करुण

(चला ऑफीस आले आता...)

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
9 Sep 2014 - 9:30 am

चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे

मी बनेन ट्रोल
सारे नुस्ते करा स्क्रोल
मी वाट्टेल तसे पिंकायचे
तुम्ही पकडापकडी खेळायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे||

मी संपादक बनेन
सुचना देत सुटेन
मी काहिंना ब्यान करायचे
मग बंड तुम्ही पुकारायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे||

मी एकोळी टाकेन
नंतर मजा बघेन
तुम्ही भरपूर बॅशिंग करायचे
तरी मी पयलाच म्हणायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे||

करुणविडंबन

सल आठवांचा...

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
18 Aug 2014 - 1:48 am

(मेहदी हसन यांनी गायलेल्या 'बेकरारी सी बेकरारी है' या गझलचा स्वैर भावानुवाद)

सखे, तुझ्या आठवांचा सल काही केल्या कमी होत नाही
विरहाची ही असह्य तगमग मनाचे अवकाश झाकोळून टाकते आहे
तो रटाळ बेजान दिवस ढळता ढळत नव्हता
अन आता तर ही काळरात्रही खायला उठली आहे...

दैवगतीला शह देत प्राक्तनावर मात करण्याची वेळ यावी
अन त्याच मोक्याच्या क्षणी डाव उधळून देत हार पत्करावी
आयुष्याच्या सारीपटावर नेहमीच रंगणारा हा डाव आता सवयीचा होत चालला आहे...

करुणमुक्तक

सप्तरंगी पोपट !!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
1 Aug 2014 - 4:22 pm

सप्तरंगी पोपट !!

तो दिवसच नशिबात आला
अन सांजवेळ ती अशुभाची
आभाळ फाटुनी घात जाहला
करूण व्यथा त्या पिलाची ….!

असे बंधिस्त तो पिंजरा
सोन्याचा कि लोहाचा,
अतिरम्य पंख किती फडकले
पिल्लू गोजिरे ते पार अडकले …!

गेला भरधाव तो रथही
घेउनि केविलवाण्या पिंजऱ्यास ,
आक्रोश विरला अन अश्रूही
इवलेसे डोळेच फक्त सांत्वनास …!

काळोख दाटला सभोवती
भीती चिमुकल्या मनात ,
काजव्यांना साद घाले परंतू
तो तर दिव्यांचा झगमगाट ….!

करुणकविता

उंबरठा नसलेले घर - २

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
7 Jul 2014 - 1:13 pm

कां कोण जाणे पण परत
उंबरठा बांधायची हिंमतच
होत नाहीये
----
न जाणो ती अंगणातली
फुलदाणी घरात परत
आलीचं नाही तर?!
----
मग वाटतं बरं झालं
उंबरठा वाहून गेला
कच्चाच होता नाहीतरी
----
तुझी डायरी तेवढी
बाहेर काढून वाचायची
अनिवार इच्छा होतेय
किमान ती अलमारी तरी
शांत होईल... एकदाची !
----
देवघरासमोरच्या समईत
तेल घातले
वाटले
ज्योतीची घालमेल थांबेल
पण...
----
काल नाही समजले
पण
त्या उंबरठ्याबरोबर
"शुभ - लाभ" लिहीलेल्या

करुणहे ठिकाण

शायरी - भाग २

चिनार's picture
चिनार in जे न देखे रवी...
30 Jun 2014 - 1:54 pm

मेरी जिंदगी मे तेरा वजूद कुछ ऐसा है, ,
के तू नही तो मेरा कोई वजूद नही !
तुझे पाने के ख्वाईश कुछ ऐसी है, ,
के तू नही तो कोई और ख्वाईश नही ! !

यू तो अकेला ही चला था मै एक राह पर , ,
हां ! ,तेरे मिलने से राहत मिली
अब तेरे ना होने का गम तो नही, ,
पर सामने देखता हू तो कोई मंजिल भी नही ! !

करुणगझल

एकलव्य..

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जे न देखे रवी...
26 Jun 2014 - 10:35 am

एकलव्य....
कित्येक शतके उलटली
युगांतरे झाली
सत्तांतर घडले
मी माञ स्थिर आहे
त्याच सहानुभूतींच्या बंदिस्त नजरेत..
कोणी नाकारले म्हणूनच
शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच
मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले
मी धर्नुधर झालो
रक्ताळलेल्या चार बोटांचा
श्रेष्ठ शिष्यही झालो
तेव्हाच;
त्या हाताकडे पाहताना
दु: खाचा लवलेशही नव्हता मुद्रेवर
पण;
मी डगमगलो ढासळलो
तुमच्या अनुत्तरीत प्रश्नात?
तुमच्या सहानुभूतीच्या नजरात?
तुमच्या पाणावलेल्या इतिहासात?
तुमच्या या पराजित युगात...!

करुणवीररसशांतरसकविता

उंबरठा नसलेले घर -- १

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
24 Jun 2014 - 3:46 pm

काय झालं कुणास ठाऊक पण
काल रात्री पावसात या घराचा
उंबरठाच वाहून गेलाय
तेव्हापासून घरातल्या सगळ्या वस्तू
जणू स्वतंत्र झाल्या आहेत
----
बैठकीच्या खोलीत
कोपर्‍यातल्या मेजावर
एक फुलदाणी होती
..
काल रात्रीपर्यंत होती
सकाळी अंगणात सापडली
पहाटेच्या वर्षावात एखादं फुलं
पदरात पडेल
या आशेने अंगणात आली असावी बहुदा
----
देवघरासमोरील समईची मंद ज्योत
आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी
पोहचेनाशी झालीये
त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या
दिशेने झुकत राहते
थरथरत
----

करुणशांतरसहे ठिकाण

मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
22 Jun 2014 - 2:09 pm

मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

माझा बाप...
रामप्रहरी उठायचा
शेणपुंजा करायचा
नांगर घेऊन खांद्यावर
दम टाकीत चालायचा
गार गार थंडीतही
घामामध्ये भिजायचा

माझा बाप....
गायी-म्हशी चारायचा
दूधदुभते करायचा
भूमातेच्या कुशीमध्ये
मरेस्तोवर राबायचा
कांदा-मिरची-भाकर खाऊन
आला दिवस ढकलायचा....

माझा बाप....
आजारी पडला तरी
घरामध्येच कण्हायचा
औषधाला पैसा-अधला
कुठून आणू म्हणायचा
देव तरी पावेल म्हणून
पूजा अर्चा करायचा ....

अभय-लेखननागपुरी तडकावाङ्मयशेतीकरुणवाङ्मयकविता

समाधानाचा शोध

चैतू's picture
चैतू in जे न देखे रवी...
15 May 2014 - 2:58 pm

माणूस निघतो समाधानाच्या शोधात
सगळीकडे फिरतो, खूप खूप शोधतो
पण समाधान काही सापडत नाही
वाटेत त्याला अनेक माणसं भेटतात
त्याच्यासारखीच, पण वाट चुकलेली
सगळे एकमेकांना विचारत राहतात
पण समाधान कोणाकडेच असत नाही
समोर असतात असंख्य वाटा
कोणती वाट पकडायची कळत नाही
पकडलीही एखादी वाट तरी
पार कशी करायची उमगत नाही
त्या वाटेवरसुद्धा असतात अनेक वाटाडे
वाट दाखवण्याचं आश्वासन देत
आधी पोहचवलेल्या माणसांच्या
कहाण्या सांगत आणि फुशारक्या मारत
माणसे त्यांच्यावर विश्वास ठेवतात
पण माणसांचा शिधा हडप करुन

करुणकविता