प्रशिक्षण आयोजीत करण्यासाठी संगणक संस्थांशी संपर्क करून हवा आहे.

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
2 Jan 2015 - 1:34 pm

नमस्कार,

मला गेल्या दहा एक वर्षात सर्वसाधारण आंतरजालासोबतच मराठी आंतरजाल, तसेच ज्ञानकोशीय लेखनाचा प्रशिक्षण देण्याचा बर्‍यापैकी अनुभव आहे. सोबतच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात ते उपयूक्त पडेल अशापद्धतीने प्रशिक्षण वर्ग/ कार्यशाळा आणि सुट्टीतील वर्ग आयोजीत करण्याची इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने प्रशिक्षण आयोजीत करण्यासाठी आंतरजाल सुविधा उपलब्ध असलेल्या संगणक संस्थांशी संपर्क करून हवा आहे. मिपाकर वाचकांपैकी कुणाची स्वतःची अथवा परिचयातील संस्था असल्यास व्य नि करावा हि विनंती.

हा धागा इतरही संगणक प्रणाली प्रशिक्षकांना निवेदने / आवाहने करण्यास उपयूक्त पडू शकेल असे वाटते.

* अवांतर टाळण्यासाठी आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद

शिक्षणप्रकटन

प्रतिक्रिया

मला नीटसे समजलेले नाही, तरीपण एक संस्था सुचवतो -

http://www.ilfsets.com/

याचा आपणांस उपयोग होईल की नाही हे माहीत नाही. तरीपण अल्पस्वल्प मदत व्हावी म्हणून प्रतिसाद देत आहे.

या संस्थेबद्दल कल्पना नव्हती. मी त्यांच्याशी जरूर संपर्क करेन. अर्थात संगणक आणि आंतरजाल सुविधा पुरवू शकणार्‍या छोट्या छोट्या शैक्षणिक संस्था सायबर कॅफेही इत्यादींशी सरळ संपर्क झाल्यास, मोठ्या पण त्रयस्थ संस्थांचे अनावश्यक रेव्हेन्यू शेअरींग टाळता येईल असे वाटते.

माहितीसाठी धन्यवाद आणि नववर्ष शुभेच्छा.