माळरान अन् ते दोघे!! -- ३

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
7 Oct 2011 - 10:37 am

माळरान अन् ते दोघे!! -- २

आज वारा जरा
वेगळ्याच दिशेने
वाहत होता
हिरव्या झाडातून
आनंदाचे धुमारे फुटत होते
आज त्याच्या फांद्यांना
लय सापडली होती
.
हाच वारा, जेव्हा
वठलेल्या झाडातून फिरायचा
एक शिळ घुमायची
काय म्हणतात बरे त्याला
.
.
हम्म... हृदयद्रावक
.
तिकडे
हिरवे झाड मात्र
आज खूप खुश होते
चार नविन कळ्या
उमलत होत्या त्याच्या
दोन काहीश्या मोठ्या अन्
दोन अगदीच अल्लड, नाजूक
.
त्या मोठ्या कळ्या जरा
उदासच होत्या
.
.
बहुदा त्यांना फक्त
त्या उजाड माळरानावरचे
वठलेले झाडच दिसत होते
.
अन्
दुसर्‍या दोन अल्लड कळ्या
त्या खुश होत्या
त्यांना मोठ्या उमलणार्‍या
कळ्या दिसत होत्या
उमलणार्‍या
.
.
दृष्टीचा हा खेळ अजबच

(क्रमशः)

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०७/१०/२०११)

करुणकथाकवितामुक्तक

प्रतिक्रिया

५० फक्त's picture

8 Oct 2011 - 8:34 am | ५० फक्त

जबरदस्तच रे, एका वैयक्तिक संदर्भातुन पाहतोय या काव्य मालिकेकडे जबरदस्त साम्य जाणवतंय.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Oct 2011 - 9:10 am | अत्रुप्त आत्मा

अच्छा चल रहा है... लगे रहो...

अवांतर- हे क्रमशः काव्य नसुन दीर्घ काव्य आहे...असे आंम्ही म्हणु का? ;-)

पैसा's picture

8 Oct 2011 - 4:11 pm | पैसा

५० राव, काव्यमालिका म्हणा पायजे तर!

गवि's picture

10 Oct 2011 - 1:15 pm | गवि

अप्रतिम आहे हा लेखनप्रकार..आणि ही मिकाची मालिका.