विरंगुळा
तु तुझे मन फक्त गच्च ठेव, बाकी घोड्यावर सोड
( स्वच्छ मन या लँडमार्क लेखाचा स्वैर अनुवाद. )
मी ओंफ्फसमधुन घेरीत जात होतो. पुढे काही आंतरावर मेंदू ज्याम होणार होता. मी माझ्या बायकोचा वेग कमी केला आणि तिला सोफ्यावर थांबवली. तशी त्या ज्याम मधून प्रत्येकजण बाहेर येण्याचा प्रयत्न करु लागला.
बॉडीचा आवाज, आतल्या गर्दीचा आवाज येत होता. तिथे जवळच एका म्हशीच्या ॐ चा आवाज येत होता. मी विचार केला, आयला, प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो. मला प्रत्येक आवाज काय सांगतोय ते जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यावेळी अनेक आवाज कानात घुमत होते.
अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय
अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय
"कपारीतील दगडाची चालणारी गाय" अश्या नावावरून काहीच संदर्भ लागत नाही ना? मलाही नाही. अगदी याची देही याची डोळा पाहून आलो असलो तरीही नाही. मग असे नाव का? कारण 'सूरदास' म्हणाला म्हणून.
"दगडाचा पुतळा दरवर्षी काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकतो" - खरे वाटत नाही ना? मलाही नाही. पण खोटे ठरवायला कारण पण नाही माझ्याकडे.
आता हा सूरदास कोण? कसला गायीचा पुतळा ? काय गव्हाचे दाणे ?
पार्कात दिसलेली 'ती'
उन्हाळ्याची सुटी चालू होती. तेव्हा मी रोज संध्याकाळी आमच्या शाळेच्या ग्रुपला बोलवायचो आणि त्यातले जे येतील त्यांच्याबरोबर गावभर हुंदडायचो. मी कॉमर्सचा विद्यार्थी त्यामुळे मला रोजच वेळ असायचा. आमचा अख्खा शाळेचा ग्रुप इंजिनिअरिंग कडे वळलेला. त्यामुळे माझ्या सुट्टीत त्यांच्या परिक्षा चालू नाहीतर क्लासेस तरी चालू. क्वचितच अख्खा ग्रुप जमायचा. असाच एकदा आमच्या ग्रुप मधल्या जान्हवी आणि पूजा मला भेटल्या. त्या दोघी एकमेकींच्या अगदी घट्ट मैत्रिणी. जान्हवी इंजिनिअरिंग करणारी, आणि पूजा ग्रुपमधली एकुलती एक कला शाखेची विद्यार्थिनी.
आनंद - कार्लसन - डाव ४
चौथा डाव सुरू झालाय -- हा डाव निकाली निघणार असे वाटतेय.
सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया
दै. बातमीपत्र (बातमीपत्रच म्हणजे बातमीपत्र)
सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया
आमच्या वर्तमानपत्राकडे आलेल्या असंख्य प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया खाली देत आहोत.
गोपाळ सुंदर, अमरावती: सचिन म्हणजे क्रिकेटचा देव आहे. देव कधी रिटायर होतो का? लागू म्हणतात देवाला रिटायर करा.
पंकज मोरे, कारसुळ बु.: सचिनची निवृत्तीची बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. वडील म्हटले शेतावर जा अन कांद्याला पाणी दे. मी गेलो नाही, घरीच माळ्यावर रडत बसलो.
वचन
तसे हे लहानसेच खेडे,जेमतेम वस्ती असलेलं,आंबा-फणस,चिंच,नारळ-पोफळी यांच्या गर्दीत लपलेलं,वर्षानुवर्षे त्याच स्थितीत असलेलं,आधुनिकीकरणाचा स्पर्शही न झालेलं,गावात ठराविक पाच पन्नास घरं,सताठ दुकाने असलेला जुनाट बाजार,एक छोटी शाळा, एक ग्रामपंचायतीचे घर,त्याला लागून पोस्ट. गावाला दुभागून जाणारा लाल मातीच्या लोटाने भरलेला रस्ता.हि सडक सरळ पार तालुक्यापर्यंत जाते.याच रस्त्याने पुढे गेलं कि हळूहळू गाव मागे पडतं, आपण सड्यावर येतो,भणाणत्या वाऱ्याने बरं वाटतं.एखाद दोन किलोमीटर अजून पुढे गेलो कि दोन फाटे फुटतात. एक सरळ तालुक्याला, आणि एक छोटी सडक खाली.
२०१४ च्या निवडणुकीनंतरचा झांगडगुत्ता : एक सोल्युशन
सालाबादप्रमाणे पाच वर्षांनी निवडणुका येणार. काही जण गुडघ्याला बाशिंग लावून बसले. काही काळजीत पडले, काही बोहल्यावर चढले, काही लाल किल्ल्यावर चढून बसले, काही टवाळ मोडात गेले, काही मवाळ मोडात गेले तर काही मौनात गेले. पण कर्णपिशाच्चाने सांगितलं कि सगळेच आपटणार म्हणून. च्यायला, सगळ्यांना कधी ना कधी चान्स मिळाला, आता कुणाला चुना लावताय या मोडात मतदार आहे. त्याला जास्त चुना लावायला गेलं तर जाळ होणार यात शंका नाही.
तरुण तुर्कांनो व ज्येष्ठ अर्कांनो प्रेमकोषा च्या निर्मीतीस योगदान द्यावे ही प्रेमळ विनंती !
मिपावरील तरुण तुर्कांनो आणि ज्येष्ठ अर्कांनो प्रेमात पडलेल्या ,पडु इच्छीणारे आजी-माजी प्रेमवीरांनो यंदा च्या दिवाळी ला एक महान मिपा प्रेम-कोष तयार करुन समाजसेवा करण्याचा मानस आहे. की जेणेकरुन भावी आणि सध्याच्या प्रेमी जीवांना एक रेडी रेकनर प्रेम फ़ुलविण्यास, प्रेयसी ला आपले प्रेम पटवुन देण्यास उपयोगात येइल आणि ज्या योगे एक ऐतिहासिक महत्वाचा विश्वकोषा च्या धर्तीवर प्रेमकोष बनु शकेल. याने प्रेम या संकल्पने वर एका जागी सुंदर असे साहीत्य ही जमा होइल. यात आपण उदार हस्ते आपल्या जवळील प्रेम खजिना शेअर करुन प्रेमकोष निर्मीतीस योगदान करावे ही प्रेमळ विनंती !.
सांगा, कसे केलेत तुम्ही हे सर्व ? … आणि मिळवा एक चित्र.
मंडळी, यंदाच्या मिपाच्या दिवाळी अंकातली एक कथा तुम्ही वाचली असेल, त्यातील कथानायक 'मदनकेतु' याच्यावर श्रीकृष्णाने एक महत्वाची जबाबदारी टाकली होती. ती म्हणजे नरकासुराच्या वधानंतर मुक्त केलेल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना प्राग्जोतिष्पुराहून द्वारकेपर्यंत सुखरूपपणे घेऊन जाणे.
