माळरान अन् ते दोघे!! -- (भाग १ समाप्त)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
21 Oct 2011 - 12:23 pm

माळरान अन् ते दोघे!! -- ९

सकाळी घाई घाईने ती
माळरानावर पोहचली
गुलमोहर तसाच होता
डेरेदार, अन्
त्याच्यावर सावली धरून
.
.
तोही तसाच
शून्यात नजर लावलेला
.
.
ती त्याच्या समोर जाऊन उभी राहली
एक क्षण त्याची अन तिची नजर भिडली
अन्.... कां कोण जाणे,
तिची नजर धरणीला भिडली
.
.
त्याच्या नजरेत विश्वाचा आनंद दाटला
अन् त्याचा हात लेखाणीकडे सरसावला
.
जणू
राधेच्या दर्शनाने
मुरलीधराच्या मुरलीला कंठ फुटला होता
.
.
खरे तर ती खूप रागावणार होती
चांगला खडसावून जाब विचारणार होती
पण
.
तिने इतकेच विचारले त्याला
कोण तू?
तो फक्त गूढ हसला
.
क्षणभराने तो म्हणाला
बस ना,
ती स्व:ताच्याही नकळत बसली
त्याच्यासमोर
.
परंतु
त्या गुलमोहराच्या सावलीच्या वर्तुळाच्या
थोडी आत अन् बरीसशी बाहेर
.
नियती संकेत देतच असते
माणूसच गाफील असतो
.
.
ती समोर बसली होती त्याच्या
पण, आरशासमोर बसल्यासारखी
.
तो काहीतरी लिहित होता,
पण बोलला काहीच नाही
.
बराच वेळ झाल्यावर ती अंमळ कंटाळली
तिला परत खोडी सुचली,
अन् तिने त्याच्या हातातील कागद ओढला
.
तो म्हणाला अग थांब
शेवटचे कडवे तर लिहु दे
त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिने वाचायला सुरवात केली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माझे जगणे तू, माझे मरणे तू
माझा देह तू, माझा आत्मा तू

माझे प्रश्न तू, माझी उत्तरे तू
माझी खळबळ तू, माझी कळकळ तू

माझा गुलाब तू, माझा चाफा तू
माझी मैत्री तू, माझे प्रेम तू

माझा धर्म तू, माझे इमान तू
माझा चेहरा तू, माझी ओळख तू

माझा मान तू, माझी शान तू
माझे हसणे तू, माझे सजणे तू

माझे डोळे तू, माझे अश्रू तू
माझी नजर तू, माझा हुंदका तू

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाचून झाल्यावर
अपार उत्सुकतेने तिने विचारले
आणि शेवटचे कडवे काय आहे
.
तो म्हणाला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माझा 'मी' ना राहिलो,
तुझा 'मी' फक्त उरलो.......
सखे आता सारे हवाली तुझ्या,
तुझ्याविना श्वासांनाही गती नाही माझ्या

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ती क्षणात सुन्न....

(भाग १ समाप्त)

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२१/१०/२०११)

******
मित्रांनो,
भाग १ इथे समाप्त!!
लवकरच पुढील भाग घेऊन येईन....
तो पर्यंत
..... जरा विश्रांती......
******

करुणकथाकवितामुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानराम's picture

21 Oct 2011 - 2:26 pm | ज्ञानराम

छान.

छान आहे

अवांतर भाग 1 समाप्त ऐवजी मालिका 1 समाप्त योग्य ठरलं असत अस मला वाटत

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

21 Oct 2011 - 5:57 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

या मालिकेतील हा पहीला भाग संपला, दुसर्‍या भागात मालिका सुरु राहणार आहे.
कधी ते माहीत नाही, पण लिहीणार आहे. :(

जशी तुमची इच्छा

पु.ले.शु.

वपाडाव's picture

21 Oct 2011 - 6:02 pm | वपाडाव

मालिका 1 समाप्त

जाइशी सहमत....

प्रकाश१११'s picture

21 Oct 2011 - 6:45 pm | प्रकाश१११

छान लिहिले आहे
त्याच्या नजरेत विश्वाचा आनंद दाटला
अन् त्याचा हात लेखाणीकडे सरसावला
.मस्तच ...!!

विदेश's picture

21 Oct 2011 - 7:53 pm | विदेश

मलाहि समजण्यात गोन्धळ झालेला आहे.
म्हणून म्हणत आहे -
काव्य-मालिका प्रवेशांच्या पहिल्या भागाचा पहिला अंक आवडला आहे.
पुढील मालिका-प्रवेशांच्या दुस-या भागाचा दुसरा अंक येऊ द्या.

फिझा's picture

24 Oct 2011 - 1:14 pm | फिझा

हि कविता वाचताना ती कधि सम्पुच नये,,,,असे वाटते.