बरसणार्या पावसाने
माती गच्च भिजली होती
तिची मगरमिठी
आता जरा
सैल झाली होती
वठलेल्या झाडाची मुळे
जरा मोकळी झाली होती
.
फार दिवसांनी
मिळालेली हि थोडीशी
मोकळीक
.
मातीची पण काय कमाल ना,
ज्यांना घट्ट धरायला हवे,
त्यांनाच मोकळे सोडते!
.
.
आज जरा उघाड आहे
सोनेरी कोवळी उन्हे
पसरायला सुरवात झाली आहे
कालच्या वर्षावाने
हवेत दाटलेला मृदगंध
अजूनही विरळ झाला नाहीये
.
त्या गंधात... हिरव्या झाडाच्या
धुंद कळ्यांचा मंद सुगंध
मिसळतोय
सगळे वातावरण कसे
बेधुंद
.
बऱ्याच दिवसानंतर, नाही,
बहुदा काही दशकानंतर
त्या निर्मनुष्य माळरानावर
एक वृद्ध लावण्य अवतरले
वठलेल्या झाडाजवळ
येवून थबकले,
त्याच्या पायाशी
पडलेल्या वाळक्या पानाखालचे
कोवळे फुल उचलून
मंद हसले
.
त्या गोंदवलेल्या अस्फुट अक्षरांवरून
तिने आपले सुरकुत्या पडलेले
मऊसुत हात फिरवले
.
वठलेल झाड खोडभरून शहारले
.
युगांनतरचे हे शहारणे
कदाचित,
विस्मृतीत गेलेले, पण,
फार फार मोहक होते
.
भूतकाळाचे क्षण
आता
वर्तमानाला सुखावत होते
(क्रमशः)
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१६/१०/२०११)
प्रतिक्रिया
16 Oct 2011 - 10:32 am | गवि
great...
>>>
बऱ्याच दिवसानंतर, नाही,
बहुदा काही दशकानंतर
त्या निर्मनुष्य माळरानावर
एक वृद्ध लावण्य अवतरले
वठलेल्या झाडाजवळ
येवून थबकले,
त्याच्या पायाशी
पडलेल्या वाळक्या पानाखालचे
कोवळे फुल उचलून
मंद हसले
.
त्या गोंदवलेल्या अस्फुट अक्षरांवरून
तिने आपले सुरकुत्या पडलेले
मऊसुत हात फिरवले
.
वठलेल झाड खोडभरून शहारले
.
युगांनतरचे हे शहारणे
कदाचित,
विस्मृतीत गेलेले, पण,
फार फार मोहक होते
>>>
Excellent Mika...
16 Oct 2011 - 10:46 am | ५० फक्त
.......
16 Oct 2011 - 10:51 am | प्रकाश१११
सुंदर ...!!
मनापासून आवडले.पु.ले.शु.
16 Oct 2011 - 10:51 am | प्रकाश१११
सुंदर ...!!
मनापासून आवडले.पु.ले.शु.
16 Oct 2011 - 12:03 pm | जाई.
मस्त
16 Oct 2011 - 4:43 pm | पियुशा
लय भारी लीहिता की तुम्ही
चालु द्या ! :)
18 Oct 2011 - 12:17 pm | गणेशा
अप्रतिम ...
निव्वळ अप्रतिम ..
शेवतीच रिप्लाय देणार होतो पण ही कविता वाचुन राहावले नाहि