एखाद्या ठिकाणाची आठवण करून देण्याची शक्ती वासात,गंधात, असते.
तो दिवस मला आठवतो.शेतात कामकरणाऱ्या
माझ्या सकट इतर कामगारांना एक दुर्गंध येत होता.शोधता शोधता एका पिंपळाच्या झाडाखाली एका झुडपात दुर्गंध तिव्र झाला.
झुडूप विस्कटून पाहिल्यानंतर एक रान-मांजर
मेलेलं आढळलं.
रात्री घरी गेल्यावरही तो दुर्गंध माझ्या नाकात
“वास” करून राहिला होता.