खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम! त्यामूळे शीर्षकही तसेच घेतले.मधमाशांना कायमस्वरुपी पुरुषांची गरज नाही त्यामुळे त्यांना घराबाहेर हाकलले जाते किंवा ठार मारले जाते.आजच्या जगात स्त्रि स्वातंत्र्याचे वारे खुप जोरात आहे त्यामूळे संसारात पुरुषांची गरज कमीच उरलीय हे खरच.त्यांच्यावरही हिच वेळ येत आहे.(प्रत्येक घरातील परीस्थिती वेगवेगळी असते,काही पुरुष मुलतः वाईटही असतात.) कारण शेतकरयांच्या आत्महत्येपेक्षा स्त्रियांच्या आत्महत्या जास्त आहेत व स्त्तियांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्या जास्त आहेत.(कौटुंबिक कारणामुळे.) ( भारत सरकारच्या आकडेवारीप्रमाणे, १ महिन्यापुर्वीची ). घरात अतिशय किरकोळ कारणांवरुन प्रचंड मोठी भांडणे होत आहेत.त्याचा परिणाम लहान मुलांवर होत आहेत.खास करुन घरातील लहान मुलगीही खुपच AGGRESSIVE होत आहे व ती सुध्दा आईचीच बाजु घेतांना दिसते.माझ्यासमोर अशी अनेक उदाहरणे आहेत.त्यामुळे पुरुषांना घरात रहाणे अवघड होते व त्याची भावनिक गरज पुर्ण होत नसल्याने,मानसिक आधार स्त्रियांपेक्षा कमी असल्याने (बर्याच केसेसमध्ये त्याचे माहेर तुटलेले असते), खुलेआम रडता येत नसल्याने,त्याचे मानसिक खच्चीकरण होते व तो मग दारु,जुगार्,दुसरी बाई, घ्ररात चिडचिड्,मारहाण (प्रत्येक पुरुषाची Reaction वेगवेगळी असते.) किंवा इतर वाईट गोष्टींना बळी पडतो व दुसरीकडुन बघा तो दारु पितो असाही प्रचार होतो व शेवटी तोच बदनाम होतो. व गोष्टी हाताबाहेर जायला लागतात.त्यामुळे आता भारतीय कायदेसुध्दा पुरुषांच्या बाजुने होत आहेत.नुकतेच काही निकाल पुरुषांच्या बाजुने लागले आहेत.पुरुषांविरुध्द अनेक खोट्या केसेस दाखल झाल्या आहेत असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले आहे.
पूरुषांबरोबरच त्याच्यातील बापालाही मारले जातेय जे मुलांच्या द्रुष्टीने खुपच घातक आहे.त्यालाही Emotional Blackmailing केले जाते. (नवराबायकोच्या भांडणात मुलांना गुंतवले जाते.) आईचे कष्ट घरात मुलांच्यासमोर होतात व बापाचे कष्ट मुलांच्या डोळ्याआड घराबाहेर होतात त्यामुळे मुलांपर्यंत हे कष्ट पोहोचत नाहीत.पुरुषामधल्या खर्या बापाची गरज आहे कि त्याने कमवलेल्या पैशांची? त्यामुळे Save Father ! Save Family !! असे म्हणण्याची गरज आहे.त्यामुळे बाप या मुद्द्यावरही चर्चा झाली पाहिजे.
प्रतिक्रिया
10 Sep 2016 - 6:52 pm | जेपी
सुद्दलेखनामुळे लेख नीट कळला नाही.
.
.
पण save father !save family !!
आवडल.
बाप एकतर खंबीर असावा.बाप खंबीर नसणे मुलांसाठी वाईट.
त्यापेक्षा अनाथ लेबल लागलेली मुल चांगली प्रगती करतात.
10 Sep 2016 - 7:13 pm | अभ्या..
फारच सुंदर विषय मांडला आहात तुम्ही,
म्हणजे कसय ना, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी जी काही दु:खे असतात त्याला वाचा फोडायचे जे काही दुश्प्राप्य काम असते, त्याला तुम्ही ज्या नेटाने हात घातलाय ते खरोखरच तारीफे काबिल आहे. अशा गोष्टींची तात्काळ तड लावणे गरजेचे असते पण भिजत घोंगडे ठेवायची जी आपली पूर्वापार परंपरा चालत आली आहे त्यामुळे ह्या समस्येला चिघळत राहण्याशिवाय काही मार्ग राहिला नाहीये. शेवटी हक्क आरक्षण नावाची काही चीज असते राव. किती दिवस असे दिवाभीतासारखे जगायचे? मी तर म्हणतो होउद्या एल्गार. पेटवा आपल्या आयुष्याच्या मशाली. तुमचा हा लेख म्हणजे एक ठिणगी आहे. त्याचा वडवानल बनवण्याची जबाबदारी येणार्या पिढीची आहे. ती तयार करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. चला, त्या पवित्र कामाची सुरुवात करुया.
10 Sep 2016 - 7:52 pm | नर्मदेतला गोटा
कमेंटची पोस्ट करण्याचा हा फेसबुकी प्रकार आहे.
पण
यात नेमके मुद्दे किंवा चिंतन यायला हवे होते. अधिक वेळ घेतलात तर योग्य ती भर घालता येइल