कधितरी.
प्रतिक्रिया
9 Oct 2013 - 5:10 pm | प्रकाश घाटपांडे
चित्रगुप्त जी पापपुण्याचा हिशोब नंतर करायच्या ऐवजी आत्ताच करताय का?
9 Oct 2013 - 5:11 pm | तिमा
आम्हास आमच्या बालपणापासूनच 'लंबकर्ण' असे चिडवण्यात आले. आता वृद्धपणी माणसाचे फक्त नाक व कानच वाढत जातात, असे आम्ही कुठेशी वाचले होते. त्यामुळे आम्ही आता आणखी किती लंबकर्ण होणार, अशी चिंता लागून राहिली आहे. त्याशिवाय अनेक उपचिंताही आहेतच. तरी आपल्या या लंबक चिकित्सेचा लंबकर्णाचे भवितव्य सांगण्यासाठी उपयोग होणार असेल तर आम्ही आपल्याला त्वरेने भेटू इच्छितो.
- तिरशिंगराव लंबकर्णे
9 Oct 2013 - 5:20 pm | दादा कोंडके
एका लंबकाने दुसर्या लंबकाचा घात केला. कुर्हाडीचा दांडा गोतास काळ की म्हणतात तसं. :))
9 Oct 2013 - 5:41 pm | प्रसाद गोडबोले
:D
9 Oct 2013 - 5:35 pm | अनिरुद्ध प
माझे एक डोक्टर नातेवाईक जीथे औषध सापडत नाही तिथे या विद्येचा वापर करित असत आणि बर्याच वेळेस त्यन्च्या भाषेत सान्गायचे म्हणजे miraculous results मिळत,माझे एक मुसलमान स्नेही हे पत्रिकेच्या आधारावरुन औषधोपचार करत असत्,आणि मुख्य म्हणजे ते आपले हिन्दु पन्चाग घेवुन बसलेले असत्,आणि पेशन्ट हे मुख्य करुन मुसलमानच जास्त असत.
9 Oct 2013 - 8:51 pm | पैसा
एवढा चांगला व्यवसाय सोडून कुठे ती चांदोबातली चित्रे काढत बसलात?
10 Oct 2013 - 3:12 am | स्पंदना
भाषेवर अतिशय लोभ जडला असुन चित्त शांत जाहले असल्याची खात्री पटली.
28 Aug 2022 - 12:10 pm | शशिकांत ओक
१९व्या शतकातील मराठी भाषेत लंबकविद्येची हस्तकला, समुपदेशन भावले. धागा १०००० धक्के खात मस्त तरंगत असल्याचे दिसते...
10 Oct 2013 - 6:55 am | पक्या
छान लेख. आवडला.
10 Oct 2013 - 10:47 am | बाळ सप्रे
दोन्ही उदाहरणात जोतिषाचा काहीच संबंध नाही.. तुम्ही चांगलं समुपदेशन केलत असं म्हणता येईल.
यात वेळ्प्रसंगी खोटं बोलणं हितकारक असं म्हणता येईल.. उगाच लंबक, जोतिषाची भलावण कशाला.. (लंबकविद्या गमतीचा भाग असला तरीही)
तुमचं समुपदेशन कौशल्य चांगलं आहे तर जोतिष वगैरे न वापरताही लोकांचं भलं करु शकाल तुम्ही !!
त्यामुळे जोतिष विद्या नाही शास्त्रही नाही.. तुमच्या तंतोतंत खरं ठरलेल्या भविष्याच्या अनुभवावर पुन्हा कधीतरी लिहाल तेव्हा ते खरं खोटं ठरवुच :-)
29 Aug 2022 - 9:29 am | चौकस२१२
सप्रे आपण अगदी यौग्य शब्दात हे मांडलेत १००% सहमत
10 Oct 2013 - 11:25 am | चित्रगुप्त
दोन्ही उदाहरणात ज्योतिषाचा खरेतर संबंध नाही हे खरे, परंतु ती मंडळी माझ्याकडे समुपदेशक म्हणून कधीच आली नसती. त्यांना ज्योतिषावर विश्वास असल्याने, आणि मी लंबकाद्वारे भविष्य सांगू शकतो, अशी त्याकाळी जी थोडीबहुत ख्याति पसरली होती, त्यामुळे ते आले होते. दुसर्या उदाहरणातील व्यक्तीशी माझा परिचय या प्रसंगापूर्वीही वीस वर्षांपासूनचा असून त्यांनी कधीही त्यांच्या वैयक्तिक गोष्टी उघड केल्या नव्हत्या.
'इंद्रियातीत बोध' असे ज्याला साधारणपणे म्हणता येईल, त्याचा ज्योतिषात प्रयोग होत असतो. लंबकाच्या प्रयोगातही खरोखर भविष्यात डोकावता येऊन ते जाणून घेण्याचे अनुभव आलेले आहेत, म्हणूनच काही काळ मी कसोशीने त्याचा पाठपुरावा केला होता.
10 Oct 2013 - 1:29 pm | बाळ सप्रे
आता त्या दोघांनाही सांगा जे सांगितले होते ते खोटे होते.. पण तुमच्या भल्याचेच होते..
तुमचे समुपदेशन कौशल्य चांगले असल्याने त्यांना ते नक्की पटू शकेल.. आणि हे ही समजेल की अशावेळी जोतिषाच्यामागे जाण्याऐवजी एखाद्या समुपदेशकाकडे जावे..
11 Oct 2013 - 9:48 am | चित्रगुप्त
त्यापैकी त्या मुलीचा व तिच्या पालकांचा आता काही ठावठिकाणा नाही (प्रयत्न केल्यास कदाचित मिळू शकेल, पण तेवढी उठाठेव करण्याची तातडी वाटत नाही).
... ते वृद्ध चित्रकार केव्हाच दिवंगत झालेले आहेत. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे, कधीकाळी दिल्लीतील प्रसिद्ध चित्रकारांपैकी एक, आणि काहीसे आढ्यताखोर होते. खरेतर ते मला (आणि इतर सर्वांना) कःपदार्थ समजत. मला कोण काय शिकवणार? असे त्यांना वाटायचे, त्यामुळे समुपदेशकाकडे ते कधीच गेले नसते. कित्येक यशस्वी लोकांना आपल्याला लोकांपेक्षा जास्त कळते, असे वाटत असूनही 'ज्योतिषाकडे मात्र काही विशिष्ट योग्यता असते, त्यामुळे त्यांना भविष्य जाणून घेता येते' अशी समजूत असते, असे बघितले आहे.
मुळात आपले विचार चुकीचे आहेत (वा सध्या चुकीच्या दिशेने जात आहेत), हेच बहुतेकांना मान्य नसते. त्यामुळे समुपदेशनाची गरज आपल्याला आहे, हे पटत नसते. तरी भविष्यात काय होणार आहे ? हे कुतुहल मात्र असते.
आता इथेच बघा. सध्या मिपावर 'ज्योतिष हे थोतांड असते' आणि 'ते खरे असते' असे दोन तट पडलेले आहेत. असे समजा की यातील कोणतेतरी एक सत्य आहे (म्हणजेच पन्नास टक्के लोकांचे विचार चुकीचे आहेत). असे असून 'माझे विचार चुकीचे असल्याने मला समुपदेशनाची गरज आहे, सबब मी एकाद्या समुपदेशकाकडे जायला तयार आहे' असे किती लोक मान्य करतील? माझ्या अंदाजाने कोणीच नाही.
उद्या मी जर समुपदेशकाचा बोर्ड घरावर लावला तर कोणीही माझ्याकडे सल्ल्यासाठी येणार नाही (हे मी अनेक वर्षांच्या अनुभवाने सांगतो आहे, ती पण एक मोठी कथाच होइल) पण ज्योतिषाचा लावल्यास दोन-चार लोक तरी लगेच येऊ लागतील, ही वस्तुस्थिति आहे. त्यातून हा फुकटात भविष्य सांगतो म्हटल्यावर तर एरव्ही कधी त्या वाटेस न जाणारे सुद्धा येतात, हे मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे.
ज्या शहरात मी रहातो, तिथे किती आणि कोणकोण समुपदेशक आहेत, हे मला वा माझ्या परिचयातल्या कुणाला ठाऊक नाही, ज्योतिषी मात्र अनेकांना ठाऊक आहेत. अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन कुणाला फसवू नये, हे अगदी खरे, आणि हे फक्त ज्योतिषांसाठीच नाही, तर सर्वांसच लागू होते. (हल्ली तर या बाबतीत डागतर आणि इस्पितळे यांचा हात धरणारा कुणी नसेल).
माझ्या स्वतःच्या माहितीत काही पैका न घेणारे, आणि उत्तम मार्गदर्शन करणारे (समुपदेशन करणारे म्हणा हवे तर) ज्योतिषी आहेत, अश्या लोकांकडे जाणे मलातरी काहीच चुकीचे वाटत नाही. असो.
11 Oct 2013 - 10:48 am | बाळ सप्रे
आपला स्वतःचा जोतिषावर विश्वास असेल तर गोष्ट वेगळी.
पण आपला विश्वास नाही पण लोकांचा आहे म्हणून आपण जोतिषाच्या भूमिकेतून खोटं सांगून लोकांचं भलं करण्यापेक्षा आपल्या विचारांशी प्रामाणिक राहून लोकांना जोतिषातला फोलपणा दाखवून त्यांच्या स्ट्रेंग्थ दाखवून देउन योग्य मार्गदर्शन करणे जास्त उचित वाटते..
12 Oct 2013 - 6:56 pm | चित्रगुप्त
लंबकाच्या सहाय्याने भविष्याचा वेध घेण्याचा जो प्रयत्न मी केला, त्यात अकल्पित यश मिळाले, म्हणूनच मी दीड - दोन वर्षे त्याचा पाठपुरावा केला. मागे मी म्हटल्याप्रमाणे इंद्रियातीत बोध, ज्याला स्थला-कालाचे बंधन नाही, त्याद्वारे भविष्याचा वेध घेता येऊ शकतो, हा माझा अनुभव आहे. याचा लंबक, ग्रहादिकांचे भ्रमण वगैरेंशी नेमका काय संबंध आहे, हे मला ठाऊक नाही. जगात जे काही घडते, ते विशिष्ट निसर्ग-नियमानुसारच, त्यामुळे याचेही नियम असणारच, पण ते मला तरी ठाऊक नाहीत. आपण रोजच्या जीवनात जी अनेक उपकरणे, यंत्रे इ. वापरतो, ती ज्या तत्वांनुसार काम करत असतात, त्यापैकी किती आपल्याला ठाऊक असतात? तरी आपण त्यांचा उपयोग करू शकत असतो.
बंगळुरात सीतम्मा नामक बाई फोटो बघून भविष्य सांगत, त्यांनी माझ्या लहान मुलांच्या बाबतीत सांगितलेले आज पंचवीस वर्षांनंतर खरे ठरले आहे. अन्य ज्योतिषांनी सांगितलेले खरे ठरल्याचीही प्रचिती आलेली आहे. मी स्वतः लंबक ज्या दिवशी प्रथम हाती घेतला, त्या दिवशी कळलेले भविष्य तंतोतंत खरे निघाले, म्हणूनच त्याविषयी उत्सुकता वाढून प्रयोग करत गेलो होतो.
अर्थात शंभर टक्के गोष्टी सांगता येत नाहीत हे मात्र खरे. हेही काही विशिष्ट नियमांद्वारेच होत असणार.
12 Oct 2013 - 8:28 pm | बाळ सप्रे
शंभर टक्के सोडा ८०-९० येत असेल तरी ते कसे याबाबत लिहा.. नुसत्या अनुभवाच्या कथा नकोत..
13 Oct 2013 - 12:38 am | चित्रगुप्त
लंबकाबद्दलचा आधीचा धागा वाचला असेल तर त्यात सर्व लिहिले आहेच.
मी वर लिहिलेच आहे, की यामागे कोणते नियम काम करतात हे मला ठाऊक नाही.
जास्त उत्सुकता असणार्यांनी लंबकाचे प्रयोग स्वतः करून शाहनिशा करून घेणे श्रेयस्कर. त्यात यश मिळाले नाही, तर माझी कोणतीही जबाबदारी नाही, आणि जमले तर त्यात माझे काही श्रेयही नाही.
मला काहीही सिद्ध वा असिद्ध करण्यात काडीचाही रस नाही, आणि मला काही अनुभव आले, म्हणून ते इतरांनाही मान्य व्हावेत असा आग्रह तक बिल्कुलच नाही. मला लंबकाच्या प्रयोगांमधून काहीही मिळवायचे नव्हते आणि नाही. कुतुहलामुळे काही काळ केले आणि कुतुहल शमल्यावर सोडून दिले.
13 Oct 2013 - 1:11 pm | प्रकाश घाटपांडे
भुमिका आवडली. पटण न पटण हा भाग वेगळा!
10 Oct 2013 - 1:00 pm | मंदार कात्रे
छान लेख. आवडला.
10 Oct 2013 - 3:36 pm | म्हैस
नाही नाही. त्या दोघांना अजिबात खरं सांगू नका. त्यांना जे समाधान मिळालाय ते तसंच राहूदे. आणि खरं सांगितलत तर तुम्हाला खेतराचा प्रसाद मिळणार नाही ह्याची काळजी घ्या.
12 Oct 2013 - 10:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
खरच हरहुन्नरी आहात ! लेखनाची ढबही मस्त आहे. तुमचे भविष्याच्या संदर्भातले अनुभव वाचायला आवडतील. टाका लवकर.
13 Oct 2013 - 1:30 am | प्यारे१
छान अॅप्रोच आहे तुमचा.
बाकी उद्या जी गोष्ट घडणार आहे नि उद्याच घडणार आहे तिच्याबद्दल आज जाणून घेण्याचा जो हव्यास असतो तो इतका का असावा?
उद्याचं उद्याच घडण्यात जास्त मजा नाही काय?
13 Oct 2013 - 2:37 pm | अग्निकोल्हा
मधे हा मुद्दा मस्त अनुशंगला आहे.
नेमका हाच मुद्दा दोघांमधे (टॉम अन कॉलीन) चर्चेत असतो, तेव्हड्यात बोलता बोलता टॉम क्रुझ कॉलीनला व्यवस्थित दिसेल अशा पध्दतिने एक चेंडु टेबलाच्या उतारावर जमिनीच्या दिशेने काहिसा वेगाने सोडतो अन तो घरंगळत खाली पडणार तेव्हड्यात कोलीन फॅरेल पुढे येउन तो चेंडु (स्मार्ट्ली) कॅच करतो... यावर मुळ चर्चा बाजुला राहतेय असे वाटताना असे संभाषण घडते.
टॉम क्रुझ : तु चेंडु का पकडलास... ?
कोलीन फॅरेल : नाही तर तो जमिनीवर पडला असता.
टॉम क्रुझ : :) नक्किच, पण आता पडला तर नाहिना ?
13 Oct 2013 - 10:57 am | चित्रगुप्त
@प्यारे१ ...
... लेखनशैलीच्या संदर्भात म्हणता की ज्योतिषाबद्दलच्या विचारांच्या संदर्भात ?
13 Oct 2013 - 12:47 pm | प्यारे१
दोन्ही!
आत्ता विशेषत्वानं विचार. :)
13 Oct 2013 - 12:12 pm | शशिकांत ओक
चित्रगुप्ता,
आपला व्य.नि व नंतर धागाला प्रातर्विधी सदनात बसून वाचता वाचता एका कार्यक्रमाला जायचे विसरून गेलो व पत्नीचा 'आामंत्रणाच्या कार्यक्रमाला विसरला कसे?' असा बोल ऐकायला लागला. नंतर तिने मिपावरील आपला धागा वाचायला सुरवात केली व पहिला चहा बनवायचे मागे पडले तेंव्हा तिलाही कळले आपले पतिराज का रंगून गेले असावेत! कारण चित्रगुप्तांची हातोटीच अशी की भाषेचे वेगळेपण जपून आपल्याला हवा तसा विषयाला हात घालून त्यातून विनोद, संगीत व विविध कलांची असी पखरण ते करतात की जणू दिवाळीच्या काळात आकाश कंदिलाच्या आसपास सुबक व रंगबिरंगी रांगोळीचे मखर तयार केले आहे. असो.
ज्योतिषाकडे 'जावे का - का जावे' ? या 'डालडा' टाईप प्रश्नाचा डाऊझिंगच्या लंबकाच्या तोलावरील आपल्या हातोटीची करामात वाचून रंजन झाले! तरुणीच्या 'असाध्य' रोगाची लक्षणे व अनुरागाची विविध रुपे गाण्यात गुंफून आपण धाग्याचा सुमनाहार केलेला भावला. लंबकाने मातापित्याच्या भावनांची कदर करून तिला अयोग्य मार्गाकडे न जाण्याचे समुपदेशन पुढे फळले हे वाचून फार बरे वाटले.
विक्षिप्त चित्रकाराला लंबकाने 'मैत्रिणीचे रुपांतर पत्नीपदात न केलले बरे' असा सावध करणारा इशारा त्याने पाळला व त्याचे भले झाले वाचून लंबकविद्येचा समाजोभिमुक उपयोग खचितच इतरांनी अमलात आणावा असा होता.
त्या विधुराच्या मनात मनमौजातील 'जरूरत है (3) एक श्रीमती की, कलावती की, सेवा करे जो पति की - सक़्त जरूरत है' हे गीत रंगवले असेल. अशी कल्पना करतो.
14 Oct 2013 - 2:44 pm | धन्या
किती ते गोड गोड बोलावं. ;)
15 Oct 2013 - 1:44 am | शशिकांत ओक
गोडाला गोड गोड नको का म्हणायला? .... त्यात संकोच कशाला म्हणतो मी?
13 Oct 2013 - 5:34 pm | चित्रगुप्त
फारा वर्षांपूर्वी नित्य वाचनात असलेले साहित्य आणि त्या काळातील हिंदी बोलपटातील गाणी यांच्या स्मरणरंजनातून सिद्ध झालेले लेखन भावले, हे वाचून मशारनिल्हे लेखकाच्या चित्तास अंमळ तकवा येऊन च्यार घटिका बहुत हुशारी वाटली.
13 Oct 2013 - 7:59 pm | उद्दाम
हायला, लंबकवाले, आम्हालाही मार्गदर्शन करा की.
आमचा संसार मार्गी लावून द्या.
13 Oct 2013 - 8:36 pm | चित्रगुप्त
अहो, लंबकापेक्षा समुपदेशनाचा मार्ग चोखाळा, असा आम्हाला सल्ला मिळालेला आहे. तरी तुमची काय समस्या आहे? प्रेमरोग? प्रेमभंग? कोर्ट कचेरी? अडलेले प्रमोशन? व्यापारात नुकसान? शेयर बुडाले? पाहुणे ठाण माडून बसलेत? छोकरी पटेना? लग्न ठरेना? नवरा-बायकोचे पटेना? मूलबाळ होईना? लॉटरी लागेना? ध्यान लागेना? मोक्ष मिळेना? काय आहे तरी काय?
14 Oct 2013 - 2:07 pm | स्मिता.
काका, तुमचं व्यक्तिमत्त्व फारच बहुआयामी आहे. कोण-कोणत्या 'रोचक' विषयाला तुम्ही आतापर्यंत हात घातलाय हे पाहिलं तर प्रश्न पडतो की कोणते विषय तुम्ही सोडले आहेत :)
तुमच्याकडून अश्या निरनिराळ्या अनुभवांतून आलेल्या कहाण्या ऐकायला आवडते आणि आवडेल.
15 Oct 2013 - 9:51 am | सुबोध खरे
अरेच्चा हे बरे आहे.
आता मी पण लंबकाचा वापर सुरु करेन असे म्हणतो. चित्रगुप्त साहेब तुमची शिकवणी लावेन म्हणतो वर गुरुदक्षिणा (ते नको नसते लफडे) मानधन ( पण देईन चालेल का?) . म्हणजे रुग्णाला जे काही सांगायचे आहे त्यात आमची नैतिक जबाबदारी लम्बकावर टाकता येईल.वर चूक आले तर जबाबदारी काहीच नाही. आम्ही असे प्रयत्न केले होते आणी नैतिकतेच्या मुद्द्यावर भरपूर मार खाल्ला http://www.misalpav.com/node/24347. अजून माराच्या खुणा बाकी आहेत.
ह. घ्या. आपला कृपाभिलाषी
सुबोध
6 Jul 2014 - 3:06 pm | चित्रगुप्त
नवीन मिपाकरांसाठी पुन्हा एकदा.
6 Jul 2014 - 11:09 pm | आयुर्हित
१)'इंद्रियातीत बोध' असे ज्याला साधारणपणे म्हणता येईल, त्याचा ज्योतिषात प्रयोग होत असतो.
२)अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन कुणाला फसवू नये, हे अगदी खरे, आणि हे फक्त ज्योतिषांसाठीच नाही, तर सर्वांसच लागू होते. (हल्ली तर या बाबतीत डागतर आणि इस्पितळे यांचा हात धरणारा कुणी नसेल).
१०१% सहमत.
मानले आपल्याला आणि आपल्या निष्कर्षांना!!
आपल्याला लाभलेले प्रयोगशिल व्यक्तिमत्व असेच जपून ठेवा.
7 Jul 2014 - 2:29 pm | vrushali n
अजुन काही प्रयोग केले असतील/अनुभव आले असतील तर वाचायला नक्किच आवड्तील
10 Jun 2015 - 3:58 am | चित्रगुप्त
नवीन मिपाकरांसाठी पुन्हा एकदा.
10 Jun 2015 - 7:12 am | सोत्रि
फारा दिवसांनी मिपावर लॉगिन केल्याचे सार्थक झाले हा धागा वाचून!
सटायर फक्कड जमले आहे, शैली खुमालदार!!
- (लंबक वापरणारा) सोकाजी
10 Jun 2015 - 8:57 am | कंजूस
{मिसळपाव}राज-ज्योतिषी,कथाकार,विदुषक,मंत्री,सल्लागार,डॅाक्टर,चित्रकार वैद्य आणि आता ६तारखेपासून {आदेश}भावोजी मिपावर प्रस्थापित झाले आहेत. इतरांना या कला अवगत नाहीत असे नाही परंतू पदवी एकालाच असते.
13 May 2017 - 1:08 pm | प्रकाश घाटपांडे
वाट पाहिली बरीच! अजून काही टाकल नाही मिपावर
13 May 2017 - 3:29 pm | चित्रगुप्त
खरेतर जुने बरेच काही विस्मरणात गेलेले आहे, तरी आठवेल तेवढे सांगतो.
माझा मोठा मुलगा बंगलुरात असलेली चांगली नोकरी सोडून पॅरिसला शिक्षणासाठी गेला. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही केल्या त्याला नोकरी लागेना. (बरोबर शिकणार्या सर्वांना नोकर्या लागल्या होत्या) भारतात परतावे तर पुन्हा जायला व्हिसा मिळाला नसता. मोठी कठीण परिस्थिती झालेली होती. त्याकाळी आमच्या कालोनीत एक ज्योतिषी रहायचा. स्वतःहून पैसे मागत/सांगत नसे पण लोक आपणहूनच काही पैसे ठेऊन यायचे. त्याने सांगितले की सध्या तुम्ही त्याला खर्चाला पैसे पाठवा, मात्र अमूक आठवड्यात अचानक एका अनोळखी व्यक्तीशी त्याची भेट घडून येईल आणि त्यातून नोकरी लागेल. मग त्याने सांगितलेल्या आठवड्यातच हॉटेलात जेवताना मुलाची एका मराठी माणसाची ओळख झाली. तो मुंबईतल्या एका नामवंत आयटी कंपनीत असून त्यांना पॅरिसमधे फ्रेंच भाषा येणारा भारतीय आयटीवाला हवा होता. त्यानंतर भराभर चक्रे फिरून पॅरिसमधेच मुलाला नोकरी मिळाली.
दुसरे उदाहरण आमच्या नात्यातील एक मध्यमवयीन गृहस्थांना अचानक एका रोगाने पछाडले. त्यांना रोज सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत चक्कर यायचे. नोकरीवर जाणे शक्यच नव्हते, सुमारे तीनेक वर्षे हा क्रम चालला. पगार बंद झाल्याने रहाते घर विकून भाड्याच्या घरात रहायला गेले. दिल्लीतील सर्व प्रसिद्ध दवाखान्यात तपासण्या केल्या पण रोगाचे निदान झाले नाही. बत्रा हॉस्पिटलवाल्यांनी मेंदूची शस्त्रक्रिया सांगितली, पण फायदा होईलच, याची खात्री डॉक्टरासही नव्हती, त्यामुळे त्यांनी ते केले नाही. त्यावेळी अवघे तीस रुपये घेऊन पत्रिका बनवण्यासकट भविष्य सांगणार्या एका वृद्ध ज्योतिषाने अमूक ग्रहाची दृष्टी तमूक ग्रहावर आहे, ती ग्रहस्थिती तीन महिन्यानंतर बदलते आहे, तसे झाले की आपओआप तुम्ही बरे व्हाल, आर्थिक समस्याही सुटेल, काहीही औषधोपचार वा ग्रह-शांती, अंगठी वगैरेंची गरज नाही असे सांगितले आणि खरोखर अगदी त्याप्रमाणेच घडले. विशेष म्हणजे खाजगी कंपनीत असूनही त्यांना त्याच कंपनीत त्याच पदावर पुन्हा नोकरी मिळाली.
ही दोन उदाहरणे मला आत्ता आठवली ती सांगितली. याबद्दल माझे स्वतःचे काहीही म्हणणे वा आग्रह नाही. धाग्यात सांगितल्याप्रमाणे मला काहीही सिद्ध वा असिद्ध करायचे नाही. आणखीही काही आठवतील तेंव्हा लिहेन.
28 Aug 2022 - 3:15 pm | कर्नलतपस्वी
हायला काय भारी योगायोग आहे.
मिपाच्या नर्सरीतले विद्यार्थी आम्ही. फावल्या वेळात बुद्धिमान वयस्कांचे धागे काढून वाचत आसतो.
"तुला काय ठावूक सजणी" च्या निमित्ताने प्रतीथयश चित्रकार चित्रगुप्त या अवलियाची ओळख झाली.
प्रत्यक्ष बोलणे झाले.
एक वजनदार धागा हा त्यांचा लंबक विद्ये वरील लेख आगोदरच वाचला होता.
आज हा धाग्याची लिंक दिल्याबद्दल लेखकाचे आभार.
लेखकाशी सहमत आहे. विद्या आहे किंवा नाही हा वेगळाच विषय पण रोगी ठिक होत असेल तर एक उपाय म्हणून करायला काय हरकत आहे.
जेवढी सुंदर रंगचित्रे तेवढीच सुंदर शब्दचित्रे. भाषेवर असलेले प्रभुत्व खुप काही शिकवून जाते.
धन्यवाद.
29 Aug 2022 - 8:45 am | चौकस२१२
सुविद्य लेड्या ज्योतिषांची टर उडविताना दिसतात;
प्रत्येक विरोध काही आंधळा नसतो
ज्योतीष समजणारे आणि त्याचा व्यावसाय म्हणून करणारे ( व्यवसाय करणे यावर आक्षेप नाही ) हे इतर वयसायिकांप्रमाणे समाजा तील नियमांना कटिबद्ध होऊन व्यावसाय करतांना दिसत नाहीत म्हणून यावर प्रश्न उठवले जातात ...
१) डॉक्टर सिविल इंजिनेर दोन्ही आपलया शास्त्रातून जे सल्ले देतात त्यात ज्योतिष प्रमाणेच कोणतीही खात्री नसते पण पाहिलया दोन व्यासायिकांना आधी अनेक वर्षे अभ्यास करावा लागतो + कोणताही दावा करताना त्याचा व्यसायीक सन्स्थेकडून त्याची उलट तपासणी होण्याची शक्यता असते ... तसे ज्योतिषांना कुठे असते .. तुम्हीच म्हणालात कि एक पुस्तक वाचून करायाला लागलो.... !
२) यात "भोंदू गिरी " अंधश्रद्धा पसरवायला मुभा राहते ... आणि यातून एक प्रकारचे शोषण होण्याची शक्यता वाढते ... उद्या इंजिनियर ने सांगितले कि "एका २ इंच पाया असलेल्या छोट्या खांबावर १० माजली उंच इमारत उभी करा" तर त्याला " हे टिकेल कसे ते दाखव" असा प्रश्न विचारता येतो/ त्याचे मुल्य मापन करता येते .. प्रयोगशाळेत असा दावा सिद्ध करण्यांचे बंधन लावता येते
ज्योतिषाला काहीच असले बांधणं नसते
३) पब्लिक लायबिलिटी ... काय असते हो ज्योतीषाला ? वर परत हे म्हणायला मोकळे कि " तुमचा विश्वास नाही म्हणून मी दिलेला "उपाय" चालला नाही !
- एखादा बायो मेडिकल इंजिनेर किंवा स्थापत्य शास्त्रांन्ञ असली पळवाट काढू शकेल काय ?
ताजे उदाहरण : अमेरिकेतील एलिझाबेथ आणि सनी बलवानि यांचयवरील "थेरानोस" या रक्त चाचानी यंत्र व्यवसायातील बनवणाऱ्या उद्योगाबादल नक्की वाचा ... २ थेंबात २०० चाचण्या करू असे यंत्र बनवतो असा खोटा दावा केला यांनी... दावा उघडकीला आला आणि निदान त्यातील एका व्यक्तीला तरी कोर्टात दोषी ठरवलं गेला .. हेच जर एखद्या "प्रसिद्ध" ज्योतिषाने " रस्त्याचे खोदकाम अमुक दिवशीचा करा आणि त्याच पाणी साचून ते खोदकाम दोषी झाले आणि त्यातून पुढे काही अपघात झाला तर त्या ज्योतिषाची जबाबदारी काय ??? शून्य
४) अगदी फुकट जरी सल्ला कोणी देत असले तरी वरील सर्व नियमातून त्याची सुटका का व्हावी ?
29 Aug 2022 - 8:49 am | चौकस२१२
आणि बघता बघता आम्ही स्वत:च लंबकाद्वारे भविष्यकथन करू लागलो.
29 Aug 2022 - 8:51 am | आग्या१९९०
' थेरोनोस ' बदल सहमत
29 Aug 2022 - 9:07 am | चौकस२१२
त्या दीड-दोन वर्षात आम्ही बरेच जणांना दिलासा देऊ शकलो, मदत करू शकलो. पुढे मात्र आम्ही असे प्रयोग करणे थांबवले, ते आजतागायत.
चित्रगुप्त साहेब ... तुमचा अपमान करायचा या हेतून ने नाही पण हे खालील मुद्दे अमी मांडू इच्छितो विचारात घ्या कृपया
हे विचारतो कि
हा जो सल्ला मार्गदर्शन तुम्ही केलेत ते ( कि जे समाजाच्या दृष्टीने एका चांगलेच पाऊल आहे ) ते एक अनुभवी + हुशार + जगातील ठोकताळे माहिती असलेली व्यक्ती म्हणून तुम्ही केलं असेल किँवा तुमच्यासारखी कोणिही इतर प्रगल्भ व्यक्ती करू शकते ... त्यात "ह्या लंबक ज्योतिष " चा काय संबंध ?
तर्क लावला तर
दोन्ही उदाहरणात तुम्ही परस्थितीचाच साधक बाधक विचार करून त्या मुलीला आणि त्या मित्राला
" हे जे तुमच्या मनात चाललंय ते खरे होण्याची / त्याच्य्या मागे लागून तो हेतू सफल होण्याची शक्यता तपासून पहा सद्सद्विविक बुद्धीने " एवढाच सल्ला दिलात
मज़े वडिलांचं बाबतीत असेहच घडले होते त्यांचचहा मित्र अनाथ झालेलया पुतण्याला सांभाळत असे एक दिवशी तो मुलगा घर सोडून गेला नई मित्र वडिलांकडे सल्ला मागायला आला ... त्यांनी साधा सल्ला दिला " उत्तरेला जा , आणि काही तरी चमचमीत खायला घेऊन ये रात्री ९ नंतर .. पुतण्या सापडेल " .. साधा तर्क होता ... छोट्या गावातील उत्तरेला बस स्टॅन्ड पाशी त्यातल्या त्यात रात्रीपर्यंत गर्दी असायची आणि तिथेच काय ते उशिरणे चहा खाणे मिळायचे
आड वयाचा एक पोरगा घरातून वैतागून निघाला / खसिहत पैसे नाहीत तर असह्या छोट्या गावात कुठं सापडेल भूक लागल्या वर?
पुतण्या मिळाला, वडिलांना एक पार्टी लागू झाली ! हाय काय आणि नाय काय !
विषय गंभीर आहे खरा पण जरा तर्क वापरला तर अनेक गोष्टीत सुटतात कि किंवा मग अश्या वेळी मानाचं रोगाचे निदान करणारे तद्न्य आहेतच कि ( डॉक्टर मोहन आगाशे यांचे यावर संशोधन आहे )
1 Sep 2022 - 10:00 am | प्रकाश घाटपांडे
याबद्दल अधिक माहिती साठी उत्सुक आहे
तो पर्यंत ज्योतिष- पलभरके लिए कोई हमे प्यार कर दे झूटाही सही!
1 Sep 2022 - 10:35 am | चौकस२१२
काय अजून माहिती पाहिजे ?
तर्काने अनेक गोष्टी सुतंतू शकतात ... मी त्या पळून गेलेल्या पुतण्याचे / भाज्यांची गाडी उदाहरम दिले कि
अनुभवातून लोक ठोकताळे मांडतात आणि मिळालं देतात तिथे काही श्रद्धा वैगरे कशाला लागते
बाकी मानस उपचार तन्य कसे काम करतात हे मी कसे सांगणार
अपल्याकडे तरी "... दे झूटाही सही!" असे प्रेम द्यायला जागा नाही बुवा ...
हा सूर्य हा जयंद्रथ किंवा "बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर" हा आपला या बाबतीत टारीखाक्या आहे
1 Sep 2022 - 6:46 pm | प्रकाश घाटपांडे
मोहन आगाशे यांच्या संशोधनाचा संदर्भ हवा आहे. काही लेख वा लिंक असल्यास द्या
2 Sep 2022 - 5:12 am | चौकस२१२
https://www.mimhpune.org/directors.php