माळरान अन् ते दोघे!! -- ८

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
18 Oct 2011 - 10:40 am

माळरान अन् ते दोघे!! -- ७

अकस्मात सोसाट्याचा वारा सुटला
ढग अन त्यांच्यासहित
अवघे आभाळ
मागे मागे सरकावयास लागले
.
त्या वृद्ध लावण्याला आता दिसतेय
एक १७ वर्षांचे अल्लड
नवयौवन.... नाजूक अन् अवखळ
असेच एक दिवस, अनवधानाने
या माळरानावर पोहचलेले
.
पण तिथे हे हिरवे झाड, ते दिसत नाही
अन वठलेले झाड
हा तर गुलमोहर, खूपच बहरलेला आहे
जवळपास सगळ्याच फांद्यांवर
हिरवा दाटला आहे
.
त्या झाडाखाली
एक कवी, काहीतरी खरडणारा
सगळे वेडा म्हणत त्याला
खूप सारी कागदे विखुरली होती
त्याच्या अवतीभोवती, पण,
तो मात्र तिथे असूनही, तिथे नसल्यासारखा
शून्यात नजर लावलेला
आभाळाची पिसे मोजणारा
.
तिला खोडी सुचली
तिने त्याच्या हातातला कागद
हळूच ओढून, धूम ठोकली, घराकडे
धपापत्या उराने, घरी पोहोचल्यावर
हळूच तो कागद पहिला मात्र
तिचा विश्वास बसत नव्हता
कागदावर अगदी तळाशी
एकच ओळ होती
.
.
"अखेर तू आलीस तर..........."

(क्रमशः)

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१८/१०/२०११)

करुणकथाकवितामुक्तक

प्रतिक्रिया

क्या बात है.. क्या बात..

मिका जबरदस्त रे...

जाई.'s picture

18 Oct 2011 - 12:55 pm | जाई.

मस्त

प्रकाश१११'s picture

19 Oct 2011 - 3:43 am | प्रकाश१११

भन्नाट. छानच....!!

वपाडाव's picture

19 Oct 2011 - 11:46 am | वपाडाव

यार तु फोडलंस तोडलंस.....