त्या हिरव्या झाडाचे
एक कोवळे फुल
त्या खोडसाळ वार्याने
खुडले
चटका देणारी उन्हे होतीच
वार्याच्या जोडीला
.
बिचारे येऊन पडले
वठलेल्या झाडाच्या आसर्याला
फुलाचे हाल त्याला बघवत नव्हते
.
आपले सुकलेले पान
आपसूकच
गाळले अखेर त्या फुलासाठी
बहुदा शेवटचे
.
वठलेल्या झाडाची मुळे
आता खरेतर घुसमटली आहेत
त्यांना आता मातीचा कारावास अन्
तिची घट्ट मिठी असह्य झालीये
.
श्वास कोंडणार्या मगरमिठीत
शांत पहुडून राहायचे म्हणजे
.
असं म्हणतात
चिवटपणा हा मुळांचा गुणधर्म
पण फक्त मुळांनाच ठाऊक असते
कि हे तर त्यांचे
विदारक प्राक्तन
(क्रमश:)
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०४/१०/२०११)
प्रतिक्रिया
4 Oct 2011 - 11:35 am | गवि
सुंदर आहे रे.. नाऊ यू आर इन युअर फुल फॉर्म..
4 Oct 2011 - 1:00 pm | विश्वेश
येउ द्या पुढचा भाग ...
वाचत आहे ...
4 Oct 2011 - 1:19 pm | गणेशा
पुन्हा वाचुन छान वाटले.
संपुर्ण क्रमशः कविता वाचल्या आहेतच.
4 Oct 2011 - 2:04 pm | पाषाणभेद
वाचतो आहे
4 Oct 2011 - 2:08 pm | जाई.
सुंदर
4 Oct 2011 - 10:36 pm | प्रकाश१११
मिका. --छान आवडली ..!!
असं म्हणतात
चिवटपणा हा मुळांचा गुणधर्म
पण फक्त मुळांनाच ठाऊक असते
कि हे तर त्यांचे
विदारक प्राक्तन
6 Oct 2011 - 10:08 pm | अत्रुप्त आत्मा
चिवटपणा हा मुळांचा गुणधर्म
पण फक्त मुळांनाच ठाऊक असते
कि हे तर त्यांचे
विदारक प्राक्तन.......... हां... अब बात आने लगी...
अता कविता मुळ धरायला लागलीये,इस लीये... अब...आने दोव... आने दोव