आटपाट नगरात नवीन घर आणि ऑफिस...!!!

प्यारे१'s picture
प्यारे१ in जनातलं, मनातलं
5 Aug 2011 - 5:58 pm

नेहमीप्रमाणे कन्फ्युजन. काय करावं बरं असा प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर आलोय.
नक्की काय झालंय हे नमनाला घडाभर तेल न घालता सांगतो.

आटपाट नगर होतं. गावामध्ये बारा बलुतेदार, अठरा पगड जातीजमातींचे, विविध व्यवसाय असलेले, विविध कौशल्ये असलेले लोक एकत्र येत जात होते.... तुम्ही म्हणाल 'राहत होते' असे हवे ना? नाही येत जात होते असेच बरोबर आहे.

त्या गावाचं वैशिष्ट्यच असं होतं की नगरामध्ये लोक राहत नव्हते. तरी प्रत्येकाचं एकेक घर, एकेक निवारा या नगरामध्ये होता. थोडं सेकंड होम्स टाऊन शिप सारखं म्हणा ना! बर्‍याच्शा लोकांची स्वतःची वेगळी घरं त्यांच्या त्यांच्या गावी होती. या सेकंड होम टाऊनशिप मध्ये.. आटपाट नगरामध्ये... लोक यायचे ते दोनचार दिवस आराम करायला. हसायला, खेळायला, मस्ती करायला. कधी दु:ख विसरायला तर कधी नवीन काही शिकायला. कुणी शिकलेलं विसरायला देखील यायचं. काही तरुण पोरं यायची टवाळक्या करायला. काही म्हातारे शिंगं मोडून पोरांच्यात वासरु बनून दम्गा देखील करायचे.

आणि व्हायचं काय की आपल्या आटपाट नगरात यायला आणि निवारा करायला नवीन कुणाला बन्दी अशी नव्हती. बरेचसे नवीन लोक आटपाट नगरात यायचे आणि तिथे रुळायचे. अर्थात बरेच लोक आटपाट नगरात येताना आपले मोठेपण, आपले पद, आपले वय, सगळं सगळं विसरुन यायचे. कारण वर सांगितल्याप्रमाणे बरेचसे इथे निवांत व्हायला यायचे. निवांतपणा मिळवायचे मार्ग वेगळे असले तरी उद्देश निवांतपणाच ना !

आता या निवांतपणामध्ये सगळे लोक जेव्हा एकत्र यायचे तेव्हा प्रत्येकाला काही ना काही करता यायचे. कुणी कविता कर, कुणी गोष्टी ऐकव, कुणी आणखी काही बनवून लोकाम्ना दाखव, कुणी नवीन कुठला पिक्चर बघितला ते लोकांना सांग. नवीन वाचल्या गेलेल्या पुस्तकांची, कलाकृतींची, बातम्यांची अगदी खुसपट संदर्भाची देखील चर्चा व्हायची.

एखादा नवीन यायचा सुटाबुट घालून. जणू कामासाठीच आटपाट नगरात आला आहे. कामाच्या व्यापात एखादा असतो कातावलेला म्हणून आपण समजून जातो. बरं ठीक आहे म्हणून थोड्या वेळाने येईल कपडे बदलून असे म्हणून घेतो समजून. बरेचसे नवीन लोक पटकन समजूनही घेतात. सुटबुट उतरवतात. सुट्टीचे कपडे घालतात. पण म्हणतात ना 'अपवादाला नियम' असतात का काय ते....! एखादा असतो. जो आटपाट नगरात पण तसाच वागू पाहतो. कळत नाही त्याला तो त्याच्या कंपनीत असेल मोठ्या हुद्द्यावर म्हणून आटपाट नगरात थोडीच त्याचा अम्मल सगळीकडे चालणार असतो ?
काही लोक फारच भारी असतात. त्यांनी त्यांच्या घराचं वस्तुसंग्रहालय केलेलं असतं.चाणि आटपाट नगरात ते आपल्या घरच्या काही वस्तु घेऊन येतात आनि सगळ्यांना सांगतात तुम्ही बघा आणि काहीही करुन कौतुक करा. काही लोक खूपच हुशार अस्तात आणि खरंच खूप प्रामाणिक आणि प्रवीणही असतातं त्यांच्या त्यांच्या कामामध्ये. पण होतं कसं ना की सगळ्या लोकांना नसते ना आवड सुट्टीत क्लास करायची. :P

हल्ली थोडी अडचण आलीय. कदाचित मलाच जाणवतेय का काय कुणास ठाऊक. आटपाट नगरामध्ये एक नवीन गृहस्थ (नागरीकच म्हणूया त्याना) आलेत असं ऐकलंय. जास्त हुशार आहेत. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घराचं बुकींग-बंगल्याचंच खरंतर- १३ व्या वर्षी केलं आणि १५ व्या वर्षी राहायला पण आले. हल्लीच आटपाट नगरीचं नागरीकत्व त्यांनी घेतलं पण झालंय काय की त्यांनी त्यांचं घर आटपाट नगरात आणलंय आणि नुसतं घरच नाही महाराजा त्यांनी त्यांचं ऑफिस पण आणलंय.

होतंय कसं की त्यांच्या घरच्या काही वस्तु आणि बर्‍याच वस्तुंचा कचरा सगळ्या आटपाट नगरीत पसरायला लागलाय हो.
त्यांनी एक नवीन स्कीम देखील आणली आहे. त्यांच्या ऑफिस मध्ये नवनवीन गोष्टींचे आराखडे मिळणार आहेत म्हणे. इथल्या सगळ्या नागरीकांना आवाहन करुन झालंय की आराखडा घ्या आणि त्याचं का ही ही... करा. तास दिड तास खूप त्यांना १० आराखडे करायला.

मला प्रश्न पडलाय की या नागरीकाला आटपाट नगरीत हवे तसे कौतुक आणि आराखड्यांवर काम करणारे लोक मिळणार आहेत का? की या नव नागरीकाची प्रतिभा आणि अगाध ज्ञान याचा म्हणावा असा उपयोग आटपाट नगरी करुन घेऊ शकणार नाही?

काय करायला हवे?

डिस्क्लेमरः टाकायलाच पायजे? ;)

धोरणबालकथावाक्प्रचारविडंबनशुद्धलेखनतंत्रराहणीमौजमजासद्भावनाशुभेच्छासल्लाप्रश्नोत्तरेप्रतिक्रियाआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

पल्लवी's picture

5 Aug 2011 - 6:11 pm | पल्लवी

गोष्टींकडे सरळ सरळ दुर्लक्ष करणे हा साधा-सरळ उपाय नव्हे काय ?

प्रचेतस's picture

5 Aug 2011 - 6:14 pm | प्रचेतस

मी तर असेही ऐकलेय की त्या नव्या स्कीममध्ये जिलबीच्या साच्याचाही समावेश आहे. त्यामुळे त्या नगरीत सतत जिलब्या पडायला लागल्यात म्हणे. जिकडे जाल तिकडे जिलबीच जिलबी. आटपाट नगरीतील सगळी दुकाने जिलब्यांनीच भरून गेलीत म्हणे.
आता काही जणांना जिलब्या आवडतात तर बरेच जण जिलब्यांना नाके मुरडतात पण रोजरोजच जिलब्या पडायला लागल्या तर इतरांना ते कसे आवडणार?

तुम्हा डायबेटीसवाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे कळत नाय?
तुम्हाला डॉक्टरांनी बजावलाय ना की नका गोड-धोड खाउ, तर जाता कशाल्या त्या हलवायाच्या दुकानात?
बाकीचे गोड खाऊ बघतील त्याच काय कारायच ते. हाय का नाय? ;)

- (सर्वचापी) गणु

प्रचेतस's picture

5 Aug 2011 - 7:09 pm | प्रचेतस

पण आम्ही जिकडं जाउ तिकडं तिकडं आम्हाला जिलब्यांचीच दुकानं दिसून राह्यलीत ना बाप्पा, ;)

आहा रे लेका, मग तुमची स्वतःची खमंग दुकान उघडाना (आमच्या सारख्यांचा डब्बल फायदा ;)) त्यांच्या जिलेबीवर फोडणी का टाकताय? ;)

प्रचेतस's picture

5 Aug 2011 - 7:18 pm | प्रचेतस

आमच्यात कुठली एवढी चतुरस्त्र प्रतिभा खमंग दुकानं उघडण्याची, आम्ही आपली गरीब गिर्‍हाइकं दुकानांतून खरेदी करणारी :) त्यामुळे ग्राहक हक्क संऱक्षण कायद्याखाली आम्ही दाद मागणारच ना (जिलब्यांच्या मोनोपॉली निमित्त)

जाउदे. आवांतरकरुन गण्याने धागा हायजॅक केला म्हणतील आमचे मित्र.
पुढील वाद चर्चा खवत करु.
काय म्हणता? :)

प्रचेतस's picture

5 Aug 2011 - 7:28 pm | प्रचेतस

चालेल. आमची काहीही हरकत नाही हो

अवांतरः श्रावण महिन्याच्या निमित्ताने तुमच्याकडून आमच्यासारख्या शाकाहार्‍यांसाठी एका शाकाहारी पाककृतीची वाट बघतोय. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Aug 2011 - 7:20 pm | विश्वनाथ मेहेंदळे

गणपा भाऊ, तुमचे म्हणणे १००% पटले. पण मी खात्रीशीर सांगतो, दुकानात नवी जिलबी आली, की सर्वात जास्त आनंद डायबेटीसवाल्या लोकांनाच होत असणार, हलवायाच्या नावाने शिमगा करायला संधी मिळाली म्हणून.

सर्वात मजा अशी की काही लोकांना हे धागे आवडत नाही, पण तीच लोक प्रतिसाद देऊन देऊन हे धागे वर ठेवतात आणि मग नंतर "चांगले धागे खाली गेले" असा गळा काढून लेखकाला दोष देतात.

पण त्यांचे हे वागणे चूक आहे असे म्हणता नाही येणार. कारण अशा लोकांवर / धाग्यांवर विविध प्रकारे टीका करायची संधी मिळाल्यामुळे टीकाकारांच्या प्रतिभेला धुमारे फुटतात. शिवाय सर्व टीकाकारांचा एक संघ निर्माण झाल्यामुळे संघभावना तयार होते (नाहीतर ४ मराठी माणसांची मते जुळली आहेत कधी?). इतरही अनेक फायदे आहेत. त्याबद्दल नंतर कधीतरी.

बाकी बोला, तुम्ही कधी येताय मुम्बईत ?

विमे, तुम्ही सुद्धा?
स्वगतः वड्याचे तेल वांग्यावर यासारखा तर हा प्रकार नाही ना?:)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Aug 2011 - 12:46 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>विमे, तुम्ही सुद्धा?
तुमचा रोख नाही कळला.

>>वड्याचे तेल वांग्यावर यासारखा तर हा प्रकार नाही ना?
छे हो. तळणातील उरलेले तेल पोहे बनवण्यासाठी वापरल्या गेलेले आहे ;-)

प्रचेतस's picture

6 Aug 2011 - 1:06 pm | प्रचेतस

तुमचा रोख नाही कळला.

नाही कळला तर सोडून द्या ;)

तळणातील उरलेले तेल पोहे बनवण्यासाठी वापरल्या गेलेले आहे

पोहे खाण्यास आम्हास न बोलावल्याबद्दल निषेध :)

कृपया माननीय परा यांनी इकडे लक्ष द्यावे.
:)

किसन शिंदे's picture

5 Aug 2011 - 6:16 pm | किसन शिंदे

:D :D

कोणत्या चक्कीतलं दळण खाता ओ?

किसन शिंदे's picture

5 Aug 2011 - 6:20 pm | किसन शिंदे

प्रकाटाआ

मृत्युन्जय's picture

5 Aug 2011 - 6:39 pm | मृत्युन्जय

थत्ते चाचा मोड सुरु < तुर्तास काही न बोलायचे ठरवले आहे > थत्ते चाचा मोड समाप्त.

अर्धवट's picture

5 Aug 2011 - 6:43 pm | अर्धवट

है तिच्यायला

आयला हे भारी आहे. ताकाला जावून भांडे लपवण्यात मजा आहे खरी.
डायबीटीसवाल्यांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत कायम चिघळत राहतात.
आमच्या प्रोडक्शन म्यानेजर ला दोनच आठवड्यात स्विस वरून परत यावे लागले त्याच्या पायाला जखम झालीय आणि भाऊ आधीच डायबेटिक आहे त्यात बंगाली.

हवांतर :नव्या मेम्ब्रांना (कि मेंढरांना) प्रोत्साहन द्यावे' ह्या विनंतीची पायमल्ली का होत आहे ?

नगरीनिरंजन's picture

5 Aug 2011 - 8:09 pm | नगरीनिरंजन

रो मत प्यारे... अरे, ये निजी दुकानवाले इधर का उधर उठा उठा के चिपका देते है रे
तू भी उनके जलेबी पे अपनी जलेबी मत डाल, मिपा की इज्जत बहुत कीमती है रे..........

अनामिक's picture

5 Aug 2011 - 8:30 pm | अनामिक

काय करायला हवे?

आटपाटनगराच्या नगराध्यक्षांना किंवा नगरसेवकांना विचारा. उगाच 'मन'सैनीक होऊन कचरा साफ करायला चौकात उभे राहून येणार्‍या-जाणर्‍याला "खूप कचरा झालांय हो... काही तरी करुया" असे ओरडून सांगण्याने काही हशील होत नाही. त्यासाठी नगरसेवक आणि पालीकेचीच मदत घ्यावी लागते. आणि जर नागरीक नगराच्या नियमाप्रमाणे वागून, त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर दुर्लक्ष करावे. नव्याचे नऊ दिवस सरले की सगळे नागरीक सारखेच वागू लागतात.

हे काय आनि कुनाबद्द्ल चल्लेलय?

सौन्दर्य's picture

6 Aug 2011 - 8:54 am | सौन्दर्य

मला देखील कुणितरी सांगा रे

सौन्दर्य

सौन्दर्य's picture

6 Aug 2011 - 9:56 am | सौन्दर्य

आत्ताच मिपा वर आणखी काही लेख वाचले आणि उत्तर मिळाले.

सौन्दर्य

सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक आभार.

आज या ठिकाणी मला संपादक मंडळाला विनंती करायची आहे की आपण हा धागा उडवावा. कारण या धाग्याचा जो उद्देश होता तो सफल झालेला आहे. तीर 'निशाण्या'वर लागलेला आहे असे आम्हाला तरी वाटते. संदर्भ लगेच मिळेल.

वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे जिलेबीच्या रुपकात आपण बोलायचे झाले तर आम्हाला डायबेटिस नाही त्यामुळे आम्हाला गोड खाण्याची कुठल्याही प्रकारची बंदी नाही. त्यामुळे आम्ही नवीन दुकान पाहून तेथील जिलेब्या खाल्ल्या.
या हलवायाच्या जिलेब्या आम्ही खाल्ल्या आणि हलवायाला सांगितले की बाबा रे जिलेब्या बेचव आहेत तर हलवायाला आम्ही 'जाणकार खवय्ये' वाटत नाही आणि त्याउप्पर हलवाई आम्हाला जिलेबी बनवायला साचा घेऊन जा असा उफराटा सल्लाही देतो. फक्त आणि फक्त चांगले म्हणणारे ग्राहकच हलवायाला चांगले वाटतात असे दिसते. असो.

बाकी अधिक चौकशी अंती हलवायाचे मुख्य दुकान दुसरीकडे असून इकडचे नवीन दुकान ही शाखा आहे आणि मुख्य दुकानात बनलेला माल इकडे आणला जात आहे. (पुण्यात असून शाखा कशी असा 'प्रश्ण' आम्ही विचारीत नाही ) बरे माल मुख्य दुकानात बनला आहे की कुठे याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही पण माल तरी चांगला हवा. आटपाट नगरात चांगले हलवाई आहेत आणि अतिशय चांगला माल देतात. आता लागलीये सवय बुवा आम्हाला चांगले चुंगले खाण्याची. काय करणार ?

तसे म्हटले की हलवाई चिडतो. आमचे जुने 'कष्टंबर'च आम्हाला प्रिय असे म्हणतोय आणि आलेल्या ग्राहकाला तुम्हीच जिलेब्या पाडा म्हणतो. आता ग्राहकाला जिलेब्या पाडायला सांगणारा हलवाई भेटल्याने समोसा कचोरी खाणारे आम्ही नवीन कष्टमर जरा हलवायाच्या मागे लागलो तर बिघडले कुठे?

धागा उडवण्याची विनंती वर केली आहेच. आमच्याकडून अक्षर वाङमय लिहीले जात नाही त्यामुळे एखादा धागा उडाला तर काही फरक पडत नाही. मुख्य म्हणजे धाग्याचा हेतू पूर्ण झाला आहे. हलवाई बदलणार नाही हे आता कळून चुकले आहे. (आधीच आले होते पण जरा टीपी करावा असा उद्देश होता )

याउप्पर काय करायचे तुम्हीच सांगा.