मदत...Internship.!

उगा काहितरीच's picture
उगा काहितरीच in जनातलं, मनातलं
5 Jan 2015 - 5:40 pm

नमस्कार,
नुकतेच पुणे विद्यापिठातुन MCA(अभियांत्रीकी) या पद्व्युत्तर पदवीचे ५ सत्र पुर्ण केले. विद्यापिठाने सहाव्या सत्रासाठी विषय वगैरे न ठेवता पुर्ण वेळ Internship असा कार्यक्रम आखला आहे. यासाठी आम्हा विद्यार्थ्यांनी कंपनी मध्ये राहुन काम शिकणे वगैरे अपेक्षीत होते. यामध्ये विद्यार्थ्यांसोबत कंपन्यांचापण फायदा होता कारण त्यांना अल्प मानधनावर(stipend)किंवा फुकट काम करायला व्यक्ती मिळते.पण मागील २-३ वर्षापासुन लहानमोठ्या कंपन्या या संधीचा फायदा उठवुन विद्यार्थ्यांकडुन काम करुन घेता घेता training fees च्या नावाखाली ५००० ते ५०,००० रुपये उकळत आहेत.
मागच्या जवळपास १ महिन्यापासुन मी Internship साठी पुण्यातल्या भरपुर कंपन्या फिरलो आहे. पण जिथे खरोखर काम चालते व शिकायला मिळेल अशी कंपनी काही मिळाली नाही. माझ्या माहितीप्रमाणे बरेचसे पुणेकर मिपाकर IT मध्ये काम करतात. जर कुणी अश्या प्रकारची Internship देउ शकत असेल तर फार मदत होईल.धन्यवाद.

(धागा २/३ दिवसात उडवला तरी चालेल.)

नोकरीशिक्षणमदत

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

5 Jan 2015 - 5:59 pm | श्रीगुरुजी

मी काही वर्षांपूर्वी अभियांत्रिकीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी काही कंपन्यांची नावे दिली होती. भाषांतराचा कंटाळा आल्यामुळे ती माहिती जशीच्या तशी देत आहे.

You can try at a company called Bioimagene. (located at 107 Corporate Plaza, Senapati Bapat Road)

You may also try Tata Honeywell.

In Pune, there is a company called 'Modular systems' in Electronic estate, Pune-Satara road, opposite to hotel Utsav near City Pride. It is the company which normally gives project to BE students.

Also one can try at Siemens , Pune. In Siemens, one will have to walk in and talk to the HR.

सेनापती बापट रस्त्यावरील "बिटवाईज" या कंपनीत प्रयत्न करता येईल.

खालील कंपन्यात प्रयत्न करता येईल.

- Mastek

- Kale Consultants

- Selectica

- Mphasis

- KPIT

- Zensar

- TRDDC

- Gurukul

- Wipro

- Satyam

- Geometric

- Mascot

- Computer Vision (Parametric)

- Cyrix

- Persistent

- C-DAC

- Cognizant

- Indus

- Kanbay

गुगलवर सर्च करून इंटर्नशिपसाठी संधी देणार्‍या कंपन्यांची माहिती मिळू शकेल. माहितीचा सगळ्यात उपयुक्त स्त्रोत म्हणजे तुमचे प्राध्यापक आणि पूर्वी पासआऊट झालेले विद्यार्थी.

आदूबाळ's picture

5 Jan 2015 - 6:25 pm | आदूबाळ

अगं बने! म्हणजे इंटर्नशिपमध्ये फुटकळ का होईना पैसे मिळायच्या ऐवजी पैसे द्यावे लागतात होय! अवघड झालं...

लॉरी टांगटूंगकर's picture

6 Jan 2015 - 10:36 am | लॉरी टांगटूंगकर

सरकारी रिसर्च इन्स्टीट्यूट पकडा. स्टायपेंड मिळायची शक्यता फार कमी होते पण काम मिळते. बहुतांश वेळा चांगले कामं मिळतात.
तुमच्या विषयातली कामं कुठे होतात हे मला नक्की माहीती नाही.
Software Development Institute - Indian Airforce इथे बंगळूरात आहे.
डीआरडीओ, सीएसआयआर (Council of Scientific & Industrial Research) मध्ये चौकशी करा. प्राध्यापकाचं पत्र असलं की इन्टर्नशिप मिळते.
Centre for Mathematical Modelling and Computer Simulation (CSIR) च्या वेबसाईटवर सध्याच्या चालू असलेल्या प्रकल्पांची यादी असते. तिथून डायरेक्ट scientistला मेल करता येईल. काहीच निष्पन्न होत नसल्यास IIT, IISC मध्ये बरेच प्रोजेक्ट चालू असतात. तिथे प्रोफेसरशी थेट बोलता येतं. चांगलं काम केलं तर पेटंट वगैरे होऊन जातं.

बेस्ट लक

नपा's picture

6 Jan 2015 - 3:31 pm | नपा
श्रीरंग_जोशी's picture

7 Jan 2015 - 1:44 am | श्रीरंग_जोशी

बरोबर दहा वर्षांपूर्वी एमसीएच्या शेवटच्या सत्रात कमलनोंदी वापरणार्‍या कंपनीमध्ये इंडस्ट्रीयल ट्रेनिंगसाठी (इंटर्नशिप शब्द वापरला जात नसे तेव्हा) निवड झाली होती (६० जणांमधून आम्ही ४ जण निवडले गेलो होतो).

स्टायपेंड खूपच नाममात्र होते. पण दर एक तारखेला रोख रकमेत मिळायचे :). सुटी काढली असल्यास तेवढे पैसे वजा व्हायचे. महिन्यातून एकदा रांग लावून स्टायपेंड मिळवण्याचा आनंद आजच्या डायरेक्ट डिपॉझिट पेक्षा अधिक होता. पीएमटीचा मासिक पासचे भाडे अडीचशे रुपये होते. घरून पैसे मागवल्याशिवाय महिन्याचा खर्च भागणे शक्य नव्हते.

पाच महिन्यांचा ट्रेनिंगचा काळ संपला अन लगेच नोकरी सुरू झाली. ट्रेनिंगच्या काळातही प्रोजेक्टचेच काम केले जायचे. पण तेव्हा लहानसहान कामगिरीचे बरेच कौतुक व्हायचे :-) .

या ट्रेनिंगमुळे माझे करिअर मार्गी लागले. तुम्हाला अनेक शुभेच्छा!!

काही प्रश्न असल्यास अवश्य विचारा.

अवांतर - माझ्या एमसीएबाबत पूर्वी हा लेख लिहिला होता.

अमित खोजे's picture

7 Jan 2015 - 2:43 am | अमित खोजे

व्यनी पाठवला आहे. पुढील वाटचालीस शुभेछा!