समाज

शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी

chittmanthan.OOO's picture
chittmanthan.OOO in जनातलं, मनातलं
5 Apr 2019 - 8:15 am

काल रद्दी घालण्यासाठी न्यूजपेपर पोत्यमध्ये भरत होतो. त्यावेळी गेल्या वर्षीचा एक पेपर हातात पडला. सहज नजर फिरवली तर काही हेडलाईन्स वाचल्यानंतर वाटलं या बातम्या जर क्रमाने लावल्या तर शेतकरी आत्महत्या, कारणे आणि उपाय सगळेस समजेल

पहिल्यांदा बातमी होती ती म्हणजे यंदा ९८% पाऊस!! म्हणजे सगळ्यात पाहिलं गेम निसर्गाने केला..!! लगेच दुसरा हल्ला तो म्हणजे मान्सून कमीपण आणि उशिरापण..!! निसर्गानं शेतकऱ्याच्या नशिबाला हा बेभरवशी पांडू जो पडला तर अगदी मुसळधार आणि नाही तर यंदा काही खरं नाही.

समाजप्रकटनबातमीमत

दाराआडची मुलगी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
3 Apr 2019 - 9:47 pm

एक मुलगी दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पार
जिथे एक मुलगा बसला आहे स्तब्ध....
करत असेल का तो ही तिचा विचार?
जात असेल का तो ही
स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पलीकडे?
मुलगी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
मग ती तिचे संपूर्ण डोळे पाठवते,
ते डोळे डोळ्यात घेऊन
मुलगा शांतपणे जागा राहतो....
डोळे हरवलेली मुलगी
घर नसलेल्या दाराआडून बघत राहते...
बघतच राहते....

-शिवकन्या

कविता माझीवावरसंस्कृतीवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाज

पुरंदराचं तेजस्वी पातं..! [updated]

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
27 Mar 2019 - 9:16 pm

मुरारबाजी म्हटलं की डोळ्यांपुढे न चुकता उभी राहते ती पुरंदरची लढाई. त्रिवार मुजरा अगदी सहज घेते - ती प्रयत्नांची पराकाष्ठा, अतुलनीय शौर्य आणि न खचणारी, कुठलीही भीड-मुर्वत न मानणारी अभेद्य हिंमत.. मुरारबाजींची आणि त्यांच्यासोबत, दिलेरखानाच्या ५००० च्या सुलतानढव्याला [डोक्याला कफन बांधून, जीवाची पर्वा न करता केवळ विजयासाठीची चढाई करण्याची मुघल पद्धत] उत्तर देण्यासाठी बाहेर पडलेल्या उण्यापुर्‍या ७०० कडव्या मावळ्यांची. त्यात मुरारबाजींचं शौर्य बघून दिलेरखानानं मनसबीचं आमिष दिलं.. झालं.. त्या निरोपानं कृद्ध झालेल्या मुरारबाजींनी सरळ मुघल सैन्याच्या मध्यात घुसून खानालाच कापण्यासाठी चाल केली..!!

वीररसरौद्ररसइतिहासकवितासमाज

सामाजिक उपक्रम -२०१९

निशदे's picture
निशदे in जनातलं, मनातलं
18 Mar 2019 - 10:47 pm

नमस्कार,
सामाजिक उपक्रमाचे हे आपले दहावे वर्ष. मित्रपरिवाराच्या आणि साथीने गेली ९ वर्षे आम्ही स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो.

समाजविचारलेखमदत

मरणाचं अर्थशास्त्र

अबोलघेवडा's picture
अबोलघेवडा in जनातलं, मनातलं
15 Mar 2019 - 12:38 pm

काल बातमी आली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून निघणारा फूट ओव्हर ब्रिज कोसळला. काही माणसं मेली.

समाजविचार

Women 's Day - 2019

माउ's picture
माउ in जनातलं, मनातलं
9 Mar 2019 - 3:28 am

नमस्कार मंडळीनो !
काल ' जागतिक महिला दिन' (International Women 's Day ) झाला. सगळ्या महिलांनी एकमेकीना शुभेच्छा दिल्या. ज्या working आहेत, त्यांनी छान Day Out त्यांचा enjoy केला. बऱ्याच पुरुषांनी त्यांच्या मुलीना,आई ला, बायकोला, मैत्रिणी ना, girlfriend ला वेगवेगळ्या पद्धतीने wish केले. Such a kind gesture! परत Men - Women Equality, women and their rights ह्या सगळ्या विषयांवर चर्चा झाल्या ofcourse on different platforms ..

समाजविचारलेख

स्वतःसाठी जगू नका

नायकुडे महेश's picture
नायकुडे महेश in जे न देखे रवी...
22 Feb 2019 - 7:26 pm

मातीसाठी प्राण वेचतो आम्ही
जातीसाठी लढू नका ।
तिरंग्याची शान राखतो आम्ही
स्वतःसाठी जगू नका ।।

कितीही येवो वादळे मोठी
आम्ही त्यांना घाबरत नाही,
आपलेच खेचतात आपले पाय
ते आम्हाला पाहवत नाही,
तुमच्यासाठी लढतो आम्ही
कुणापुढे झुकू नका।
तिरंग्याची शान राखतो आम्ही
स्वतःसाठी जगू नका ।।

हसत असें तेव्हासुद्धा
जेव्हा मरण समोर येईल,
भ्याड हल्ले करणाऱ्यांच्या
यम होऊन समोर येईन,
मेल्यानंतर आमच्या देहाचे
राजकारण करू नका ।
तिरंग्याची शान राखतो आम्ही
स्वतःसाठी जगू नका ।।

भावकवितावीररससमाज

पशु पक्षांसाठी श्री. किरण पुरंदरे (पक्षीतज्ञ) यांनी केला नैसर्गिक अधिवासात कृत्रिम पाणवठा

नानुअण्णा's picture
नानुअण्णा in जनातलं, मनातलं
22 Feb 2019 - 2:23 pm

गेल्या काही दिवसांपासून मी श्री. किरण पुरंदरे (पक्षीतज्ञ) यांच्याबरोबर पक्षी निरीक्षणासाठी जात आहे.
खालील माहिती त्यांनी व्हाट्स अप वरती पाठवलेली आहे, अनेक वर्ष ते पशु पक्षांसाठी तसेच निसर्ग संरक्षण याबद्दल जनजागृती आहेत.
सध्या होत असलेल्या हवामान बदलामुळे ऋतुबदल होत आहेत, त्याचा परिणाम पशु पक्षी यांच्या जीवनावर सुद्धा पडत आहे, तीव्र उन्ह्याळ्यात व पाणी टंचाईत, पशु पक्षी यांना पिण्यास पाणी नैसर्गिक अधिवासाप्रमाणे मिळावे यासाठी ते कार्य करीत आहेत. हे कार्य जनजागृतीतून अधिक लोकांपर्यंत ते पोहोचेल व अधिक लोकसहभागातून कार्यास हातभार लागेल, हाच उद्देश आहे.

समाजविचारबातमी