चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे
मी बनेन ट्रोल
सारे नुस्ते करा स्क्रोल
मी वाट्टेल तसे पिंकायचे
तुम्ही पकडापकडी खेळायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे||
मी संपादक बनेन
सुचना देत सुटेन
मी काहिंना ब्यान करायचे
मग बंड तुम्ही पुकारायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे||
मी एकोळी टाकेन
नंतर मजा बघेन
तुम्ही भरपूर बॅशिंग करायचे
तरी मी पयलाच म्हणायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे||
नुस्तेच फटू टाकेन
तया प्रवासवर्णन म्हणेन
तुम्ही तया भरपूर लाईकवायचे
अजून येऊ द्या म्हणायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे||
मी मोदीद्वेष्टा व्हायचे
तुम्ही समर्थक बनायचे
मी हरेक धोरणाला झोडपायचे
तुम्ही गांधी घराणे काढायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे||
मी होईन नास्तिक
तुम्ही व्हायचे आस्तिक
एकमेकांना यथेच्छ ओरबाडायचे
संस्थळाचा टीआरपी वाढवायचे
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे||
प्रतिक्रिया
9 Sep 2014 - 9:46 am | सस्नेह
ऑफिस सुटले की हो आता
सर्फून सर्फून सगळ्या संस्थळान्चा झाला चोथा
9 Sep 2014 - 11:16 am | जेपी
आज कळाल इथे
हिरीरीने मेगाबायटी प्रतिसाद आणी प्रतिवाद कसे येतात.