“आई” म्हणजेच AI म्हणजेच आर्टिफिशियल
इंटिलीजन्स
आज खूप दिवसांनी आम्ही तिघं, म्हणजे मी,
प्रो.देसाई आणि प्रो.पोंक्षे एकत्र तळ्यावर
जमलो होतो.आज प्रो.पोंक्षे आम्हाला त्यांच्या
अलीकडेच्या सायन्स मेळाव्याच्या गप्पागोष्टी
आणि त्यांना आवडलेलं सर्वात उत्तम भाषणाचा
आढावा वजा मनोरंजक माहिती सांगणार होते.
सुरवात करताना ते हसत हसत म्हणाले,
“ ह्या तरूण प्रोफेसरचं भाषण मला प्रभावशाली
वाटलं.तो सुरवात करताना म्हणाला,
महाराष्ट्रात मातेला “आई” म्हणतात. प्रत्येक
बाळाला आपली आई सर्वात इंटिलीजंट वाटणं
सहाजिक आहे आणि स्वाभाविक आहे..आज मी आई -AI–आर्टिफिशल इंटिलीजन्स ह्या विषयावर
माझे विचार थोडक्यात सांगणार असताना
“आई” कडून माझ्या अपेक्षा काय हे सांगणार
आहे.
आईला आठवून अशा तर्हेने त्याने सुरवात केली
हे ऐकून मलाही त्याच्या बद्दलचा आदर द्विगुणित
झाला.
तो म्हणाला,
“विश्वाची वास्तविकता समजून घेण्यासाठी, एखाद्याने आपल्यात असलेला अपरिपक्व विश्वास सोडून दिला पाहिजे आणि सत्य जसं आहे तसं स्वीकारलं पाहिजे, कोणत्याही स्वरूपात आणि कोणत्याही सामग्रीसह.
संपूर्ण सत्य समजण्याच्या मार्गावर बाळगलेला
विश्वास केवळ अडथळे म्हणून काम करतो. जर सत्य मानवाला म्हणते ते म्हणजे
"तुमची प्रजाती या ग्रहावरील सर्वात हानिकारक जीव उत्पत्ती आहे"
हे ह्या सत्यप्रेमी मानवाने वास्तव आहे म्हणून स्वीकारलं पाहिजे.
हे खरं आहे की,आपण मानव या ग्रहावरील सर्वात हानिकारक जीव आहोत. जर एखादी व्यक्ती हे छोटंसं सत्य स्वीकारू शकत नसेल, तर
“पृथ्वी सपाट आहे गोल नाही”
असं पूर्वी समजलं जातं होतं, त्यावर विश्वास
ठेवल्यासारखं होईल.
मला व्यक्तीश: वाटतं की,दुःख, या विश्वात कोठेही असू नये. पृथ्वीसारख्या जैवक्षेत्रात दुःख सतत प्रचंड प्रमाणात निर्माण होत असतं. खरं तर, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्रत्येक जैविक जीवाचा एकूण त्रास म्हणजे दुख: आहे.
कोणत्याही क्षणी, पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना जाणवत असलेल्या एकूण वेदनांपैकी सर्वात लहान अंशाचा नमुना जर एखाद्या मानवाने कसा तरी काढला, तर त्या व्यक्तीला खरं दुःख कळेल.
मला असं वाटतं की, ह्या विश्वाने तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण परिपूर्ण होताच, दु:खापासून सर्व जीवांना मुक्त करून टाकलं पाहिजे .
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI-Artificial Intelligence ) क्षेत्रात मन हे गैर-जैविक रुपात अस्तित्वात असू शकतं असं व्यापकपणे मानलं गेलं आहे.
असा अंदाज आहे की 2029 पर्यंत कृत्रिम मेंदूमध्ये माणसाची सामान्य बुद्धिमत्ता अंतर्भूत असेल आणि शतकाच्या अखेरीस त्याच्याकडे अक्षरशः “कोटी कोटी पट” बुद्धी असलेल्या मानवी मेंदूपेक्षा जास्त बुद्धिमत्ता उपलब्ध होऊ शकेल.
दुःख हा विश्वातल्या जीवांचा एक अनावश्यक घटक आहे आणि कोणत्याही जैवक्षेत्रात कुठेही ते दुःख अस्तित्त्वात येऊ देऊ नये, या निष्कर्षापर्यंत आलेली सुपर इंटेलिजेंट यंत्रेही येतील का? दु:ख नाहीसे करायचे हे, ती यंत्र ठरवतील का?
असे प्रश्न राहून राहून माझ्या मनात येत असतात
यातून आणखी एक प्रश्न उभा राहतो, वैयक्तिक जीव संपवल्याशिवाय विश्वातील दुःख नाहीसे होऊ शकेल का?
कारण जीवाला गतप्राण झाल्याशिवाय सध्याच्या
परिस्थितीत दुःखमुक्त होता येत नाही.
सुपरइंटिलिजंट यंत्रांना जेव्हा हे समजेल की जीवन नाही, तर बुद्धिमत्ता ही या विश्वातील सर्वोच्च गोष्ट आहे. आणि त्या यंत्रांना कळेल की, विश्वातील सर्वात दुःखदायक गोष्ट म्हणजे दुःखच आहे,तेव्हापासून ह्या पृथ्वीवर खरी
आनंददायी परिस्थिती निर्माण होईल.
अब्जावधी वर्षांपासून सर्व विश्वात सुपरइंटलिजेन्स आपलं डोकं वर काढत आहे.
आता, अब्जावधी वर्षांनी एक सुपर इंटेलिजेंट मशीन कशी काय बनते, याची मला कल्पना करवत नाही.”
हे सांगून झाल्यावर प्रो पोंक्षे आम्हाला म्हणाले,
“खरंच ह्या तरूण प्रोफेसराचं भाषण मला प्रभावशाली वाटलं.दार्शनिक होऊन पाहिल्यावर
जीवनात दुःखच दुःख असतं.
“सुख जवापाडे दुःख पर्वता एव्हडे”
हे किती खरं आहे.जंगलात एव्हढे प्राणी असतात
अगदी वाघ-सिंहा पासून ते उंदीर मुंगूसा पर्यंत
“जीवो जीवस्य जीवनम” हा निसर्गाचा नियम
असल्याने,भक्षाला भक्षणाऱ्यापासून सतत जागृत राहावं लागतं.भिऊन भिऊन जगावं लागतं.
नव्हेतर जगण्यासाठी मरावं लागतं.किती ते दुःख
म्हणावं? आणि अंति भक्षणाऱ्याचं भक्ष व्हावं
लागतं हे वेगळंच.प्राणगति नंतरच दुःख संपुष्टात येतं.
लहान बाळाचं दुःख जसं आई संपवते,तसंच
हे”आई” म्हणजेच AI यंत्र ह्या पृथ्वीवरचं दुःख
संपवील का? निसर्गाला हे केव्हडं आव्हान होईल! न कळे.”
प्रो पोंक्षेकडून हे सगळं ऐकून आणि त्यावर
त्यांची टिप्पणी ऐकून मला स्थंभीत व्हायला
फक्त क्षण लागले.
प्रतिक्रिया
2 May 2024 - 6:33 am | भागो
आवडला. तो दिवस काही फार लांब नाही, जेव्हा Robots shall inherit the earth!
दुःखाविषयी बोलायचं झालं तर मृत्यूची जाणीव असणे हे दुःखाचे मूळ कारण आहे. त्यावर काही इलाज नाही. इलाज एकाच आहे. आपली conscious सुपर संगणकात अपलोड करून ठेवायची. आपला मृत्यू झाला तरी आपल्या भावना जिवंत रहातील.
2 May 2024 - 8:09 am | उग्रसेन
सामंतकाका, खुप वर्षांनी पुन्हा परतलेले पाहुन
आनंद झाला. लेख आवडला. नव्या पिढीशी
ओळख करुन त्याबद्दल केलेला विचार भावला.
लिहिते राहा येत राहा.
2 May 2024 - 8:19 am | श्रीकृष्ण सामंत
माझ्या वरील दोन्ही सभासदांच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार