मिपाभारत
धिस पिक्चर इज जॉइंट प्रॉडक्शन ऑफ विप्र. खोपडा अॅंड परा थोपडा.
मुळ कथा : बाबा म्हाराज ठाणेकर
डायरेक्टर ,स्क्रिप्ट राईटींग : परा
एडीटींग : धम्मु (अतिरिक्त भार)
मुझी़क : विजूभौ सातारवी अँड प्रमोद देव
बॅ़ग्राउंड मुझीक : प्रमोद देव
फायनान्स : तात्या भयंकर
स्टार कास्ट : नेहेमीचे यशस्वी मिपाकर
पुनरपी मरणम पुनरपी जननम (पीत पीत जगणारे, आणि मरणारे) ह्या न्यायाने मिपाकर सुद्धा म्हाभारतातील युद्धात हजर होते.
बहुतेक सर्व पांडवांच्या पार्टीत होते. काही चपला घातलेले कौरवांच्या पार्टीत होते.
टारझन भीमाच्या बाजुला उभा होता. त्यामुळे लांबुन नेमका भीम कोणता हे ओळखु येत नव्हते.टारझन युद्ध सुरु व्हायची वाट बघत होता. त्याला एक ओळींचे धागे काढ्णार्या कौरव पार्टीतील सदस्यांचे भुस्काट पाडायची उत्सुकता होती.
रामदासाना स्टॉक संपल्यामुळे शिरस्त्राण मीळाले नव्हते. ते घरातले तांब्याचा भांड्याचा टोप घालुन आले होते.'धातु कोष' मदतीला बरोबर आणलेला होता.
विप्र. आणि अवलिया गळ्यात गळा घालुन टवाळक्या करत होते. नविन नियमानुसार हे आता सरकार मान्य होते.
अदितीतै आपली दुर्बीण अॅड्जेस्ट करत होत्या. संजयाला 'फीड्बॅक 'द्यायची जबाबदारी त्यांची होती.
सर्वबाजुंनी शंखनाद सुरु झाला, अचानक या सर्व शंखनादांवर कडी करणारा आवाज घुमला. बघतो तर काय, विजुभौ शंखाऐवजी एका रथात उभे राहुन बासरी फुंकत होते. त्यांची बासरी ऐकुन अर्जुनाच्या सारथी झालेल्या मुरलीधराने डोक्याला ताडकन हात मारुन घेतला.
एव्हड्यात सगळीकडे गदारोळ माजला. अर्जुन शस्त्र टाकुन युद्ध करणार नाही म्हणतोय अशी बातमी धडकली. पाठोपाठ अर्जुनाला शस्त्र उठवेना म्हणुन आद्य समुपदेशकांनी ' गिताग्रान' ची कॅप्सुल अर्जुनाला द्यायची ठरवले आहे अशी सबसे तेज बातमी आली.
"च्यायला आता ४ तासांची निश्चींती" रथांच्या ट्रॅफिक मधुन वैतागत कसातरी युद्धभुमीवर पोचलेला छोटा डॉन म्हणाला.
चतुरंगराव ताबडतोब बुद्धीबळाचा पट रथातुन काढुन भिडु शोधत हिंडु लागले. मुक्तसुनीत अलगद त्यांच्या तावडीत सापडले. रथाच्या मागेच त्यांचा डाव रंगला.
इकडे तात्या वेळ न घालवता दु:शासन, दुर्योधन, शकुनीला पकडुन युद्धाच्या आधी विमा काढणे किती गरजेचे आहे हे पटवुन द्यायला लागले. तिघेही महारथी झुंजारपणे तात्याला नकार देत नडत होते. शेवटी "काढायच तर काढा विमा नाहीतर गेलात बा***" असे ऐतीहासीक उदगार काढत तात्या पांडव पक्षाकडे वळले.
एका कोपर्यात भिष्म व धमाल मुलगा हे 'मुस्काटदाबी कशी होते व त्यावर काय उपाय करावेत' ह्यावर गहन चर्चा करत होते. बाजुनी जाता जाता हि चर्चा कानावर पडताच आनंदयात्री थबकले. "उच्चभ्रुंच्या नादी लागलात की अशीच फळे मिळणार" असा एक तीरकस शेरा ते जाता जाता मारायला विसरले नाहीत.
सखाराम गटणे पुर्ण कुरुक्षेत्रात हातात काहीतरी लाकडी यंत्र घेउन फिरत होते. प्रत्येक रथापाशी जाउन ते यंत्राकडे बघत व "ह्म्म्म्म हा कुंभोजवरुन आलाय, हा द्वारकेहुन आलाय, हा साला प्रॉक्सीवाला दिसतोय" असे काहीतरी अगम्य बडबडत होते.
दुर एका कोपर्यात राजे, युधीष्ठीर आणी शकुनी द्युत खेळत बसले होते. राजे आणी शकुनी हळुच एकमेकांना कसल्यातरी खाणाखुणा करत छद्मी हसत होते. युधीष्ठीराच्या अंगात आता फक्त धोतर उरलेले दिसत होते.
युद्धाला अजुन बर्याच वेळ असल्याने फावल्या वेळात टारोबा सूहास, मराठमोळा ह्यांना रथाची व्हिली करुन दाखवत होते. एका बाजुला निखिल देशपांडे घटोत्कचाला "तुला काय सांगु रे बॅचलर्सच्या अडचणी" असे काहीतरी हृदयद्रावक वर्णन करत होते.
कृपाचार्य आणी घाटपांडेकाका युद्धाच्या मुहुर्ताची काढलेली वेळ ह्यावर वादवीवाद करत बसले होते. दोघेही अनेक प्रकारचे दाखले देउन एकमेकांना उगाचच दमवत होते.
दुर एका झाडाखाली बसुन डॉ. दाढे एक खास आकाराच्या बाणावर काही प्रयोग करत होते. न राहवुन मी तिकडे धावलो. "डॉक डॉक हा कुठला बाण म्हणे ?" मी विचारले.
"परा लेका, हे मी नवीन 'दंतास्त्र' तयार केले आहे, ह्याचा वापर केला की एक अक्षौहिणी विरुद्ध सेनेचे पुढचे २/२ दात आणी डावीकडची एक दाढ पडते" डॉक्टर अभिमानानी वदले.
"नदीच्या किनार्यावर भडकमकर मास्तर १०००/२००० सैनीकांना जमवुन काहीतरी करताना दिसले. अधीक चौकशी करता मास्तर त्यांना "शॉर्ट टर्म रथी, महारथी कोर्स" बद्दल शिकवत असल्याचे कळले.
बाजुलाच प्रा. डॉ. बिरुटे कौरव पांडव सैन्यातील १८ वर्षाखालील तरुणांना एकत्र जमवुन व्याकरणाचे धडे गिरवत होते. हे भिष्मांच्या आज्ञेने होत असल्याने तरुण वर्ग चडफडत गप्प शिकत होता.
एका रथात बसुन प्रमोद देव काका आणी धनंजय शंखाच्या वेगवेगळ्या नादांवरती वाद विवाद करत होते. शंखवाणी श्रेष्ठ का शंखताल ह्यावर दोघांची जुंपली होती.
"एका एरियात दोन सिंह जसे राहात नाहीत तसेच एकाच एरियात दोन समुपदेशक राहु शकत नाहीत ह्या नियमानुसार विप्र मास्तरांनी निघुन जावे" ह्या साठी एका बाजुला अवलियाचा जोरदार प्रयत्न चालु होता.
"पण मास्तर समुपदेशक आहेत ह्याला पुरावा काय?" मी सुद्धा आता त्या वादात उडी मारली.
येव्हड्यात बाजुला जोरदार गलका ऐकु आला. तात्यानी कोणाचा तरी रथ हायजॅक केला होता म्हणे. शेवटी दुबईवर्तातील शेख बिका ह्यांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. ह्या शेख बिकांना दुबईमातेकडुन एक दैवी उंट मिळाला होता. ज्यावर बसुन ते कधी ह्या देशात तर कधी एकदम त्या देशात प्रकट होत असत.
एका कोपर्यात ब्रिटीश टिंग्या एकटाच बसला होता. तो पांडवांकडचा आहे असे कौरव पक्षाचे ठाम मत होते तर तो कौरव धार्जीणा आहे हे पांडव पक्षाचे. टिंग्या आपण नक्की कोणत्या पक्षाचे आहोत ह्याबद्दल विचार करत बसला होता.
"पालथे धंदे बंद केल्याशीवाय ह्यावर उपाय सापडणे कठीण आहे" श्रावण मोडक टिंग्याला उपदेश करत म्हणाले.
"पण काय हो श्रावण काका, तुम्ही कोणत्या पार्टीचे ?" टिंग्याने पृच्छा केली.
"हॅ हॅ हॅ चपला घाला आणी चालु पडा" श्रा मों चे एका वाक्यात उत्तर.
"कृष्ण देव आहे का ? नक्की देव म्हणजे काय ? त्याच्यावर काही संस्कार आहेत का ?" ह्यावर छोटा डॉन व आनंदयात्री ह्यांचा खल चालला होता.
तेव्हड्यात एका कोपर्यात "झेंड्याची धोतरे नेसणार्या प्रत्येकाला मी या युद्धात वधणार" अशी अॅडी जोशीनी प्रतिज्ञा केली आहे अशी कुजबुज कानावर पडली. आम्ही ताडकन उठलो आणी धोतर बदलायला धावलो.
(ह्या चित्रपटाच्या कथेत अजुन कोणाला भर घालायची असल्यास स्वागतच आहे.)
वाचन
16552
प्रतिक्रिया
57