धिस पिक्चर इज जॉइंट प्रॉडक्शन ऑफ विप्र. खोपडा अॅंड परा थोपडा.
मुळ कथा : बाबा म्हाराज ठाणेकर
डायरेक्टर ,स्क्रिप्ट राईटींग : परा
एडीटींग : धम्मु (अतिरिक्त भार)
मुझी़क : विजूभौ सातारवी अँड प्रमोद देव
बॅ़ग्राउंड मुझीक : प्रमोद देव
फायनान्स : तात्या भयंकर
स्टार कास्ट : नेहेमीचे यशस्वी मिपाकर
पुनरपी मरणम पुनरपी जननम (पीत पीत जगणारे, आणि मरणारे) ह्या न्यायाने मिपाकर सुद्धा म्हाभारतातील युद्धात हजर होते.
बहुतेक सर्व पांडवांच्या पार्टीत होते. काही चपला घातलेले कौरवांच्या पार्टीत होते.
टारझन भीमाच्या बाजुला उभा होता. त्यामुळे लांबुन नेमका भीम कोणता हे ओळखु येत नव्हते.टारझन युद्ध सुरु व्हायची वाट बघत होता. त्याला एक ओळींचे धागे काढ्णार्या कौरव पार्टीतील सदस्यांचे भुस्काट पाडायची उत्सुकता होती.
रामदासाना स्टॉक संपल्यामुळे शिरस्त्राण मीळाले नव्हते. ते घरातले तांब्याचा भांड्याचा टोप घालुन आले होते.'धातु कोष' मदतीला बरोबर आणलेला होता.
विप्र. आणि अवलिया गळ्यात गळा घालुन टवाळक्या करत होते. नविन नियमानुसार हे आता सरकार मान्य होते.
अदितीतै आपली दुर्बीण अॅड्जेस्ट करत होत्या. संजयाला 'फीड्बॅक 'द्यायची जबाबदारी त्यांची होती.
सर्वबाजुंनी शंखनाद सुरु झाला, अचानक या सर्व शंखनादांवर कडी करणारा आवाज घुमला. बघतो तर काय, विजुभौ शंखाऐवजी एका रथात उभे राहुन बासरी फुंकत होते. त्यांची बासरी ऐकुन अर्जुनाच्या सारथी झालेल्या मुरलीधराने डोक्याला ताडकन हात मारुन घेतला.
एव्हड्यात सगळीकडे गदारोळ माजला. अर्जुन शस्त्र टाकुन युद्ध करणार नाही म्हणतोय अशी बातमी धडकली. पाठोपाठ अर्जुनाला शस्त्र उठवेना म्हणुन आद्य समुपदेशकांनी ' गिताग्रान' ची कॅप्सुल अर्जुनाला द्यायची ठरवले आहे अशी सबसे तेज बातमी आली.
"च्यायला आता ४ तासांची निश्चींती" रथांच्या ट्रॅफिक मधुन वैतागत कसातरी युद्धभुमीवर पोचलेला छोटा डॉन म्हणाला.
चतुरंगराव ताबडतोब बुद्धीबळाचा पट रथातुन काढुन भिडु शोधत हिंडु लागले. मुक्तसुनीत अलगद त्यांच्या तावडीत सापडले. रथाच्या मागेच त्यांचा डाव रंगला.
इकडे तात्या वेळ न घालवता दु:शासन, दुर्योधन, शकुनीला पकडुन युद्धाच्या आधी विमा काढणे किती गरजेचे आहे हे पटवुन द्यायला लागले. तिघेही महारथी झुंजारपणे तात्याला नकार देत नडत होते. शेवटी "काढायच तर काढा विमा नाहीतर गेलात बा***" असे ऐतीहासीक उदगार काढत तात्या पांडव पक्षाकडे वळले.
एका कोपर्यात भिष्म व धमाल मुलगा हे 'मुस्काटदाबी कशी होते व त्यावर काय उपाय करावेत' ह्यावर गहन चर्चा करत होते. बाजुनी जाता जाता हि चर्चा कानावर पडताच आनंदयात्री थबकले. "उच्चभ्रुंच्या नादी लागलात की अशीच फळे मिळणार" असा एक तीरकस शेरा ते जाता जाता मारायला विसरले नाहीत.
सखाराम गटणे पुर्ण कुरुक्षेत्रात हातात काहीतरी लाकडी यंत्र घेउन फिरत होते. प्रत्येक रथापाशी जाउन ते यंत्राकडे बघत व "ह्म्म्म्म हा कुंभोजवरुन आलाय, हा द्वारकेहुन आलाय, हा साला प्रॉक्सीवाला दिसतोय" असे काहीतरी अगम्य बडबडत होते.
दुर एका कोपर्यात राजे, युधीष्ठीर आणी शकुनी द्युत खेळत बसले होते. राजे आणी शकुनी हळुच एकमेकांना कसल्यातरी खाणाखुणा करत छद्मी हसत होते. युधीष्ठीराच्या अंगात आता फक्त धोतर उरलेले दिसत होते.
युद्धाला अजुन बर्याच वेळ असल्याने फावल्या वेळात टारोबा सूहास, मराठमोळा ह्यांना रथाची व्हिली करुन दाखवत होते. एका बाजुला निखिल देशपांडे घटोत्कचाला "तुला काय सांगु रे बॅचलर्सच्या अडचणी" असे काहीतरी हृदयद्रावक वर्णन करत होते.
कृपाचार्य आणी घाटपांडेकाका युद्धाच्या मुहुर्ताची काढलेली वेळ ह्यावर वादवीवाद करत बसले होते. दोघेही अनेक प्रकारचे दाखले देउन एकमेकांना उगाचच दमवत होते.
दुर एका झाडाखाली बसुन डॉ. दाढे एक खास आकाराच्या बाणावर काही प्रयोग करत होते. न राहवुन मी तिकडे धावलो. "डॉक डॉक हा कुठला बाण म्हणे ?" मी विचारले.
"परा लेका, हे मी नवीन 'दंतास्त्र' तयार केले आहे, ह्याचा वापर केला की एक अक्षौहिणी विरुद्ध सेनेचे पुढचे २/२ दात आणी डावीकडची एक दाढ पडते" डॉक्टर अभिमानानी वदले.
"नदीच्या किनार्यावर भडकमकर मास्तर १०००/२००० सैनीकांना जमवुन काहीतरी करताना दिसले. अधीक चौकशी करता मास्तर त्यांना "शॉर्ट टर्म रथी, महारथी कोर्स" बद्दल शिकवत असल्याचे कळले.
बाजुलाच प्रा. डॉ. बिरुटे कौरव पांडव सैन्यातील १८ वर्षाखालील तरुणांना एकत्र जमवुन व्याकरणाचे धडे गिरवत होते. हे भिष्मांच्या आज्ञेने होत असल्याने तरुण वर्ग चडफडत गप्प शिकत होता.
एका रथात बसुन प्रमोद देव काका आणी धनंजय शंखाच्या वेगवेगळ्या नादांवरती वाद विवाद करत होते. शंखवाणी श्रेष्ठ का शंखताल ह्यावर दोघांची जुंपली होती.
"एका एरियात दोन सिंह जसे राहात नाहीत तसेच एकाच एरियात दोन समुपदेशक राहु शकत नाहीत ह्या नियमानुसार विप्र मास्तरांनी निघुन जावे" ह्या साठी एका बाजुला अवलियाचा जोरदार प्रयत्न चालु होता.
"पण मास्तर समुपदेशक आहेत ह्याला पुरावा काय?" मी सुद्धा आता त्या वादात उडी मारली.
येव्हड्यात बाजुला जोरदार गलका ऐकु आला. तात्यानी कोणाचा तरी रथ हायजॅक केला होता म्हणे. शेवटी दुबईवर्तातील शेख बिका ह्यांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. ह्या शेख बिकांना दुबईमातेकडुन एक दैवी उंट मिळाला होता. ज्यावर बसुन ते कधी ह्या देशात तर कधी एकदम त्या देशात प्रकट होत असत.
एका कोपर्यात ब्रिटीश टिंग्या एकटाच बसला होता. तो पांडवांकडचा आहे असे कौरव पक्षाचे ठाम मत होते तर तो कौरव धार्जीणा आहे हे पांडव पक्षाचे. टिंग्या आपण नक्की कोणत्या पक्षाचे आहोत ह्याबद्दल विचार करत बसला होता.
"पालथे धंदे बंद केल्याशीवाय ह्यावर उपाय सापडणे कठीण आहे" श्रावण मोडक टिंग्याला उपदेश करत म्हणाले.
"पण काय हो श्रावण काका, तुम्ही कोणत्या पार्टीचे ?" टिंग्याने पृच्छा केली.
"हॅ हॅ हॅ चपला घाला आणी चालु पडा" श्रा मों चे एका वाक्यात उत्तर.
"कृष्ण देव आहे का ? नक्की देव म्हणजे काय ? त्याच्यावर काही संस्कार आहेत का ?" ह्यावर छोटा डॉन व आनंदयात्री ह्यांचा खल चालला होता.
तेव्हड्यात एका कोपर्यात "झेंड्याची धोतरे नेसणार्या प्रत्येकाला मी या युद्धात वधणार" अशी अॅडी जोशीनी प्रतिज्ञा केली आहे अशी कुजबुज कानावर पडली. आम्ही ताडकन उठलो आणी धोतर बदलायला धावलो.
(ह्या चित्रपटाच्या कथेत अजुन कोणाला भर घालायची असल्यास स्वागतच आहे.)
प्रतिक्रिया
6 Jul 2009 - 12:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे! (च्यायला या डेडलाईनच्या...!!)
अदितीतै दुर्बिटणे.
6 Jul 2009 - 1:02 pm | विजुभाऊ
या कुरुकक्षेत्रावर एका बाजूला वडापाव आणि दुसरीकडे तलम पानाचे धोतरे असे दोन स्टॉल लागले होते
6 Jul 2009 - 1:04 pm | ब्रिटिश टिंग्या
परा......*****!
बघुन घेईन साल्या.....सध्या अंमळ बिझी आहे!
(पक्षलेस) ब्रिटीश टिंग्या.
6 Jul 2009 - 1:19 pm | ऋषिकेश
=)) =)) =))
__/\__
=)) =)) =))
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
6 Jul 2009 - 1:23 pm | विसोबा खेचर
परा, बाबारे धन्य आहे तुझी! छान निरिक्षण शक्ति...
हा हा हा! :)
आपला,
(भाग्यश्रीचा मित्र) तात्या.
--
आमची सही - मिपा आहे हे असं आहे. ते आवडणार्यांचं स्वागतच आहे , न आवडणार्यांनी चपला घालायच्या अन् चालू पडायचं! :)
6 Jul 2009 - 2:28 pm | पर्नल नेने मराठे
आमची सही - मिपा आहे हे असं आहे. ते आवडणार्यांचं स्वागतच आहे , न आवडणार्यांनी चपला घालायच्या अन् चालू पडायचं!
हेच आव्ड्ले =))
चुचु
6 Jul 2009 - 1:32 pm | विशाल कुलकर्णी
हहपुवा.
अवांतर : श्रीकृष्णाचे विपश्यनाव्रत चालु असल्याने ते मौनात होते तत्सत अर्जुनाला गीताज्ञान ऐकवण्यासाठी श्री श्री श्री बाबामहाराज सातारकर यांना पाचारण करण्याचे ठरले. पण त्यासाठी मोरारीबापु, आसारामबापु ई. ई. देखील रांगेत असल्याचे कळल्याने विधिवत टेंडर काढण्याचे सर्वानुमते ठरले असल्याचे कळले.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
6 Jul 2009 - 2:06 pm | श्रावण मोडक
चप्पल घाला आणि चालू पडा!
6 Jul 2009 - 2:22 pm | दिपक
=)) =))
6 Jul 2009 - 2:29 pm | विनायक प्रभू
'लावा भांड्याला कल्हई' हे गाणे म्हणुन रामदासांनी त्याच्याच सारख्या
शिरस्त्राण न मीळालेल्याना मदत सुरु केली.
6 Jul 2009 - 2:41 pm | अश्विनि३३७९
मिपा करांची जय हो !!
अश्विनि ....
6 Jul 2009 - 2:46 pm | अश्विनि३३७९
अश्विनि ....
6 Jul 2009 - 2:52 pm | वेताळ
एकदम सही..........लगे रहो परा भाई.
वेताळ
6 Jul 2009 - 2:54 pm | अवलिया
हाणतिच्यायला !
=))
--अवलिया
कर्ण जन्मतःच कवचकुंडले घालून आला होता. आम्ही चपला घालून आलोत... केव्हा म्हणाल तेव्हा तयार आहे. (सौजन्य बिका)
6 Jul 2009 - 3:29 pm | घाटावरचे भट
असेच म्हणतो...
- भटोबा
"मेरे पास गाडी है, बंगला है, दौलत है.... तुम्हारे पास क्या है, आंय?"
"... मेरे पास.... मेरे पास चपला हैं"
6 Jul 2009 - 3:08 pm | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
अक्षरशः फुटेश लेका !!! तोड फोड स्फोटक !!
लेका .. तिकडे स्वाती ताई आणि दिपाली ताई कौरवांना फक्त पाककृतींचे फोटोज मेल करत होत्या ते नाही टाकलंस ? बरेच कौरव जळून जळून मेले की रं ..
शितल काकु त्यात कौरवांना "काळ्या काळ्या " म्हणून चिडवून न्युनगंड आणत होत्याच !! मृगणयणीनं ही काव्यग्रंथ वाचून दाखवला, त्यामुळे सुद्धा बरेच कौरव यमावहन करत होते ...
कोल्हापुरी दादांनी आपल्या निबंधांच्या स्कॅन कॉपीज चे पँप्लेट्स पुर्ण सेनेत वाटले , आणि खाली मोठ्या अक्षरांत "आणि हो, वाचा आणि प्रतिक्रिया द्या" लिहीलं होतं .. शुर शुर लढवय्यांनी सुद्धा चार पाच पॅरे वाचल्यावर स्वतःच्या हातातले भाल्यांनी स्वतःला खुपसून घेतले , काहींनी गदा घालून कपाळमोक्ष करून घेतला . दुशासनानं स्वतःहून आपली छाती फोडून घेतली आणि ते रक्त तो द्रौपदीला पोस्ट करून आला. भिमाला आपली प्रतिज्ञा अपुर्ण राहिल्यानं कोदांचा पत्ता शोधत हिंडत होता . तेवढ्यात कोदांनी आय.डी. बदलून "भयानक पाठलाग" ठेवला, आणि ते वाचले .
तेवढ्यात कर्णाच्या चिलखताला कोणी तरी अरूण राव णाडी बांधतानादिसले . कृष्णाला त्या णाडीमुळे कर्ण अमर होईल की काय असे वाटल्याने त्यामे युद्धात णाडीवापराला बंदी केली !
राजे नेहमी प्रमाणे युद्धातून पळून जाऊन युद्धकॅंपात जाऊन आपल्या नविन चाटफ्रेंड बरोबर व्हाईस चाट करत होता हे मी स्वतः पाहिलं होतं ..
(२० हॉर्सपावरचा महारथी ) टारझन रोस्सी
6 Jul 2009 - 3:45 pm | दशानन
प्रचंड सहमत.
=))
=))
=))
>>राजे नेहमी प्रमाणे युद्धातून पळून जाऊन युद्धकॅंपात जाऊन आपल्या नविन चाटफ्रेंड बरोबर व्हाईस चाट करत होता हे मी स्वतः पाहिलं होतं ..
हाणतिच्यामायला ;)
=))
थोडेसं नवीन !
6 Jul 2009 - 3:59 pm | अनिल हटेला
शॉल्लीट मिपाभारत....
परा राजे धन्य आहात आपण ^^^^^ ....
बची कसर टार्याने पूरी केली.....
लगे रहो...................;-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
6 Jul 2009 - 5:09 pm | छोटा डॉन
=)) =))
अफाट लेख आहे पराभौ, जहबहर्या जमला आहे.
टार्याच्या प्रतिसादाने अजुन ४ चांद लागले.
मजा आली ...
चालु द्यात, अजुन असेच येऊद्यात ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
6 Jul 2009 - 5:22 pm | ब्रिटिश टिंग्या
टार्या घटोत्कच होता का?
- (कर्ण) टिंग्या
6 Jul 2009 - 5:36 pm | छोटा डॉन
>>- (कर्ण) टिंग्या
=)) =))
वाचुन अंमळ मज्जा वाटली ...
पण काय हो मालक, तुमची ती सुप्रसिद्ध अभेद्य कवचकुंडले उर्फ "गेंड्याची कातडी" आहे कुठे ?
त्याचे मालकी हक्क दुसर्याच कुणाकडे आहेत असे ऐकले आहे, ह्याला आम्ही काय समजावे ?
असो.
------
डॉन्या पांचाल
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
6 Jul 2009 - 5:49 pm | ब्रिटिश टिंग्या
>>वाचुन अंमळ मज्जा वाटली ...
बरं...मग उसळ खा.....शिकरण खा!
ऑम्लेट खाउन झालं असेलच!
>>पण काय हो मालक, तुमची ती सुप्रसिद्ध अभेद्य कवचकुंडले उर्फ "गेंड्याची कातडी" आहे कुठे ?
अहो, एका हलकट ब्राम्हणाने फसवणुकीने काढुन घेतली कवचकुंडले!
आम्ही आनंदाने यात्रा करीत असताना, त्या हलकटाने दिलेला प्रसाद आम्ही भक्षण करताच मुळापासुन आमची कवचकुंडले गायब झाली हो! ;)
>>त्याचे मालकी हक्क दुसर्याच कुणाकडे आहेत असे ऐकले आहे
एव्हाना समजलेच असेल कोणाकडे आहेत ते! ;)
- (कौरव का पांडव हे न समजलेला) टिंग्या
6 Jul 2009 - 4:21 pm | प्रकाश घाटपांडे
या मिपाभारतात..... आणि कौरव व पांडव आपापल्या राज्यात सुखाने नांदु लागले असा शेवट व्हनार. शेवटी ष्टोरीने प्रेक्षकांशी 'जवळीक' साधली पायजे कि नाय?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
6 Jul 2009 - 4:22 pm | मसक्कली
बाकि कसर टार्याने पूरी केली.....;)
सहमत आहे.........!!:)
6 Jul 2009 - 5:18 pm | नीधप
ह ह पु वा!!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
6 Jul 2009 - 10:52 pm | Nile
हहपुवा!
(महाभारत पाहुन नेहमीच खो खो-खी खी होणार्या प्रेक्षकांपैकी एक)
6 Jul 2009 - 5:27 pm | ऍडीजोशी (not verified)
मेल्या परा, भेटच तू. तुझ्या समोर मी आणि धम्या सिंगल मॉल्ट ढोसू आणि तुला कॅरट ज्यूस प्यायला लाउ :) :) :)
6 Jul 2009 - 5:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चालू दे ! :)
स्वगतः या पराचे 'पर' कसे कापावेत बरं ! :?
6 Jul 2009 - 6:05 pm | सखाराम_गटणे™
सखाराम गटणे पुर्ण कुरुक्षेत्रात हातात काहीतरी लाकडी यंत्र घेउन फिरत होते. प्रत्येक रथापाशी जाउन ते यंत्राकडे बघत व "ह्म्म्म्म हा कुंभोजवरुन आलाय, हा द्वारकेहुन आलाय, हा साला प्रॉक्सीवाला दिसतोय" असे काहीतरी अगम्य बडबडत होते.
काय काय लक्षात ठेवतोस रे????
लेख फक्क्ड जमला आहे.
पुढचा लेख लवकर टाक.
6 Jul 2009 - 7:05 pm | बिपिन कार्यकर्ते
खणखणीत रे परा... मोठ्ठा धमाका. हहपुवा झाली वाचताना. बाय द वे, कधी आलास इकडे फिरत फिरत तर उंट देईन तुला वापरायला. अरे खूपच मज्जा येते... ;)
बिपिन कार्यकर्ते
6 Jul 2009 - 7:13 pm | अवलिया
बिकाशेख ! उंट वापरायला का फिरायला? :?
--अवलिया
काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!
6 Jul 2009 - 7:16 pm | चतुरंग
कदाचित फिरवून फिरवून वापरायला देत असतील! ;)
(सरळमार्गी)चतुरंग
6 Jul 2009 - 7:19 pm | बिपिन कार्यकर्ते
उंट वापरायला का फिरायला?
अहो, ते तुमच्या त्या वेळच्या गरजेवर आणि मूडवर अवलंबून आहे. उंट तसा मल्टिपर्पज असतो.
खुद के साथ बातां: हा नाना एकदा येऊच दे इथे. नाही त्याचाच उंट केला तर नाव नाही सांगणार.
बिपिन कार्यकर्ते
6 Jul 2009 - 7:25 pm | श्रावण मोडक
उंट तसा मल्टिपर्पज असतो.
अनुभवाचे बोल की काय? ;)
6 Jul 2009 - 7:28 pm | अवलिया
हा नाना एकदा येऊच दे इथे. नाही त्याचाच उंट केला तर नाव नाही सांगणार.
हॅ हॅ हॅ
शेखचिल्ली के हसीन सपने! :)
--अवलिया
काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!
7 Jul 2009 - 12:19 am | दशानन
=))
काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?
6 Jul 2009 - 7:32 pm | चतुरंग
एकेक दृष्य डोळ्यांसमोर आले! =)) =))
अरे बाबा पण मी सारखा बुद्धीबळच खेळत नाही रे! :O
भर युद्धातही मला रथावर बुद्धीबळं खेळायला बसवतोय मेला! X(
चतुरंग
6 Jul 2009 - 7:38 pm | छोटा डॉन
>>भर युद्धातही मला रथावर बुद्धीबळं खेळायला बसवतोय मेला!
तेच तर म्हणतो मी.
नाहितर रंगाशेठ आपले बुद्धिबळात मग्न, आसपास काय चालु आहे ह्याचा पत्या नाय.
रंगाशेठ म्हणायचे " हांग्गाशी, झालास की नाही चेक-मेट, कसा नुस्ता उंटाच्य तिरक्या चालीत हाणला बेट्या तुला ..."
आणि मागुन एक गदाधारी पैलवान ( टार्या नव्हे ) म्हणायचा " व्हय सायबानु, झालं का तुमचं, आता हाणु का मी डोस्क्यात गदा? "
मग काय करता बोला ?
स्वगत : चला पळा बाबा, उशीर झाला की फुकट ट्राफिक ज्यममध्ये ४-४ तास जातात ;)
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
6 Jul 2009 - 8:05 pm | विनायक प्रभू
तुझ्या पिच्चरचे काश्चुम डीजाइन कुणाचे बॉ?
6 Jul 2009 - 10:47 pm | मिसळभोक्ता
क्वाश्चुम डिझाईन घाटपांड्यांनी केलेले असावे.
-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
7 Jul 2009 - 1:00 am | विसोबा खेचर
हम्म!
मिसळभोक्त्या, अजून तुझा मूळचा भिकारचोट स्वभाव गेला नाही म्हणायचा! :)
तात्या.
6 Jul 2009 - 8:16 pm | प्राजु
पुन्हा एकदा सिद्ध केलं आहेस तू, की तू एक उत्तम लेखकच नव्हे तर इतिहास कर्ता सुद्धा आहेस.. ;)
लगे रहो..
आवांतर : कुरूक्षेत्रावर आम्हाला प्रवेश न दिल्याबद्दल तुझा त्रिवार निषेध. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 Jul 2009 - 8:42 pm | ऋषिकेश
:)
असेच म्हणतो ;)
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
6 Jul 2009 - 11:05 pm | अंतु बर्वा
पराशेठ... मानलं बुवा तुमच्या निरीक्षणशक्तीला...
झकास लेख...
6 Jul 2009 - 11:22 pm | लिखाळ
छान.. मजेदार :)
-- (हनुमान)लिखाळ.
6 Jul 2009 - 11:32 pm | धनंजय
हाहाहा...
मजा आहे!
(देवदत्त नावाचा शंख वाजवणारा - बघा भगवद्गीता १:१५)
धनंजय
6 Jul 2009 - 11:43 pm | चतुरंग
केलेलावाजवलेला शंख ऐकला! ;)
(पौंड्र)चतुरंग
7 Jul 2009 - 1:20 am | दिपाली पाटिल
माझ्या पाकृ ने कौरव जळुन मेलेत काय? :D , बाकी लेख फुल्ल TP आहे.
दिपाली :)
7 Jul 2009 - 1:22 am | स्वप्निल..
परा आणि टार्या,
=))
दोघेही धन्य आहात..
हसुन पोट दुखायची वेळ आली .. =))
स्वप्निल
7 Jul 2009 - 4:01 am | पक्या
हा हा हा, मस्तच. मजा आली.
युध्दभूमीवर शरदिनी ताई ही आल्या होत्या आपली काव्यघोरपड घेऊन. त्यांना पाहताच चंपीच्या भितीने निम्मे सैन्य तर झारीतल्या शुक्राचार्यांसारखे वितळून गेले.
7 Jul 2009 - 11:42 am | परिकथेतील राजकुमार
प्रतिसाद देणार्या व न देणार्या सर्वांचे आभार __/\__
आभारी
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?
आमचे राज्य
7 Jul 2009 - 1:44 pm | क्रान्ति
परा आता थेट :? पुराणात? मला वाटतं यापुढं तो "मिपर्ववेद" लिहिणार! ;)
{टारु लेखनिक असेल का?} :?
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
14 Jul 2009 - 3:27 pm | विश्वेश
मी नविन आहे, म्हणुन अभिमन्यु चा रोल घेतो आणि बोलतो ...
हे सगळे बघून मी वैतागलो आणि बाबाना विचारले ... च्यायला हे सुरु कधी होणार युद्घ ?
बाबा म्हणाले "अरे हे असेच चालायचे ..... आमच्या टायमाला .... " (पुणेरी अर्जुन) .... पुढे बाबा जे बोलत होते तिकडे लक्ष्य गेले नाही कारण पंडवानी ३०% महिला आरक्षण नियमाचे उल्लंघन केले असे कोणीतरी ओरडत आले .... म्हणे पांडवामधे महिला नसून पुरुष लोक वेश परिवर्तन करून वावरत आहेत. माला पटकन बाबांच्या कपाळावर घाम फुटलेला दिसला. त्यानी गिरिधर काकांकडे (कृष्ण) पाहिले, ते नेहमीसारखे कुत्सित हसले आणि अचानक त्यानी मपा-गीता सांगायला सुरुवात केलि ....
च्यायला ... आता बसा माश्या मारत अजुन २-४ दिवस ....
बाबाना की त्यांच्या डमी ला ५-६ बायकांबरोबर पलायन करताना माझ्या डोळ्यानी हेरले ....
12 Apr 2012 - 6:19 pm | किचेन
यानी गिरिधर काकांकडे (कृष्ण) पाहिले, ते नेहमीसारखे कुत्सित हसले आणि अचानक त्यानी मपा-गीता सांगायला सुरुवात केलि ....
माझ्या पोटात कावळे कोकलायला लागले.मी मुदपाकखान्यात कि काय तिथे जाऊन बघितले तर गणपा मुख्य बल्लवाचार्य होते आणि पियुषा आणि मृणालिनी ह्या त्याना मदत (?) करत होत्या.स्वयंपाक खूपच लवकर होणार आहे हे जाणवल्याने मी रणांगणावर चक्कर टाकून परत इथे आलो तर बघतो काय....हे तिघे वपाडावला वडापाव बनवण्याची पाक्रु शिकवतायत.मी स्वत:च्या खिशातले १० रुपये खर्च करुन भैय्याकदुन पाणिपुरि खाल्लि.
12 Apr 2012 - 1:02 pm | यकु
च्यामारी येवढा ऐतिहासिक धागा सध्याच्या महाभारतमय वातावरणात खाली?
उप्पर खींचो, उप्पर खींचो!!!
पराशेठ, केवळ
_____/\_____ !!!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=))
12 Apr 2012 - 1:09 pm | प्यारे१
+१+१+१+१+१++++
पराशेठ, केवळ
_____/\_____ !!!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=))
आज की तारीख में ये सब अतिरथी महारथी कहाँ गायब हो गये है?
12 Apr 2012 - 5:02 pm | सुहास झेले
हा हा हा ... हसून हसून फुटलो. =)) =)) =))
धागा उपर खेचणाऱ्या यकुशेठचे विशेष आभार ;)