माय-(मराठीची) पोएम
आज मराठी भाषा-दिन.
मराठी असे आमुची मायबोली या कवितेचे कवि माधव ज्युलियन आज असते तर अनेक घरात बोलली जाणारी मिंग्लिश भाषा ऐकून त्याना असे म्हणावे लागले असते?
============
मराठी असे आमुची मायबोली
जरी एव्हरी डे यूजमध्ये नसे
नसो आज ऐश्वर्य त्या माऊलीला
सक्सेसची तिच्या होप आम्हा असे ॥१॥
जरी पंचखंडांतही मान्यता घे
पाॅवरफुल नि पाॅप्युलर इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही
तिचा आॅफस्प्रिंग तीस केवीं त्यजी ॥२॥