माळरान अन् ते दोघे!! -- ९

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
19 Oct 2011 - 1:42 pm

माळरान अन् ते दोघे!! -- ८

परत जायचे नाही तिथे
तिने निश्चय केला होता आता
अगदी घट्ट
.
.
वेडी कुठली
वयाच्या १७ व्या वर्षीच
प्राक्तनाला आव्हान?
.
.
एक संपूर्ण दिवस
एकाच विचारात
कोण आहे तो... मला ओळखतो कां?
मग मला का नाही आठवत?
.
कां मी नीट पहिलेच नाही त्याला
छे, असं कसं
पहिले तर होते मी त्याला
खरे तर मीच पाहत होते, तो तर
शून्यात होता
.
मग त्याने असे कां लिहिले
वाटले.... सरळ जावे आणि विचारावे
पण नको
.
इतक्यात दारावर
एक संन्यासी, भगवी छाटी
हातात कमंडलू
अनुभवाची चांदी मस्तकापासून हनुवटीपर्यंत
.
ति घरात जाऊन भिक्षा घेऊन आली
अन् संन्यासाला देणार,
एवढ्यात त्याने एक कागद
तिच्या हातावर ठेवला
आणि हात तिच्या मस्तकावर
आशिर्वादाला
ति चक्रावली, अजाणता कागद घेऊन
पाहत राहिली त्याच्याकडे
तो तिच्या घराचे वळण पार करून गेल्यावर
कागदावर नजर गेली
.
कागदावर तीनच शब्द
"तुझ्या प्रतिक्षेत, अजूनही..."
.
.
खरेतर ती मुळातून हादरली होती
तिला आता त्याची
भीती वाटायला लागली होती, अन्
कदाचित एक
अनाकलनीय आकर्षण
.
ती आता
रोज वाट पहाट होती
त्या संन्यासाची
.
.
अचानक एक दिवस
त्या संन्यासाची ती ठराविक हाक
तिच्या कानावर आदळली
.
ती जीव तळहातावर घेऊन
दाराकडे धावली
.
दारावर कोणीही नव्हते
.
आता तिला तिचे भ्रम
मृगजळाची चव चाखवत होते

(क्रमशः)

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१९/१०/२०११)

करुणकथाकविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

वपाडाव's picture

19 Oct 2011 - 4:49 pm | वपाडाव

यार तु वेड लावलंस....

गवि's picture

19 Oct 2011 - 4:56 pm | गवि

जबरदस्त..

काय बोलू ?

५० फक्त's picture

19 Oct 2011 - 11:27 pm | ५० फक्त

मस्त रे....

प्रकाश१११'s picture

21 Oct 2011 - 7:04 pm | प्रकाश१११

आता तिला तिचे भ्रम
मृगजळाची चव चाखवत होते
मस्त ..