आता पावसाळा सुरु झालाय
हिरव झाड
खूपच घनदाट झालंय
.
आता त्याला
फळ धरायला लागली आहेत
त्याच्या फुलांनी आता
रक्तवर्ण घेतलाय
हि लाल-हिरवी रंगसंगती
खूप खुलून दिसतेय माळरानावर
.
.
अन त्याच्या पार्श्वभूमीवर
वठलेल्या झाडाच्या
काळ्याभोर फांद्या
.
गोंडस बाळाला काजळटीट लावतात ना
अगदी तश्याच
.
आजच्या धो धो पावसात
वठलेले झाड
आकंठ भिजले होते
.
त्याच्या कोरड्या जगण्यात
हाच काय तो थोडासा
ओलावा
.
पण त्याची भीती वेगळीच
जर चुकून
या वर्षावामुळे.... एखादी
पालवी फुटलीच
.
तर.... त्या चैतन्याला
.
कोरड्या सहानभूतीशिवाय
ते काय देऊ शकणार होते?
(क्रमशः)
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१३/१०/२०११)
प्रतिक्रिया
13 Oct 2011 - 7:17 pm | पैसा
मस्त रे!
13 Oct 2011 - 8:02 pm | अविनाशकुलकर्णी
मस्त..कल्पना..
आवडले काव्य
13 Oct 2011 - 8:08 pm | ५० फक्त
आता या मालिकेवर प्रतिसाद द्यायला शब्दच उरले नाहीत, जेंव्हा भेटाल तेंव्हा बोलेन याबद्दल.
13 Oct 2011 - 9:07 pm | प्रकाश१११
छान लय सापडलीय..!!
14 Oct 2011 - 1:23 pm | गवि
अरे.. एकापेक्षा एक सुंदर भाग..
व्यनी करतोय.
14 Oct 2011 - 2:01 pm | जाई.
सुंदर