विरंगुळा

सीकेपी खाद्य जत्रा आणि डोंबिवलीत भरलेले, अभिजीत आर्टस आयोजीत, "आफ्रीकेतील जंगली प्राणी व पक्षी यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन" ... कट्टा

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
17 Feb 2014 - 12:11 pm

,

प्रिय मिपाकरांनो,

कसे आहात?

गेले ७/८ दिवस सीकेपी हॉल्,ठाणे इथे सीकेपी खाद्य पदार्थांची जत्रा आहे, असे तुम्हाला समजावे आणि आम्ही काही मिपाकर मंडळी पण तिथे जाणार आहोत, अशा अर्थाचा एक धागा मी काढला होता.

तशी लहानपणा पासून मला ह्या ना त्या निमीत्ताने, ह्या पदार्थांची चव घ्यायला मिळत असे.मित्र तर सीकेपी होतेच पण आमचे शेजारी पण सीकेपी होते.आम्ही करतो ती करंजी आणि सीकेपी लोक करतात ते कानोले.हा फरक फार पुर्वीच लक्षांत आला होता.

संस्कृतीविरंगुळा

जीम-जीम-जिमात!!

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
17 Feb 2014 - 11:31 am

मला बारीक असण्याचा, सडपातळ असण्याचा न्यूनगंड वगैरे नाहीये बरं का... असलाच तर अभिमानच आहे. बहुतांशी लोक स्वतःला 'मेंटेन' करण्याचा सतत प्रयत्न करत असतात, मला मात्र तसं काही करावं लागत नाही. मी आपोआपच मेंटेन होतो. गेली चार-पाच वर्षं मी जसा होतो तस्साच आहे. या कालावधीत माझा खुराक वाढला, थोडीफार उंचीही वाढली, पण रूंदी अजिबात वाढली नाही. आई वडील सुद्धा (कोणे एके काळी) बारीक होते, त्यामुळे मी सुद्धा आहे, माझी ठेवणच तशी आहे, अशा सबबी मी 'तू जाडा केव्हा होणार' असं विचारणा-या मंडळींना देत असतो.

राहणीमौजमजाविचारविरंगुळा

आत्मूबाबा स्माईलीवाले बाबांच्या आश्रमात

सू डोकू's picture
सू डोकू in काथ्याकूट
17 Feb 2014 - 2:26 am

‘आत्मूबाबा स्माईलीवाले’ या नावाच्या पाटीची तीनदा खात्री करुन आम्ही त्या आश्रमात शिरलो. आतील वातावरण टिपीकल म्हणजे सर्वच आश्रमात असते तसे आध्यात्मिक, सुवासिक वासाने भारावलेले आणि प्रसन्न होते. समोरच बाबा प्रशस्त अशा लाकडी व्यासपीठावर मांडी घालून बसलेले होते. गौरवर्ण, फिकट भगव्या रंगाची सॅटीनची कफनी, खाली त्याच रंगाची लुंगी, हातात गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, भाळी चंदनाचा लेप, त्यावर मध्यभागी केशरी टिळा असे दृष्ट लागण्यासारखे तेजस्वी रुप. त्यांच्या पुढ्यात लॅपटॉप होता, आणि त्यावर ते काहीतरी टंकण्यात मग्न होते. आम्ही त्यांच्या शेजारी एका बाजूला जाऊन उभे राहिलो.

मिपा दंगा धागा क्र. २..... मिपावरील बल्लव आणि सुग्रणींचे संमेलन भरवू या का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
16 Feb 2014 - 10:45 pm

इथे दर आठवड्याला कुणी ना कुणी रेसीपी देत असतो.

पण चव आणि वास न समजल्याने कुठला पदार्थ चांगला. हे काही समजत नाही.

तर,

आपण एक "बल्लव आणि सुग्रणींचे संमेलन भरवू या का?"

परीक्षक म्हणून

सुबोध खरे,पैसा ताई,सर्वसाक्षी,रामदास काका,अजया इ. तयार असतीलच.

६/७ महिने आधीपासूनच आयोजन केले तर उत्तम.

पा.क्रु. देणारी बरीच मंडळी अनिवासी भारतीय असल्याने, त्यांच्या सवडीला प्राधान्य देण्यात यावे.

ठि़काण कुठलेही चालेल.

हा पण धागा तद्दन विनोदी असल्याने, जास्त सिरीयस घेवू नये....

मिपा दंगा....धागा क्र. १.....डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण होवू शकते का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
15 Feb 2014 - 1:39 pm

हा धागा फक्त दंगा करायलाच आहे.हा निव्वळ टाइमपास धागा असल्याने वैयक्तिक शेरेबाजी टाळावी.

ह्यात कुठलाही स्वार्थ नाही...असलाच तर परमार्थच आहे.जेणेकरून तमाम मिपाकरांना एक २०० ते २५० मी. लांबी असलेल्या फडके रोडचे दर्शन घेता यावे.

ह्या निमीत्ताने मला, महारष्ट्राचा तमाम भौगोलिक.ऐतिहासिक आणि सांस्क्रुतिक इतिहास पण समजेल.

तुम्हाला डोंबिवली नको असेल तर. मध्यवर्ती ठिकाण म्ह्णून वडगांव बुद्रुक किंवा तळेगांव खूर्द वाटले तरी लिहा.

नेहमीच्या पुणे,मुंबई आणि ठाणे करांना खास आमंत्रण.

मिस्टर प्रामाणिक

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
15 Feb 2014 - 11:08 am

मी अत्यंत प्रामाणिक आहे बरं! आपल्या देशातलाच काय, या जगातला सर्वात प्रामाणिक माणूस आहे मी! त्यामुळेच तर या भ्रष्टाचारी राक्षसांकडून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी मी पक्ष स्थापन केला. माझा पक्ष मोठ्या संख्येने निवडून आल्याबरोबर लगेच सत्तेचे दलाल सावध झाले. सगळ्यांनी माझ्याविरुद्ध कट केला. मला माहितच होते ते. ते आतून कसे एक आहेत, हेच तर मला जनतेला दाखवून द्यायचे होते. माझे सरकार स्थापन झाल्याबरोबर मला आणि माझ्या माणसांना किती काम करु आणि किती नको असे झाले. रोजच्या रोज आम्ही कामांचा फडशा पाडायला सुरवात केली. सरकारी नियम हे आपणच केलेले असतात नं?

संस्कृतीमुक्तकसमाजराजकारणप्रतिक्रियामतविरंगुळा

काळा घोडा कला महोत्सव कट्टा - वृत्तांत (४)

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
15 Feb 2014 - 12:19 am

तर त्या पोपटाने जोरदार गर्दी खेचली होती. पोपट लहान अस्ला तरी तो भल्या मोठ्या खुर्चीवर बसला होता, खुर्चीशेजारी त्या पोपटाच्या जन्मदात्याचे वडील उभे होते. त्यांचे नाव नरेशभाई. गोरापान वर्ण, निळसर घारे सोळे आणि अथांग शुभ्र दाढी असलेले हे व्यक्तिमत्त्व मला भावले. नरेशभाइंची परवानगी घेऊन त्यांच्या दोन छबी टिपल्या.
kg1

कलाजीवनमानविरंगुळा

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग ४

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
14 Feb 2014 - 3:18 pm

(कृपया भाग १ मधील प्रस्तावना आधी वाचा)

भाग १ - http://misalpav.com/node/26930
भाग २ - http://misalpav.com/node/26938
भाग ३ - http://www.misalpav.com/node/26981

४)

कथासाहित्यिकअनुभवविरंगुळा

काळा घोडा कला महोत्सव कट्टा - वृत्तांत (३)

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
14 Feb 2014 - 1:00 am

आम्ही उत्सवस्थळी दाखल झालो. माझा या उत्सवाला हजेरी लावण्याचा पहिलाच प्रसंग. कलेचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही, अगदी रेघ देखिल सरळ मारता येत नाही. पण चार लोक जातात तर आपणही जावे, लोकांना कुठे माहित असतं की मी 'ढ' आहे? मागे एकदा तर मी जहांगिरला एक चित्र प्रदर्शन देखिल पाहुन आलो होतो. मूढ मुद्रेने एका चित्रापुढे 'हे काय असावे' याचा अंदाज घेत असता तिथल्यांपैकी एकाने मला 'जाणकार' समजुन अनेक भिकार चित्रांची सहल घडवली होती वर वहीत अभिप्राय लिहावा असा आग्रह देखिल केला होता. असो.

कलामौजमजाछायाचित्रणआस्वादविरंगुळा

काळा घोडा महोत्सव कट्टा - वृत्तांत (२)

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
11 Feb 2014 - 9:58 pm

प्रत्यक्ष कट्टाकारांनी अनुमोदन दिल्याने शिर्षकात आवश्यक तो बदल करण्यात आला आहे :)

कलाछायाचित्रणआस्वादविरंगुळा