त्या हिरव्या झाडावर
एक घरटे आहे
.
बहुदा चिमणीचे
बर्याचदा तिथून
कलकलाट येतो कानावर
पाखरे तरी किती निरागस
.
वठलेले झाड विचार करतेय
.
घरट्यामध्ये खोचलेल्या
वाळलेल्या काटक्या तर त्याच्याच आहेत ना
.
.
चला, म्हणजे अजूनही मी
अगदीच निरपयोगी नाही तर
.
त्याच्या जीर्ण खोडावर
अजूनही कोरल्याच्या
खुणा जाणवतायत
अगदी स्पष्ट नाहीयेत तरी
त्याच्यावर, आणि हो,
एकमेकांवरही प्रेम करणार्या
दोघांनी गोंदवलेली काही अस्फुट अक्षरे
.
.
किती यातना झाल्या होत्या पण
त्याचे असे आहे
कोण कोणाला कसा लळा लावेल
.
आता युगे लोटली
त्या दोन्ही झाडांना
शेजारी शेजारी उभे असून
.
.
हिरव्या झाडाने अजूनही
साथ सोडली नाही अन्
वठलेल्या झाडाने
.
आशा
(क्रमश:)
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१०/१०/२०११)
प्रतिक्रिया
10 Oct 2011 - 12:29 pm | जाई.
छान
10 Oct 2011 - 12:40 pm | पैसा
आवडतेय...
10 Oct 2011 - 12:52 pm | गवि
संपूर्ण मालिकाच अतिशय सुंदर आहे. अत्यंत आवडीने वाचतो आहे.
10 Oct 2011 - 4:44 pm | कवितानागेश
:)
लाईक!
10 Oct 2011 - 6:04 pm | विश्वेश
आवडली
10 Oct 2011 - 6:05 pm | ५० फक्त
मागच्या भागाचाच प्रतिसाद पुन्हा वाचावा, बाकी लिहिण्यासारखं काही नाही. पिडिएफ करुन ठेवल्या आहेत योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य किंवा अयोग्य माणसांना ? वाचुन दाखवण्यासाठी.
10 Oct 2011 - 8:26 pm | प्रकाश१११
त्याच्या जीर्ण खोडावर
अजूनही कोरल्याच्या
खुणा जाणवतायत
अगदी स्पष्ट नाहीयेत तरी
त्याच्यावर, आणि हो,
एकमेकांवरही प्रेम करणार्या
दोघांनी गोंदवलेली काही अस्फुट अक्षरे
छान .आवडली कविता .शुभेच्छा ..!!
11 Oct 2011 - 10:16 am | पाषाणभेद
वाचतो आहे रे