माळरान अन् ते दोघे!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
3 Oct 2011 - 11:24 am

कधी कधी आपण मनाच्या या दोन्ही अवस्थांमधून जात असतो.
कधी मनाचा हिरवेपणा, तर कधी ओसाड.
अशाच काहीशा अवस्थांची ही दैनंदिनी.
म्हटले तर कविता, म्हटले तर कथा....
कोणत्याही एका साच्यात ते बसवणं शक्यचं नव्हतं.
ते ओघवतच हवं होत.

*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|

एक विशाल माळरान
त्या माळरानावर
दोनचं झाडे
एक हिरवे, रसरसलेले
अन दुसरे...
.
खूप वारा असे त्या माळरानात
अगदी भिन्नाट म्हणावे तसा
खरे तर वार्‍याची काहीच चूक नाही
वाहणे हा तर त्याचा धर्म
शिवाय
त्याला अडवायलाही कोणीचं नाही तिथे
.
.
वार्‍यावर डोलणार्‍या हिरव्या फांद्या पाहून
ते दुसरे वठलेले झाड
हलकेच हसायचे स्वताशीच
बहुदा त्याच्या काही आठवणी जाग्या होतं
.
बरीचं पाने
गळून गेली आहेत त्याची
.
.
आता त्याच्या पोटात एक
ढोली तयार झाली आहे
नाही बहुदा पोकळी
निर्वात नाही पण
पोकळीच आहे
.
काय गंमत आहे ना
त्याची पोकळीसुद्धा
मोकळी नाही
.
त्या माळरानावर आज
खूप सारे काळे ढग जमलेत
त्यांच्या सावलीने काजळी धरलीय
ते उजाड माळरान सावळेसे भासतेय
त्या सावल्यांच्या वर एकच
हिरव्या झाडाची
निळसर गुलाबी कळी
वेडी... एकटीच हसणारी
.
त्या मुरलीधराच्या मुकुटावरील
मोरपिसासारखी
.
.
देव तरी कसा ना
कुठेही प्रकटतो

(क्रमशः)

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०३/१०/२०११)

करुणकथाकवितामुक्तक

प्रतिक्रिया

कळी हिरव्या झाडावर आलीये.
यात वठलेल्या झाडाची भुमीका काय ते आगामी भागात समजेल काय? अन कवितेत क्रमश: बहूदा पहिल्यांदा पाहतोय.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Oct 2011 - 2:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

यात वठलेल्या झाडाची भुमीका काय ते आगामी भागात समजेल काय?

होय.

अन कवितेत क्रमश: बहूदा पहिल्यांदा पाहतोय.

ह्याला कविता म्हणावे कां कसं? म्हणूनच सुरवातीचे प्रास्ताविक आहे.

कवितानागेश's picture

3 Oct 2011 - 2:59 pm | कवितानागेश

:)

प्रास's picture

3 Oct 2011 - 4:13 pm | प्रास

मिकाभौंच्या प्रतिभेचा कथा-कवितारूपी मुक्तकस्वरुपातला करुण आविष्कार बघून नेमकं काय वाटलं ते पुढल्या भागात (जो बहुदा शेवटचा असेल तर) सांगितले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती.

:-)

विश्वेश's picture

3 Oct 2011 - 4:17 pm | विश्वेश

आता त्याच्या पोटात एक
ढोली तयार झाली आहे
नाही बहुदा पोकळी
निर्वात नाही पण
पोकळीच आहे

प्रकाश१११'s picture

4 Oct 2011 - 10:34 pm | प्रकाश१११

मिका. --छान आवडली ..!!