पत्र...
प्रिय,
प्रिय,
बंदुकीची गोळी कशी गोल गोल
गोल गोल
रक्ताचा रंग कसा लाल लाल
लाल लाल
सोनू, तू माझ्याशी नीट बोल
नीट बोल....
पैशाचा झोल कसा गोल गोल
गोल गोल
सत्तेचा माज कसा खोल खोल
खोल खोल
सोनू, तू माझ्याशी नीट बोल
नीट बोल..
सोनूची केस कशी वायलंट वायलंट
सोनूचा आवाज कसा सायलंट सायलंट
सोनू, बोलशील तर मरशील
मरशील.....
सोssssनूssss
शिवकन्या
#GauriLankesh etc....
माझं मन कायम ह्या साडेपाच इंची चौकटीत वावरणारं . . . .
आजूबाजूला काय चाललंय हे पाहूनही न पाहिल्यासारखं करणारं . . .
काही वेगळं दिसलंच तर डोळे असूनही ह्या स्मार्ट खेळण्यातूनच बघतो. . .
मग समोर खाद्यजत्रा असो की प्रेतयात्रा . . तोच निर्विकारपणा असतो !
कधीकधी मरणही टिपतो मी दुसऱ्याचं कारण असं चित्र वारंवार कुठे दिसतं ?
कासावीस होतो फक्त तेंव्हाच जेव्हा बॅटरी उतरते किंवा इंटरनेट नसतं !
जगात असूनही जगाशी परत जोडण्यासाठी जपतो मी पासवर्ड. . . . .
आपण आणि आपला अंडा "सेल", कोणी माणुसकी करता का फॉरवर्ड ?
(माफी नाम्यांची रांग आहे, विडंबन काळाची मांग आहे प्रेर्ना १ प्रेर्ना २)
अरे डिअरपिअर कशास बघतोस
स्वप्नात जुई... खोटे नाही सांगत
जुईले आणि मॅकबेथले...
काळाची उधई गिळी टाकई!
संध्याकाळच्या दिवा लावण्या
आधी तुझा विग काढून
टकल्यावरून हात फिरव
फ्रेश विग लावून सेल्फीकाढण्याचा
आणि कायप्पावर पोस्ट
करण्याचा जमाना आला
आणि तू(म्ही) अजूनही उधई
ने गिळलेल्या मॅकबेथपुशित
रमलेला आजच्या रमेला
गमत नाही.
रात्री मासे आणणाऱ्या एकाकी माणसाला
बोकेमांजरे चहुबाजूने घेरतात.
माणूस पळू लागला कि,
त्याच्यावर झेप घेऊन त्याला बोचकारतात.
त्याच्या हातातील मासे क्षणार्धात लंपास होतात.
मासे मिळताच बोकेमांजरे
माणसाला तिथेच सोडून देतात.
हे सगळे किती विश्वासाहार्य, predictable आहे!
मासे मिळाल्यावर,
मासे तर फस्त करायचेच
पण माणसाची आतडी बाहेर येईपर्यंत
त्याला ओरबाडत, बोचकारत रहायचे,
मग, रात्रीच्या भयाण शांततेत फिस्कारत हिंडायचे .......
हे मात्र फक्त माणसातच !
- शिवकन्या.
एकीकडे गोडधोड, एकीकडे पोट दौड,
सामाजिक विषमता, नाही का ??
एकीकडे धर्मांद वेडे, एकीकडे दैवत्वाचा बाझार,
धार्मिकतेचा मुखवटा, नाही का ??
एकीकडे उंच मनोरे, एकीकडे लहानसे घरटे,
हरवला मनाचा मोठेपणा, नाही का ??
एकीकडे घनदाट वर्षा ,एकीकडे भयाण आहे सारे,
नीसार्गाचाच कोप हा, नाही का ??
एकीकडे तिमिर न संपणारे, एकीकडे प्रकाश झेपावणारा,
अज्ञानचा श्राप हा, नाही का ??
एकीकडे स्वार्थी राज्यकर्ते, एकीकडे दैवी श्रमकर्ते,
आपल्या जबाबदारीचा अभाव हा, नाही का ??
आशा मनात तुझी धुसर धुसर,
मागताना आवाज कातर कातर,
स्मरता जुन्या त्या आठवणींना,
दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!!
क्लायंट कायम करतो काशी,
म्हणतो पगार कसा छापाल छापाल
मुहूर्त काढता सणासुदीचा रिलीजला
शिव्या अपुर्या पडतील पडतील !!२!!
डिजाइन टीमची असते बोंब
रिक्वायरमेंट नाही क्लियर क्लियर,
क्यूएची आहे नसती कटकट मागे ,
बग सापडलेत बघा शंभर शंभर!!३!!
नुसताच फुत्कार नको...आता डसून दाखवा.....
भारतभूच्या सुपुत्रांनो ...आता करुनच दाखवा......!
शब्दाचा मार फक्त शहाण्यालाच...मूर्खांना लाथाच घाला....
लाखो अश्राप मातापित्यांचे अश्रू, त्याविना कसे थांबती बोला ?
आताही काही बोललो नाही... तर उरणार नाही कणा....
आता नजरा तुमच्यावर आहेत... हर हर महादेव म्हणा...!
आमची प्रेरणा: स्पंदन, सांजवेळ, हृदय, अवचित, मन, मोहरणे वगैरे शब्द इकडून तिकडे गुंफले की आजकाल मराठी रोमँटिक गाणं तयार होतं.
बावरे प्रेम हे या पंचनाम्यात समीरसूर यांनी आधुनिक गीत लेखकांवर असे ताशेरे ओढलेले पाहून अंमळ डचमळून आले. त्याचा निषेध म्हणून लगोलग एक गीत लिहून काढले. हौशी आणि बरा आवाज असणाऱ्या कुणीतरी या गीताला आवाज देऊन मराठी रोम्याँतिक गाण्याच्या दुनियेत अजरामर करावे ही विनंती आणि समीरसूर यांना ते सकाळ दुपार संध्याकाळ मात्रेसारखे ऐकवन्यात यावे ही विनंती.
सॉफ्ट कोरस: