जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-७ } ब्लॅक स्वान & गोल्ड रन ?
मागील वर्षात जागितक बाजारात खळबळ उडाली ! ती या वर्षाच्या सुरवातीलाच देखील दिसुन येत होती. फेड ची प्रत्येक दरवाढ बाजार अशांत करत आहे.
या वर्षी फेडची दरवाढ आणि चीन यांच्या प्रत्येक घडामोडी पाहण्या सारख्या असतील असे मला वाटते... तर जालावर सध्या रिसेशन कधी येणार यावर चर्चा चाललेली दिसते. ट्रम तात्या भिंतीला चिकटुन बसले आहेत तर तिकडे क्रिमिया मध्ये रशियाने एस-४०० तैनात केले आहे. बिटकॉइचा बुडबुडा फुटल्यावर या वर्षी क्रिप्टो करन्सी कशी वाटचाल करेल हे देखील पाहणे रोचक ठरेल.
जसा वेळ मिळेल तसा हा धागा अपडेट करत राहीन.