स्वीडन
स्वीडन नाटो मध्ये जाणार ह्या बातमीने स्वीडन देशाचे नाव खूप वेळा बातम्यांत आले. फिनलंड सुद्धा चर्चेत होता. कदाचित NOKIA मुळे भारतीयांना फिनलंड ची अगदी चांगली ओळख असेल. कारण नोकिया ११०० सारखे फोन १००% त्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. एकदा माझा नोकिया चुकून कपड्यासोबत वॉशिंग मशीन मध्ये पडला. दुसऱ्या दिवशी मी तांदळात ठेवला आणि २४ तासांनी तो मी नव्हेच प्रमाणे चालू झाला. कितीदा हा फोन खिशांतून पडला, मी किती वेळा फेकून मारला इत्यादी मला आठवत सुद्धा नाही. फिनिश लोक ह्या फोन प्रमाणेच चिवट आणि राकट आहेत. ह्या देशांतील सर्वच गोष्टी नोकिया प्रमाणेच अगदी भक्कम बनवलेल्या असतात.