काल उष्मा फार वाढला होता
शेवटी काल संपून
आज आला होता
पहाट सरून सकाळ उजाडली
हिरव्या झाडाने एकदा
पानभरून श्वास घेतला
अन्, दीर्घ उसासा टाकला
.
त्याचे स्वप्नं सरले होते
.
स्वप्नात त्याने
शेजारच्या वठलेल्या झाडाला
पालवी फुटतांना पहिले होते
.
आज इतकी दशके लोटली
पण हिरव्या झाडाने कधी
वठलेल्या झाडाची
साधी दखल देखील नव्हती घेतली
मग असे स्वप्नं का पडावे
.
.
अकस्मात
सर्रकन काटा आला त्याच्या खोडावर......
.
वठलेल्या झाडाच्या फांदीच्या टोकाशी
कालच्या उष्म्याने
करपलेला एक कोंब लटकत होता
(क्रमशः)
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(११/१०/२०११)
प्रतिक्रिया
11 Oct 2011 - 3:19 pm | जाई.
सुंदर
11 Oct 2011 - 3:49 pm | गवि
आहा... वा.. क्या बात..
11 Oct 2011 - 6:21 pm | ५० फक्त
जबरदस्तच, एक व्हिडिओ कॅमेरा लावल्यासारखा वाटतोय.
12 Oct 2011 - 3:28 pm | गणेशा
छान सिरिज .
अवांतर :
कविता आधीच वाचल्याने, आता सर्वात शेवटच्या काव्याला एकत्रीत प्रतिसाद देतो
12 Oct 2011 - 6:17 pm | वपाडाव
आज पहिल्यांदी स्वतःहुन एखादी कविता वाचण्यास आलोय......
वाचता वाचता मुग्ध झालो एकदम......
अगदी माळरान अन त्या दोन झाडांची फिल्म तरळुन गेली.....