बाबा वाक्यं प्रमाणं.... भाग १...
खालील लेख हा तद्दन विनोदी आणि फालतू लेख आहे.खूद्द आम्हीच ह्या लेखाला जास्त किंमत देत नाही.आता आम्हीच लेख लिहीणार, म्हटल्यावर त्यात आमचा उल्लेख असणारच.ह्या लेखातील व्यक्ती आजूबाजूला असतीलच असेही नाही आणि नसतीलच असेही नाही.
===========================================================
गेले काही दिवस दुसर्या उत्तम नौकरीच्या शोधात होतो.नौकरी मिळाली आणि पेढे घेवून बाबांच्या मठांत गेलो.दिवेलागणीची वेळ टळून गेली होती.बाबा पण मस्त खूषीत होते.
मी : नमस्कार बाबा.कसे आहात?
बाबा : मजेत.काय मग कधी चाललात सौदीला?
मी: आँ.तुम्हाला कसे काय माहीत?


