मुक्त कविता

उठ मावळ्या ...

गबाळ्या's picture
गबाळ्या in जे न देखे रवी...
22 Nov 2017 - 11:13 pm

आपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात.

उठ मावळ्या फोडू चल नळ्या
कुकुटाची सर ना कधी पाचोळ्या
चल मदिरालयी तु घुस
ये सोडूनि घास फूस

कोंबड्यासम केस रंगविसी
कोंबडीस मग का तू वर्जिशी
६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस
ये सोडूनि घास फूस

मुक्त कवितावीररसमुक्तकशब्दक्रीडाविनोदसमाजमत्स्याहारीमांसाहारीशाकाहारीमौजमजा

चंद्रमण्यांचे पाझर

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
15 Nov 2017 - 3:40 pm

आज माझ्या ओंजळीत
चंद्रमण्यांचे पाझर
भले विझून जाऊदे
माथ्यावर चंद्रकोर

पायतळी आज माझ्या
अब्ज-रंगी पखरण
भले अंधुक होउदे
इंद्रधनूची कमान

आज माझ्या रोमरोमी
ब्रह्मकमळ फुलेल
कोडे गहन कधीचे
विनासायास सुटेल

मुक्त कविताकवितामुक्तक

काळाची उबळ

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
10 Nov 2017 - 1:18 pm

खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,

तरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली
पण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत !

खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,

जेव्हा माणूस विचार करावयास शिकला
तेव्हा पासून मला कलीयुगच दिसत

तो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित
ते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं
पण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल.

अनर्थशास्त्रइशाराकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालनागपुरी तडकाफ्री स्टाइलभूछत्रीमुक्त कवितारतीबाच्या कवितासांत्वनाअद्भुतरससंस्कृती

हे सव्यसाची,

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
23 Oct 2017 - 11:53 am

खुणावतील तुला जटिल गणिते-
विश्वाच्या महास्फोटी प्रसववेणांची

हाकारतील तुला कोडी-
* विस्कळखाईत क्षणोकणी होणार्‍या
विश्वाच्या अटळ अंताची#

या अपार भूतभविष्यादरम्यान
लीलया झेपावणारा तुझ्या प्रज्ञेचा झोका
कुठे खिळवलाय, हे सव्यसाची?

तो इथेय बघ,
निळ्या पाखरपंखावर
अथक थिरकणार्‍या
क्षणभंगूर वर्तमानात

(*entropic end of the universe#)

मुक्त कविताकविता

नशिब

mr.pandit's picture
mr.pandit in जे न देखे रवी...
17 Oct 2017 - 11:19 am

नशिबाच काय घेऊन बसलात हो
ते कधी साथ देत तर कधी नाही
मनगटात ताकद हवी खर तर
नाहितर् राजयोग पण कामाचा नाही

परीक्षेच्या वेळीच नेहमी देव आठवतो
कारण अभ्यास मन लावुन केलेला नसतो
कसेतरी त्या अवघड परीक्षेत पास होता
नशिबाचा भाग म्हणुन त्यालाच दोष देता

हिच सवय मग अंगवळणी पडत जाते
अपयश आले की नशिबावर खापर फोडले जाते
थोडे प्रयत्न कमी पडतायेत बाकी काही नाही
प्रयत्नांती परमेश्वर उगाच म्हटलय का कुणी?

माझी कवितामुक्त कविताकवितामुक्तक

मद्यचषक१

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
14 Oct 2017 - 6:31 pm

प्रेर्ना : ओळखा पाहू

लार्ज पेग कुणा मिळे पतियाळा
दोन थेंबांचे शिंतोडे कुणा पामराला ।। धृ ।।

किक कैसी
नशा कसली
मद्य ते दुर्मिळ भासतसे
स्कॉच ची जरी हाव नसे
देशीच फक्त नशिबाला ।।१।।

टोस्ट करी
ऑन द रॉक्स कुणी
चखणाच, हाय! कुणा मुखाला
व्हिस्की, रम अन टकीला
कधी मिळेल मज पिण्याला? ।।२।।

मला देशी
त्याला विदेशी
मद्यनशा ही जबरी
कसाबसा प्याला हाती धरी
सोनेरी पेय्य तो प्यालेला ।।३।।

- चामुंड रायणे

काहीच्या काही कविताजिलबीमुक्त कविताविडंबन

हे बहुरुपी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
30 Sep 2017 - 8:25 pm

हे बहुरुपी मृत्यो

एकदाच सांग, थांबवून इथल्या समुद्राची गाज
कोणतं रूप घेऊन घिरट्या घालतोयस आज?

उघड्या मॅनहोल मधली जलसमाधी प्रलयी?
की पुलावरच्या गर्दीची चिरडती घुसमटघाई?

कळत नाही, दोष देऊ कुणा ?
या बजबजपुरीचा बकालपणा ?
की तुझा निरंतर मायावीपणा ?

मुक्त कविताकविता

बघ तुला जमतं का ...

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
30 Sep 2017 - 8:25 am

बघ तुला जमतं का ...

तू साबुदाण्याच्या खिचडीसाठी उपवास कर
किंवा बटाट्याच्या चिप्स साठी
मर्जी तुझी...
उपवासाचे पुण्य नाही मिळाले तरी चालेल
पण
एकादशी दुप्पट खाशी हे
नेहमी लक्षात ठेव.....

तू जिम मध्ये
रोज जा किंवा नको जाऊस
इच्छा तुझी...
तिथे वाकला, पळाला नाहीस तरी चालेल
पण
वजन उचलतानाचे फोटो शेअर करायला
मात्र विसरू नकोस.....

तू मित्र, नातेवाईक यांच्या बरोबर
फेस-टू-फेस संवाद कर किंवा नको करूस
युअर विश...
पण
फेसबुकवर स्टेटस अपडेट करायला
मात्र विसरू नकोस.....

vidambanफ्री स्टाइलमुक्त कवितावाङ्मयशेतीविडंबन

अत्तर

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
12 Sep 2017 - 1:10 am

कपडे
कितीही मळले,
जुने झाले,
रंग उडून गेला
वीण उसवून गेली
घड्या विस्कटून गेल्या
तरी
कधीतरी लावलेले
मायेचे भरजरी अत्तर
मंदपणे दरवळत राहते!
.
.
.
माणसं अशी
अत्तर असती तर..!

शिवकन्या

अदभूतकविता माझीमाझी कवितामुक्त कवितासांत्वनामांडणीसंस्कृती

घननीळ वाजवी बासरी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 Sep 2017 - 2:36 pm

ये पुन्हा, छेदून ये त्या काल-पटलाला, इथे
ये जरा, समजावया ही शब्दविरहित भाषिते

ये जरा, स्पर्शून पुन्हा अद्भुताची ती मिती
जी दिसे स्वप्नात सरत्या जागृतीच्या शेवटी

ये इथे, ऐकू पुन्हा, घननीळ वाजवी बासरी
चल पुन्हा, बरसून येऊ तप्त मरूभूमीवरी

मुक्त कविताकविता