बीबी का मकबरा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
6 Jun 2008 - 10:00 am

नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.

बीवी का मकबरा

या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे. आगर्‍याचा ताजमहाल संगमरवरी दगडाचा बनवलेला आहे तर ,मकबरा हा पांढर्‍या मातीपासुन बनविलेला आहे. एका भव्य दरवाजातून प्रवेश केल्यावर प्रवेशदारात मोठा पाण्याचा हौद आहे. त्यात डोलणारी कमळांची फुले लक्ष वेधुन घेतात. त्यानंतर पुढे कारंजे आणि दोन्ही बाजूने दगडी रस्ता आहे. दोन्ही बाजुने सरुची वृक्ष लावलेली आहेत. बीबीच्या मकबर्‍याची भव्यता आणि सौंदर्य डोळ्यात साठवण्याच मोह कोणासही व्हावा. मकबरा एक भव्य ओट्यावर बांधलेला आहे. मकबर्‍यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. पुर्वी थेट तिथे जाता येत होते आता तो भाग प्रवेशासाठी बंद केला आहे. कबरीच्या चारही बाजुने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. कबरीची रचना करतांना वरील छतांच्या खिडक्यांची अशी रचना केलेली आहे की त्या कबरीवर दिवसा सुर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश त्या कबरीवर पडतो. मकबर्‍याचा घुमट संगमरवरी दगडाचा बनलेला आहे. भव्य ओट्यावर चारही बाजुने दोन ताळी मिनार बांधलेले आहेत. कधी काळी मिनारावर जाता येत होते. पण लोकांनी इहलोकाची यात्रा संपवण्यासाठी या जागेची निवड केल्यामुळे हा रस्ता कायमचा बंद करण्यात आलेला आहे.

29042008042
औरंगजेब व त्याची बेगम यांच्या वापरात येणार्‍या काही वस्तु भांडे, वस्त्र, लाकडी वस्तू या संग्रहात ठेवलेले आहे. पण हे संग्राहलय सुद्धा बंद करण्यात आलेले आहे.
29042008032 29042008035 29042008037
आजुबाजुच्या वीट भट्ट्यांमुळे संगमरवरी वास्तु काळी पडत आहे. त्याला रंगकाम देण्याचे काम सतत चालले असते.
मकाइ दरवाजा
औरंगाबाद शहरात किमान बावन्न दरवाजे अजुनही येणार्‍या जाणार्‍याचे स्वागत करुन गतकाळाची आठवण देत असतात.
29042008018

पुरातत्व खात्याने जर इमारतींची काळजी घेतली नाही तर आजुबाजुच्या वीटभट्ट्यामुळे ही सुंदर शिल्प काळाचे पडद्याआड जातील असे मात्र राहुन राहुन वाटते.

कलासंस्कृतीप्रेमकाव्यप्रवासइतिहाससमाजमौजमजाप्रकटनविचारमतप्रश्नोत्तरेआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

6 Jun 2008 - 11:13 am | आनंदयात्री

ओळख बिरुटेसर, अशी पाणचक्की अन इतर एतिहासिक मानदंडांची ओळख करुन द्या पुढील लेखात.
धन्यवाद.

मराठी_माणूस's picture

6 Jun 2008 - 11:20 am | मराठी_माणूस

सुंदर छायाचित्रे

या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे.

यातले खरे कोणते ?

आनंदयात्री's picture

6 Jun 2008 - 11:27 am | आनंदयात्री

अरे जागा हो !
त्यात काही २ वेगवेगळे प्रतिवाद सांगितले नाहित, मुळ कबर म्हणजे जिथे खरेच प्रेत दफन केलेले असते तो चौथारा जेव्हा राबिया दुर्रानी मेली तेव्हाच म्हणजे औरंगजेबाच्या काळातच बांधली गेली अन ते सहाजिक आहे, बाहेरची ताजमहालाची प्रतिकृती मात्र नंतर बांधली/ वाढवली/ अमेंड केली गेली.

मराठी_माणूस's picture

6 Jun 2008 - 12:46 pm | मराठी_माणूस

स्पष्टिकरणा बद्दल धन्यवाद

स्वाती दिनेश's picture

6 Jun 2008 - 11:53 am | स्वाती दिनेश

खूप वर्षांपूर्वी औरंगाबादला आमची (शाळेची)सहल गेली होती त्याची आठवण करून दिलीत सर..
छान फोटो ! अजून येऊ देत,
स्वाती

चित्रा's picture

6 Jun 2008 - 3:41 pm | चित्रा

मी अगदी लहानपणी औरंगाबादला गेले होते, त्याची आठवण झाली.
जास्त आठवण जॅम लावून खाल्लेल्या पावाची! बिबीका मकबरा नावामुळे लक्षात राहिला. आणि अर्थातच अजंठा.

बिबी का मकबरा हा सँडस्टोन म्हणजे जयपूर जवळ मिळत असलेल्या दगडातून बनवला आहे असे ऐकले. जर खरेच असे असले आणि खरे तर तो तसाच ठेवला असता तर त्याच्या दगडांची शोभा चांगली दिसली असती. पण मुसलमानी लोकांमध्ये वास्तूंसाठी पांढरा रंग प्रचलित आहे असे एक निरीक्षण. त्यामुळे वरून पांढर्‍या रंगाचे लेप /प्लास्टर लावले असावेत.

बाकी लेख छान. अजून येऊ देत.

सहज's picture

6 Jun 2008 - 12:31 pm | सहज

सर फोटो छान आहेत.

आता असेच औरंगाबादच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपुर्ण स्थळे, संस्था, इतिहास अशी एक माहीतीपुर्ण मालीका होऊनच जाउ दे.

औरंगाबादची संपुर्ण ओळख करुन द्या सर.

बेसनलाडू's picture

6 Jun 2008 - 1:22 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

6 Jun 2008 - 1:22 pm | विसोबा खेचर

वा बिरुटेसाहेब,

छोटेखानी परंतु सुंदर लेख..

चित्रमय सफर चित्रांसकट आवडली! :)

अजूनही असेच उत्तम लेखन येऊ द्या, ही विनंती!

तर आजुबाजुच्या वीटभट्ट्यामुळे ही सुंदर शिल्प काळाचे पडद्याआड जातील असे मात्र राहुन राहुन वाटते.

असे खरंच होऊ नये!

असो,

आपला,
तात्या.

राजे's picture

6 Jun 2008 - 1:23 pm | राजे (not verified)

छोटेखानी परंतु सुंदर लेख.. चित्रमय सफर चित्रांसकट आवडली !!!!

अजून काही लेख येऊ देत :)

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मदनबाण's picture

6 Jun 2008 - 10:54 pm | मदनबाण

हेच म्हणतो.....

मदनबाण.....

मन's picture

6 Jun 2008 - 2:40 pm | मन

अगदि आपल्या गावची आठवण करुन दिलीत दिलीपराव.
धन्यवाद.
हा फोटु पाह्य्ला..
मन आलं उचंबळुन. लगेच केलय तिकिट बुक आणि पोचतोय दोनेक दिवसात घरी.
मग पुन्हा भेट देइनच ऐतिहासिक स्थळांना.

आपलाच,
मनोबा

प्रियाली's picture

6 Jun 2008 - 3:05 pm | प्रियाली

छोटेखानी लेख आवडला. मी औरंगाबादला कधी भेट दिलेली नाही पण सरांच्या चित्रदर्शी लेखांतून शहराचे उत्तम दर्शन होते. धन्यवाद!

शितल's picture

6 Jun 2008 - 5:57 pm | शितल

छान फोटो आहेत, आणि मी बीबी का मक्बरा पाहिला होता तेव्हा ही मला ते छान वाटला होता प्रत्यक्ष ताजमहाल पहायला मिळाले नाही अजुन पण आ॑नदयात्री म्हणतो तसे पाणीचक्की राहिला ना.
औ.बाद शहराला ऐतहासिक महत्व आहे, तुम्हाला खुप फोटो काढता येतील. (अज॑ठा वेरूळ लेणी ,देवगिरी किल्ला )

मुक्तसुनीत's picture

6 Jun 2008 - 8:32 pm | मुक्तसुनीत

..आणि माहितीसुद्धा. असेच दौलताबादच्या किल्ल्याबद्दल लिहावे अशी विनंती.

प्रमोद देव's picture

6 Jun 2008 - 8:40 pm | प्रमोद देव

देवगिरीचा किल्ला

वरील दुवा बिरुटेसाहेबांनी ह्याआधीच लिहिलेल्या लेखाचा आहे.

दिलीपराव बिकाम चा हा माहितीपूर्ण लेख आणि त्यामधील मस्त छायाचित्रेही आवडली.
झकास!!!!!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मुक्तसुनीत's picture

6 Jun 2008 - 10:23 pm | मुक्तसुनीत

... आणि प्रा डॉ यांचे आभार !

चतुरंग's picture

6 Jun 2008 - 8:55 pm | चतुरंग

सुरेख चित्रे आणि नेटके लेखन पाहून छान उजळणी झाली! लहानपणी सातवी-आठवीत असताना सहल गेलेली त्यानंतर ही वास्तू पाहिलेली नाही.
पुन्हा पहायला आवडेल. पाणचक्कीसुधा आठवते आहे.

(औरंगाबादेप्रमाणेच अहमदनगरलाही बारा वेशी होत्या त्यातल्या आता फक्त दोन (माळीवाडा वेस आणि दिल्ली दरवाजा) शिल्लक आहेत.)

चतुरंग

भाग्यश्री's picture

6 Jun 2008 - 11:05 pm | भाग्यश्री

कसली मस्त चित्रं आहेत हो.. आणि एकदम मस्त लहानपणची, शाळेची सहल गेली होती,आग्र्याला गेलो होतो, ती आठवण झाली!! लहानपणी औरंगाबादला २-३ वेळा गेले होते, नंतर गेलेच नाही.. आता परत बिबिका मकबरा,दौलताबाद्,अजंठ-वेरूळ करावेसे वाटते आहे..

(औरंगाबादहून मी नेहेमी खड्यांचे आणि कवडीसारखे दिसणारे कानातले - गळ्यातले आणायचे.. भयंकर आवडायचे ते मला.. नंतर एक हरवलं.. :( नाहीतर अजुनपर्यंत घातले असते! अजुन मिळतात का हो? असे पारदर्शी,निळसर मोठा गोल खडा.. आणि आत सोनेरी डिझाईन.. )

असो, बाकी शेवटचे चित्र खूप मस्त घेतलंय!!

http://bhagyashreee.blogspot.com/

धनंजय's picture

7 Jun 2008 - 12:19 am | धनंजय

फोटोही सुंदर.

मी घाईघाईच्या सहलीत बीबी का मकबरा रात्री चंद्रप्रकाशात बघितला. फोटो सगळे बेकार आले, पण त्या प्रकाशातली विलक्षण स्मृतिचित्रे अजून जतन केलेली आहेत.

सुधीर कांदळकर's picture

7 Jun 2008 - 8:42 am | सुधीर कांदळकर

आता औरंगाबादला भेट द्यायलाच पाहिजे.

दौलताबाद किल्ला झाला. बीबी का मकबरा झाला. आण्खै अशीच स्थळे असतीलच. आमच्या भेटीपुर्वी ती येथे आली तर मजा येईल.

तरी

दोन्ही बाजुने सरुची वृक्ष लावलेली आहेत.

याचा अर्थ नीट कळला नाही.

सुधीर कांदळकर.

यशोधरा's picture

7 Jun 2008 - 9:38 am | यशोधरा

सुरेख फोटो, खूप आवडले. हिमरू शालींबद्दल लिहिले नाहीत? बनत नाहीत का आता??

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2008 - 8:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिक्रिया लिहिणारे, आनंदयात्री,मनोबा ( औरंगाबादचेच) मराठी माणूस, स्वाती,चित्रा,सहज,बेला, तात्या,राजे,मदनबाण,मन,प्रियाली,शितल,मुक्तसुनीत,देवसाहेब, चतुररंग,भाग्यश्री,धनंजय,कांदळकरसाहेब आणि यशोधरा कौतुकाच्या प्रतिक्रियेबद्दल आपले आभार........वाचकांचेही आभार....बीबीका मकब-याच्या निमित्ताने आपल्या आठवणींना उजाळा मिळाला, आनंद वाटला !!!

चित्रा(जी) म्हणतात : बिबी का मकबरा हा सँडस्टोन म्हणजे जयपूर जवळ मिळत असलेल्या दगडातून नवला आहे असे ऐकले. जर खरेच असे असले आणि खरे तर तो तसाच ठेवला असता तर त्याच्या दगडांची शोभा चांगली दिसली असती.

मिनार तर पांढ-या मातीचेच आहेत.तर काही ठिकाणी दगड वापरले आहेत. मात्र पांढ-या मातीचा वापर असल्यामुळे मिनारला आणि वास्तूलाही तितकी चमक नाही.

सहज :औरंगाबादच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपुर्ण स्थळे, संस्था, इतिहास अशी एक माहीतीपुर्ण मालीका होऊनच जाउ दे.

जसे जमेल तसे लिहित असतोच, पण मिपाच्या ध्येय धोरणाचाही विचार करावा लागतो ना ? शशांकच्या गोदामाचा माल इथे उतरवल्यासारखा वाटला :)

शितल : पाणीचक्की राहिला ना.

पाणचक्कीत सध्या पाणी नाही, आणि ते पाण्यावर फिरणारे जाते तर पाहण्यासही मिळत नाही. पण कधीतरी त्याच्यावरही लेखनी चालवूच.

भाग्यश्री : औरंगाबादहून मी नेहेमी खड्यांचे आणि कवडीसारखे दिसणारे कानातले - गळ्यातले आणायचे.. भयंकर आवडायचे ते मला.. नंतर एक हरवलं.. नाहीतर अजुनपर्यंत घातले असते! अजुन मिळतात का हो?

बाप रे !!! अवघड प्रश्न विचारला. पण जरा चौकशी करुन सांगतो.

कांदळकर साहेब, सुरुची झाडे खाली फुगीर व वर निमुळता अशा मजेदार आकाराचा सरळ उंच वाढत जाणारा शोभीवंत वृक्ष, आम्ही त्याचा सरुची असा उल्लेख केल्यामुळे गोंधळ झाला असावा.

यशोधरा : हिमरू शालींबद्दल लिहिले नाहीत? बनत नाहीत का आता??
अजूनही बनतात, त्या बद्दल आम्हालाच लेखनासाठी जरा माहिती गोळा करावी लागेल.

प्रियाली : मी औरंगाबादला कधी भेट दिलेली नाही.

एकदा याच आपण औरंगाबादला आम्ही मिपाच्या वतीने आपले स्वागत करु,मिपामित्रांना आमचे आग्रहाचे निमंत्रण,जर आलात तर आम्ही आपल्या आदरातिथ्यात कमी पडणार नाही. :)

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

8 Jun 2008 - 9:24 am | विसोबा खेचर

जसे जमेल तसे लिहित असतोच, पण मिपाच्या ध्येय धोरणाचाही विचार करावा लागतो ना ? शशांकच्या गोदामाचा माल इथे उतरवल्यासारखा वाटला

बास काय बिरुटेशेठ! अहो फक्त भाषा, भाषाशास्त्र, व्याकरण, प्रमाणभाषा, शुद्धलेखन याच विषयांवर चर्चा करायला मिपावर बंदी आहे. हे सोडून बाकी तुम्हाला काय लिहायचं ते लिहा की बिनधास्त! कुणाची ना आहे सांगा बरं! :)

शिवाय, बोलीभाषेवर लिवा की राव! बोलीभाषेवर लिहायला मिपाची मुळीच ना नाही!

आम्हाला चीड आहे ती प्रमाणभाषा, भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन या विषयावर नसती ट्यांव ट्यांव करून दुसर्‍याला तुच्छ लेखणार्‍या मंडळींची. आणि हे विषय निघाले की ह्या मंडळींना चेव चढलाच म्हणून समजा! म्हणूनच केवळ आम्हाला बंदी घालावी लागली आहे, अन्य कारण नाही!

शशांकच्या गोदामाचा माल इथे उतरवल्यासारखा वाटला

हा हा हा! हरकत नाही. अहो कधी कधी आमच्याही गोदामाचा माल शशांकच्या गोदामात उतरवलात तर चालेल की आम्हाला! शशांक आम्हाला परका नाही, आमचाही तो दोस्तच आहे. भला माणूस! मिपाच्या किंवा नमोगताच्या मालकासारखा हलकट नव्हे! ;)

आपला,
(मिपाच्या गोदामाचा चौकिदार) तात्या.

झकासराव's picture

7 Jun 2008 - 9:20 pm | झकासराव

सगळी प्रकाश चित्र छान आहेत. :)
माहिती अजुन थोडी हवी होती अस वाटल.

अवांतर :
वा! आता कधी औरंगाबादची सफर झाली तर हक्काच घरच माणूस आहे दाखवायला सगळ फिरुन :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2008 - 9:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकासराव,
प्रकाशचित्राच्या कौतुकाबद्दल आभारी !!!

माहिती अजुन थोडी हवी होती अस वाटल.
फारच त्रोटक माहिती झाली, याच्याशी सहमत !!! पण भर घालावी तर काय भर घालावी विचार करता, करता लेखन बरेच दिवस पडून होते. पडुन राहण्यापेक्षा लेखन प्रकाशित केलेले बरे असे वाटले. :)

अवांतर : वा! आता कधी औरंगाबादची सफर झाली तर हक्काच घरच माणूस आहे दाखवायला सगळ फिरुन
नक्की दाखवेन !!! आपले स्वागत आहे.

इनोबा म्हणे's picture

7 Jun 2008 - 10:19 pm | इनोबा म्हणे

मस्त काम केले आहे आपण. मला अजूनतरई कधी तिकडे यायचा योग आलेला नाही. पाहूया कधी जमतंय...

या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे.
हि 'बीबी' कोण? कारण 'बीबी का मकबरा' हे नाव ऐकून तर मला वाटले होते की कुणीतरी आपल्या बायकोची(ताजमहालप्रमाणे)कबर बांधली असावी.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्रभाकर पेठकर's picture

8 Jun 2008 - 9:55 am | प्रभाकर पेठकर

माझ्या माहितीनुसार 'बिवी' म्हणजे बायको आणि 'बीबी' म्हणजे कोणीही 'स्त्री'.
उर्दूचे जाणकार ह्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jun 2008 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बीबी म्हणजे 'स्त्री'. हा तुर्की शब्द आणि त्याचा अर्थ आहे, पत्नी, भार्या,कुलवधू.
बीवी म्हणजे पत्नी. इथे मात्र एक 'स्त्री' असाच अर्थ अपेक्षीत असावा !!!
अर्थात जाणकार काय म्हणतात ? तेही पाहिलं पाहिजे.

इनोबा आणि पेठकरसाहेब, प्रतिक्रियेबद्दल आभारी !!!

प्रभाकर पेठकर's picture

7 Jun 2008 - 10:21 pm | प्रभाकर पेठकर

बिबी का मकबराची छायाचित्रे आणि वर्णन औरंगाबादची ओढ वाढविणारे आहे. एकदा धावती भेट दिली होती ह्या शहराला पण आता मुद्दाम 'औरंगाबाद पाहण्यासाठी' मुहूर्त पाहावा असे मनात आहे. धन्यवाद आणि अभिनंदन बिरूटे साहेब.

पिवळा डांबिस's picture

8 Jun 2008 - 8:05 am | पिवळा डांबिस

बिरूटे साहेब तुम्ही अपलोड केलेली चित्रे सुंदरच आहेत. इतकी की पुढल्या वारीत औरंगाबाद करायचेच असे ठरवून आम्ही अधिक माहिती काढायला सुरवात केली.
पण तुमच्या एअरपोर्टचे नांव "चिखलठाणा" असे वाचून उत्साह मावळला....
आयला, तिथेच चिटकून पडलो तर काय करायचं?:))

माझा एक पाव्हणा जालन्याला असतोय त्याला फोन करून माझी शंका विचारली तर ते बेनं खोखो हसायला लागलं.
म्हणतंय, की मराठवाडा आधीच दुष्काळी भाग, तिथं चिखलठाण्यात चिखल कुठला असायला?
आता मला सांगा, आमी जन्मजात मुंबईकर, आमाला कसं कळायचं हो?:)
च्यामारी, जर आसं आहे तर जरा नांव तरी बदला ना विमानतळाचं!:))
ह्.घ्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jun 2008 - 8:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरूटे साहेब तुम्ही अपलोड केलेली चित्रे सुंदरच आहेत.
कौतुकानं भारावलोय शेठ....!!!

इतकी की पुढल्या वारीत औरंगाबाद करायचेच असे ठरवून आम्ही अधिक माहिती काढायला सुरवात केली.
अरे, नक्की या !!! अजून दोन- तीन पाऊस होऊ द्या, डोगंरांवर हिरवे गालिचे दिसू द्या , फीर देखो हमारे शहर का नजारा.......!!!

पण तुमच्या एअरपोर्टचे नांव "चिखलठाणा" असे वाचून उत्साह मावळला....
आयला, तिथेच चिटकून पडलो तर काय करायचं?

हाहाहाहा =))

मराठवाडा आधीच दुष्काळी भाग, तिथं चिखलठाण्यात चिखल कुठला असायला?

पाव्हण्यानं बाकी दुष्काळाचं खरं सांगितलं !!! असतं एक एकाचं दुर्दैव बाकी काय :(

च्यामारी, जर आसं आहे तर जरा नांव तरी बदला ना विमानतळाचं!

डांबिसराव, आमचं विमानतळ आता फार मोट्ठं होणार आहे, ते काम पुर्ण झाल्यावर कोणत्या तरी राजकारणी माणसाला नामांतराची आठवण येईलच, तेव्हा त्याची फिकीर करु नका ते बदलेल असे वाटते.

गमत्या's picture

10 Jun 2008 - 9:05 pm | गमत्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,

मि देखील औरंगाबादचाच आहे.

परंतु कामाच्या व्यापामुळे जास्त प्रतिक्रिया लिहीत नाही. पण वाचन मात्र चालु असते.
आपण लिहीलेला लेख अतिशय सुंदर आणि माहिती पुर्ण आहे.

औरंगाबादला आल्यावर आपल्याला जरुर भेटेल...............

(औरंगाबादचा) गमत्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jun 2008 - 11:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

औरंगाबादच्या गमत्याची भेट झाली आनंद वाटला !!! :)

परंतु कामाच्या व्यापामुळे जास्त प्रतिक्रिया लिहीत नाही. पण वाचन मात्र चालु असते.

अरे, दोस्ता प्रतिक्रिया लिहिल्या पाहिजे म्हणजे लिहिणा-याचा उत्साह वाढतो.

औरंगाबादला आल्यावर आपल्याला जरुर भेटेल...............

अरे, साहेब !! केव्हाही भेटा हजर असेन !!!

विकास's picture

11 Jun 2008 - 12:56 am | विकास

व्यस्त असल्याने जरा गुमान होतो,नंतर वाचायला लागलो तेंव्हा म्हणलं बिरूटे साहेबांचा लेख म्हणजे वाद घालायला स्कोप नाही, म्हणून अंमळ उशीरा वाचला ;)

आत्ताच आपला लेख वाचला. फोटू एकदम आवडले. लहानपणी शाळेच्या सहलीबरोबर आणि नंतर अजून एकदा घरच्यांबरोबर औरंगाबादेला गेलो होतो तेंव्हाची आठवण झाली.

या बिविका मकबर्‍यापाशीच पाणचक्की आहे ना?

विकास

मनस्वी's picture

11 Jun 2008 - 11:18 am | मनस्वी

बिरुटेसर
माहितीपूर्ण सचित्र लेख आवडला.
अजूनही आवडेल बसल्या बसल्या औरंगाबाद हिंडायला :)

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसुनाना's picture

11 Jun 2008 - 12:09 pm | विसुनाना

परवाच (म्हणजे जानेवारीत) औरंगाबाद सहल केली होती. त्या आठवणींना उजाळा मिळाला.
बिबी का मकबरा खरेच सुंदर आहे. (त्याची तुलना ताजमहालाशी करू नये. पण निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर ही इमारत फारच आकर्षक दिसते हे निर्विवाद सत्य आहे.)

बिरुटेसाहेब, अजिंठा, वेरूळ, बिबी-का-मकबरा, दौलताबादचा किल्ला, पैठण अशा अनेक प्रेक्षणीय स्थळांच्या सान्निध्यात तुम्ही राहता. भाग्यवान आहात. अजिंठा आणि वेरूळ तर संपूर्ण आयुष्य निछावर करावे अशी स्थळे आहेत.

पण तुम्ही म्हणता तसे पाणचक्की पाण्याविना नेहमी बंद असते आणि जाते दिसत नाही ही गोष्ट खरी नाही. कदाचित उन्हाळ्यात पाणी नसेल. पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात चक्की फिरते, कारंजे उडते आणि जातेही शाबूत आहे. मी पाहिले आहे. हे पहा -

मी काढलेला सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणार्‍या बीबी-का-मकबर्‍याचा फोटू -

आणि मकबर्‍याच्या आत -

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jun 2008 - 12:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय सुरेख फोटो काढले आहेत, अहो, आम्ही आपलीच वाट पाहात होतो. आपण काढलेली सुरेख छायाचित्रे आम्ही पाहिलेली होतीच
आता आमच्या भ्रमनध्वनीच्या कॅमे-याने आपल्याइतके सुंदर फोटो थोडे काढता येतील आम्हाला :(

पण तुम्ही म्हणता तसे पाणचक्की पाण्याविना नेहमी बंद असते आणि जाते दिसत नाही ही गोष्ट खरी नाही.

बंद असते असे आम्ही कुठे म्हटले आहे ? पाण्यावर फिरणारे जाते म्हणजे पाण्याच्या दाबाने फिरतांना दिसणारे जाते ? केवळ दिसणे म्हणजे फिरणे नाही ना ! काय म्हणता ?

नहरीमधून येणारे पाणी फक्त पावसळ्यात पाहण्यास मिळते त्यात आपल्याही छायाचित्रात नहरीतून पडलेले पाणी दिसत नाही. पाणचक्की सतत उघडीच असते :)

बाकी आपले छायाचित्र सुरेख आहेत, आम्ही डकवलेली छायाचित्रे सरपंचाना सांगुन काढावेत असे वाटत आहे :? :)
( थोड्याच दिवसात नहरीतून पडणा-या पाणचक्कीचे फोटो डकवतो )

बिरुटेसाहेब, अजिंठा, वेरूळ, बिबी-का-मकबरा, दौलताबादचा किल्ला, पैठण अशा अनेक प्रेक्षणीय स्थळांच्या सान्निध्यात तुम्ही राहता. भाग्यवान आहात. अजिंठा आणि वेरूळ तर संपूर्ण आयुष्य निछावर करावे अशी स्थळे आहेत.

हाहाहाहा भाग्यवान तर आहोतच आम्ही, आमची भुमीच मुळी संताची आणि ऐतिहासिक वारसा सांगणारी. आमच्यात दिसतात की नाही संताचे आणि आमच्या मातीचे गुण ? :(

प्रतिक्रियेबद्दल, फोटो डकवल्याबद्दलही आभार !!

विकासराव, मनस्वी, आपल्याही प्रतिक्रियेबद्दल आभार !!!

विसुनाना's picture

11 Jun 2008 - 12:58 pm | विसुनाना

बिरुटेसर, तुमचे अजिंठा-वेरुळाचे सौंदर्य उलगडणारे लेख लवकर यावेत ही अपेक्षा आहे.
शिवाय चक्रधर स्वामींबद्दलही ललित लेख लिहिल्यास उत्तम.

आमची भुमीच मुळी संताची आणि ऐतिहासिक वारसा सांगणारी. आमच्यात दिसतात की नाही संताचे आणि आमच्या मातीचे गुण ?

अर्थातच! बिरुटे सर, तुमची मायमराठीबद्दलची कळकळ ज्ञानेश्वर, एकनाथांचा वारसा सांगते. आणि महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीचा तुमचा अभ्यास भल्याभल्यांना लाजवणारा आहे.

पाणचक्की केवळ दिसणे म्हणजे फिरणे नाही ना ! काय म्हणता ?

नाही हो. मी पाणचक्कीची पाती आणि जाते दोन्ही पाण्याच्या दाबाने फिरताना पाहिली आहेत. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. कधी सवड मिळाली तर जालावर चढवीन. असो.

आम्ही डकवलेली छायाचित्रे सरपंचाना सांगुन काढावेत असे वाटत आहे .
-नको, नको. तसे झाले तर मूळ लेखाला बाध येईल. त्यापरास माझीच प्रकाशचित्रे उडवता येतील. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jun 2008 - 1:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाही हो. मी पाणचक्कीची पाती आणि जाते दोन्ही पाण्याच्या दाबाने फिरताना पाहिली आहेत. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. कधी सवड मिळाली तर जालावर चढवीन. असो

खरच मी आतापर्यंत जाते फिरतांना पाहिलेलेच नाही. पण आपण पाहिलीत यावर माझा विश्वास आहे. आता पुढल्या वेळेला जाईन तेव्हा ते काळजीपुर्वक पाहीन !!!

स्वगत : औरंगाबादला राहुन आपल्याला मित्र माहिती सांगतो की पाणचक्कीचे जाते फिरते, या पेक्षा नामुष्की कोणती :)

अर्थातच! बिरुटे सर, तुमची मायमराठीबद्दलची कळकळ ज्ञानेश्वर, एकनाथांचा वारसा सांगते. आणि महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीचा तुमचा अभ्यास भल्याभल्यांना लाजवणारा आहे.

खेचा भो खेचा गरीबाची !!! :)

विकास's picture

11 Jun 2008 - 8:39 pm | विकास

खरच मी आतापर्यंत जाते फिरतांना पाहिलेलेच नाही. पण आपण पाहिलीत यावर माझा विश्वास आहे. आता पुढल्या वेळेला जाईन तेव्हा ते काळजीपुर्वक पाहीन !!!

ही पाणचक्की मी माझ्या दोन्ही प्रवासात चालू असताना पाहील्याचे चांगले लक्षात आहे.

गणा मास्तर's picture

13 Jun 2008 - 12:26 pm | गणा मास्तर

लेख आवडला.
औरंगबादेस जाणे झाले होते पण बीबीका मकबरा पाहणे राहुन गेले.
परत कधी गेलो तर नक्की पाहीन.

ऋचा's picture

13 Jun 2008 - 12:30 pm | ऋचा

मी खुप लहानपणी गेलेले चित्र पाहुन आठवणी जाग्या झाल्या

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

काळा_पहाड's picture

13 Jun 2008 - 3:02 pm | काळा_पहाड

लहानपणी शाळेच्या सहलीत "बीबीका मकबरा" आणि "पानचक्की" बघितल्याचे आठवते.
बिरुटेसरांनी त्या आठवणी जागविल्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच.
मात्र आता औरंगाबादला गेल्यावर पुन्हा जाईन म्हणतो.
काळा पहाड

बकुळफुले's picture

28 Oct 2015 - 11:13 am | बकुळफुले

बिरुटे सर अजून द्याना आणखी काही स्थळांची ओळख.

नया है वह's picture

29 Oct 2015 - 1:56 pm | नया है वह

लेख आवडला.

प्रचेतस's picture

29 Oct 2015 - 9:08 pm | प्रचेतस

सरांनी ह्यावर लेखन केलेलं माहितच नव्हतं.
खुद्द सरांबरोबरच ह्या वास्तूची दोनेक वर्षापूर्वी भेट झाली होती. प्रांगणात बसून अगदी निवांत गप्पा झाल्या होत्या.