तो दिवस मला आठवतो.शेतात कामकरणाऱ्या
माझ्या सकट इतर कामगारांना एक दुर्गंध येत होता.शोधता शोधता एका पिंपळाच्या झाडाखाली एका झुडपात दुर्गंध तिव्र झाला.
झुडूप विस्कटून पाहिल्यानंतर एक रान-मांजर
मेलेलं आढळलं.
रात्री घरी गेल्यावरही तो दुर्गंध माझ्या नाकात
“वास” करून राहिला होता.
निसर्गाने पृथ्वीवरच्या बहुतेक जीवांना वास अनुभवण्याची दिलेली क्षमता पाहून मला
निसर्गाचं कौतुक करावसं वाटतं.
मी,अगदी साध्या गंधाच्या सामर्थ्याचंही कौतुक करतो.
हा एक विलक्षण प्रकार अनुभवता येतो.
वास सौम्य ही असतो तसाच तो जहरी असतो.
काही गंध क्षणभंगुर असतात आणि काही वर्षानुवर्षे टिकून राहतात. मी डोळे मिटून फिरू शकतो जेणेकरून मला दिसत नाही, आणि मला जाणवू नये म्हणून माझे हात मुठीत घट्ट करून आणि मला ऐकू येऊ नये म्हणून माझे कान गप्प करून राहू शकतो. तथापि, मी गंध अनुभवल्याशिवाय जगू शकत नाही कारण जगण्यासाठी मला नाक उघडं ठेवावंच लागतं.
उघड आहे जगण्यासाठी मला श्वास घ्यावाच
लागतो आणि पर्यायाने नाक उघडं ठेवावंच लागतं.
वास सर्वत्र असतो. बागेत, स्वयंपाक घरात, शेतात आणि फुला फळात, शेतात कुजलेल्या
प्राण्याच्या प्रेतात,पावसात,उन्हाळात आणि रात्रीत. जुन्या, धुळीच्या पुस्तकांपेक्षा नवीन पुस्तकांचा वास वेगळा असतो.त्याशिवाय तिखट गंध असतो आणि दुर्गंध ही असतो.
खरंच, प्रत्येक गोष्टीचा वास येतो. हजारो आणि हजारो वेगवेगळ्या सुगंधांची नोंद घेण्यास खरोखर वेळ लागत नाही.
एकदा मी रस्त्याच्या कडेने चालत होतो तेव्हा मी जवळच्या गवत उगवलेल्या पाण्याच्या तलावाजवळून जात होतो. त्या वसंत ऋतूमध्ये विक्रमी प्रमाणात पाऊस पडला होता आणि त्यामुळे ते पाणी जुनं आणि घाणेरडं झालं होतं आणि त्यातून एक गढूळ, दलदलीचा वास येत होता. तो वास माझ्या नाकापर्यंत पोहोचताच, मी
पळत पळत माझ्या आजोबांच्या अंगणात, तिथल्या त्यांच्या तलावाजवळ येऊन
उभा राहिलो.
मला फक्त शिळ्या पाण्याचा वासच येत नव्हता तर पायाच्या बोटांमध्ये चिखल आणि गवताचा ओलावा ही जाणवला.
या घटनेनंतर काही आठवड्यांनंतर, एकदा
माझ्या आजोबांच्या जुन्या बाथरूममध्ये गेलो होतो. तो विशिष्ट वास अजूनही मला तिथे येत होता.
म्हणून मी वासाचं महत्त्व समजावून घेण्याचा प्रयत्न करूं लागलो.
पुष्कळ लोक वासाकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांच्या नाकाखाली फुलं आणली तरच त्यांना
गंधाची आठवण येते.
माझ्या एक लक्षात आलं आहे की,वास मला
दुर्गंधीयुक्त परिसराचा धोका दाखवून देतो.
जी ठिकाणं मी विसरलो असेन त्या ठिकाणांची आठवण करून देण्याची शक्ती
वासात आहे. हे एक सुंदर आणि निर्विवाद सत्य आहे