आईच्या गावात ...... चांगले बोल
हा आठवडा मराठी चित्रपटासाठी सुखद धक्का होता . एकाच आठवड्यात तीन नवीन चित्रपट भेटीस येणार होते . श्यामच्या आईच्या धक्क्यातून अजून सावरलो नसल्याने डोक्याची मंडई न करणारा चित्रपट पाहायचा असे ठरवले होते. पण यावेळेस त्रिधा मनस्थिती झाली होती. 'पंचक' , 'ओले आले' आणि 'आईच्या गावात मराठी बोल' असे तिन्ही विनोदी धाटणीचे पण वेगळ्या अंगाचे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले. (महत्प्रयत्नाने release चा मराठी शब्द गुगल न करता आठवला. काय दिवस आलेत मराठीतले शब्द सुद्धा गूगलवर शोधतोय !!) पंचक माधुरी दीक्षितचा चित्रपट असला , तरी ती यात नव्हती.