मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे.
१. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल :
पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले. 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' ची लक्षणे माझ्यात दिसत होती, आणि वर्षानुवर्षे 'फिस्टुला' च्या वेदना मी भोगत होतो. फिस्टुलावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याचे सर्जनने सांगितले, परंतु जालावर हुडकता शस्त्रक्रिया करून सुद्धा पुन्हा फिस्टुला उद्भवतो असे समजले. अॅलोपाथीची औषधे घेणे मला कधीच भावत नसल्याने आता करावे तरी काय, हेच कळेनासे झाले. पूर्वी नियमित व्यायाम करायचो, तोही आळस आणि निरुत्साहामुळे बंद झाला. गोड, तळकट खाणे सोडवले जात नव्हते. अतिशय निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली होती.
रेक्झीन च्या खुर्चीवर बसल्याने, सिंथेटिक कापडाची विजार घातल्याने, कॉफी प्यायल्याने लगेच फ़िस्टुला होतो हे लक्षात आल्यावर कॉफी पूर्ण बंद केली, सुती पटलूण घालू लागलो, आणि सिनेमाला जातानासुद्धा बुडाखाली ठेवायला सुती बस्कुर नेऊ लागलो. या उपायांनी फिस्टुला होण्याचे प्रमाण जरा कमी झाले खरे, परंतु पुढे मूळव्याधीने पण मला ग्रासले. --- आता मात्र माझी पाचावर धारण बसली. जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे "मै अपनी जिंदगीसे तंग आ चुका था… मेरी बीवी मुझसे नफरत करने लगे थी " --- असे झालेले होते, पण ... " फिर एक दिन मुझे पिंटो मिला, उसने मुझे xxxxx के बारे मे बताया" ... असे मात्र काही घडून येत नव्हते.
२. आशेचा किरण :
अश्या परिस्थितीत २०१४ च्या जुलै महिन्यात अमेरिकेत येऊन पहुचलो. मुलाचे घर पहिल्या मजल्यावर होते, तो एक जिना चढायलाही मला जड जात होते. आलो, त्याच दिवशी मुलाने ' Fat, Sick and Nearly Dead' हा सिनेमा दाखवला आणि त्यात दाखवल्याप्रमाणे आपण सर्वजण एक आठवडा फक्त भाज्या-फ़ळांचा रस घेऊन राहूया, असा प्रस्ताव मांडला. मला आणि पत्नीला ही कल्पना अशक्य कोटीतील वाटली. नुसत्या रसाने पोट कसे भरणार ? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटे, दूध-तूप वगैरेंशिवाय शक्ती कशी राहणार ? एक दिवस सुद्धा जेवणात पोळी नसेल तर आपण त्रस्त होतो, सात दिवस कसे काढणार ? वगैरे शंका होत्या, पण मुलगा एवढे म्हणतो आहे तर करून बघू, झाला तर फायदाच होईल, अगदी रहावले गेले नाही तर खाऊया काहीतरी, असा विचार करून आम्ही संमती दिली.
३. रस-आहारावर वीस दिवस आणि 'काळ-सर्प वियोग'
मग लगेचच बाजारात जाऊन ज्यूसर खरेदी केला आणि काकडी, हिरवी सिमला मिर्च, दुधी भोपळा, पालक, पोदिना, सेलरी, केल वगैरे हिरव्या भाज्या, हिरवी (ग्रॅनी स्मिथ) सफ़रचंदे, पिवळी-लाल सिमला मिर्च, गाजरे, संत्री, टमाटर, ग्रेपफ़्रूट, बीटरूट, लाल सफ़रचंदे, अननस, कलिंगड, वगैरे लाल-पिवळ्या भाज्या आणि फळे, आले, ओली हळद, लिंबू असे सर्व सामान नीट धुवून फ्रिज मध्ये ठेऊन सज्ज झालो.
दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले.
.
रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो.
रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्या-तिसर्या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते.
पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले...
.
सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला.
अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले.
४. यानंतरचा काळ :
भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो.
ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले.
ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला.
कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत.
http://www.rebootwithjoe.com
Fat Sick and Nearly Dead:
https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8
प्रतिक्रिया
23 Oct 2015 - 11:29 am | विटेकर
हे सारे इथे , भारतात . पुण्यात राहून , सुट्टी न घेता , भारतभर कंपनीच्या कामासाठी भटकत असताना ही शक्य झाले !
23 Oct 2015 - 11:36 am | विटेकर
तुमचा ज्युसर कोणता आहे ? सेन्त्रीफ्युगल ज्युसर असेल तर काही पोषक द्रव्ये नाश होऊ शक्तात उष्णतेमुळे !
ज्युसर स्लो हवा , आणि दाबून ( बारिक तुकडे करून फिरवून नव्हे ) रस काढणारा हवा, स्लो असल्यामुळे गरम होत नाही आणि सारी पोषक मूल्ये अबाधित राहतात असा माझा अनुभव आहे !
शक्यतो रसाहारासाठी मिक्सर वापरू नये, पण ज्युसर नाही म्हणून रसाहार विनाकारण पुढे पुढे ढकलू नये !
समथिन्ग इज बेटर द्यान अजिबात नथिन्ग !
मिक्सर वापरल्यास रस गाळूनच प्यावा .. अजिबात तंतू / मगज असू नयेत.
23 Oct 2015 - 9:04 pm | चित्रगुप्त
सध्या तरी सेंट्रिफ्युगलच आहे, परंतु आता नवा घेतेवेळी पूर्ण माहिती मिळवून घेईन.
जेंव्हा आपण फक्त जूसिंगवर असतो, तेंव्हा त्यात अजिबात तंतू नसावेत. याचे कारण जो क्रॉस यांनी चांगले सांगितले आहे.
@ विटेकर साहेबः तुम्ही आठवड्यातून एक दिवस जूस घेता, तेंव्हा इतर दिवशी आहार काय काय, किती असतो ?
कोल्ड प्रेस जूसरने काढलेला रस गाळावा लागतो का ?
23 Oct 2015 - 12:53 pm | द-बाहुबली
एका आयुर्वेदीक माणसाला विचारले तो म्हटला हे एक प्रकारचे लंघनच आहे, पौष्टीक लंघन. सलग ३ पेक्षा जास्त दिवस करु नकोस. हे चालु असताना विशेषतः नेहमीचे व्यायाम अजिबात करु नकोस. ३ दिवस नंतर आहार हळु हळु वाढ अन्यथा पोट अजुन सुटेल. सगळा गोंधळ झालाय माहितीचा डोक्यात.
23 Oct 2015 - 3:06 pm | कवितानागेश
एकन्दरीत पाहता आधी मनाचाच निग्रह महत्त्वाचा, हे दिसतय मग सगळे उपाय लागू होतील.
कधी जमणार कुणास ठाऊक?
(गुलाबजाम खात प्रतिसाद देणारी ) आळशी माउ ;-);-)
24 Oct 2015 - 6:43 am | बाजीगर
जे तुम्ही लिहिलयं तसं व्हावं अशी तुमची ईच्छा असावी.ती फिल्म पाहून/ तसं लेख वाचून तुम्हाला तसं व्हावं अस वाटलं असेल,पण तसं होणं शक्य नाही.पॅथालाॅजीक रिपोर्ट दाखवा.आंतरजाल वरचे फोटो दाखवून असेच झाले होते म्हणने ठीक नाही.
24 Oct 2015 - 9:57 am | तर्राट जोकर
क्यूं भई... फेमस होणा चाहते हो? ३० सेकंड्स ऑफ फेम..?
24 Oct 2015 - 10:46 am | चित्रगुप्त
बाजीगरपंत, इथे मी काही सिद्ध करण्यासाठी आलेलो नाही , ज्याला करायचे असेल त्याने करून बघावे, नसेल त्याने सोडून द्यावे . मी जे काल्पनिक लिखाण करतो, त्यात तसे स्पष्ट सांगतो. आपल्याला झाला तसा लाभ इतरांना व्हावा या कळकळीतून हे लिखाण केले.
24 Oct 2015 - 11:05 am | मार्मिक गोडसे
ह्या थेरेपीनंतर किडकिडीत नसणार्या व्यक्तींचेच वजन हे नको असलेले पाहुणे बाहेर पडल्यावर कमी का होते? असा माझा प्रश्न होता.
ह्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या तपासण्या असतात ज्या तुम्ही केल्या नाहीत. ठिक आहे.
हे गंभीर आहे. मांस व्यवस्थीत न शिजवता खाल्याने टेपवर्मचे इन्फेक्शन होते.
टेपवर्मचा मोठा तुकडा विष्ठेत आढळला ह्याचा अर्थ तो संपुर्ण बाहेर पडला असा होत नाही. त्याचा तोंडाचा भाग शरिरात असु शकतो व त्याच्या तुटलेल्या शरिराची पुन्हा वाढ होत असते. टेपवर्मची अंडी साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत, त्यामुळे विष्ठा प्रयोगशाळेत तपासणे हे योग्य राहील.
24 Oct 2015 - 12:26 pm | चित्रगुप्त
धन्यवाद . मुलाला सांगतो तसे.
6 Nov 2015 - 10:00 am | मार्मिक गोडसे
मेंदूत टेपवर्म
6 Nov 2015 - 11:16 am | सुबोध खरे
मेन्दुत टेपवर्म बर्याच वेळेस दिसुन येतो. फिट्स येण्याचे ते एक मह्त्त्वाचे कारण आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Cysticercosis
https://en.wikipedia.org/wiki/Neurocysticercosis
वर दिलेलं जरा जास्त सनसनाटी आहे.
असो
25 Oct 2015 - 3:50 am | जयन्त बा शिम्पि
मोठ्या आतड्यातील, लहान आतड्यातील मळ बाहेर काढण्यासाठी अतिशय सोपी पद्धत म्हणजे " लघू शंख प्रक्षालन " . विषेशतः बध्ह्कोष्टता व मलावरोध याचा ज्यांना त्रास होतो त्यांचेसाठी सोपी आहे. ज्यांना अधिक माहिती हवी त्यांनी व्यनि करावा.
25 Oct 2015 - 7:21 am | चित्रगुप्त
लघू शंख प्रक्षालन -- याबद्दल माहिती कृपया इथे धाग्यावर दिली तर उत्तमच .
25 Oct 2015 - 10:23 am | मार्मिक गोडसे
लघू शंख प्रक्षालन
25 Oct 2015 - 7:53 am | श्रीकृष्ण सामंत
ज्यूस नको,ज्युसर नको,रंगीबेरंगी फळं नको,रंगीबेरंगी भाज्या नको.
कुणाला आपल्यापासून त्रास नाही.कुणाचे आपल्यावर उपकार नाहीत.आमचाच आम्ही पितो तुमचा काय जातां?
फक्त सकाळी उठल्यावर मोरारजी देसाई करायचे ते करावं.आणि शंभर (१००) वर्ष जगावं.
टीप-मी मात्र हा प्रयोग केलेला नाही.मी रोज घेतो ब्राम्हणी जेवण-वरण,भात,तूप,लिंबाची फोड,थोडं मीठ आणि एक कुठचीही भाजी हा आहार घेऊन अजून ८२ वर्षाचा तरूण आहे.वजन आटोक्यात आहे.
Morarji Desai (29 February 1896 – 10 April 1995)
Advocate of urine therapy
In 1978, Prime Minister Morarji Desai, a longtime practitioner of "urine therapy," spoke to Dan Rather on 60 Minutes about the benefits of drinking urine.[17][18]
https://en.wikipedia.org/wiki/Urine_therapy--- युरीन थेरपीबद्द्ल
25 Oct 2015 - 7:30 pm | पाषाणभेद
शरीर शुद्धीसाठी स्वच्छ कापड गिळतात या क्रियेला काय म्हणतात?
25 Oct 2015 - 8:26 pm | चित्रगुप्त
धौती क्रिया ?? या प्रकारे बाहेरून घातलेले कापड वगैरे अन्ननलिका आणि पोटात कोठ्यापर्यंत पोहोचत असावे. संपूर्ण पचनसंस्थेची, लहान आणि मोठ्या आतड्याची स्वच्छता होते का? मूळव्याधीसारखे विकार दूर होतात का?
रसाहारात बहुतांश पाणी आणि जरूरीपुरती पोषकद्रव्ये घेऊन पचनसंस्थेला विश्रांती/अवसर मिळत असल्याने ती कित्येक वर्षांचे पेंडिंग काम - अर्थात आतड्यात साचून राहिलेली घाण बाहेर काढते, त्याने अनेक प्रकारच्या व्याधि दूर होऊन शरीर निरामय होते. अन्नाचा 'सुकाळ' आणि 'दुष्काळ' या दोन वेगवेगळ्या परिस्थितीत शरीर वेगवेगळ्या रीतीने काम करत असते. इथे आपण तात्पुरता कृत्रीम दुष्काळ निर्मित करत आहोत, असे समजू शकतो. यामुळे शरीरात जागोजागी साठलेली चरबी उपयोगात घेतली जाऊन वजनही कमी होते.
नवरात्रीत काही लोक नऊ दिवस केवळ लिंबूपाणी घेऊन असतात. असे कोणी मिपावर आहेत का ? त्याचा काय परिणाम शरीरावर दिसून येतो ?
25 Oct 2015 - 9:59 pm | रेवती
वस्त्र धौती म्हणतात. शिवाय वासंतिक वमन शिबीर असते. त्याचे वर्णन ऐकून मला मळमळायला लागते. पण तो उपचार म्हणून चांगला असावा. मी करून पाहिलेला नाही.
27 Oct 2015 - 4:54 pm | चित्रगुप्त
वाढलेल्या पोटाबद्दल डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा व्हिडियो:
(हा शवविच्छेदनाचा व्हिडियो आहे. सुरुवातीला बघताना कसेसेच वाटले, परंतु चिकाटीने बघितला).
Where does abdominal fat accumulate? (Dissection)
https://www.youtube.com/watch?v=Bav_IBsuXEM&index=1&list=PL4UUvGPFS01mkT...
या चरबीचा होणारा दुष्परिणामः
https://www.youtube.com/watch?v=8ij3k50-C28&index=4&list=PL4UUvGPFS01mkT...
30 Oct 2015 - 12:28 am | रेवती
शवविच्छेदनाचा व्हिडिओ बघितला जाईल असे वाटत नाही पण दुसरा पाहते.
7 Nov 2015 - 12:45 pm | सिरुसेरि
हल्ली अनेक आयुर्वेदिक औषधे मिळतात - उदाहरणार्थ - कायम चुर्ण , धौती योग इत्यादी . हि आयुर्वेदिक औषधे शरीरातील जंतु बाहेर काढण्यासाठी परिणामकारक ठरु शकतात ?
4 Nov 2016 - 11:38 am | सुबोध खरे
साहेब
आपल्या पोटात असलेल्या जंतांच्या तोंडात आकडे (हुक) असतात. ज्याने ते आपल्या आतड्याला घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे गंधर्वहरितकी किंवा कायम चूर्ण सारखी रेचके जंतांना आतड्याबाहेर काढू शकत नाहीत. अलबेंडाझॉल सारखी औषधे मानवी शरीरात शोषली जात नाहीत. पण ती जंतांनी खालीही कि त्यांना लकवा मारतो(paralysis). त्यामुळे ते आतड्याना पकडून राहू शकत नाहीत आणि दुसऱ्या दिवशी शौचाचे वाटे पडून जातात.
7 Nov 2015 - 1:09 pm | वामन देशमुख
माझाही अनुभवही सांगतो.
वय ३८ वर्षे, पुरुष, अथलेटिक शरीर. खाण्या-पिण्याची आवड आहे. २० वर्षांपासून तंबाखू खातो.
मी आठवड्यातून किमान चार दिवस, ६-८ किमी पायी चालतो आणि हलका व्यायाम करतो.
मागच्या वर्ष-दीडवर्षापासून माझे पोट सुटायला सुरुवात झालीय. हे थोडे विचित्र वाटेल, पण माझ्या पोटावर फारशी चरबी नाहीय आणि माझे पोट एखाद्या फुग्याप्रमाणे फुगलेले वाटते आणि त्या तुलनेत हातपाय बारीक होत आहेत असे वाटते आणि जाणवते. माझी मुळची ३१ इंच कंबर आता ३३ इंच झालीय आणि जुन्या प्यांटी घालता येत नाहीत. माझी मेहनत, व्यायाम, सराव चालणे, पळणे, जॉगिंग इ. करण्याची तयारी आहे आणि करतही आलेलो आहे. पण अश्यात थोडा उत्साह कमी झाला आहे असे वाटते.
सारखे फुगलेल्या पोटाकडेच लक्ष लागून राहते. आणि मूळ पातळ पोट परत आणण्यासाठी काय करावे लागेल असे वाटत राहते.
विस्कळीत प्रतीसादाबद्धल क्षमस्व.
2 Nov 2016 - 6:47 pm | मोदक
दिवाळीपूर्वीच्या आठवड्यात ज्युसींगचा एक अयशस्वी प्रयोग केला.
दिवसाच्या सुरूवातीला लिंबू पाणी, नंतर एक ग्लास गाजर ज्यूस.
दुपारी जेवणाच्या वेळी एक ग्लास गाजर ज्यूस आणि एक ग्लास बीटचे ज्यूस.
दुपारी पाणी.
संध्याकाळी एक मोठा बाऊल भरून पाया सूप सारखे एक मटण सूप.
रात्री २ ग्लास टोमॅटो ज्यूस.
पुन्हा भूक लागली म्हणून थोडा दहीभात. (बहुदा घन पदार्थाची भूक लागली असावी)
दुसर्या दिवशी कसेबसे ज्यूस वर दिवस ढकलला पण संध्याकाळी अन्नाची जबरदस्त इच्छा झाली. इतकी की तोंडाला पाणी सुटू लागले आणि कानात अक्षरशः कोंबड्यांचे पक पक आवाज येवू लागले.
..मग ज्यूसिंगला बासनात गुंडाळले आणि एक चिकन बिर्याणी उडवली. :(
आता पुढील प्रयोग आणखी थोडा सावधगिरीने आणि नेटाने करेन.
2 Nov 2016 - 7:21 pm | राघवेंद्र
मोदक भाऊ ( दादा),
ज्यूसिंग च्या प्रयोगाबद्दल सहमत. सकाळी ज्यूस घेतले, दुपारी सलाड आणि संध्याकाळ पर्यंत गाडी नॉर्मल जेवण्यावर घसरते.
2 Nov 2016 - 7:25 pm | मोदक
दादा म्हणू नका हो.. ते सायकलवाले सगळे जण दादा म्हणून मजा घेतात. :(
मी सायकलवरून कासारसाई धरणावर जात असलो म्हणून लगेच काय दादा म्हणायचे....
2 Nov 2016 - 11:54 pm | पिलीयन रायडर
=))
दादा..जमत नाही तय भानगडीत कशाला पडता... दादा!
4 Nov 2016 - 10:35 am | नाखु
मोदक दादा.
अता दाद कुठे मागू मी मधला नाखु
3 Nov 2016 - 12:52 am | चित्रगुप्त
एकदम पूर्ण जूसिंगवर घसरण्यापेक्षा आधी फक्त एकदा वा दोनदा जूस पिणे सुरु करावे, शिवाय नारळपाणी, लिंबूपाणीही एक दोनदा घ्यावे. बाकी आहार रोजचाच घ्यावा. नंतर आहाराचे प्रमाण थोडे कमी करत जूसचे वाढवावे. जूसची गोडी आणि सवय लागल्यावर पाच-सात दिवस (सुट्टी घेता आली तर उत्तमच) संपूर्ण जूसिंग करावे, म्हणीजे बरे.
या लेखात टाकलेले फोटो (विशेषतः पोटातील घाण आणि तंतुमय पदार्थ) मी घेतलेले नसून साधारणपणे त्याप्रकारचे जे फोटो जालावर मिळाले, ते टाकले आहेत, कारण प्रत्यक्ष जूसिंग करताना पुढे त्यातून एवढा अद्भुत फायदा मिळेल याची सुतराम कल्पना नव्हती, त्यामुळे फोटो घेण्याचे सुचलेही नाही.
3 Nov 2016 - 12:42 pm | मोदक
धन्यवाद.. असा प्रयत्न करतो आता.
बाकी फोटो घेतले नाहीत ते चांगले झाले. :p
3 Nov 2016 - 11:45 am | दीपक११७७
उत्तम लेख.
नियमित पणे पोट साफ करण्याचे चुर्ण
घेतल्याने आतड्यात कीडे होणार नाहीत
असा मझा समज आहे.
कॄपया मार्गदर्शन व्हावे.
धन्यवाद
3 Nov 2016 - 1:01 pm | दीपक११७७
मला वाटते ८ तास तोड बन्द असल्याने जे विष लळेत जमा होते,
ते अपलेच असल्याने आपल्या शरिरास घातक नसते ते सकाळी पण्याद्वारे
शरीरात पसरते आणि toxins व अनावश्यक पदार्थ बाहेर फेकायला मदत करते,
4 Nov 2016 - 12:18 pm | सुबोध खरे
विष हे आपलं किंवा परक्याचं ते विषच असतं. तेंव्हा सकाळी उठल्यावर प्रथम तोंड धुवून साफ करावे( कोणतीही टूथ पेस्ट पावडर वापरून खळखळून चूल भरणे आवश्यक आहे.) आणि मगच जे जे काही खायचे / प्यायचे आहे ते खावे/ प्यावे. बेड टी हि इंग्रजी संकल्पना अत्यंत भंपक आहे.
लकवा इ आजाराच्या रुग्णांच्या तोंडाला वास येतो याचे कारण लाळेतील प्रथिनांचे जंतू द्वारे विघटन होते म्हणून.
5 Nov 2016 - 5:11 am | चित्रगुप्त
@ दीपक११७७
पाचक चूर्णाबद्दल मला ठाऊक नाही कारण मी ते वापरत नाही. परंतु पोटात कृमि वगैरे असतील तर डॉ. खरे यांनी लिहीलेली १ गोळी घेणे योग्य. मुळात पचन नेहमी ठीक रहावे म्हणून चूर्ण वगैरेंपेक्षा आहाराची निवड, मात्रा, वेळा, वगैरेंविषयी नेहमी सजगततेने वागणे आवश्यक. तसेच चालणे, वगैरे व्यायामही आवश्यक.
4 Nov 2016 - 12:31 pm | सुबोध खरे
गोगलगायीच्या पाठीवर कासव बसल्यामुळे तिची गती जितकी असेल तितक्या गतीने हा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व.
६. चरबी विषयी: मुळात जास्तीची चरबी शरिरात निर्माण कशी होते, आणि पोटावर तिचे थर का निर्माण होतात ? तूप वगैरे चरबीयुक्त जिन्नस अजिबात घेतले नाहीत, परंतु अन्य पदार्थ प्रमाणाबाहेर खाण्यानेही चरबी साठत जाते का?
८. मांड्यांवर आणि नितंबांवर वगैरे 'सेल्युलाईट' जे जमा होते, ती चरबीच असते की आणखी काही? ते कमी करता येते का? कसे ?
आपण खाल्लेल्या नऊ कॅलरी चे रूपांतर एक ग्रॅम चरबीत होते. मग या कॅलरी तुम्ही कोणत्याही स्वरूपात घ्या. संपूर्ण भात/ बटाटा/साबुदाणा इ फक्त कर्बोदके असलेले पदार्थ एक थेम्ब सुद्धा तूप न घेता खाल्लेत तरी अतिरिक्त कॅलरीचे चरबीत रूपांतर होते. याचे थर पुरुषांच्या बाबतीत प्रथम पोटावर आणि बायकांच्या बाबतीत प्रथम नितम्ब आणि कंबरेवर जमा होतात. सेल्युलाइट म्हणजे चरबीच पण गोळे गोळे या स्वरूपात त्वचेच्या खाली जमा होता असलेली.
कर्बोदके, प्रथिने आणि चरबी/ तेल युक्त पदार्थ यांचे एकमेकात सहज रूपांतर होते. पण अतिरिक्त कर्बोदके आणि प्रथिने पण चरबीच्याच स्वरूपात साठवली जातात.
चर्बीतही 'चांगली चरबी' आणि 'वाईट चरबी' असे काही असते का?
चावला तर नाग चांगला कि मण्यार किंवा घोणस असा हा प्रश्न आहे.
७. 'सूज' मह्णजे नेमका काय पदार्थ असतो? सूज कश्यामुळे येते आणि कमी होते ? सूज अपायकारक असते की उपकारक ?
सूज म्हणजे शरीराच्या कोणत्याही अवयवाला हानी पोहोचण्यामुळे तेथील उती (TISSUE) फुगून येतात त्याला सूज म्हणतात. मग यात स्नायू ना मुका मर असो कि हाड मोडणे असो किंवा त्वचेला भाजणे असो. सूज आली याचा अर्थ आपल्या शरीराची हानी झाली आहे आणि ती भरून काढण्यासाठी शरीर तेथे जास्त रक्त पुरवठा करीत आहे. यात शरीराची हानी हि अपायकारक आहे आणि सूज हि हा अपाय भरून काढण्यासाठी शरीराची प्रतिक्रिया आहे.
९. जिला आयुर्वेदात 'आम' वा 'आव' म्हणतात तो पदार्थ शरीरात कसा निर्माण होतो, आणि कुठे कुठे साठतो? त्याचे परिणाम ?
आयुर्वेदाची मला काडीइतकीही माहिती नाही त्यामुळे या प्रश्नाला "पास"
5 Nov 2016 - 5:21 am | चित्रगुप्त
आभार डॉक्टर साहेब. आणखी एक प्रश्न म्हणजे 'सप्लिमेंट्स' म्हणून मिळणारी औषधे कुणी, केंव्हा, कश्यासाठी घेणे योग्य्/आवश्यक असते ? की नसतेच? आपल्याला त्याची गरज आहे वा नाही हे कसे ओळखावे ?
माझ्या परिचिताना त्यांच्या ऑफिसातून दिवाळी का केंव्हातरी अश्या गोळ्यांचे एक मोठे खोकेच मिळाले होते, त्यांनी त्यातील स्वतः एकही न घेता सर्व पुडकी वाटून टाकली. मला मिळालेले बरेच दिवस पडून होते, नंतर बहुतेक ते फेकले. कारण इंग्रजांनी आधी लोकांना चहा फुकट वाटून सवय लावली, तसा हा औषध कंपन्यांचा उद्योग असावा, असे वाटले होते.
5 Nov 2016 - 9:03 pm | विजुभाऊ
भाज्या / पदार्थ द्रव अवस्थेत प्यायले काय आणि घन अवस्थेत घेतले तर कसा फरक पडेल हे अजूनही समजले नाहिय्ये
6 Nov 2016 - 2:27 am | चित्रगुप्त
यावर पुष्कळ वर्षांमागे झालेल्या प्रयोगांविषयी कार्यक्रम डिस्कव्हरी का कशावरतरी बघितला होता. तेच पदार्थ पण द्रवरूपात घेतले तर जास्त वेळ पर्यंत भूक लागत नाही, असा निष्कर्ष त्या प्रयोगांचा होता. तस्मात ज्यांना वजन कमी करण्यासाठी कमी खाणे असेल, त्यांच्यासाठी उपयोगी आहे.
आपले मिपाकर समीर शेलार यांनी मागे पाताळेश्वर कट्ट्यात माझ्याकडून जूसिंगची माहिती कळल्यावर तो प्रयोग करून सुमारे सहा महिन्यात सतरा किलो वजन कमी केले. याखेरीज अपचन, अॅसिडिटीचा त्रास संपून स्फूर्ती, चपळता वगैरेत खूप वाढ होऊन उगाच जास्त खाण्याची सवय संपली असल्याचे परवाच सांगितले. त्यांना संपर्क केल्यास त्यांनी नेमके काय काय केले, याची माहिती देतील.फोन नं. साठी मला व्यनि करावा.
6 Nov 2016 - 9:44 am | संदीप डांगे
अरे वा! अभिनंदन त्यांचे!!
6 Nov 2016 - 10:36 am | यशोधरा
अरे वा! मग त्यांना ह्याच धाग्यावर माहिती द्यायला उद्युक्त करा ना.
5 Jan 2019 - 6:43 pm | खिलजि
हा पण लेख मस्तंय ,,, बोले तो एकदम ज्ञानवर्धक
28 Jan 2023 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व लेख प्रतिसाद वाचून काढले. वजनावर प्रयोग करायचे आहेत.
धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
28 Jan 2023 - 5:27 pm | चित्रगुप्त
@ प्रा.डॉ. बिरूटे: आपल्या शरीरात 'फाजील' चरबी किती आहे, हे सांगणारी एक चाचणी असते. तिचे नाव विसरलो. मी पूर्वी एकदा करवून घेतली होती. यात एका विशिष्ट ठिकाणी (यंत्रावर ?) दहा-बारा मिनीटे फक्त उभे रहायचे असते. रक्त-मूत्र वगैरे काही नाही. 'फाजील' चरबी किती आहे, हे यातून समजले, की तेवढीच चरबी कमी करायला नेमके काय करावे हे ठरवता येईल. करून घेतलीत तर कळवा.
28 Jan 2023 - 9:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे माहिती नाही पण माहिती घेतो. असेल तर चांगलेच आहे. सध्या भरपेट जेवणे हे टाळतो. हलका फुलका व्यायाम. यामुळे वजन वाढत नाही हे सध्या बरं आहे, पण वजन कमी झालं पाहिजे. फलभाजीज्यूस हेच बरं वाटतं.
-दिलीप बिरुटे
28 Jan 2023 - 11:51 pm | चित्रगुप्त
बहुतेक खालील चाचणी आहे. परंतु 'फालतू' चरबी किती, हे यातून कळेल का हे विचारून घ्यावे.
बाकी पोटाचा घेर, BMI वगैरे, तसेच आपल्याला एकंदरित उत्साही, ऊर्जावान, चपळ वगैरे 'वाटते' का, हेही बघणे पुरेसे ठरावे. निदान सुरुवात करण्यासाठी तरी.
DEXA BODY SCAN
The DEXA Scan is a quick and painless, whole body scan that uses medical grade technology to provide measurements of Body Fat, Muscle Mass, and Bone Health.
A DEXA Scan (Dual-Energy X-ray Absorptiometry), uses two different types of waves that are reflected by lean muscle, and bone differently. The scanner uses this information to create a detailed map of your body and measure body composition.
28 Jan 2023 - 2:25 pm | Bhakti
आधीही लेख वाचला होता.भारी भारी प्रयोग आहेत सगळ्यांचे.
दोन वर्षांपासून माझेही विविध प्रयोग सुरू आहेत.प्रवास जरा उलटा आहे,आधी शरीराला चालण्याची,HIIT, Cardio,Full body अशा व्यायामाची सवय लावली.मग डायटकडे वळाले.खुप प्रकारचे डाएट केलं.१६ तास फास्टिंगच सुट होतंय.म्हणजे कसं तोंडाला सांगितले ना की १६ तास चुप्प बस की सोपं जातं.पोर्शन डाएटने भुक अर्धवट वाटते.नवे नवे डीपी टाकल्यावर ,कसं काय केलं ग विचारतात:)सारखं पुर्ण बंद करायचा प्रयत्न सुरू आहे.