खालील लेख हा तद्दन विनोदी आणि फालतू लेख आहे.खूद्द आम्हीच ह्या लेखाला जास्त किंमत देत नाही.आता आम्हीच लेख लिहीणार, म्हटल्यावर त्यात आमचा उल्लेख असणारच.ह्या लेखातील व्यक्ती आजूबाजूला असतीलच असेही नाही आणि नसतीलच असेही नाही.
===========================================================
गेले काही दिवस दुसर्या उत्तम नौकरीच्या शोधात होतो.नौकरी मिळाली आणि पेढे घेवून बाबांच्या मठांत गेलो.दिवेलागणीची वेळ टळून गेली होती.बाबा पण मस्त खूषीत होते.
मी : नमस्कार बाबा.कसे आहात?
बाबा : मजेत.काय मग कधी चाललात सौदीला?
मी: आँ.तुम्हाला कसे काय माहीत?
बाबा : अरे , मी पण आजकाल मिपाचे सदस्यत्व घ्यायच्या विचारांत आहे.बाकी तुमचे मिपा म्हनजे एकदम मस्त बघ.लोक कट्टे काय करतात.आनंदाने शिल्पकला काय शिकतात.प्रवासवर्णने काय लिहीतात.शिवाय मग गेला बाजार, अगदीच काही नाही जमले तर, निदान पाकक्रुती काय लिहीतात.सगळे हिरे ह्या मिपाच्या खाणीतच लपलेले आहेत.
मी : हो ना, पण त्या बरोबर काही रत्ने पण आहेत.
बाबा : अरे, रत्ने ही हवीतच.त्याशिवाय हिर्यांना किंमत नाही.
मी : हो. ते ही खरेच म्हणा.
बाबा : बस.मी तुला २/४ गोष्टी सांगतो.
नं. १ : आजकाल कलयूग आहे.पुर्वी शिष्य गुरुंच्या शोधात भटकायचे.पण आज काल गुरुच शिष्यांच्या शोधांत भटकतात.चांगल्या गुरुला शिष्यांची कमतरता कधीच नसते.तेंव्हा गुरु पारखून घे.
मी : तुमचे म्हणणे बरोबर दिसत आहे.परवाच एका व्याख्यानाला गेलो होतो.मी माझ्या मुलाला त्यांच्या शिक्षण संस्थेत पाठवावे, असे सांगत होते.पण मी काही पाठवणार नाही.माझ्या मुलाला गूण जर चांगले असतील तर मी त्याला उत्तम शाळेतच पाठवणार ना?
बाबा : नं.२,
आजकाल भेसळ जरा जास्तच वाढली आहे.त्यामुळे शक्यतो स्वतःचे अन्न स्वतः शिजवून खा.
मी : मला समजले नाही.
बाबा : पुर्वी आपल्याकडे केळी फार चांगली मिळायची.शिवाय कलींगड वगैरे.पण आजकाल हापूसच्या आंब्याला पण अढीत न पिकवता, वेगळ्या प्रकारे पिकवल्या जाते.तेंव्हा जिथे स्वादाची खात्री नसेल अशा ठिकाणी जास्त फळे खाऊ नकोस.पण सौदीत तुला उत्तम ड्राय फ्रुट्स मिळतील.तेंव्हा त्यांचा आस्वाद घे.
मी : बाबा, सौदीत जायची, ही काही माझी पहीलीच खेप नाही.शिवाय मी एस्किमो गटातला असल्याने, बेगमी करून मगच तो तो देश सोडतो.
बाबा : नं.३,
आजकाल असंतुष्ट माणसे फार.त्यांना कुणी हिंग लावून विचारत नाही.तुझ्या कं.त पण अशी माणसे असणारच.त्यांना जास्त जवळ न घेता दूरच ठेव.जंगलातील सिंह पत्करला कारण लढता लढता मरण आले तरी शौर्य गाजवायचे समाधान तरी मिळते.तेंव्हा लढायचे असेल तर सिंहाशीच लढ.
मी : बहूदा तुमचे म्हणणे खरे दिसत आहे.
बाबा : नं ४,
बर्याच वेळा असे लोक उत्तम माणसाला पाण्यात बघतात आणि मग त्यांना जळी-स्थळी-काष्ठी चांगले लोकच दिसायला लागतात.तुला तो संताजी-धनाजीचा किस्सा माहीत आहेच.तस्मात अशा लोकांना संत होवून माफ कर आणि उत्तम व्यवहारे धन जोडून परत ये.
मी : बाकी ठीक आहे.पण हे संत होणे काही जमेल असे वाटत नाही.
बाबा : अरे एकदम सोपे आहे.अशा लोकांच्या कुठल्याच क्रियेला प्रतिक्रिया द्यायची नाही.तुला एक उदाहरण देतो.
एकदा बुद्धाला एक माणूस खूप शिव्या देत असतो.पण बुद्ध काहीच प्रतिक्रिया देत नाहीत.कारण हाथी चले अपनी चाल......
मी : बघतो जमतंय का ते.पण आता हा आपला कट्ट्याचा व्रुत्तांत मिपावर टाकू का?
बाबा : अरे टाक बिंधास्त.नाही तरी तसा पण तू कट्टेकरी म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहेस.मला तरी ह्या पदवीत वावगे काही दिसत नाही.उत्तम लोक तुला बोलावतात आणि तू पण मान राखून जातोस मग त्यांत वाईट काय? आणि ज्या लोकांच्या विचारांशी तुझे विचार जुळत नाहीत , अशा लोकांच्या बोलावण्याला किंवा तू न बोलावता पण जबरद्स्ती येवू इच्छीणार्या व्यक्तींना तू किंमत पण देत नाहीस.शिवाय मी काही जगावेगळे असे कुठलेच तत्वज्ञान सांगीतले नाही.तेंव्हा बिंधास्त टाक.
प्रतिक्रिया
17 Mar 2014 - 3:48 pm | विजुभाऊ
बाबा : नंबर ५ ,
बर्याचवेळा मुद्दामच असे लिखाण करत जा की ज्या योगे लोकाना त्यावर प्रतिक्रीया देता येईल. शक्यतो अशा धाग्यावर आपण स्वतः स्वतःच्या आयडी ने प्रतिक्रीया द्यायची नाही मात्र कोणी खादी प्रामाणीक शंका विचारली तर त्याला जबरदस्त ठोकुन काढावे की ज्यायोगे तो आयडी पुन्हा शम्का विचारण्याच्या भानगडीत पडणार नाही.
लिखाण लिहीतानाची काही पथ्ये १) बाईक सायकलची जीप ट्रक सारख्या मोठ्या वाहनाशी धडक घडवून आणायचे व ते मोठे वाहन नदीत पाडायचे. २) समजा लिखाण नवराबायको च्या जीवनाशी निगडीत असेल तर त्यात बायको नवर्याला बडवते असे दाखवायचे ज्यायोगे पुरुषांची सहानुभूती आणि अनहितांचा पाठिंबा असे दोन्ही डगरींचा लाभ होईल.३) लिखाणात सर्वसामान्य मराठीतील शब्द थोडे दुमडुन वापरावे उदा: हुबेहूब ऐवजी उभेउभ ज्यायोगे लोक त्या लिखाणावर सडकून प्रतिक्रीया देतील अन धाग्याची शंभरी सहज पार पडेल.४) खादाडीचे धागे काढताना शक्यतो हॉटेलमधील डिशचा फोटो द्यावा ( दिस्क्लेमरसहीत)
17 Mar 2014 - 4:36 pm | मुक्त विहारि
आमच्या बाबा महाराजांना पण हे सांगायला पाहिजे.
विजूभाऊ, आपले घारापुरी नंतर भेटायचे राहूनच गेले.कुछ तो करनाही पडेगा.
17 Mar 2014 - 6:41 pm | अत्रुप्त आत्मा
बालिका मोड ऑन--- '' मु.वा... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ... " ---बालिका मोड ऑफ
17 Mar 2014 - 7:13 pm | मुक्त विहारि
अ,आ,
18 Mar 2014 - 3:42 pm | प्रमोद देर्देकर
वाह वाह मु.वि हे का खासा शालजोडीतले हाणलेत की!
बरं तुम्ही केव्हा निघणार आणि केव्हा परतणार आहात.
प्रवासास शुभेच्छा!
18 Mar 2014 - 5:24 pm | मुक्त विहारि
२५ जूनला भारतात येणार.
२७/२८ जून कडे पुणे.
18 Mar 2014 - 3:45 pm | स्पंदना
बाबा चांगला भेटलाय मुवि तुम्हाला. सौ टके की बात कहेके गया!
18 Mar 2014 - 5:26 pm | मुक्त विहारि
स्वतःच्या पैशांनी पक्षी-तीर्थाला जातात.उगाच जास्त शिष्यगण गोळा करत बसत नाहीत.
20 Mar 2014 - 3:30 pm | जेपी
घ्या तुमच्या बाबांना द्या .आजचा बनवल्या आहेत .नारळाच्या वड्या :-)
लवकरच अनुग्रह घेतला जाईल. *secret*
20 Mar 2014 - 5:59 pm | मुक्त विहारि
बाद्वे,
तुम्हाला व्य.नि. केला आहे.