शिक्षण

एस. एस. सी., सी. बी. एस. ई, आय. सी. एस. ई.

वारा's picture
वारा in जनातलं, मनातलं
12 Jan 2015 - 12:43 pm

पिल्लु ला शाळेत अ‍ॅड्मिशन घेतोय. पण सध्या असलेल्या बर्याच ऑप्शन मधे कन्फ्युज झालोय.

१) एस. एस. सी - ट्रेडीशनल अभ्यासक्रम, स्वतः शिकल्यामुळे पुर्ण माहीती आहे.
फायदे - ट्युशन आहेत , पुस्तके महीतीतील, गाईड मिळतात, प्रश्नसंच मिळतात, मराठी मिडीयम फी कमी.
तोटे - स्पर्धा परीक्षा साठी पुरेसा अभ्यासक्रम नाही, महाराष्ट्राबाहेर अभ्यासक्रम नाही, ईंग्लीश मिडीयम फी जास्त.
अ‍ॅड्मीशन प्रोसेस लॉटरी पद्धतीने , कमी जागा विद्यार्थी जास्त.

शिक्षणसल्लामाहितीचौकशीप्रश्नोत्तरेमदत

मदत...Internship.!

उगा काहितरीच's picture
उगा काहितरीच in जनातलं, मनातलं
5 Jan 2015 - 5:40 pm

नमस्कार,
नुकतेच पुणे विद्यापिठातुन MCA(अभियांत्रीकी) या पद्व्युत्तर पदवीचे ५ सत्र पुर्ण केले. विद्यापिठाने सहाव्या सत्रासाठी विषय वगैरे न ठेवता पुर्ण वेळ Internship असा कार्यक्रम आखला आहे. यासाठी आम्हा विद्यार्थ्यांनी कंपनी मध्ये राहुन काम शिकणे वगैरे अपेक्षीत होते. यामध्ये विद्यार्थ्यांसोबत कंपन्यांचापण फायदा होता कारण त्यांना अल्प मानधनावर(stipend)किंवा फुकट काम करायला व्यक्ती मिळते.पण मागील २-३ वर्षापासुन लहानमोठ्या कंपन्या या संधीचा फायदा उठवुन विद्यार्थ्यांकडुन काम करुन घेता घेता training fees च्या नावाखाली ५००० ते ५०,००० रुपये उकळत आहेत.

नोकरीशिक्षणमदत

प्रशिक्षण आयोजीत करण्यासाठी संगणक संस्थांशी संपर्क करून हवा आहे.

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
2 Jan 2015 - 1:34 pm

नमस्कार,

मला गेल्या दहा एक वर्षात सर्वसाधारण आंतरजालासोबतच मराठी आंतरजाल, तसेच ज्ञानकोशीय लेखनाचा प्रशिक्षण देण्याचा बर्‍यापैकी अनुभव आहे. सोबतच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात ते उपयूक्त पडेल अशापद्धतीने प्रशिक्षण वर्ग/ कार्यशाळा आणि सुट्टीतील वर्ग आयोजीत करण्याची इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने प्रशिक्षण आयोजीत करण्यासाठी आंतरजाल सुविधा उपलब्ध असलेल्या संगणक संस्थांशी संपर्क करून हवा आहे. मिपाकर वाचकांपैकी कुणाची स्वतःची अथवा परिचयातील संस्था असल्यास व्य नि करावा हि विनंती.

हा धागा इतरही संगणक प्रणाली प्रशिक्षकांना निवेदने / आवाहने करण्यास उपयूक्त पडू शकेल असे वाटते.

शिक्षणप्रकटन

मिसळपाव वर टंकलेखन करण्याच्या काही विशेष सुचना

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
31 Dec 2014 - 11:24 pm

नमस्कार मिपाकरांनो,

कसे आहात?

इथे नविन सभासदांना मराठीत टाइप करायला बर्‍याच अडचणी येतात.

सुरुवातीला मला पण थोडा त्रास झाला.

त्यामुळे, मराठीत कसे टाइप करावे? ह्यासाठी हा धागा काढत आहे.

सुरुवातीला आपण बाराखडी बघु या.

पहिली महत्वाची गोष्ट ----- तुमच्या कळफलकाचे "Caps lock" नॉर्मल ठेवा.थोडक्यात अक्षरे छोट्या लिपीत यायला पाहिजेत.

अ = a

आ = aa

इ = i

ई = I (Capital I)

उ = u

ऊ = U (Capital U)

ए = e

ऐ = ai

ओ = 0

औ = au

अं = aM

अ: = a:

शिक्षणप्रकटनविचार

शिक्षक बनायचे आहे

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
19 Dec 2014 - 7:31 pm

२३- २४ वर्षे IT प्रोजेक्ट management / delivery वगैरे करून झाल्यावर शिकवायची हौस म्हणून २-३ वर्षांपासून campus to corporate, data wareshousing concepts वगैरे ट्रेनिंग केली ...अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला ...
एकूणच 'शिकवणे' हे तुला उत्तम जमते हा अनेकांचा अभिप्राय आहे आणि म्हणूनच ..हल्ली बरेच दिवस, ट्रेनिंग देणे हा पूर्ण वेळ व्यवसाय करावा असे मनात येते आहे ...

मी ह्याच्यात उत्तम काम करू शकेन हा आत्मविश्वास आहे ..परंतु वयाच्या मध्य चाळीशीत हे उद्योग करावेत का ? आणि नक्की सुरुवात कशी कुठे करावी ह्या बद्दल जरा घोळ आहेत मनात ...

आरक्षणा संबंधी नवीन विचार

येडाफुफाटा's picture
येडाफुफाटा in काथ्याकूट
19 Dec 2014 - 4:23 pm

माझे हिंदु/पुरुष/उच्चवर्गीय/ऊच्चवर्गीय/पहिला मुलगा असणे हीसुद्धा matter of fact च आहे. आणी त्याचे 'परिणाम भोगणे' असली काही परिस्थिती आलेली नसून त्याचे वट्ट फायदे मी 'enjoy' करत आहे. तरी काळजी नसावी.

मरायचं नाय बे...!!

आयुर्हित's picture
आयुर्हित in जे न देखे रवी...
11 Dec 2014 - 6:32 pm

मरायचं नाय बे...!!

कुणब्याचं पोरं सालं भित्रच हाय ,
फासावर जाय नाहीतर औषध खाय ,
लय बेनं इपितर बायलच हाय.. सालं..
मरायचं नाय बे , मरायचं नाय ||धृ||

गेलं खरीप गेलं रब्बी सारं गेलं जाऊ दे ,
धट्टा-कट्टा पिळदार शरीर मागं राहू दे |
चिलं-पिलं गोड कशी पिवळी हाय बाय ...
मरायचं नाय बे , मरायचं नाय ||१||

दारू पेऊन भैतानं शिव्या लय दे S तं ,
गांजाचा धूर सालं बका-बका घे S तं |
या परीस कुठतरी मजुरीनं जाय...
मरायचं नाय बे , मरायचं नाय || २ ||

समाजअर्थव्यवहारशिक्षण

शोधा म्हन्जे सापडेल!

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
11 Dec 2014 - 1:53 pm

मी एका संधीच्या शोधात आहे, जेणेकरून विदर्भातील शेतकऱ्याच्या आत्महत्या बंद होतील.
भारतात राहून काही संधी आहे काय आमच्यासाठी/आमच्या विदर्भातील शेतकरी लोकांसाठी?

त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करायची, नवीन गोष्टी शिकायची, वाट्टेल तितका खर्च करायची, वाट्टेल तेथे येवून आपली भेट घेण्याची, ह्या आयुष्यातील लागेल तेव्हढा वेळ देण्याची माझी तयारी आहे.

मिपावरच्या "शोधा म्हन्जे सापडेल" या आय डी मुळे मला हे प्रखरतेने जाणवले आहे.
आशा आहे की सर्व मिपाकर आपआपल्या कुवतीनुसार मार्गदर्शन व प्रसंगी सर्व मदतही करतील.
आणि मिपाचा एक चांगला आदर्श जगापुढे ठेवू या.

दिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
4 Dec 2014 - 8:54 pm

खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.

पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.

श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.

आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा?

किती वाजता करायचा?

खायला-प्यायला काय आणायचे?

इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.

तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.

(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)

मराठी प्राथमीकशाळेतील इंग्रजी शिक्षणाबद्दलच्या शोध निबंधाचे निष्कर्ष

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
29 Nov 2014 - 12:07 am

मराठी माध्यमाच्या शाळातूनच प्राथमिक म्हणजे इयत्ता पहिलीपासून इंग्रजी भाषेचे शिक्षण महाराष्ट्रातील सर्वच मुलांना द्यायचा निर्णय शासनाने अमलात आणूनही काही वर्षे झाली आहे. भारतातील विद्यावाचस्पती म्हणजे Phd चे शोधनिबंध पहाण्यास मिळण्याची सोय http://shodhganga.inflibnet.ac.in या संस्थळावर उपलब्ध आहे. तिथे मराठी विषयक शोधनिबंध चाळता चाळता एक ताजा शोधनिबंध हाताशी आला. त्याच लांबलचक नाव खालील प्रमाणे आहे. (मिपा संपादक मंडळाने शतकी प्रतिसादाच्या धागालेखातही किमान दहा ओळी असण्याची अट घातलेली असल्यामुळे ते नाव पूर्णपणे खाली च्योप्यपेस्ट्वत आहे.