रविवार, सोमवार इत्यादि सात वारांची व्य्वस्था पुर्णपणे भारतीय कालगणना पद्धतीने जगाला दिलेली देणगी आहे. (या वाक्यावर अनेक मार्क्सवादी इतिहासकार आणि त्यांच्या सपक लेखनावर पोसलेले त्यांचे पंटर माझ्या अंगावर धावून येण्याचा धोका मला दिसतो आहे.)
तर वार ही भारतीय देणगी नाही - असा आक्षेप येतो त्याकडे आधी पाहू या. सर्व साधारणपणे भारतात काहीच ज्ञान नव्हते आणि जे काही भारताला माहिती आहे ते सर्व भारतात बाहेरून आणले गेले असे साधारण या आक्षेपाचे स्वरूप असते. त्यासाठी रोमन संस्कृतीने इस १०० च्या आसपास 'वार' म्हणजे दिवसांची नावे भारताला दिली असा एक धादांत खोटा 'कयास स्वरूपाचा सिद्धांत' मांडला जातो.
पण हे वार त्यांनी म्हणजे रोमनांनी कसे शोधले किंवा स्थापीत केले यावर काही हे लोक सांगू शकत नाहीत. जास्त विचारले तर मग हे इतिहासकार सांगतात की ते रोमनांनी नाही शोधले. ते वार प्राचीन इटली मधील इत्रूस्कॅन लोकांनी शोधले होते ते रोमनांनी घेतले. या इटालियन इत्रूस्कॅन जनतेने ते कसे शोधले असे विचारले की ते म्हणतात, वार इत्रूस्कॅन लोकांनी मेसपोटामियन लोकांकडून उचलले. (ईटालियन लोकांना चौदाव्या शतका पर्यंत शून्य माहित नव्हते, ते कसले वार शोधणार!?)
म्हणजे पहा जे ज्ञानी रोमन म्हणून आपल्यावर फेकले जातात मुळात त्यांनीच उचलेगिरी केली हे मान्य केले जाते.
या शिवाय कोणतेही पुरावे न देता अजून एक भंपक नाव यात ठोकून जाते ते म्हणजे खाल्डियन लोक आणि त्यांचे ज्ञान. पण हे खाल्डियन लोक कुठे होते हे विचारले तर त्याचे काही उत्तर बहुदा नसते. असो, याचा संदर्भ त्यांना बहुदा उरार्तुशी लावायचा असतो कारण एका अनातोलिया नामक देशातील ग्रीक संस्कृतीशी संबंधीत हे लोक होते हे ही यांना माहित नसते. असो या भाषेतले सर्व ज्ञान आताच्या तुर्की/टर्की लोकांनी नष्ट केले आहे आणि अनतोलिया या मूळ देशाच्या भूभागावर आजचा नाचाचा देश आहे. त्यामुळे त्याचा सिद्ध करण्याची काहीही संबंधच रहात नाही.
तर आपण आता हे सिद्ध केले आहे की रोमनांनी वार वगैरे काही शोधले नाहीयेत आणि स्थापीत तर नक्कीच केलेले नाही. आता दुसरा भाग पाहू या -
वाराच्या दिवसाला तोच दिवस म्हणजे शनिवाराला शनिवारच का म्हणायचे बुधवार का नाही; याचे कोणतेही कारण मार्क्सवादी इतिहासकार आणि त्यांच्या लेखनावर पोसलेले त्यांचे पंटर देऊ शकत नाहीत. कारण वार आणि त्याची काही पद्धती आहे, याची त्यांना माहितीच नाही.
वारांची नावे ही सूर्य उदयाची संबंधीत आहेत. आपण भारतीय कालगणने मध्ये दिवसाची संकल्पना ही सूर्योदयापासून सुरू करतो. (सद्य स्थितीत रात्री १२ वाजता दिवस संपला असे मानले आहे.) भारतीय काल गणनेमध्ये दिवसाचे २४ भाग मानले आहेत. याला होरा असे नाव आहे. (लगेच ग्रीक शब्द हॉरोस्कोप घेऊन पहा रोमन संबंध असे म्हणून माझ्या अंगावर धावू नका! कारण मग मी विचारणार की रोमनांनी दिवसाचे २४ भागच का केले आणि कसे केले हे हे सांगा.)
असे तर हे दिवसाचे २४ होरे प्रत्येक ग्रहास दिलेले आहेत. कसे ते आपण पाहू या. दिवस हा सूर्योदयापासून सुरू होतो हे आपण पाहिले. मग या उदयाच्या वेळी जो ज्या ग्रहाचा होरा असेल तो वार त्या दिवशी असतो. म्हणजे सूर्य उदयास शनीचा होरा असेल तर तो शनीवार. पण मग हे होरे कसे ठरवले? तर त्यासाठी प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ आर्यभट्ट लिखित केलेले सूत्र आहे. (त्यांनी लिहिले म्हणजे त्या आधी ते वापरात होते. त्याने ते फक्त लिहिले - आणि हो नशीबच की ते सूत्र लिहून ठेवले) तर ते सूत्र म्हणजे - आ मंदात शीघ्र पर्यंतम होरेशा:
म्हणजे जो सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे त्यापासून ते सर्वात वेगाने चालणारा ग्रह आहे त्या क्रमाने एक एक होरा दिवसात येतोसासर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे शनि महाराज. आणि सर्वात वेगाने चालतो तो चंद्र. (आता लगेच चंद्र आहे ग्रह नाही उपग्रह आहे वगैरे बोलू नका, चंद्र हा ज्योतिषात ग्रह मानलेला आहे).
तर हे सर्व सात ग्रह उदयासमयी शनि महाराजांपासून सुरूवात करून एका मागे एक असे यातात. जसे की पहिला शनी, दुसरा बृहस्पति, तिसरा मंगळ, चौथा रवि, पाचवा शुक्र, सहावा बुध आणि सातवा चंद्र. तर अशा रीतीने प्रत्येक ग्रहा पासून चौथ्या ग्रहाचा वार येतो. (जिज्ञासूंनी २१ होरे अधिक ३ होरे केले असता कुणाचा येतो हे गणित करून पाहिल्यास दिसेलच)
अशा रितीने प्राचीन भारतीय गणितज्ञानी आणि ज्योतिष गुरूंनी वार पद्धती विकसित केली. आणि जसे आकडे अरबां मार्फत प्रथम इटली आणि मग उर्वरीत युरोपात पसरले हे आपण पाहतो आले, तसेच वार ही भारतातून युरोपात गेले हे सहज सिद्ध होते.
संदर्भ:
१. कुण्डलीची भाषा खंड पहिला, पान क्र.७, आवृत्ती चौथी, लेखक वाईकर शुक्ल
--
मकरसंक्रांती एक जागतिक परंपरा? येथे गवि यांना उत्तर देण्याऐवजी प्रतिक्रिया जरा उद्धटपणे उमटली म्हणून एक वेगळा लेख केला आहे.
प्रतिक्रिया
15 Jan 2024 - 12:31 pm | गवि
अरे वा. तपशीलवार लेख. धन्यवाद.
आता वर उल्लेखिलेली उद्धट प्रतिक्रिया शोधणे आले. सापडत नाही. बादवे माझा कोणताही दावा नाही की अमुक पद्धत पाश्चात्यच आहे किंवा भारतीय आहे.
15 Jan 2024 - 2:11 pm | मुक्त विहारि
वाखूसा ...
15 Jan 2024 - 9:20 pm | प्रसाद गोडबोले
रामायण , महाभारत , वेद, पुराणे किंव्वा प्रमुख उपनिषदे ह्यात कुठेही वारांचा उल्लेख असलेले श्लोक द्या म्हणजे तुमचे म्हणणे पुराव्याने शाबित होइल.
16 Jan 2024 - 1:09 pm | निनाद
आरसा दाखवण्याचा मक्ता मी घेतलेला नाही.
थोडा फार शोध घेतला असता तर तुम्हाला ही कदाचित हे मिळाले असते.
पारंपारिक ज्ञान हे भारतीय आहे हे दाखवून देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, ते न करता ज्यांनी चार शब्द लिहिले आहेत, ते कसे चुकीचे असावेत अशा प्रकारची संशयाची पिंक टाकून जाणे योग्य नाही. कोणताही संदर्भ न देता फक्त विनाकारण संशय मात्र निर्माण करत आहात, हे योग्य नाही!
तरी दाव्यात खोट राहू नये म्हणून -
येथे सापडल्याप्रमाणे
याशिवाय माझ्या ऐकीव माहितीनुसार शिवपुराणात भगवान शिवाने आठवड्याचे सात दिवस निर्माण केल्याचा आणि त्यांना देवता नियुक्त केल्याचा उल्लेख आहे. त्यात असे म्हटले आहे की पहिल्या सृष्टीत सात दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी परमेश्वराने ठरवले होते.
देवी भागवत पुराणातही वासरांचा उल्लेख आहे. येथे दिलेल्या प्रतिनुसार आठवड्याचे सात दिवस असा स्पष्ट उल्लेख केला गेला आहे.
माझ्या अल्पमतिनुसार लोकमान्य टिळकांनीही यावर उहापोह करून त्या काळी हा वाद निकाली काढला असावा असे वाटते. (माझ्याकडे काही संदर्भ नाहीत, वडिलांशी बोलतांना असे उल्लेख आल्याचे आठवते.) तज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.
आता मन मोकळेपणे वारांचे भारतीय मूळ मान्य करायला प्रत्यवाय नसावा.
अर्थात भारतात जे काही ज्ञान आहे ते पाश्चात्यच आहे असे ठरवून टाकले असेल तर कोणतीही मदत करणे शक्य नाही.
16 Jan 2024 - 2:27 pm | अमरेंद्र बाहुबली
पारंपारिक ज्ञान हे भारतीय आहे हे दाखवून देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे
;)
16 Jan 2024 - 6:07 pm | मुक्त विहारि
... हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे...
...
पण काही लोकांना पटतच नसेल तर काय करणार?
-----
फार पूर्वी एक गाणे पण आले होते...
https://youtu.be/HEvS7_hAPQg?si=xyWcX0iZ_1_aENns
-------
मानसिक गुलाम सुधरत नाहीत...
18 Jan 2024 - 12:02 am | प्रसाद गोडबोले
=))))
मग काय नुसता व्हॉट्सअॅप्पी प्रचार करायचा मक्ता घेतला आहे का ? तुमच्या सारख्या निर्बुध्द आळशी लोकांच्यामुळे आमच्यासारखे सनातनी लोकं बदनाम होतात. तुम्हाला खरेच तुमचा संस्कृतीचा अभ्यास असेल तर आधी किमान स्वतःतरी वाचा, आधी स्वत्:च्या मनाला पुराव्याने शाबित करा, कोणत्याही सेकंडरी सोर्स वर अवलंबुन राहु नका. तज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील म्हणे. =)))) स्वतः तज्ञ बना अन मग वाट्टेल ते क्लेम करा , उगाच तोंडाच्या वाफा कशाला ?
तुम्ही दिलेले सर्व संदर्भ भोंगळ आहेत , कुठेही नीट आवृतीचा , पान क्रमांकाचा उल्लेख नाही. तरी त्यातल्या त्यात आमच्या महाभारताचा उल्लेख सापडला म्हणुन
हा संदर्भ शोधुन पाहिला : https://sanskritdocuments.org/mirrors/mahabharata/unic/mbh01_sa.html
बोरीच्या संशोधित आवृत्तीत , आदिपर्वात १६० म्हणजे तापस्योपाख्यानम् नावाचा अध्याय येत आहे: त्यातील सातवा श्लोक खालील प्रमाणे :
ह्यात कुठे वाराचा उल्लेख तुम्हाला दिसला ? मला तरी कळत नाही.
उगाच काहीही पडताळणी न करता, दुसर्याचे संदभ ठोकुन दिले की असे चारचौघात फजीत व्हायला होते !
एकुणच पुरावे न देता , अभ्यास न करता ठासुन बोलण्याची वृत्ती सर्वत्र वाढत आहे हे चिंताजनक आहे.
बाकी शिवपुराण वगैरे काही बोलुच नका , मला हसुच येते , #"एक लोटा जल, सब समस्याका हल". =))))
बर्डन ऑफ प्रूफ हे अॅसर्टिव्ह स्टेटमेंट करणार्यावर असते. तुम्ही काहीही विधान करत असाल तर तुम्हाला ते खरे आहे हे सिध्द करावे लागेल, तुम्ही इतरांना म्हणत असाल की "माझे विधान असत्य आहे असे तुम्ही सिध्द करुन दाखवा." तर तुमच्याशी काहीही बोलण्यात अर्थ नाही. ज्याला बेसिक लॉजिक कळत नाही त्याच्याशी काय बोलणार !
बाकी पुराव्याने शाबित करणार असला काही, काही ओरिजिनल श्लोक ,संदर्भ देणार असलात तर पुढे बोलु नाहीतर उगाच काही वेळ वाया घालवण्यात आम्हाला रस नाही.
आम्ही प्रचेतस उर्फ वलीसर आणि बॅटमॅन शी स्वतंत्र चर्चा करु ह्या विषयावर.
18 Jan 2024 - 6:58 am | निनाद
ओके
हे असे नाहीये असे तरी सिद्ध करण्याची जबाबदारी उरतेच...
21 Jan 2024 - 4:40 pm | प्रसाद गोडबोले
निनाद, मी पुनरेकवार अत्यंत विनम्रपणे म्हणतो कि तुम्ही पुराव्याने शाबित करा की हिंदुंनी दिवसांची पध्दत वापरात आणली, आम्हाला त्या निमित्ताने काहीतरी नवीन शिकायला मिळेल. अन्यथा भोंगळ विधान करुन लोकांची दिशाभुल केल्याचे तरी कबुल करा.
तुमच्या लक्षात येते आहे का की ह्या असल्या निर्बुध्द क्लेम्स मुळे तुम्ही हिंदु धर्माचा हिंदु संस्कृतीचा गौरव वाढवण्याऐवजी नुकसानच करत आहात ते ! त्यातही तुम्ही स्वतः काहीच पडताळुन पाहिलेले दिसत नाही नुसतेच व्हॉट्सॅप्प युनिव्हर्सिटीवरुन फेकाफेकी करत आहात ह्यावरुन तुमच्या बुध्दीमत्तेचेही चारचौघात वस्त्रहरण होत आहे !
हिंदुं रादर सनातनी वैदिक धर्माच्या लोकांनी आकाशातील ग्रहतार्यांची गती , त्यांची आवर्तने अचुकपणे मोजली होती, अगदी ग्रहणाचे वेध कधी लागतात कधी सुटतात हेहे मोजले होते. चांद्र कालगणनेची सुर्यकालगणनेची सांगड घातलेली होती. त्यातही तिथींच्या, चंद्रोदयाच्या मोजमापातील एरर मुळे दर तीन वर्षांनी एक अधिक महिना सौरकालगणनेत जोडावा लागतो हे शोधुन काढले होते, त्यातही तो अधिक महिना नेहअमी एकच असत नाही तर तो ही बदलता असता जेणे करुन ऋतुचक्राचे , वातावरणाचे , सणासुदींचे गणित बिघडत नाही. इतके सगळे आमच्या पुर्वजांन्नी शोधुन काढलेले आहे , निर्णयसिंधु मध्ये कोणत्या सणाला कोणती तिथी धरावी, प्रतःव्यापिनी की माध्यान्ह व्यापिनी वगैरे ह्याचे स्पष्ट निर्देशही आहेत. दाते पंचांग वालेही व्यवस्थित चंद्रोदय सुर्योदय, नक्षत्र, ग्रहांची स्थाने वगैरे देत आहेत जे की शेकडो वर्षांपासुन चालु आहे. कालिदासानेही आषाढस्य प्रथमे दिने म्हणले आहे, त्याने दिवसाचा उल्लेख केलेला नाही , कारण दिवस ही कन्सेप्टच नव्हती , तिथी हाच मुख कालगणनेचा आधार होता.
पण ह्यासर्वात कोठेच "दिवस " असा उल्लेख नाही सापडला मला तरी.
तुम्ही ठासुन बोलता पण काडीमात्र पुरावा देत नाही . बरं, वस्त्रहरण झाले तरीही वस्त्रहरण झाले हे सिध्द करा असे म्हणत ती जबाबदारीही वस्त्रहरण करणार्यावरच ढकलत आहात !
तुमच्यासारख्या निर्बुध्द लोकांच्यामुळे सनातनी हिंदुंची बदनामी होते, अंधश्रध्दा निर्मुलनवाल्या हिंदुधर्मध्वसंक लोकांना हातात फुकटाचे कोलीत मिळते , सिक्युलर लोकांना हसण्यासाठी टॉपिक मिळतात. तुमच्यात अन त्या सनातन प्रभातवाल्या बावळट लोकांच्यात काहीही फरक नाहीये .
आता तरी सुधारा.
एकुणच तुमची विधाने बुध्दीदारिद्र दाखवणारी आहेत , बाष्कळ , बालबुध्दी आहेत असे माझे विधान आहे . आता तुमच्याच तर्काला धरुन - ते सिध्द करायची जबाबदारी माझी नाही. आणि आता हे असे नाहीये असे तरी सिद्ध करण्याची तुमचीच जबाबदारी उरतेच.
करा सिध्द आता!
ठ्ठो.
21 Jan 2024 - 10:21 pm | नठ्यारा
अवांतर :
प्रसाद गोडबोले,
तुम्ही व्यक्त केलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे. फक्त सनातन प्रभातवाले बावळट म्हणजे नेमके कोण ते माहीत नाही. जमल्यास ते स्पष्ट करावे व त्यांचा बावळटपणाही सविस्तर सांगावा ही विनंती.
-नाठाळ नठ्या
22 Jan 2024 - 12:41 am | प्रसाद गोडबोले
सनातन प्रभात हो !
हे घ्या लिंक : https://sanatanprabhat.org/
ते तुमच्या आध्यात्मिक पातळीचे परसेंटेज काढुन देतात =))))
नुसते sanatan prabhat आध्यात्मिक पातळी असे गुगल सर्च करुन पहा, तुम्हाला अनेक लोकांच्या आध्यात्मिक पातळीचे परसेंटेज मिळेल =))))
22 Jan 2024 - 7:59 pm | नठ्यारा
अवांतर :
टक्केवारीत बावळटपणा काय बरं? काही वर्षांपूर्वी मी सहज विचारणा केली होती. तेव्हा तिकडून उत्तर आलं होतं की ही टक्केवारी म्हणजे अतींद्रिय चाचणीचा किमान गुणांक आहे ( ESP Test minimum score ).
-नाठाळ नठ्या
22 Jan 2024 - 11:36 pm | प्रसाद गोडबोले
करेक्ट. खुपच अवांतर आहे हे , तुम्ही स्वतंत्र धागा काढा कि " अध्यात्मिक प्रगतीची टक्केवारी काढण्याची पध्दत " .
आपण तिकडे सविस्तर चर्चा करु.
=))))
16 Jan 2024 - 6:23 pm | कॉमी
दोन प्रश्न आहेत. आता सरळ उत्तर द्यायचे का मार्क्सिस्ट, म्हणून रिकामे व्हायचे हा तुमचा चॉईस आहे. माझी चूक असू शकते, कारण मी तज्ञ नाहीये. सिव्हीलिटी ने संवाद होईल अशी आशा.
१.
भारतातली ज्ञात सर्वात जुनी कालगणना पद्धत माझ्या माहितीनुसार शके आहे. त्यात शके मध्ये सुद्धा जुनी शके, जिची अज्ञात सुरुवात किंवा epoch जवळपास ख्रिस्तपूर्व एक सहत्रक मागे आहे. ही जैन आणि बुद्ध लिखाणात आढळते. नवी शके ही ख्रिस्तपूर्व ७८ पासून चालू होते, ती शालिवाहन राजाने चालू केली असे म्हणतात. त्याआधी मला माहित असणारी कोणतीही कालगणना भारतात नव्हती. विक्रम संवत्सर सुद्धा त्यानंतर, ५४ bc.
मग वेदांमध्ये वार असतील तर ते कोणत्या कॅलेंडर नुसार होते ?
२.
त्यापुढे आर्यभट्ट पाचव्या ते सहाव्या शतकातला आहे. त्याचा दाखला देऊन पाचव्या ते सहाव्या शतकात भारतात वर वापरात होते इतकेच सिद्ध होते. भारतीय दिवस सर्वात जुने आहेत दाखवायला रोमन कॅलेंडर पेक्षा जुना रेफ्ररंस लागणार नाही का ?
३. इतर ग्रंथांचे दाखले दिलेत त्याबद्दल काही कॉमेंट नाही, कारण रेडी दुवा नसल्याने तपासण्यास वेळ लागेल.
18 Jan 2024 - 7:02 am | निनाद
तुम्ही शोधा. मला माहित नाही.
18 Jan 2024 - 7:40 am | कॉमी
.
25 Jan 2024 - 11:28 am | अहिरावण
काय ठरलं मग ? वार कुणी शोधले? वारावर जेवणा-यांनी की वा-यासारखे पिसाट फिरणा-या मध्य आशियातील बाबिलोनीयांनी?
25 Jan 2024 - 2:19 pm | नठ्यारा
मध्य आशियातले बाबिलोनी ....? ह.ह.पु.वा.!
25 Jan 2024 - 2:52 pm | अहिरावण
आपण हसलात... आम्ही धन्य धन्य झालो.... असाच लोभ असू द्या !
25 Jan 2024 - 4:28 pm | अमरेंद्र बाहुबली
हा धागा नी ह्या धाग्यावरचा दावा हा सत्तर रूपयांप्रमाणे वारलाय. लेखकांनी पुढीलवेळी पुराव्यानीशी मैदानात ऊतरावे असा सल्ला देऊन खाली बसतो. जय हिंद! जय महाराष्ट्र! जय मिपा! जय मिपा मालक!
30 Jan 2024 - 9:19 am | निनाद
अत्यंत खालच्या पातळीवर येऊन माझ्यावर टीका करणार्यांना उत्तर देणे मला शक्य नाही!
मी उत्तर देणारही नाही!
या वादात खुपसटे तर अनेक काढता येतील या वादात. पण मूळ हे उरतेच की उगवणारा दिवस हा शनिवारचाच दिवस का आहे? जर हे ज्ञान भारतीय नाही तर मग इतरत्र ही शनिवार हा शनिवारच का याचे कारण का मिळत नाही?
कारण ही वारांची संगतवार जुळणी कुणी केली तर भारतीयांनी.
कारण इतरत्र कुठेही आ मंदात शीघ्र पर्यंतम होरेशा: हे सूत्र आहे असे दिसून येत नाही. अर्थात हे सूत्रच चुकीचे आहे असे म्हणत असाल तर आर्यभटांना चूक दाखवून योग्य त्या सूत्राचे रिबटल द्यावे.
असो सूत्राप्रमाणे आ मंदात शीघ्र पर्यंतम होरेशा: म्हणजे जो सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे त्यापासून ते सर्वात वेगाने चालणारा ग्रह आहे त्या क्रमाने एक एक होरा दिवसात येतो. शनि महाराज सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. तर हे सर्व सात ग्रह उदयासमयी शनि महाराजांपासून सुरूवात करून एका मागे एक असे येतात.
जसे की पहिला शनी, दुसरा बृहस्पति, तिसरा मंगळ, चौथा रवि, पाचवा शुक्र, सहावा बुध आणि सातवा चंद्र.
१ शनी, (शनिवार सुरुवात) २बृहस्पति, ३मंगळ, ४रवि, ५ शुक्र, ६ बुध, ७चंद्र.
८ शनी, ९बृहस्पति, १०मंगळ, ११रवि, १२शुक्र, १३बुध, १४चंद्र.
१५ शनी, १६बृहस्पति, १७मंगळ, १८रवि, १९शुक्र, २०बुध, २१चंद्र.
२२ शनी, २३ बृहस्पति, २४ मंगळ.
१ रवि (रविवार सुरुवात) २शुक्र, ३बुध, ४चंद्र, ५ शनी, ६ बृहस्पति, ७ मंगळ...
तर अशा रीतीने प्रत्येक ग्रहा पासून चौथ्या ग्रहाचा वार येतो.
हे गणित भारतीय ज्योतिषाचा परिणाम नसलेल्या इतरत्र कोणत्याही संस्कृतीमध्ये भारताच्या आधी बनवले गेले होते आहे याचा पुरावा आणावा.
पुरावा न मिळाल्यास आपल्या भारतीय ज्योतिष ज्ञानातून पुर्वासूरींनी हे कार्य केले याचा आनंद मानावा.
30 Jan 2024 - 7:06 pm | मुक्त विहारि
https://en.wikipedia.org/wiki/Hindu_calendar
-----
30 Jan 2024 - 12:14 pm | अहिरावण
तुम्हाला समजून घेण्याची इच्छा नाही आणि तुम्ही समजून घेणारही नाही.
फक्त इतरांसाठी : भारतीय ज्योतिष गणित आता आता पर्यंत घटिका आणि पळे यावर होते. ५० च्या वर वय असलेल्या ज्यांच्याकडे दाते पंचांग नियमित येत असेल त्यांना काही वर्षांपूर्वी दात्यांनी २४ तासांनुसार पंचांग द्यायला सुरुवात केली हे ठाऊक असेल. ६० घटीकांचा दिवस आणि म्हणून ६० या आकड्याला बरेच मूल्य. नारदाची ६० नावे आणि त्यानुसार दर वर्षांचे नाव अमुक नाम संवत्सर इत्यादी
त्यामुळे २४ तासांच्या होरा नामकरणाचा खटाटोप नक्की कसा कुणी केला हे गंमतीचे असेल.
तसेही बाण मारुन मग वर्तुळ काढले की वर्तूळ काढून बाण मारला.... सोईचे काय ते पहावे.
हं तर काय म्हणत होतो... तर ते असे की वारांची नावे कशी कोठून आली याबाबत जाणकारांची मते भिन्न आहेत आणि तसे असायला हरकत नाही.
30 Jan 2024 - 6:01 pm | प्रसाद गोडबोले
>>>
आता एखाद्याची पातळी खरेच खालचीच असेल तर त्याच्यावर तिथेच जाऊन टीका केली पाहिजे ना !
तरी फार फार विनम्र शब्दात बोललोय आम्ही.
समर्थ रामदासस्वामींनी काय काय लिहिलंय पहा :
प्रचीतिवीण जे बोलणे ।
ते अवघेंचि कंटाळवाणे ।
तोंड पसरोन जैसे सुणे ।
रडोन गेले ।। दासबोध दशक ९ समास ५ श्लोक १५
सुणे म्हणजे कुत्रे.
प्रत्यक्ष प्रचिती शिवाय जे जे काही बोलले जाते ते कुत्राच्या रडण्यासारखे आहे.
आता बोला.
परत एकदा , अतिशय विनम्रपणे सांगतो : बाकी काहीही बाष्कळ बडबड करून स्वत:ला लज्जित करून घेण्यापेक्षा तुम्ही कोणत्यातरी वेदातील, उपनिषद मधील, पुराणातील , किमान महाभारत रामायणातील दिवसाचा उल्लेख असणारे २-४ श्लोक उद्धृत करा, आम्हीही पडताळून पहातो. तुम्हाला तुमचा मुद्दा सिद्ध केल्याचा आनंद मिळेल अन् आम्हाला काहीतरी नवीन शिकल्याचा.
अन्यथा, चालू दे तोंड पसरून रडणे.