जिजामाता उद्यान कट्ट्यासाठी सर्वांना सहकुटूंब आमंत्रण.....
भायखळ्याचं जिजामाता उद्यान.
जवळजवळ ५० एकर विस्तीर्ण परिसरावर दीडेकशे वर्षांपासून उभं असलेलं हे उद्यान मुख्यता प्राणिसंग्रहालय म्हणून प्रसिद्ध. इथे लोक येतात ते प्राणी-पक्षी बघायला. हल्ली तिथे फार थोडे प्राणी शिल्लक आहेत. मात्र प्राणिसंग्रहालय असलेल्या या उद्यानात अनेक दुर्मीळ आणि आगळेवेगळे वृक्षही आहेत, हे फार थोड्यांना माहीत असेल.